Monday, 18 June 2018

जळगाव भाजपतील यादवी ... !

भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा शाखेत उभी फूट पडली आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडलेले मात्र मंत्रीपदाची तीव्र इच्छा आजही बाळगून असलेले एकनाथराव खडसे यांचा एक गट आहे. त्यांच्या सोबत खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे हे दोघेच दिसून येतात. दुसरा गट विद्यमान जल संपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचा आहे. त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जळगाव महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे (कधी इकडे कधी तिकडे) यांच्यासह खासदार ए. टी. पाटील, आमदार उन्मेष पाटील, हरिभाऊ जावळे, सौ. स्मिता वाघ, चंदुभाई पटेल यांचे गूळपीठ दिसते.

Saturday, 16 June 2018

वाकडी येथील दुसरी बाजू ...

वैधानिक इशारा – वाकडी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे मांतग समाजातील दोन मुलांना नग्नावस्थेत झालेली मारहाण आणि अनुसूचित जमातीतील एकाला धमकावण्याचे अमानविय कृत्य करणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या दोघांसह त्यांचे इतर दोन बघे साथीदार (ते सुद्धा अनुसूचित जमातीचे आहेत) यांना प्रचलित कठोर कायद्यांमधील सूचविलेली कमाल शिक्षा झालीच पाहिजे, असे मत लेखानापूर्वीच व्यक्त करीत आहे.)

राहुल गांधींना समज आहे ?

काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अपरिपक्व हरकती किंवा संवादाचे अनेक किस्से चर्चेत आहेत. यु ट्यूबवर राहुल यांच्याशी संबंधित अशा विषयावरील अनेक व्हीडीओ क्लिप पाहता येतात. तरीही एक युवा नेता म्हणून राहुल यांच्याकडे मी पाहतो.

Monday, 4 June 2018

असे जिंकले १९७१ चे युद्ध


पाकिस्तानी सैन्यदलाची शरणागती
सन १९४७ मध्ये भारताचे विभाजन होऊन दि. १४ ऑगस्ट १९४७ ला पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) हे अस्तित्वात आले. भौगोलिकदृष्ट्या दोन ठिकाणी विभाजीत अशा संयुक्त देशाचे अस्तित्व तेव्हाही अडचणीचे होते. पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी व पठाणी राजकिय नेत्यांचे पूर्व पाकिस्तानवर वर्चस्व होते. त्यांची भाषा उर्दू होती. पूर्व व पश्चिम पाकिस्तानची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक संस्कृती भिन्नच होती. पूर्व पाकिस्तान नैसर्गिक स्त्रोतांनी संपन्न होता. तेथे बंगाली नेते राजकिय वर्चस्व ठेवून होते. त्यांची भाषा बंगाली होती. राजकारणासह सरकारी नोकऱ्यांत पश्चिमी पाकिस्तानी मंडळींचे वर्चस्व होते. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तान विषयी प्रारंभापासून नाराजी होती.

Friday, 1 June 2018

ना. गिरीषभाऊंचा अटकेपार झेंडा !

पालघर मतदार संघात भाजप उमेदवार राजेंद्र गावीत यांना विजयी करुन जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्ह्याबाहेरील दुसऱ्या निवडणुकीत नेतृत्वाचा "अटकेपार झेंडा" लावला आहे.  नाशिक महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावून ना. महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द खरा करुन दाखविला होता. पालघरचा विजय हा त्यापुढील मोहिम असून आणि बदलत्या वातावरणात शिवसेनेच्या नाकावर टीच्चून जागा कायम राखण्याचे राजकीय कौशल्य ना. महाजन यांनी दाखविले आहे.

Monday, 28 May 2018

राझी चित्रपटाच्या निमित्ताने ...

१९७१ मधील युद्धाचा रंजक, रोमांचक आणि उत्कंठा वाढविणारा इतिहास
पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझी
मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला आणि नौदलातील वरिष्ठ निवृत्त अधिकारी लेफनन्ट कमांडर हरिन्दर सिक्का यांच्या “कॉलिंग सेहमत” या पुस्तकावर आधारित आणि अभिनेत्री आलिया भट हिची मध्यवर्ती भूमिका असलेला "राझी" (मराठीत अर्थ एखादे काम करण्यासाठी राजी होणे)  चित्रपट बघितला. बघितला हा शब्द गुळमुळीत वाटतो. चित्रपट अनुभवला असेच म्हणायला हवे. 

