राज्यात दुष्काळीस्थितीमुळे बहुतांश सुतगिरण्या बंद आहेत. बाजारात कापूस नसल्यामुळे खान्देशातील मोठ्या संख्येतील जिनिंग प्रेसिंग उद्योग अडचणीत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती संत मुक्ताई सहकारी सुतगिरणीने अशाही वातावरणात अवघ्या साडेतीन महिन्यात उच्च प्रतिचा ३४ काऊंट धागा निर्मिती करुन गुणवत्तेचा उच्चांक गाठला आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून कापूस गाठी मागवून तीन शिफ्टमध्ये सुतगिरणी सुरू आहे. ही माहिती सुतगिरणीच्या अध्यक्षा तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी महान्यूजला दिली.
Thursday, 28 April 2016
Sunday, 24 April 2016
जळगाव मनपात मोठी भरती ...तातडीने हवेत ज्योतिष, तांत्रिक
जळगाव महानगर पालिकेवर सध्या असलेल्या विविध गंडांतरामुळे
सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासन यांच्यासह जनताही परेशान आहे. मनपाला आर्थिक
आणि प्रशासकीय अशा प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी योग्य निर्णय व
त्यानुसार कृतीची गरज आहे. तशी पाऊले महापौर व आयुक्त टाकत आहेत. पण
मध्यंतरी एक बातमी प्रसिध्द झाली आहे की, मनपा कशामुळे अडचणीत आहे याचा शोध
घेण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी ज्योतिष्याचा सल्ला घेतला. त्यानंतर चर्चा
सुरू झाली की, मनपाच्या वास्तूत दोष आहे आणि मनपाचा लोगो बदलायला हवा.
अर्थात, यावर पदाधिकारी किंवा प्रशासनाचे अधिकृत कोणतेही भाष्य नाही.
मात्र, लोगो बदलून आणि वास्तू दोष काढून कोणतीही स्थिती बदलली असती तर जगात
सारे काही आनंदी राहीले असते.
Friday, 22 April 2016
जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची डिजिटल भरारी
जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरात प्राथमिक शाळांचे डिजिटलीकरण, संगणकीकरण, मोबाइल डिजिटलीकरण आणि "आयएसओ" करण अशा विविध उपक्रमात भरारी घेतली आहे. जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची ही कार्यशैली सध्या राज्यभरात "जळगाव पॅटर्न" म्हणून नावलौकिक मिळवून आहे. या पॅटर्नचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपये निधी उभारला आहे.
Thursday, 21 April 2016
"अपूर्णांक" चे २५ वे वर्तुळ पूर्ण !!!
![]() |
| हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटेंसोबत अपूर्णांकची टीम |
Wednesday, 20 April 2016
”मेपल” च्या गृह घोटाळ्यामुळे सरकारसह दैनिकांची बेअब्रूच !!!
सवर्सामान्य कुटुंबाला पुण्यात अवघ्या पाच लाख रुपयांत 'वन रुन किचन' घर देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भल्यामोठ्या दोन पानी जाहिराती गेल्या १४ व १५ एप्रिल २०१६ ला महाराष्ट्रातील आघाडीच्या काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय, पंतप्रधान जन आवास योजनेचा लोगो वापरला आहे. घराच्या बुकिंगचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी एक मात्र बँक म्हणून 'बँक आफ महाराष्ट्र'* चा उल्लेख आहे. प्रकल्पास 'पीएमआरडीए' तर्फे मान्यताप्राप्त असा उल्लेख आहे. पाच लाखातील घरे कुठे देणार त्या जागा म्हणजे पुण्यालगतची गावे चाकण-तळेगाव, वाघोली अनेक्स, सणसवाडी, रांजणगाव, वाई, शिरवळ, शिक्रापूर, ऊरळी कांचन, कोंढवा-अनेक्स-बोपगाव, तळेगाव ढमढेरे आणि शिक्रापूर-कोंढापुरी आहेत. जाहिरातीत घरांच्या किंमतीची आकडेमोड प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांसाठी अशा दोन प्रकारात आहे.
Saturday, 16 April 2016
रेल्वेने पाणीपुरवठा "सेवा" की "इव्हेंट"
![]() |
| १९८६ मध्ये राजकोटसाठी पाणी नेणारे टॅन्कर सेवा म्हणून भरताना रेल्वेचे अधिकारी |
Friday, 15 April 2016
इंद्रमहाराज आणि हाजी अली एकत्र येणार !!!
(दुपारची वेळ. ४६ डिग्री तापमान डबल एसीच्या गारवा घेत इंद्रमहाराज पेंगुळलेले आहेत. त्यांच्या घोरण्याचा आवाज द्वारपालाला येतोय. घड्याळाचा सेकंद काटा कासवगतीने टीक टीक करतोय. तेवढ्यात इंद्रमहाराजांच्या शयनकक्षाजवळ गलबाला ऐकू येतो. काळ्याशार पेहरावात शिंगणापूरचे शनिमहाराज, लाल भडक कुंकू लावलेली कोल्हापूरची लक्ष्मीबाई, अर्धपंचा घातलेले त्र्यंबकेश्वरचे महादेवभाई, लाल-पांढरे कपडे घातलेली शबरीमाला मावशी तावातावाने द्वारपालशी भांडाताहेत.)
Wednesday, 13 April 2016
राजकीय तळीरामांची "बार मिटींग" !!!
Monday, 11 April 2016
अजातशत्रू ... नितीनभाऊ लढ्ढा !!!
जळगाव शहराचे महापौर नितीनभाऊ लढ्ढा यांचा आज (१२ एप्रिल) वाढदिवस. वयाची ५३ वर्षे पूर्ण करून भाऊ ५४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नितीनभाऊ राजकारणी नंतर असून सहृदयी माणूस प्रथम आहेत. "खाविआ" च्या "मुरलेल्या लोणच्यातील" ही "कैरीफोड" अजूनही "मसाला लागलेली" नाही. आजही नितीनभाऊ सामान्य मित्राप्रमाणेच इतरांशी वागत असतात, बोलत असतात.
Sunday, 10 April 2016
जळगावच्या गवळणी मुक्ताईच्या बाजाराला..!!
| खडी गंमत किंवा तमाशातील "गवळण" सादर करणारे कलावंत (संग्रहीत छायाचित्र) |
Subscribe to:
Posts (Atom)








