Friday, 14 April 2017

सातबारा कोरा होणे कठीणच !

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की कर्जमुक्त करावे ? या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकात बराच खल झाला. सन २००८/९ मध्ये केंद्रातील व महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेली अंशतः कर्जमाफी, मदतीचे विविध पैकेज आणि सध्याच्या भाजप नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकार यांनी केलेली मदत या विषयांवर चर्चा झाली. विरोधकांनी कर्जमाफी हा विषय लावून धरला आहे. सत्ताधारी कर्जमुक्तीवर जोर देत आहेत. या दोघांच्या भूमिकांमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आशाळभूत झाला आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटपात महत्त्वाची भूमिका असलेल्या जिल्हा सहकारी बँकाही कर्जवसुलीची टक्केवारी घसरल्याने कर्जमाफी झाल्यास सरकारकडून हमखास मिळणाऱ्या रकमेकडे डोळे लावून आहेत. मात्र, या मागील आर्थिक गणित समजून घेणे आवश्यक आहे.

Tuesday, 11 April 2017

Why Sharad Pawar blemished man of corruption ?

Maharashtrian powerful leader Sharad Pawar honoured Padmavibhushan award by hands of president of Hindusthan Pranab Mukharji. This is one step down award compared with Bharatratna.

Prime Minister Narendra Modi government offered this Padma award to Pawar without any nomination or recommendations by State government or members of parliament. Modi always admir sensitivity, sensiblity and seniority of Pawar in politics and social libelities as being CM of Gujrat to become PM of Hindusthan. Both have friendly and faithful relationship on each other. Both publicly shows respects about each other, though makes some bad comment at the time of political propaganda or election campaign, rallies.

Saturday, 8 April 2017

हणमंत गायकवाड यांची यशसूत्रे

(हा लेख हा दैनिक देशदूत – खानदेश आवृत्तीच्या शब्दगंध पुरवणीत (दि. ९ एप्रिल २०१७ (पान १५ वर प्रकाशित झाला आहे)

बीव्हीजी इंडियाचे चेअरमन तथा व्यवस्थापकिय संचालक हणमंत गायकवाड यांचे दि. ७ एप्रिलला जळगाव येथे “कल्पनेपलिकडचे यश” या विषयावर व्याख्यान झाले. जळगावमधील कांताई सभागृह श्रोत्यांच्या गर्दीने खचाखच भरले होते. टाचणी पडेल आणि तिचा आवाज ऐकू येईल अशा शांततेत जळगावकरांनी गायकवाड यांच्या सेवा उद्योग समुहाची यशसूत्रे ऐकली. गायकवाड यांच्यासोबत प्रश्नोत्तराचा तासही रंगला. रोटरी क्लब जळगावतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने हणमंत गायकवाड यांच्या सेवा उद्योगातील यशसूत्रे समोर आली. त्याचा धावता आढावा ... 

Thursday, 6 April 2017

मोठ्या सावलीची दोन माणसे

केरळमधील नौदल प्रशिक्षण अकादमीचे प्रमुख तथा व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांना लष्करातील मानाचे अतिविशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते प्रदान झाले. या निमित्ताने सुनील भोकरे यांच्याशी केलेल्या कौटुंबिक गप्पांच्या आठवणी ताज्या झाल्या. दुसरीकडे, बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणमंत गायकवाड जळगावात येत असल्यामुळे त्यांच्या विषयीच्या औत्सुक्यातून त्यांच्या सेवा उद्योगाच्या यशकथांची काही पाने सलग वाचायला मिळाली. दोन्ही व्यक्तिमत्त्वे उत्तुंग भरारी घेणारी. मात्र, कुटुंबाच्या रुणानुबंधाचा दोघांचा धागा घट्ट .

Friday, 31 March 2017

मनिष भंगाळे हा तर “फेकर”च !

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी दूरध्वनी संभाषणाद्वारे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप करणारा कथित हॅकर (नव्हे फेकर) मनिष भंगाळेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. तशी ही कारवाई खुपच उशीरा झालेली आहे.

Tuesday, 28 March 2017

व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरेंच्या शौर्याची पाण्याखालील कहाणी

भारतीय नौदल अकादमीचे चीफ कमान्डन्ट तथा खान्देशचे सुपूत्र व्हाइस अॅडमिरल सुनील भोकरे यांचा उद्या बुधवार (दि.२९ मार्च) रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहरातील कांताई सभागृहात नागरी सत्कार उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव येथील गौरव समितीने केले आहे.  

