Showing posts with label Industry. Show all posts
Showing posts with label Industry. Show all posts

Thursday, 5 March 2020

'जैन है ... तो मुमकिन है ...

संपूर्ण जगभरात व्याप आणि जळगाव शहरात मुख्यालय असलेला 'जैन उद्योग समुह' परिस्थितीतून निर्माण झालेल्या काही तात्कालिक कारणांमुळे अडचणीत आहे. समुहाच्या संचालकांनी ही बाब भागभांडवलदार सभासदांच्या सभेत यापूर्वी प्रांजळपणे स्पष्ट केली आहे. जवळपास साडेसहा हजारावर कामगार-कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. तरीही सर्वजण रोज कामावर येत असून दैनंदिन जबाबदारी निभावत आहेत. कर्ज आणि व्याजाचे रोजचे देणे सुरु असल्यामुळे इतर आर्थिक व्यवहार प्रलंबित आहेत. अशा स्थितीत उद्योग समुहात पुरेशी गुंतवणूक करु शकणारे भागीदार शोधणे किंवा गरज भागवता येईल एवढ्या रकमेचा विदेशातील एखादा प्रकल्प विक्रीत काढणे या पर्यायांवर समुहाचे संचालक अथक परिश्रम घेत आहेत.

Friday, 28 October 2016

मुखवटा आणि चेहऱ्यातला संघर्ष ...

टाटा उद्योग समुहाचा “चेहरा” आजही टाटा परिवारातील अर्ध्वयू रतन टाटा हेच आहेत. परंपरा, विश्वास, प्रगती आणि राष्ट्रहित या मुल्यांची जोपासना करीत टाटा समुह गेल्या १४८ वर्षांत जगभरात विस्तारला. रतन टाटांच्या नंतर कोण ? हा प्रश्न निकाली काढताना सायरस मिस्री यांना टाटांचे वारस नेमले गेले. मात्र, अवघ्या ४ वर्षानंतर सायरस यांना वारसा पदावरुन पायउतार करण्यात आले. या मागील अनेक कारणे हळूहळू समोर येत आहेत. मुख्य कारण “मुखवटा आणि चेहरा” यांच्यातील संघर्ष हेच आहे, हेही स्पष्ट होत आहे. कार्पोरेट क्षेत्राचा खरा चेहरा हा संचालकांचे आपापसातील वर्तन, त्यांची कर्मचाऱ्यांशी वागणूक आणि लाभार्थी, ग्राहक तथा हिचिंतकांशी व्यवहार यावर ओळखला जातो. मात्र, बड्या उद्योग समुहात दिसणारे चेहरे आणि दाखवायचे मुखवटेही अनेक असतात. अशावेळी टाटांचा मूळ चेहरा आणि सायरस यांचा मुखवटा यांच्यात संघर्ष होतो. त्याचीच ही कारणमिमांसा ...