![]() |
| कोरोनातून बरे होणाऱ्यांसाठी कोणते आहेत प्रश्न ? |
Tuesday, 19 May 2020
कोरोनातून बरे झालेल्यांची समाजवापसी ?
Sunday, 17 May 2020
कोरोनासोबतची जीवन व कार्यशैली !
संपूर्ण जगाला भयंकर साथीच्या संसर्गातून घोषीत बंदीच्या स्थितीत नेणारा कोरोनाचा विषाणू पुढे किती काळ मानवाला घाबरवत राहील याचा अंदाज लावणे आज शक्य नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गेले ६० दिवस संपूर्ण भारतातील जनजीवन ठप्प करण्यात आले आहे. त्यात आणखी १५ दिवसांचा कालावधी वाढवला आहे. साथरोग रोखण्यासाठी अपेक्षित ७५/७६ दिवसांची मर्यादा दि. ३१ मे पर्यंत पूर्ण होईल. हे करूनही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईलच याची शक्यता कमीच. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी वा नष्ट करण्यासाठी मुखावाटे घेण्याचे किंवा इंजेक्शन, सलाईनद्वारे टोचून घेण्याचे औषध सध्या तरी जगभरात कुठेही उपलब्ध नाहीच. म्हणजेच आहे त्या स्थितीत पुढील काळात वा दैनंदिन कामे व जबाबदाऱ्यांकडे प्रत्येकाला जावे लागणार आहे. मरणाच्या भीतीपोटी थबकलेल्या जगाला संभाव्य मृत्यू उरावर धरून धावणे सुरू करावेच लागेल. इच्छा असो वा नसो प्रत्येकाला धावावेच लागेल.
Wednesday, 13 May 2020
नाथाभाऊ, त्या ५५ फाईलींचा विषय काय ?
![]() |
| नाथाभाऊ किती दिवस पक्षांतरासाठी वेळ पाहाणार ? |
भाजपची मोठी गंमत आहे. या पक्षात सेनानिवृत्ती ही गोड बोलून व संभ्रमित ठेऊन दिली जाते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह ही ठराविक उदाहरणे. उत्तर महाराष्ट्रात धरमचंद चोरडीया, डॉ. दौलतराव आहेर, डॉ. विजय गावित ही काही उदाहरणे. भाजपत नेतेपदी असताना स्वतः ठरवून निवृत्ती निश्चित केल्याची केवळ तीन उदाहरणे आहेत. पहिले अटल बिहारी वाजपेयी, दुसरे उत्तमरावनाना पाटील यांचे. या दोघांनी सर्वोच्च पदांवर असताना स्वतःच बाजूला होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांना कोणतीच रांग दाखविण्याचे धारिष्ट्य कोणाचेही झाले नाही. तिसरे उदाहरण सुषमा स्वराज यांचे आहे. पक्षाची सत्ता असताना मंत्रीपद नाकारुन त्या बाजूला झाल्या. ही उदाहरणे सोडली तर बाकीच्यांना बाजूला सारायला अगोदर दुर्लक्ष, नंतर कुजबूज, त्यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणणे, नंतर सभा, बैठकांमधून टाळणे, हळूहळू आरोपांची तीव्रता वाढवणे, दोघा-तिघांनी थेट आरोप करणे, आरोपांना उत्तरे देण्यास बाध्य करणे आणि नंतर स्वतःच स्वतःची गच्छंती घडवून आणणे हे सूत्र वापरले गेले आहे.
भाजपतही सत्तेत कमबैक करता येते अशी उदाहरणे आहेत. त्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर होते. त्यांनाही पक्षाने काही काळ बाजूला सारले. कुजबूज मोहिम सुरू झाली. पण फुंडकर यांनी मौन पाळले. त्यांनी हल्ले-प्रतीहल्ले केले नाही. अखेरीस त्यांना मंत्रीपद मिळाले. फुंडकर मौन राखून कमबैक करु शकले. नाथाभाऊंना मौनाचे महत्त्वच समजले नाही. मंत्रीपदाच्या अवघ्या दीडवर्षांत इतरांकडून किंमत वसूल करीत नाथाभाऊंनी कुटुंबासह सत्तेचा अमर्याद उपभोग घेतला. नाथाभाऊंकडे १४ खात्यांचे मंत्रीपद होते. त्यात सहकार, महसूल, कृषी खाते होते. जळगाव जिल्हा बँक, जळगाव जिल्हा दूध संघात ठाण मांडून बसलेल्या व अनेक घोटाळे केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या फायली मंत्रालयात होत्या. चौकश्या आणि वेळप्रसंगी कारागृहाची भीती असल्यामुळे अनेक प्रस्थापितांनी नाथाभाऊसमोर शेपट्या घातल्या. फायलींच्या बळावरच नाथाभाऊंना घरात पदे आणता आली.
