भारताच्या संसदीय राजकारणात विचार आणि विखार यात प्रचंड परिवर्तन करणाऱ्या
लोकसभा निवडणूक २०१९ ची प्रक्रिया अंतिम
चरणात आहे. देशाशी संबंधित राष्ट्रवाद, समाजवाद आणि समानता या ३ विषयांवर २ टोकांच्या
विचारात मतदारांची विभागणी झाली आहे. पाश्चात्य मासिक टाईम्सने भारताची विभागणी करणारे
नेता असे संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. हिंदुत्त्व आणि भगवा रंग
याच्या भोवती राष्ट्रवाद व समाजवादाची भूमिका मोदींनी घेतली आहे. दुसरीकडे समाजवाद-समानता
आणि एकता या विषयांच्या भोवती विरोधकांनी केवळ आणि केवळ मोदी विरोधाचे कडबोळे तयार
केले आहे. कडबोळे एवढ्याचसाठी म्हटले आहे की, प्रत्येक राज्यातील प्रादेशिक सुभेदाराने
आपापला हिस्सा कायम ठेऊन मोदी विरोध सुरु ठेवला आहे. अशा वातावरणात लोकसभा
निवडणुकीचे निकाल मोदींसाठी फारसे चांगले असणार नाहीत, असा दावा आता विरोधक करीत
आहेत. भाजपच्या संभावित टेकूवाल्या सत्तेवर नेतृत्वाचा पर्याय म्हणून नितीन
गडकरींच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या राजकारणात पितामह राजकारणी
असलेले शरद पवार यांच्यासारखा विरोधकही नेतृत्व बदलात गडकरींच्या नावाचा उल्लेख
करीत आहे. बदलाचे हे वारे सध्या तरी दिल्लीकडे वाहते आहे. मोदींच्या नावावर भाजपने
खासदारांच्या साध्या बहुमताचा आकडा २८७ पार केला तर सारेच प्रश्न बाजूला पडतील. पण,
मोदी टाळून काही विषय आला तर विरोधकांकडून गडकरी चर्चेत आहेतच. गरज पडेल तेव्हा संघ
परिवार गडकरींना पसंती देतो याचा अनुभव २ वेळा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना
आला आहे.
Thursday, 16 May 2019
Sunday, 12 May 2019
'लाव रे तो व्हीडीओ' ची जळगाव आवृत्ती
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हीडीओ' हा प्रचाराचा नवा डीजीटल पैटर्न जन्माला घातला. केंद्रात ५ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी सरकारच्या उलट्यापालट्या मत-मतांतरे, धोरणे आणि टीव्ही, चित्रपट माध्यमात गाजावाजा केलेल्या योजनांचा सरकारी प्रचार आणि वास्तव याची उलटतपासणी करणारे व्हीडीओ राज ठाकरेंनी सादर केले. जळगाव जिल्ह्यातही सरकारच्या अशाच गाजावाजा केलेल्या पंतप्रधान कौशल विकास योजने (PMKVY) च्या लाभार्थी म्हणून ज्याचा व्हीडीओ टीव्ही वरील जाहिरातीत वापरला त्याला ४ वर्षांत योजनेतील प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रच दिलेले नाही. 'लाव रे तो व्हीडीओ' ची जळगावीची आवृत्ती समजून घेऊ...
Thursday, 9 May 2019
इंदिरा व राजीव यांनी ओढवून घेतलेले मृत्यू ...
१७ व्या लोकसभा निवडणूक प्रचारात सोनिया, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी गांधी घराण्यातील स्व. इंदिरा आणि स्व. राजीव हे देशासाठी शहीद झाल्याचा वारंवार उल्लेख केला आहे. इंदिरा या पंतप्रधानपदी असताना २ शिख अंगरक्षकांकडून दि. ३१ आक्टोबर १९८४ ला निवासस्थानी मारल्या गेल्या. राजीव हे माजी पंतप्रधान असताना तामीळ टायगर्स (एलटीटीइ) या श्रीलंकास्थित दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात दि. २१ मे १९९१ ला श्रीपेरंबदूर येथे मारले गेले. इंदिरा व राजीव यांच्या या घातपाती मृत्यूमागे त्यांनी घेतलेले निर्णय आणि कृती याचे गुंतागुंतीचे संदर्भ आहेत. देशहितापेक्षा त्यामागे व्यक्तिगत पद-प्रतिष्ठा, कळीचे राजकारण आणि विरोधकांवर मात करणे हिच प्रमुख कारणे आहेत.
