Saturday, 25 July 2015

बिनविरोधचे वारे...

जळगाव जिल्ह्यात सध्या विविध स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावपातळीवरचे वातावरण तापलेले आहे. राजकिय पक्षांची वाढती संख्या, नेतृत्त्व करण्याची सुप्त ईच्छा आणि गाव-संस्थेचे पुढारपण करण्याची संधी या हेतूने प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी करणार्‍या हौश्यागौश्यांची संख्या वाढतच आहे. अशा वातावरणात कोणतीही निवडणूक बिनविरोध होणे जवळपास अशक्य असाच आतापर्यंतचा समज होता. पण, जळगाव जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँक पाठोपाठ बिनविरोधचा नवा पॅटर्न आता चोपडा सूतगिरणी, जिल्हा दूध संघासह काही ग्राम पंचायतींमध्येही यशस्वी होताना दिसत आहे. ‘बिनविरोधचे वारे’ केवळ सत्तावाटणीचे सूत्र न ठरता विकासाचे ‘बारमाही वारे’ ठरावेत हीच मतदारांची अपेक्षा आहे.

Saturday, 18 July 2015

‘बाहुबली’चे अभासी-वास्तव तंत्र

सध्या सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांमध्ये पाच दिवसांत ३०० कोटींचा धंदा करणार्‍या आणि माध्यमांमध्ये निर्मिती विषयक तंत्राची दंतकथा बनू पाहणार्‍या ‘बाहुबली’ चित्रपटात संगणकातील अभासी जग (व्हर्च्यूअल वर्ल्ड) आणि वास्तव जग (रिअल वर्ल्ड) याचे तंत्र-यंत्राद्वारे सर्वोत्कृष्ट मिश्रण (मिक्सिंग) केले आहे. चित्रपट निर्मितीत व्हिज्यूअल इफेक्ट (दृश्य परिणाम) चा मैलाचा दगड ठरेल अशी कामगिरी भारतीय कला दिग्दर्शक, कला संचालक आणि कला निर्माता यांनी करून दाखविली आहे.बाहुबली चित्रपट हा त्याच्या दृश्यात्मक परिणाम आणि फॅन्टसी (अद्भूत कल्पनारम्यता) यासाठी जगभरात नावलौकिक मिळवतो आहे आणि कोट्यवधींच्या कमाईचा गल्लाही भरतो आहे. या यशामागे  कला दिग्दर्शक एस. एस. राजामोउली, कला संचालक तथा दृश्य परिणामतज्ञ श्रीनिवास मोहन यांचे तीन वर्षांचे अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.

केशवस्मृती प्रतिष्ठान ‘कलेक्टीव्ह विस्डम’च्या दिशेने


‘सब समाजको साथलिए आगे है बढते जाना’ हा विचार घेवून ‘जळगाव जनता सहकारी बँक’ सुरू झाली. त्यानंतर आर्थिक विकासातून समाज विकास हे तेव्हाचे सूत्र घेवून ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ स्थापन झाले. समाजाच्या विविध गरजांची शक्य तशी पूर्तता करण्याची जबाबदारी प्रतिष्ठानने सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून स्वीकारली. प्रतिष्ठानच्या नियंत्रणात आज जवळपास १६ सेवा प्रकल्प सुरू आहेत. भविष्यात इतरही नव्या सेवा प्रकल्पांचा विस्तार आणि जुन्या प्रकल्पांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आहेत. हे करताना, प्रतिष्ठानच्या कामात काळानुरुप अमूलाग्र बदलाची भूमिका स्वीकारण्यात आली आहे. समूह नेतृत्त्व आणि व्यवहाराचे शहाणपण असलेल्यांचा एकत्रित समूह ही ‘विचारशैली’ आणि समुहाच्या गरजांपर्यंत पोहचण्याची ‘कार्यशैली’ घेवून केशवस्मृती प्रतिष्ठान वाटचाल करीत आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख म्हणून श्री. भरतदादा अमळकर सेवा प्रकल्पांचा भावी प्रवास (डायरेक्शन), संकल्प (एम्स), आव्हाने (हर्डल्स) आणि पर्यायी मार्ग (सोल्यूशन) या विषयी ‘कलेक्टीव्ह विस्डम’ (बहुगुणींचा समुह) ही संकल्पना मांडतात...

Saturday, 11 July 2015

गॅस सिलिंडर अनुदान नाकारावे की घ्यावे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील ‘सधन कुटुंबांना’ गॅस सिलिंडर अनुदान नाकारा आणि गरीबांपर्यंत गॅस सेवा पोहचविण्यास मदत करा, असे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार जवळपास ३ लाख कुटुंबांनी अनुदान नाकारले असून सुमारे १४० कोटी रुपये अनुदान सरकारच्या तिजोरीत शिल्लक राहणार आहे. मात्र, याला जोडून काही प्रश्‍न समोर येत आहेत ते म्हणजे, सधन कुटुंबाची व्याख्या काय आणि सरकारकडे शिल्लक राहणार्‍या अनुदानातून लाभ होणार कोणाला? यालाच जोडून दुसरा प्रश्‍न असा की, अनुदान नाकारले तर व्यक्तिगत नुकसान काय आणि घेतले तर सरकारचे आर्थिक नुकसान काय?