Monday, 27 March 2017

जिंदा दिल मित्र डॉ. राजेश पाटील ...

गुढीपाडवा आज पहाटे पहाटे चांगली बातमी घेवून आला. एका मित्राने रात्री उशीरा मेसेज टाकलेला होता. "आयएमए" च्या सचिवपदी विश्वप्रभा हॉस्पिटलचे डॉ. राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बातमी वाचून आनंद झाला. डॉक्टरांच्या संदर्भात सध्या आव्हानात्मक वातावरण असताना जळगाव आयएमएच्या सचिवपदी डॉ. राजेश यांनी निवड होणे यात निश्चित चांगला योग आहे. नव्या कार्याची गुढी उभारण्याची संधी डॉ. राजेश यांना मिळाली आहे. याबद्दल नक्कीच त्यांचे तोंडभरून कौतुक आणि तमाम डॉक्टर व रुग्णांसाठीही काही वेगळे कार्य घडावे यासाठी शुभेच्छा !!

Saturday, 11 March 2017

शिमगा बहाद्दरांनो सावधान !

देशातील ५ राज्यांच्या विधानसभांपैकी सर्वांत मोठी विधानसभा असलेले उत्तरप्रदेश हे राज्य भाजपने पाशवी बहुमताने जिंकले आहे. ४०३ पैकी ३२५ जागा भाजपने जिंकल्या. उत्तराखंडमध्ये ७० पैकी ५७ आणि मणिपूरमध्ये ६० पैकी २१ जागा भाजपने जिंकल्या. पंजाबमध्ये भाजपने काँग्रेसकडून सपाटून मार खाल्ला तर गोव्यात काँग्रेसला संधी आहे. एकंदर ५ पैकी ३ राज्ये भाजपने जिंकली. जो जिता वो सिकंदर. नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या खुर्च्या अजून पक्क्या झाल्या. उत्तरप्रदेशच्या निकालावर गणिते मांडणारे गपगार झाले.

Sunday, 5 March 2017

वयाच्या पलिकडचे मैत्र ... युसूफभाई मकरा

जळगाव येथील व्यापारी युसूफभाई मकरा यांच्या वाढदिवसाचा तिहेरी घोळ असतो. त्यांचा वाढदिवस दि. २० जुलैला असतो. मात्र, एका दैनिकात तो दि. २० मेस छापून येतो. जळगाव येथे अजून एक ज्युनिअर युसूफ मकरा आहेत. त्यांचा वाढदिवस दि. २ मार्चला असतो. या तिनही दिनांमुळे युसूफभाईंना वर्षभरात तीन वेळा बर्थडेच्या शुभेच्छा मिळतात. गेल्या २ मार्चला मी सुद्धा युसूफभाईंना मोबाईलवरुन शुभेच्छा दिल्या. युसूफभाईंनी अगोदर थँक्यू म्हटले आणि मग म्हणाले, आज माझा वाढदिवस नाही. मला हसू आले. त्याचे कारण मला युसूफभाईंच्या तीनही वाढदिवसांची गंमत आठवली.  

Friday, 3 March 2017

महामार्ग चौपदरीकरणासाठी मुंबईत ८ मार्चला बैठक

गेल्या ३ वर्षांत खासदार रक्षा खडसेंकडून सतत पाठपुरावा

एकनाथराव खडसे यांची “सोशल मीडिया सोल्युशन” ला खास मुलाखत

जळगाव शहरातून जाणाऱ्या आणि प्रस्तावित वळण महामार्गाच्या संदर्भात मी स्वतः पाचवर्षांपासून आणि खासदार रक्षा खडसे या गेल्या ३ वर्षांपासून केंद्रीय मंत्रालयात पाठपुरावा करीत आहोत. आतापर्यंत या विषयावर दिल्लीत किमान ७ ते ८ बैठका झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ४ वेळा चर्चा झाली. जे प्रस्ताव होते ते मंजूर होवून त्याचे आराखडे तयार झाले. आता टेंडरिंग प्रोसेसही मार्गी लागली आहे. महामार्गाचा ४५० कोटींचा विकास आराखडा तयार झालेला आहे. आता हा आराखडा लोकांच्या समोर आणून त्यावर सूचना घ्याव्या लागतील. याचाच पुढचा भाग म्हणून दि. ८ मार्चला मुंबईत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे, अशी माहिती माजीमंत्री तथा या कामासाठी सतत पाठपुरावा करणारे एकनाथराव खडसे यांनी “सोशल मीडिया सोल्युशन” ला दिली.