Showing posts with label Wheather. Show all posts
Showing posts with label Wheather. Show all posts

Sunday, 19 April 2015

गारपिटचे संकट अटळच !

महाराष्ट्रासोबत इतरही राज्यांमध्ये बारमाही होणार्‍या गारपिटचे नवे संकट शेतकर्‍यांसमोर दोन-तीन वर्षांपासून उभे ठाकले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीच्या तीनही हंगामातील पिकांना बसत असून शेतकर्‍यांसोबत केंद्र व राज्य सरकारही या संकटावर कशी उपाय योजना करावी? याच विचाराने हवालदिल आहे. गारपिट रोखण्याचे कोणतेही यंत्र-तंत्र-विज्ञान सध्यातरी जगात कुठेही उपलब्ध नाही. मात्र, अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने हवामान बदलाचा अंदाज घेवून बेमोसमी पाऊस, गारपिट किंवा वादळ-वारे याचा काही तास अगोदर विश्‍वासपूर्ण अंदाज देवू शकेल असे तंत्र जगभरात विकसित झाले आहे. हे यंत्र-तंत्र सरकारी खर्चाने किंवा शेतकर्‍यांनी सामूहिक सहकार्यातून शेतशिवारापर्यंत आणण्याचा विचार करायला हवा. तसे झाले तरच भविष्यात गारपिटच्या संकटातून शेती उत्पादनांचा बचाव करणे शक्य होणार आहे...