Saturday, 19 May 2018

स्फटिकासम मित्र हा !

जळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ तथा माझे मित्र सुशील अत्रे यांचा आज वाढदिवस. त्यांचे अभीष्टचिंतन करीत असताना त्यांच्याशी असलेली माझी मैत्री उलगडून दाखविणाऱ्या माझ्या भावना मी त्यांचे तिसरे पुस्तक ‘देवळे राऊळे’ यात व्यक्त केल्या आहेत. समाजातील काही मान्यवरांशी आपली मैत्री असावी असे आपणास वाटत असते. सुशीलभाऊ माझ्यासाठी अशा मान्यवरात अव्वल आहेत.

Tuesday, 15 May 2018

गब्बर के ताप से कौन बचा सकता है ?

जळगाव महानगर पालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील सुमारे २,३०० दुकानदार व त्यांच्यावर अवलंबून असलेली ६/७ हजार कुटुंबे आज व्यापार, व्यवसायाच्या अस्थैर्यामुळे चिंतीत आहेत. शांत आणि संपन्न बाजारपेठ ही सुखी व समाधानी समाज जीवनाचा अविभाज्य अंग असते. व्यापार, व्यवसायात अस्वस्थता असेल तर समाजमनाचा एक कप्पा अंतर्गत धुसमुसत असतो. हा अनुभव सध्या जळगावातील 'ते' २,३०० दुकानदार घेत आहेत. व्यापारी संकुलातील गाळ्यांचे जवळपास ५ वर्षांचे थकलेले भाडे आणि थकलेले इतर कर याचे ओझे डोक्यावर असलेल्या दुकानदारांना आपले काय होणार ? या चिंतेने ग्रासले आहे. कोणत्याही दुकानदाराचा गाळे भोगवटादार म्हाणून हक्क हिरावला जाऊ नये व त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही बहुतांश जळगावकरांची इच्छा आहे.

Sunday, 13 May 2018

नाथाभाऊ, नकाच होऊ मंत्री !

स्वकीयांनी उपेक्षा केलेल्या दोन 'हेवीवेट' नेत्यांबाबत योगायोगाच्या गोष्टी अलिकडे घडल्या आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरुन कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना जवळपास अडीच वर्षानंतर जामीन मिळाला. भुजबळ मूळ खटल्यातून निर्दोष सुटलेले नाहीत. भुजबळ जामीनावर बाहेर आलेत यावर ज्येष्ठनेते शरद पवार यांची सूचक प्रतिक्रिया आहे. पवार म्हणाले, 'भुजबळ बाहेर आल्याचा आनंद आहे पण जेव्हा मूळ खटल्यातून ते निर्दोष बाहेर येतील तेव्हा मला हर्षवायू होईल.' पवार यांचे हे सूचक वाक्य खटला अजून निकाली निघाला नाही याची जाणीव करुन देतो. 'ईडी' च्या चौकशी फेऱ्यात अडकल्यानंतर पक्षश्रेष्ठी व स्वकीयांनी भुजबळांची फारशी पाठराखण केल्याचे दिसलेले नाही.

Sunday, 29 April 2018

काश्मिरमधील विवाहितांची दुसरी बाजू - हाफ विडो

पुनीत शर्मा यांची नवी कादंबरी

कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे केलेल्या खुनाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेत जम्मू-काश्मिरमधील समाज जिवनाचे काळेकुट्ट प्रतिबिंब उमटले आहे. मुस्लिम-हिंदू समाजातील वर्चस्वाचा वाद, दुसऱ्या समाजाला घाबरवण्यासाठी केलेला गुन्हेगारी कट, गुन्हेगारांना पोलिसांची मदत आणि गुन्हेगारांना संरक्षणासाठी निर्माण केलेले जनमत असे ठळक विषय कठुआ घटनेत समोर येतात. याच पार्श्वभूमीवर जळगावचे लेखक पुनीत शर्मा यांनी 'हाफ विडो' ही काश्मिरात घडणाऱ्या काल्पनिक कथाबिजावर आधारलेली कादंबरी मला वेगळी वाटते. अर्थात, कठुआ प्रकरण घडण्यापूर्वी ही कादंबरी मी  वाचली आहे. पुनीत शर्मा यांची ही दुसरी साहित्यकृती. यापूर्वी त्यांचे 'एनिमी ईन मी' हे स्वयंशोधाचे समुपदेशनात्मक पुस्तक बाजारात आले आहे.