Tuesday, 19 September 2017

मला किशोर राजे निंबाळकर व्हायचे आहे ... !

किशोर राजे निंबाळकर
लेखाचे शिर्षक वाचून अनेकांना वाटेल, हे काय खूळ आहे. प्रत्येकाला कलेक्टर किशोर राजे निंबाळकर कसे होता येईल ? कलेक्टर होणे एवढे सोपे आहे का ? हे दोन्ही प्रश्न रास्त आहे. पण, स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होवून अमर्याद अधिकार असलेला कलेक्टर होणे फारसे अवघड नसले तरी अधिकारांचे उच्च पदस्थ बुजगावणे व्हायचे की अधिकारांचा समाजासाठी वापर करीत माणूस व्हायचे याचा निर्णय प्रत्येकाला घेता येणे शक्य आहे. लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी म्हणून प्रचंड अधिकार प्राप्त असले तरी सामान्य माणसासाठी लोकसेवकाच्या मानसिकतेतून माणूस होणे फारच थोड्यांना साधते. तसे ते जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना साधले आहे. “माणूस असलेला अधिकारी” अशी ओळख राजे निंबाळकर यांनी निर्माण केली आहे.  

Friday, 1 September 2017

स्थितप्रज्ञ नाथाभाऊ ...



नाथाभाऊंचा आज वाढदिवस. जवळपास पाच दशकांचा राजकिय प्रवास नाथाभाऊ पूर्ण करीत आहेत. त्यातील किमान तीन दशके नाथाभाऊंना पत्रकाराच्या नजरेतून अनुभवतोय. राजकारण व समाजकारणाच्या व्यासपीठावर अनेक पद आणि प्रतिष्ठा स्वकर्तृत्वाने मिळून नाथाभाऊंचे व्यक्तिमत्त्व सद्गुण संपन्न झाले आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर समोर आलेल्या परिस्थितीत नाथाभाऊ कसे वागले, बोलले आणि गप्प सुद्धा राहिले याचा एक दृश्यात्मक आलेख समोर येतो. ज्ञानेश्वरीत सोप्या भाषेत स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे समजावली आहेत. नाथाभाऊंचे आजचे व्यक्तिमत्त्व हे स्थितप्रज्ञ अवस्थेतील आहे असे वाटते. ज्याची बुद्धी पूर्णतः स्थिर आहे, अशाच व्यक्तिला श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ म्हणतो ... 

Thursday, 31 August 2017

प्लास्टीक तांदुळाचे थोतांड ते कुभांड ...

भारतात एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरातील गणपती दूध पीत असल्याची तद्दन फालतू बातमी टीव्ही माध्यमातून जगभरात दाखविली जाते. फोनच्या माध्यमातून ती अफवा देशभरात पोहचते. त्यानंतर घराघरातील तहानलेले गणपती गटागटा दूध प्यायला लागतात. टीव्ही आणि फोन माध्यमाद्वारे निर्माण झालेल्या या अफवेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.  

Thursday, 24 August 2017

अब्दुल्ला के तलाक में बेगाने दिवाने ...

कौटुंबिक व्यवस्थेत मुस्लिम महिलांचे अस्तित्व आणि पत्नीत्व या स्थानाला स्थैर्य देणारा अंतरिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तोंडी (ट्रिपल) तलाक विरोधात भारतीय संसदेत कायदा बनवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तोंडी तलाक संदर्भातील एका खटल्याची सुनावणी केल्यानंतर अंतरिम निकाल देताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.  निकालावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने तलाक–तलाक–तलाक हा प्रकार घटनाबाह्य ठरवला आहे. न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत, तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. मुस्लिम समाजातील कोणताही विवाहीत पुरूष पुढील सहा महिन्यांत पत्नीला तोंडी तलाक-तलाक-तलाक म्हणत घटस्फोट देवू शकणार नाही.

Thursday, 17 August 2017

एमआयडीसीसाठी भू संपादनाचे मे १९९५ चे परिपत्रक रद्द ...

रद्द केल्याचा सरकारचा एकनाथ खडसे यांना खुलासा

भोसरी (जि. पुणे) येथे औद्योगिक वसाहतीकरिता सन १९६७ आणि त्यानंतर १९७१ मध्ये भूसंपादनासाठी नोटीसा (अनुक्रमे ३२-२ आणि ३२-१) दिलेल्या भूखंडाचा कागदोपत्री ताबा अद्यापही एमआयडीसीकडे नाही. त्यामुळे विहीत कालमर्यादेत संपादन न झालेला हा भूखंड मे १९९५ व जानेवारी १९९६ च्या परिपत्रकानुसार मूळ जागा मालकाकडे परत गेला किंवा नाही ? असा प्रश्न विधीमंडळात तीन वेळा विचारणाऱ्या माजीमंत्री एकनाथराव खडसे यांना अखेर ऊर्जा, उद्योग व कामगार विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दि. २ ऑगस्ट २०१७ ला उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दि. १८ मे १९९५ आणि दि. २३ जानेवारी १९९६ चे भू संपादन प्रक्रियेविषयीचे ते परिपत्रक अधिक्रमीत (बाजुला ठेवणे किंवा रद्द करणे) केले आहे. सत्ताधारी पक्षाचे माजीमंत्री व ज्येष्ठ आमदाराने एका परिपत्रकाविषयी विधीमंडळात तीनवेळा विचारलेल्या प्रश्नावर तब्बल सहा महिन्यांनी उत्तर देण्याची तत्परता विद्यमान राज्य सरकारने दाखविली आहे. याच प्रकरणाशी संबंधित चौकशी अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण करु असे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या राज्य सरकारने गेल्या सव्वा वर्षांत चौकशीचा अहवालही समोर आणलेला नाही. राज्य सरकारमधील हे वेळकाढू धोरण खान्देशातील जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांचे राजकिय वर्चस्व संपविण्यासाठीच अवलंबिले जात असल्याची भावना आता जनतेत निर्माण होत आहे.