Monday, 6 May 2019
'बुकमार्क' गनीभाई मेमन ...
जळगावच्या सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातून मोठ्ठे प्रभावलय निर्माण करणारे मित्र गनीभाई मेमन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या सहवासात आलेल्या आंबट-गोड अनुभवांविषयी लिहिण्याची आज खरी संधी. गनीभाई, हे जळगावच्या सामाजिक क्षेत्रात 'बुकमार्क' सारखे आहेत असे मला वाटते. पुस्तकाची पाने अनेक असतात. वाचन करताना ती मागे पुढे उलटवली जातात. आपण कोणत्या पानापर्यंत पोहचलो हे लक्षात ठेवण्यासाठी बुकमार्क वापरावे लागते. बुकमार्क पानांना वेगळे करीत असले तरी ते दोन पानांमधील मध्यस्थाच्या भूमिकेत असते. बुकमार्क म्हणजे पुस्तक नसले तरीळ दोऱ्याने बांधलेले बुकमार्क पुस्तकातील कोणत्याही पानांपर्यंत पोहचू शकते.
Sunday, 28 April 2019
दोन साहेबांच्या कोलांट उड्या ...
लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार नसलेल्या सेनेचे सर्वेसर्वा मा. राजसाहेब ठाकरे यांनी जाहीरसभांमध्ये डिजीटल स्क्रीनचा वापर करीत प्रचाराचा नवा ट्रेंड आणला आहे. नेत्यांच्या वक्तव्याचे जुने व्हीडीओ आणि अलिकडे भूमिका बदललेल्या वक्तव्यांचे नवे व्हीडीओ एकचवेळी पाठोपाठ दाखवून संबंधितांची लबाडी उघडी पाडण्याची ही साधी सोपी व भरपूर करमणूक करणारी पद्धत आहे. या पद्धतीने यूट्यूबवरील प्रेक्षक वाढला आहे.
Thursday, 10 January 2019
'अच्छेदिन' साठी जनआंदोलनाचे विधायक मार्ग ...
(अभिनीत जानेवारी २०१९ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख)
जनतेच्या विविध मागण्यांसाठी जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे जनतेने संघटीत होऊन जनमनातील असंतोष दर्शविण्याचा अवलंबिलेला कृतीशील मार्ग म्हणजे जनआंदोलन होय. जनआंदोलनाला जनचळवळ किंवा जनसत्याग्रह असेही म्हटले जाते. राज्य घटनेच्या माध्यमातून जनतेला सामान्य आणि व्यक्तिगत राहणीमानाचे नैतिक, सामाजिक, आर्थिक, भौतिक व कायदेविषयक हक्क वा अधिकार प्राप्त झाले आहेत. तरीही बदलत्या काळानुसार जनतेच्या अपेक्षीत गरजा जेव्हा सरकार पूर्ण करु शकत नाही तेव्हा जनमनातील असंतोष कृतीतून दर्शविण्यासाठी मोर्चा, उपोषण, असहकार, धरणे, निदर्शने, प्रतिबंध, रोको अशा आंदोलनांचा प्रभावी वापर जनतेकडून केला जातो. कोणताही अधिकार, हक्क मागणी करण्यामागे जनतेचा हेतू व्यक्तीगत अथवा कुटुंबाची सुरक्षा, संरक्षण, राहणीमानात सुधार घडवून आणणे हाच असतो. एक प्रकारे आपल्या आयुष्यात 'अच्छेदिन' यावेत म्हणूनच समाजातील सर्वच घटकांना संघटीत होऊन समाजमनांतील अस्वस्थता दर्शविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे.
