Friday, 31 March 2017
Tuesday, 28 March 2017
व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरेंच्या शौर्याची पाण्याखालील कहाणी
भारतीय नौदल अकादमीचे चीफ कमान्डन्ट तथा खान्देशचे सुपूत्र व्हाइस अॅडमिरल सुनील भोकरे यांचा उद्या बुधवार (दि.२९ मार्च) रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहरातील कांताई
सभागृहात नागरी सत्कार उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी.
पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव येथील गौरव
समितीने केले आहे.
Monday, 27 March 2017
जिंदा दिल मित्र डॉ. राजेश पाटील ...
गुढीपाडवा आज पहाटे पहाटे चांगली बातमी घेवून आला. एका मित्राने रात्री उशीरा मेसेज टाकलेला होता. "आयएमए" च्या सचिवपदी विश्वप्रभा हॉस्पिटलचे डॉ. राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बातमी वाचून आनंद झाला. डॉक्टरांच्या संदर्भात सध्या आव्हानात्मक वातावरण असताना जळगाव आयएमएच्या सचिवपदी डॉ. राजेश यांनी निवड होणे यात निश्चित चांगला योग आहे. नव्या कार्याची गुढी उभारण्याची संधी डॉ. राजेश यांना मिळाली आहे. याबद्दल नक्कीच त्यांचे तोंडभरून कौतुक आणि तमाम डॉक्टर व रुग्णांसाठीही काही वेगळे कार्य घडावे यासाठी शुभेच्छा !!
Saturday, 11 March 2017
शिमगा बहाद्दरांनो सावधान !
देशातील ५ राज्यांच्या विधानसभांपैकी सर्वांत मोठी विधानसभा असलेले उत्तरप्रदेश हे राज्य भाजपने पाशवी बहुमताने जिंकले आहे. ४०३ पैकी ३२५ जागा भाजपने जिंकल्या. उत्तराखंडमध्ये ७० पैकी ५७ आणि मणिपूरमध्ये ६० पैकी २१ जागा भाजपने जिंकल्या. पंजाबमध्ये भाजपने काँग्रेसकडून सपाटून मार खाल्ला तर गोव्यात काँग्रेसला संधी आहे. एकंदर ५ पैकी ३ राज्ये भाजपने जिंकली. जो जिता वो सिकंदर. नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या खुर्च्या अजून पक्क्या झाल्या. उत्तरप्रदेशच्या निकालावर गणिते मांडणारे गपगार झाले.
Sunday, 5 March 2017
वयाच्या पलिकडचे मैत्र ... युसूफभाई मकरा
जळगाव येथील व्यापारी
युसूफभाई मकरा यांच्या वाढदिवसाचा तिहेरी घोळ असतो. त्यांचा वाढदिवस दि. २० जुलैला
असतो. मात्र, एका दैनिकात तो दि. २० मेस छापून येतो. जळगाव येथे अजून एक ज्युनिअर युसूफ
मकरा आहेत. त्यांचा वाढदिवस दि. २ मार्चला असतो. या तिनही दिनांमुळे युसूफभाईंना
वर्षभरात तीन वेळा बर्थडेच्या शुभेच्छा मिळतात. गेल्या २ मार्चला मी सुद्धा युसूफभाईंना
मोबाईलवरुन शुभेच्छा दिल्या. युसूफभाईंनी अगोदर थँक्यू म्हटले आणि मग म्हणाले, आज माझा
वाढदिवस नाही. मला हसू आले. त्याचे कारण मला युसूफभाईंच्या तीनही वाढदिवसांची गंमत
आठवली.
Friday, 3 March 2017
महामार्ग चौपदरीकरणासाठी मुंबईत ८ मार्चला बैठक
गेल्या ३ वर्षांत खासदार
रक्षा खडसेंकडून सतत पाठपुरावा
एकनाथराव खडसे यांची “सोशल मीडिया सोल्युशन” ला खास मुलाखत
जळगाव शहरातून जाणाऱ्या आणि
प्रस्तावित वळण महामार्गाच्या संदर्भात मी स्वतः पाचवर्षांपासून आणि खासदार रक्षा
खडसे या गेल्या ३ वर्षांपासून केंद्रीय मंत्रालयात पाठपुरावा करीत आहोत. आतापर्यंत
या विषयावर दिल्लीत किमान ७ ते ८ बैठका झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्याकडे ४ वेळा चर्चा झाली. जे प्रस्ताव होते ते मंजूर होवून त्याचे आराखडे
तयार झाले. आता टेंडरिंग प्रोसेसही मार्गी लागली आहे. महामार्गाचा ४५० कोटींचा
विकास आराखडा तयार झालेला आहे. आता हा आराखडा लोकांच्या समोर आणून त्यावर सूचना
घ्याव्या लागतील. याचाच पुढचा भाग म्हणून दि. ८ मार्चला मुंबईत राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरण सोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे, अशी माहिती माजीमंत्री तथा या
कामासाठी सतत पाठपुरावा करणारे एकनाथराव खडसे यांनी “सोशल मीडिया सोल्युशन” ला दिली.
Tuesday, 28 February 2017
विवेक हरवलेला विरोध !!
जळगाव शहरात सध्या काही मान्यवर नागरिक सामाजिक कार्यात हात दाखवून अवलक्षण करुन घेण्याचा प्रकार करीत आहेत. जळगाव शहरात कोणतेही सामाजिक कार्य लोकसहभाग किंवा खासगी खर्चातून उभे राहायला लागले, की हे सामाजिक चिंताग्रस्त (Social worriers) मान्यवर शंकांची प्रश्नावली घेवून उभे राहतात. असे तीन जण सध्या बेफामपणे कार्यरत आहेत.
Friday, 24 February 2017
मरावे परि उद्यान रुपी उरावे ...
भाऊंचे उद्यान
जळगावकरांच्या सेवेत
Thursday, 23 February 2017
सत्तेसाठी एकजूट नव्हे ; बहुमत हवे !
राज्यातील २५ जिल्हा परिषद, १० मनपांसह २८३ पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. सर्वच मनपांसह बहुतांश जि. प. मध्ये भाजपने आघाडी घेत पुन्हा एकदा क्रमांक १ चा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. या विजयाचे श्रेय
अर्थात, राज्यातील सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष
संघटनचे प्रमुख म्हणून रावसाहेब दानवे यांच्याकडे जाते. भाजप अंतर्गत इतर कोणीही
राज्यस्तरावरील या विजयात हिस्सेदारी करु शकत नाही. कारण, स्टार प्रचारक
म्हणून फडणवीस व दानवे राज्यभर फिरत असताना इतर नेते आपापल्या जिल्ह्यात प्रतिष्ठा
पणाला लावून होते.
Monday, 20 February 2017
साऱ्यांच्याच नेतृत्वाची कसोटी ?
राज्यातील मनपा, जि.प. आणि पंचायत समित्यांचे निकाल लवकरच लागतील. त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भवितव्य अवलंबून असेल अशी मांडणी केली जात आहे. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याही नेतृत्वाची चाचणी याच निवडणुकीतून होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)