Saturday, 12 August 2017

१५ ऑगस्टला राजेशाही थाटात मराठमोळी दहीहंडी



एल. के. फाऊंडेशनतर्फे रंगारंग आयोजन
जळगाव शहराच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचे पान ठरलेली आणि मराठमोळ्या उत्सवाचा थरार अनुभवायला लावणारी राजेशाही थाटाची मराठमोळी दहिहंडी मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी स्व. बॅरिस्टर निकम चौकात (सागरपार्क) रंगणार आहे. या दहिहंडीचे परंपरेनुसार आयोजन एल. के. फाऊंडेशनचे प्रमुख उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले आहे.

Saturday, 5 August 2017

माध्यम पंढरीची अभ्यासवारी ...!!

माचवि चे कुलगुरु प्रा.डॉ. कुठियाला यांच्याकडून भेट
भोपाल शहर. मध्यप्रदेशची राजधानी. तलावांचे शहर. अजून एक ओळख. भोपाल हे माध्यमांची पंढरी सुध्दा आहे. भारतातील पत्रकारिता क्षेत्रातील विविध माध्यमांचे शिक्षण देणारे माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठ (माचवि), माध्यमांच्या क्षेत्रांतील देशातला सर्वांत मोठा डीबी कॉर्प समुह हा भोपालमध्येच आहे. आणखी एक विशेष उल्लेख, भारतातील वृत्तपत्रांचे एकमेव असे माधवराव सप्रे स्मृती संग्रहालय सुध्दा भोपाळमध्येच आहे. मध्यप्रदेश सरकारने माध्यम नावाची सरकारी ॲड सर्व्हिस एजन्सी निर्माण करुन सरकारी माध्यमांचाही एक वेगळा प्रवाह निर्माण केला आहे. अशा या माध्यमांच्या पंढरीत अभ्यासवारीची एक अनोखी संधी मिळाली. निमित्त होते, पत्रकारितेच्या क्षेत्रात नविन काय घडते आहे हे पाहण्याचे आणि पत्रकारितेचे शिक्षक म्हणून भविष्यात कसे अध्यापन करावे याचा अंदाज घेण्याचे. 

Wednesday, 2 August 2017

रामनाथ सोनवणेंचे लेडी डायनावर नाटक

जळगाव मनपाचे माजी आयुक्त, कुशल प्रशासक आणि नागपूरमधील स्मार्ट सीटी प्रोजेक्टचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी ब्रिटनमधील राजघराण्याच्या संदर्भातील अनेक दंतकथांची नायिका ठरलेली लेडी डायना विषयी अत्यंत उत्कंठावर्धक आणि प्रत्ययकारी शब्दांत नाटक लिहीले आहे. इंग्रजी भाषेत रचलेला हा नाट्यसंवाद "लेडी डायना द क्विन ऑफ हार्टस्" या नावाने अवघ्या ९८ पानांचा आहे.  

Sunday, 16 July 2017

खडसेंच्या बदनामीचे सामुहिक अंधानुकरण !

राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मालमत्तेविषयी चौकशी करण्याची जनहित याचिका (क्र. ३/१७) मुंबईच्या उच्च न्यायालयात अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात न झालेल्या चर्चेची चुकीची माहिती देणाऱ्या बातम्या संबंधित न्यायाधिशांच्या नावाने राज्यभरातील तमाम आघाडीच्या माध्यमे व दैनिकांमध्ये दि. १५ जुलै २०१७ ला ठळकपणे प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध बातम्यांमधील तपशील पूर्णतः काल्पनिक आणि दिशाभूल करणारा आहे. या संदर्भात खडसे यांच्यावतिने याचिकेच्या संदर्भातील कागदपत्रे व्हायरल करण्यात आली आहेत. याचिकेच्या आतापर्यंत झालेल्या सात दिवसांच्या सुनावणीत अवघ्या एकेका ओळीत कामकाज नोंदले गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही दि. १५ जुलै २०१७ च्या बातम्यांमध्ये तपशील असा लिहला आहे जणू काही प्रत्यक्षदर्शीने न्यायालयात उपस्थित राहून आणि सारे कामकाज पाहून, ऐकून बातमी लिहीली आहे. वाचकांचा असा समज होवू शकतो.

Wednesday, 12 July 2017

शिवसेनेतील डबल बडवे !

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे आज (दि. १२ जुलै) खान्देशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना काही गोष्टी कळाव्यात म्हणून हा विशेष ब्लॉग लिहीला आहे. साधारणतः महिनाभरापूर्वी धुळ्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणुकीत खान्देशातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होतील. अर्थात, राऊत यांचे असे अनेक राजकिय अंदाज चुकतात. राऊत बोलघेवडे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते स्वतः कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवून विजयी झालेले नाहीत. नियुक्तीच्या मार्गाने राज्यसभेत पोहचणाऱ्या व्यक्तीला निवडणूक जिंकायला काय करावे लागते हे कसे समजणार ? असो, मात्र उद्धव ठाकरे यांचा हा दौरा मुख्यमंत्री होण्यासाठीची पाया भरणी असेल तर आज त्यांनी शिवसेनेतील डबल बडवे (दोन्ही बाजुने बडवणारे या अर्थाने) ही टीका समजून घ्यावी.