![]() |
| २५ कोटींच्या कामांसाठी एकत्र आलेले प्रशासन व पुढारी |
Sunday, 15 July 2018
सारेच उडीदामाजी काळे गोरे ... !
Saturday, 14 July 2018
मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षाने जळगावच्या योजना बासनात !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकास योजनांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्यामुळे आज मनपा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपची पाटी कोरीच्या कोरी आहे. एकीकडे फडणवीस यांनी स्वतः दिलेले २५ कोटी रुपये भाजपमधील स्थानिक नेत्यांमधील वादविवादाने खर्च झाले नाहीत. दुसरीकडे फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या अमृत पाणी योजना व अमृत भुयारी गटार योजनांबाबत सचिवस्तरावर आडमुठी भूमिका घेतली गेली. या दोन्ही योजनांमध्ये मंत्रालयात खुट्या मारणाऱ्या सचिवांना कधीही फडणवीससह ना. गिरीषभाऊ महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा धाक वाटला नाही. फडणवीस यांनी असाच दुर्लक्ष केलेला मुद्दा आहे, मनपा मालकीच्या २२०० गाळे भाडे कराराचा. गेले २ वर्ष हा विषय घेऊन स्थानिक आमदार व व्यापारी फडणवीस यांचे समोर गेले. मात्र तेथून आश्वासनाशिवाय कृतीचा काहीही दिलासा मिळाला नाही.
Friday, 13 July 2018
त्या १७ जणांना उमेदवारी नाकारणारे कोण ?
इतर पक्षातून आयात झालेल्या मंडळींमुळे भाजप सध्या हाऊसफुल्ल आहे. भाजप - शिवसेना युतीची हाळी देत सुरु झालेली निवडणूक आता स्वबळाच्या हातघाईवर आली आहे. युतीतील ३०/३५ जागांवरुन भाजपने थेट ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. जागा वाढल्यामुळे निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक, माजी पदाधिकारी आदींना उमेदवारी मिळायची अपेक्षा होती. पण उमेदवार निश्चित करणाऱ्या नेत्यांनी ठरवून काहींची उमेदवारी कापली. यात सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांसह २ विद्यमान नगरसेवक, ४ मंडल अध्यक्ष, महिला आघाडी महानगर अध्यक्ष, ४ माजी पदाधिकारी यांची उमेदवारी नाकारली गेली.
Thursday, 12 July 2018
Wednesday, 11 July 2018
दलबदलुंना दारातून परत पाठवा !
जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा पोळा शेवटी फुटला. पोळा हा शब्द येथे उदाहरण म्हणून आहे, तुलनात्मक नाही याचे अगोदर स्पष्टीकरण देतो. बैल आणि माणसांची तर मुळीच तुलना होऊ शकत नाही. मनपा निवडणुकीत जे घडले व घडते आहे ते पाहून बैल पोळ्याची आठवण झाली. पोळ्याच्या दिवशी बैलांविषयी दोनच गोष्टी मालक किंवा गडीच्या हातून घडतात. पहिली म्हणजे, पळवून किंवा मिरवणुकीने ओळखी पाळखीच्या दारी बैलाला नेले जाते. तेथे पूजा करुन पुरणपोळी खाऊ घालतात. 'इच्छा असो वा नसो' बिच्चारा बैल पोळी खात असतो. दुसरी घडणारी गोष्ट म्हणजे, एखाद्या चौकात ग्रामदैवताच्या मंदिराजवळ १०१,२०१ रुपये बक्षीसाचे नारळ दोराला बांधलेले असते. बैलाच्या मागून धावत येणारे मालक वा गडी उडी मारुन ते नारळ तोडतात. जो बैल मालक किंवा गडी नारळ तोडतो, तो बक्षीसाचा मानकरी ठरतो.
Monday, 18 June 2018
जळगाव भाजपतील यादवी ... !
भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा शाखेत उभी फूट पडली आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडलेले मात्र मंत्रीपदाची तीव्र इच्छा आजही बाळगून असलेले एकनाथराव खडसे यांचा एक गट आहे. त्यांच्या सोबत खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे हे दोघेच दिसून येतात. दुसरा गट विद्यमान जल संपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचा आहे. त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जळगाव महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे (कधी इकडे कधी तिकडे) यांच्यासह खासदार ए. टी. पाटील, आमदार उन्मेष पाटील, हरिभाऊ जावळे, सौ. स्मिता वाघ, चंदुभाई पटेल यांचे गूळपीठ दिसते.
Saturday, 16 June 2018
वाकडी येथील दुसरी बाजू ...
वैधानिक इशारा – वाकडी (ता. जामनेर,
जि. जळगाव) येथे मांतग समाजातील दोन मुलांना नग्नावस्थेत झालेली मारहाण आणि
अनुसूचित जमातीतील एकाला धमकावण्याचे अमानविय कृत्य करणाऱ्या भटक्या विमुक्त
जमातीच्या दोघांसह त्यांचे इतर दोन बघे साथीदार (ते सुद्धा अनुसूचित जमातीचे आहेत) यांना
प्रचलित कठोर कायद्यांमधील सूचविलेली कमाल शिक्षा झालीच पाहिजे, असे मत लेखानापूर्वीच
व्यक्त करीत आहे.)Monday, 4 June 2018
असे जिंकले १९७१ चे युद्ध
![]() |
| पाकिस्तानी सैन्यदलाची शरणागती |
सन १९४७ मध्ये भारताचे विभाजन होऊन दि. १४ ऑगस्ट १९४७ ला पूर्व
पाकिस्तान (आताचा बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) हे अस्तित्वात
आले. भौगोलिकदृष्ट्या दोन ठिकाणी विभाजीत अशा संयुक्त देशाचे अस्तित्व तेव्हाही
अडचणीचे होते. पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी व पठाणी राजकिय नेत्यांचे पूर्व
पाकिस्तानवर वर्चस्व होते. त्यांची भाषा उर्दू होती. पूर्व व पश्चिम पाकिस्तानची
सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक संस्कृती भिन्नच होती. पूर्व पाकिस्तान नैसर्गिक
स्त्रोतांनी संपन्न होता. तेथे बंगाली नेते राजकिय वर्चस्व ठेवून होते. त्यांची
भाषा बंगाली होती. राजकारणासह सरकारी नोकऱ्यांत पश्चिमी पाकिस्तानी मंडळींचे
वर्चस्व होते. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तान विषयी प्रारंभापासून
नाराजी होती.
Friday, 1 June 2018
ना. गिरीषभाऊंचा अटकेपार झेंडा !
पालघर मतदार संघात भाजप उमेदवार राजेंद्र गावीत यांना विजयी करुन जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्ह्याबाहेरील दुसऱ्या निवडणुकीत नेतृत्वाचा "अटकेपार झेंडा" लावला आहे. नाशिक महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावून ना. महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द खरा करुन दाखविला होता. पालघरचा विजय हा त्यापुढील मोहिम असून आणि बदलत्या वातावरणात शिवसेनेच्या नाकावर टीच्चून जागा कायम राखण्याचे राजकीय कौशल्य ना. महाजन यांनी दाखविले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)








