Showing posts with label गुन्हेगारीकरण. Show all posts
Showing posts with label गुन्हेगारीकरण. Show all posts

Saturday, 21 May 2016

दाऊद आणि राजकीय नेते ...

दाऊद इब्राहीम
पाकिस्तानातील कराचीत आश्रीत असलेला कुख्यात आंतराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या दाऊद हा भारतातील काही अभिनेते आणि राजकीय नेत्यांच्या कुंडलीत सातत्याने तेरावा ग्रह बनून उत्पीडन निर्माण करीत असतो. दाऊदसोबतच्या कथित संबंधामुळे पूर्वी काही चित्रपट अभिनेते, अभिनेत्री चर्चेत आले आहेत. काही राजकीय  नेत्यांचा कथित संबंधही दाऊदशी जोडला गेला आहे. पण, या संबंधाविषयी खात्रीशीर पुरावे किंवा सत्य कधीही समोर आलेले नाही.