जनतेच्या विविध मागण्यांसाठी जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे जनतेने संघटीत होऊन जनमनातील असंतोष दर्शविण्याचा अवलंबिलेला कृतीशील मार्ग म्हणजे जनआंदोलन होय. जनआंदोलनाला जनचळवळ किंवा जनसत्याग्रह असेही म्हटले जाते. राज्य घटनेच्या माध्यमातून जनतेला सामान्य आणि व्यक्तिगत राहणीमानाचे नैतिक, सामाजिक, आर्थिक, भौतिक व कायदेविषयक हक्क वा अधिकार प्राप्त झाले आहेत. तरीही बदलत्या काळानुसार जनतेच्या अपेक्षीत गरजा जेव्हा सरकार पूर्ण करु शकत नाही तेव्हा जनमनातील असंतोष कृतीतून दर्शविण्यासाठी मोर्चा, उपोषण, असहकार, धरणे, निदर्शने, प्रतिबंध, रोको अशा आंदोलनांचा प्रभावी वापर जनतेकडून केला जातो. कोणताही अधिकार, हक्क मागणी करण्यामागे जनतेचा हेतू व्यक्तीगत अथवा कुटुंबाची सुरक्षा, संरक्षण, राहणीमानात सुधार घडवून आणणे हाच असतो. एक प्रकारे आपल्या आयुष्यात 'अच्छेदिन' यावेत म्हणूनच समाजातील सर्वच घटकांना संघटीत होऊन समाजमनांतील अस्वस्थता दर्शविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे.
Tuesday, 8 January 2019
जळगाव शहराचे प्रश्न सोडवायचे कसे आणि कोणी ?
जळगाव शहरातील बहुतांश नागरी प्रश्नांचे भीजत घोंगडे पडले आहे. जळगावकरांनी सत्तेतील लोकनेत्यांचे चेहरे बदलवणारा कौल सार्वत्रिक निवडणुकांमधून दिला. त्यानंतर लोकांसाठीच्या सामुहिक सेवा - सुविधांमध्ये काही परिवर्तन घडून येईल अशी अपेक्षा केली. सरकार बदलले, सत्ता बदलली, सत्ता राबविणारे मंत्री आणि प्रशासनही बदलले पण जळगाव शहराशी संबंधित प्रश्नांची उत्तरे काही अजून सापडलेली नाहीत.
Saturday, 17 November 2018
जळगावकर उपाशी; भाजप तुपाशी !
जळगाव शहरातून प्रचंड वाहतूक असलेल्या नरभक्षक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचा विस्तार व त्यालगत समांतर रस्ते (सर्व्हिस रोड) तयार करण्याच्या कामांचा डीपीआर (सोपा शब्द आराखडा) मंजूर करुन कामाची निविदा मंजूर केल्याची प्रत हाती मिळावी म्हणून सध्या जनभावनांच्या असंतोषाचे प्रतिक म्हणून साखळी उपोषण आंदोलन सुरु आहे. सर्व पक्षातील स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या अराजकिय "जळगाव समांतर रस्ते कृती समिती" च्या नेतृत्वात सुमारे १०० विविध संस्था, संघटना, मंडळे व राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने १०० दिवस उपोषणाचा निर्धार करण्यात आला आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस असून एक दिवसाच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी इतर संघटनांचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. रोज हजारो नागरिक सह्या करुन या आंदोलनाच्या माध्यमातून जनरेट्याचा दबाव निर्माण करीत आहेत.
Saturday, 6 October 2018
जळगाव शहर निश्चितपणे कात टाकेल !
जळगाव महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासोबत अनौपचारिक गप्पा करण्याची संधी मिळाली. डांगे यांनी पदभार स्वीकारुन साधारणपणे पाच महिने झाले आहेत. मनपाची आर्थिक दुखणी आणि जळगावकरांच्या प्राथमिक सुविधांसंदर्भातील समस्या याची बऱ्यापैकी माहिती त्यांना झालेली आहे. मनपात सत्ताबदल होवून भारतीय जनता पक्षाच्या बहुमतातील पदाधिकारी सुध्दा कार्यरत झाले आहे. मोदी ते फडणवीस, फडणवीस ते गिरीश महाजन आणि महाजन ते महापौर सौ. सिमा व आमदार सुरेश भोळे अशी सत्तेची सूत्रेही निश्चित झालेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस उद्या (दि.८) जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
Wednesday, 3 October 2018
नाना पाटेकरवर आमचा विश्वास आहे !
गेल्या काही दिवसांत दूरचित्रवाहिन्या आणि इंग्रजी, हिंदी अॉनलाईन तथा छापिल माध्यमातून दक्षिणेतील कधी काळी अभिनेत्री असलेली व सध्या अनिवासी भारतीय तनुश्री दत्ता हिने चित्रपट अभिनेता नाना पाटेकरवर गैरवर्तनाचा आरोप लावून नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य व चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही संशयाच्या पिंजऱ्या उभे केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)