नाथाभाऊंसारखा अनुभवी नेता फायलींचे महत्त्व जाणतो. नाथाभाऊंनी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या काही व्यवहारांच्या ५५ फाईल्स अस्तित्वात आहेत, असे एक कुजबूज अभियान सध्या चर्चेत आहे. भाजपत एवढा अपमान सहन करुनही नाथाभाऊ पक्ष का सोडत नाहीत ? असा प्रश्न चर्चेत येतो तेव्हा या फाईलींची भीती उरावर असते म्हणे. सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनीही कधी तरी या फायलींचा उल्लेख केला होता. यातील काही विषय केंद्र सरकारमधील मंत्रालयांशी संबंधित आहेत. ईडी सारखी यंत्रणा कधीही मागे लावून उत्पन्नाचे उत्खनन करता येते. बहुधा याच चिंतेतून नाथाभाऊ भाजप सोडू शकत नाहीत. ही आगतिकता ध्यानी असल्यामुळे भाजपतील छुटपूटमंडळीही नाथाभाऊंना टपली मारत आहेत.
नाथाभाऊ भाजपने केलेल्या अन्यायावर भरभरुन बोलतात. दाऊदच्या पत्नीला फोन कॉल या तथ्यहिन प्रकरणात नाथाभाऊंविषयी जनतेत सहानुभूती होती. ती आजही आहे. पण अंबानी, अदानी या उद्योजकांशी का बिनसले ? वक्फ बोर्ड जमीन भानगडी काय ? भोसरीत जागा घ्यायला ४/५ कोटी कुठून आणले ? काही व्यवहारात बोगस कंपनी कोणत्या ? अशी काही माहिती नाथाभाऊंनी स्वतःच सांगून टाकायला हवी. जेणे करुन ज्या ५५ फाईलींची चर्चा आहे, तिला पूर्णविराम मिळेल. चंद्रकांतदादा व गिरीशभू यांनी नाथाभाऊंच्या प्रतिमा भंजनाला थेट हात घातला आहे. अशावेळी नाथाभाऊ कुंपणावरुन किती दिवस बचाव करणार ? एकदा जाहीरपणे त्या ५५ फायली आहेत की नाही, हे सांगून भाजपसंदर्भातील निर्णय घ्यायलाच हवा. नाथाभाऊंना कोणीही टपली मारावी, हे पाहणे व वारंवार तसे लिहिणे क्लेषकारक आहे.
नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे
नाथाभाऊंनी भाजप सोडून कोणत्या पक्षात जावे ? याविषयी महासर्वेक्षण घेतले होते. जवळपास १५० वर समर्थकांनी पर्याय सूचविले. यात धक्कादायक बाब हीच की, भाजपने नाथाभाऊला भरपूर दिले. आता त्यांनी गप्प बसावे, असे मत व्यक्य करणारे ७५ आहेत. नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे असे ३० जणांना वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय २५ जण सूचवतात. उरलेल्या २० मध्ये काँग्रेसहसह इतर पर्याय आहे. याचा निष्कर्ष एवढाच की, नाथाभाऊला पक्षाने भरपूर दिले हे कुजबूज अभियान आता भोंगा अभियान झाल्यानंतर उरलेल्या ७५ मधूनही बहुतांश सहमत होत जातील.
सुरेशदादा खडसेंपेक्षा सरस
सुरेशदादांच्या व नाथाभाऊंच्या राजकीय वाटचालीत अनेक आडवळणे सोबत आली. सुरेशदादांचे राजकारण धाडसाचे राहिले. डंका वाजवून त्यांनी पक्षांतरे केली. नाकावार टिच्चून निवडून येत गेले. जळगाव शहराला विकासाचा चेहरा दिला. अनेक विकास प्रकल्पांच्या फलकावर सुरेशदादांचे नाव आहे. पण नाथाभाऊंनी मंत्रीपदाच्या काळात उभारलेले प्रकल्प कोणते ? ते शोधावे लागतात. भाजप न सोडून आगतिक झालेल्या नाथाभाऊंपेक्षा वारंवार पक्ष बदलून सत्तेत राहिलेल्या सुरेशदादांची कारकिर्द उजवी ठरते. म्हणून आता तरी नाथाभाऊंनी वेळ चुकवू नये, असे समर्थकांना वाटते.