Saturday, 4 July 2015

लोकशाहीच्या दुसर्‍या स्तंभाला चौथ्या स्तंभाचे अनावृत्त पत्र

जळगाव महानगर पालिका, जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा महसूल प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्‍न निर्माण करणारी स्थिती सध्या आहे. पदावर व्यक्ती कोण आहेत? हा विषय महत्त्वाचा नाही. ‘लोकशाही चेहरा’ असलेल्या या तीनही प्रशासनातील ‘अवयव’ व्यवस्थित काम करीत नसल्याचे अनुभवाला येत आहे. म्हणूनच लोकशाहीच्या ‘दुसर्‍या प्रशासन’ या स्तंभाला ‘चौथ्या माध्यम’  या स्तंभाने हेे अनावृत्त पत्र लिहीले आहे...

Sunday, 21 June 2015

काका नॉनस्टॉप ७५ !!!

आम्ही बापाला बापू म्हणतो. गांधींना बापू म्हणायचे म्हणून नव्हे. तर गल्लीतले बरेच बाप मुलांचे बापू होते. त्या मुलांच्या सोबत आम्ही राहाय म्हणून आमचे पप्पा सुध्दा बापू झाले. अर्थात, हे नाव लहान भाऊ शैलेशने प्रचलित केले. आज नेमका "योगा डे" असल्यामुळे मला बापूंची योगाविषयी आठवण सांगायला हवी.

Saturday, 20 June 2015

योगाची जगभरारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती स्वीकारून संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्याचे जाहीर केले आहे. जगभरातील जवळपास १७७ देशांमधील कोट्यवधी नागरिक आज सामुहिकपणे विविध प्रकारची योगासने करून प्राचिन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग  असलेल्या अध्यात्मिक, कायिक आणि मानसिक जीवनक्रियेला स्वीकारतील. योगाची ही ‘जगभरारी’ नवा इतिहास लिहीण्यास प्रारंभ करीत आहे.सुमारे सहा हजार वर्षांपासून योगाचे अस्तित्त्व आणि महत्त्व अधोरेखित करणारे उल्लेख भारताच्या अतिप्राचिन इतिहासाचे दस्तावेज असलेल्या वेद आणि इतर ग्रंथांमध्ये आढळून येतात. योगा आणि योगासनांचा प्रारंभ भारतात झाला की नाही? याविषयी मतभेद-विचार प्रवाह असू शकतात. मात्र, एक संदर्भ कोणीही नाकारू शकत नाही तो हाच की, भारताच्या प्राचिन गुरूकूल परंपरेत ‘योगा आणि योगासने’ ही अध्ययन तथा जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती.

Friday, 19 June 2015

लिमजी मोठाच होता...

लिमजीचा आणि माझा फार संबंध नाही आला. जैन उद्योग
समुहाच्या जैन हिल्सवर काही निमित्ताने भेट असली की तेथील  पीआरच्या गोतावळ्यात लिमजी हसमूख चेहऱ्याने नेहमी भेटायचा. त्याच्या हास्यामागे कधीही कोणताही हेतू नसायचा. पीआरमधील मंडळी तशी सहेतूक हसत असते. लिमजी तसा कधीही नव्हता. त्याचा आणि माझा संबंध तसा थेट आलाच नाही. पण, त्याच्या जाण्याचा निरोप राजूभाऊ नन्नवरेंकडून आला आणि बहुधा नंतर मी तो इतरांना दिला. केवळ हसमूख चेहऱ्यामुळे स्मृतीत राहीलेल्या लिमजीची जाण्याची बातमी मला चुटपूट लावून गेली.

Saturday, 13 June 2015

हरणार्‍या लढाईचे शिलेदार

ईश्वरलाल जैन आणि मनिष जैन
जळगावच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी खासदार पिता-आमदार पूत्र अशी ईश्‍वरलाल जैन-मनिष जैन यांची ओळख होती. मुंबई ते दिल्लीच्या राजकारणात ईश्‍वरलाल जैन यांचा दबदबा आहे. मनिष जैन यांना अजून ओळख मिळालेली नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आणि जिल्ह्याच्या राजकारणात आज या पिता-पूत्रांची अवस्था ‘हरणार्‍या लढाईचे शिलेदार’ म्हणूनच झाली आहे.


विधानसभेच्या कामकाजात सुधारणा

महाराष्ट् विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे
महाराष्ट्र विधानसभेतील चर्चांमध्ये आमदारांचा सक्रिय सहभाग वाढवून सभागृहातील कामकाज संख्यात्मक आणि गुणात्मक पातळीवर सुधारण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी सत्ताधारी पक्षांसह मित्र आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. गेल्या दोन अधिवेशन काळात सभागृहात रोज सरासरी साडेआठ तास काम झाले आहे. टप्प्या-टप्प्याने यात निश्‍चित गुणात्मक सुधारणा होत जाईल, असे स्पष्ट मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मांडले.
 खासगी कार्यक्रमानिमित्त बागडे शुक्रवारी जळगावात आले होते. तेव्हा त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास भेट दिली. तेथे त्यांच्याशी विधानसभेतील कामकाजाविषयी चर्चा केली. त्यांनी इतरही काही मुद्दे स्पष्ट केले.