Wednesday, 31 January 2018

खुद हो जाऊंगा बदनाम

अभी सूरज नहीं डूबा जरा सी शाम होने दो ……
मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम तो होने दो ……
मुझे बदनाम करने का बहाना ढूंढ़ता है जमाना ……
मैं खुद हो जाऊंगा बदनाम पहले मेरा नाम तो होने दो ……

Monday, 29 January 2018

सौंदर्याची कार्यव्रती सौ. संगिता पाटील

मित्रांच्या गोतावळ्यातील जुन्या परिचित मैत्रिण तथा जळगाव शहरातील मोजक्या सेलिब्रिटी वर्तुळातील सौ. संगिता प्रमोद पाटील यांचा आज वाढदिवस. जळगाव शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांना सर्वजण आदराने संगितामैम म्हणतात. व्हीआयपी मंडळींच्या व्हाट्सऍप गृपमध्ये मी त्यांना संगिताबाई म्हणत असे. अर्थात, त्यांनी कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही. या मागील कारण होते की, मैम या शब्दात असलेला औपचारिकपणा हा बाई शब्दांतून गळून पडतो. बाई हे मराठी संवादातही अधिकाराचेच पद आहे. त्यामुळे सौ. संगिताबाईंनी कधीही माझ्या लेखनावर आक्षेप घेतला नाही. त्यांचे पती व सहकार कायद्याचे विधीज्ञ प्रमोद पाटील यांच्याशीही माझा असाच मोकळाढाकळा परिचय आहे.

Sunday, 21 January 2018

मनमौजी निरागस मित्र !

जळगाव शहराचे बारावे महापौर आणि मनसेच्या १२ नगरसेवकांचे नेते ललितभाऊ कोल्हे यांचा आज वाढदिवस. जवळच्या आणि जिवाभावाच्या काही मित्रांचे त्यांच्या वाढदिवसाला मनःपूर्वक अभीष्टचिंतन करताना त्यांच्या विषयी चांगल्या गोष्टी लिहण्याचा वसा अनेक वर्षांपासून मी जपला आहे. वृत्तपत्राच्या व्यापातून बाजुला झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. ओळखीचे रुपातंर परिचयात झाले. परिचयातून मैत्री वृद्धींगत झाली. काही मोजक्या लोकांशी विवाद होवूनही गाढ मैत्री झाली. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून हक्काच्या वाचकांपर्यंत पोहचताना मित्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरांना माहित नसलेले पैलू उलगडण्याची संधी साधत आलो आहे. याच परंपरेत आज ललित कोल्हे यांच्या विषयी ठरवून लिहित आहे. विवादातून झालेल्या या मैत्रिची प्रवास लक्षवेधी आहे.

Wednesday, 10 January 2018

समांतर रस्ते जनआंदोलनाचा आदर्श व अन्वयार्थ ...

जळगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व समांतर रस्ते विकास संदर्भात समांतर रस्ते कृती समितीने केलेल्या महामार्ग रोकोला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी महामार्ग रुंदीकरण व समांतर रस्ते विकासाबाबत आंदोलनकर्त्या नागरिकांसमोर कालबध्द कामांची घोषणा केली. एवढेच नव्हे तर काम पूर्ण करण्याची लेखी हमी जळगावमधील तटस्थ व मान्यवर नागरिकांना दिली. हे चेहरे राजकीय नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून समांतर रस्ते कृती समिती निग्रहाने बाजुला झाली आणि नागरिकांतर्फे तटस्थ निरीक्षकांनी लेखी हमीपत्र स्वीकारले, या मागील संकल्पना हिच तर खरी जनआंदोलनाची आहे.

Thursday, 4 January 2018

शालेय शिक्षणातला अनोखा प्रयोग - एड्युफेअर २०१८

आंतराष्ट्रीयस्तरावरील शालेय शिक्षणाचे उच्च मानांकन पूर्ण करीत हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंटरनॅन्शल स्कूलची निर्मिती करणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत तथा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन तथा मोठेभाऊ यांनी अत्यंत दूरदृष्टीने सामान्य समाज घटकातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलची सुध्दा निर्मिती केली. मोठेभाऊंनी लावलेली शालेय शिक्षणाची ही दोन रोपे आता वृक्षागत बहरत आहेत. दोन्ही शाळांमधील अध्यापन आणि अध्ययनाची संकल्पना ही हसत खेळत शिक्षण आणि खेळता खेळता शिक्षण अशी आहे. शिक्षकांच्या सोबतच विद्यार्थीही नाविन्यपूर्ण अध्यापन साहित्याचा शोध घेवून शिक्षण प्रक्रियेला सहज, सोपी, सुलभ व आनंदायी करीत आहे.