Friday, 8 May 2020
नाथाभाऊ बोलून टाका, 'पक्ष गेला उडत ...'
विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवारी नाकारणे, कन्येला तोंड देखली उमेदवारी देऊन नंतर पराभव घडवून आणणे, लागोपाठ झालेल्या आरोपांची चौकशी करुन एकही अहवाल जाहीर न करणे, पक्षाच्या राज्य व जिल्हा सभांमध्ये सन्मानाने सहभाग न देणे अशा मानभंगांच्या अनेक प्रसंगांचे कडू घोट एकनाथराव खडसे यांनी रिचवले आहेत. तरीही विधान परिषदेवर उमेदवारीची आशा बाळगून खडसे रांगेत उभे होते. अखेर उमेदवारी मिळाली नाही. नाथाभाऊंचा संयमाचा बांध पुन्हा फुटला आणि ते बोलले.
Sunday, 12 April 2020
पारंपरिक माध्यमांची मक्तेदारी मोडीत ...
संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या २३ मार्च पासून सुरु झालेला लॉकडाऊनचा कालावधी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. रेड झोनमध्ये असलेल्या भागात गरजेच्या वस्तू वा सेवेसाठी माणसांना घराबाहेर फिरण्यावर आणखी कडक प्रतिबंध लागण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. बहुधा या भागात प्रतिबंध शिथिल होतील. लॉकडाऊनच्या काळात माणसाला असलेली विविध माध्यमांची गरज वा निकड पूर्णतः मोडीत निघाली आहे. वृत्तपत्र, टीव्ही, एफएम रेडीओ आणि आकाशवाणी अशा सर्वच दृक व श्राव्य माध्यमांना पर्याय म्हणून स्मार्ट फोन वा ॲन्ड्रॉईड ॲपयुक्त मोबाईल हे सर्वाधिक माहिती देणारे व रंजन करणारे साधन (उपकरण) ठरले आहे.
सामुहिक अग्निहोत्रनंतर प्रदुषकांचे प्रमाण कमी
अक्कलकोट येथील विश्व
फाऊंडेशनच्या पुढाकाराने जळगाव येथे दि. १५ मार्चला सामुहिक अग्निहोत्रचा
विधी ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला होता. यावेळी फाऊंडेशनचे
अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी अग्निहोत्रचे पारंपरिक आणि विज्ञान
विषयक महत्त्व स्पष्ट करताना अग्निहोत्रनंतर हवेतील प्रदुषकांचे प्रमाण कमी
होते असा दावा केला होता. या संदर्भात पूर्वी केलेल्या काही प्रयोगांच्या व्हिडिओ क्लिपही माध्यमातून प्रसारित झालेल्या होत्या. त्याप्रमाणे जळगाव येथेही शास्त्रशुद्ध तपासणी करता यावी म्हणून
अग्निहोत्र स्थळी मापन यंत्रे लावून अग्निहोत्र पूर्व आणि त्यानंतर हवेतील
प्रदुषकांचे मापन केले गेले. मुंबईतील एनव्हायरो केअर लॅब प्रायव्हेट
लिमीटेडच्या तज्ञांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हवेच्या गुणवत्तेचे मापन केले.
त्यानंतर हवेतील प्रदुषकांची टक्केवारी कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. विश्व फाऊंडेशन भारतासह जगभरात अग्निहोत्रच्या प्रसाराचे काम करीत असते. आतापर्यंत जवळपास ४५ देशांमध्ये अग्निहोत्रच्या उपयुक्ततेविषयी विविध प्रयोग झालेले आहेत. जळगाव मधील प्रयोगामुळे आणखी विश्वासार्ह आकडेवारी हाती आली आहे.
Sunday, 5 April 2020
जळगावकरांच्या माहितीसाठी करार जाहीर करा ! - भाग १०
जळगाव शहरातील सफाई व स्वच्छतेचे सध्या त्रांगडे झाले आहे. पहिले म्हणजे, वॉटरग्रेसचा ठेका तूर्त रद्द आहे. तूर्त एवढ्यासाठीच की, ठेकेदार न्यायालयात गेल्यानंतर मनपाने केलेल्या कराराची तेथे काय चिरफाड होते ? यावर पुढचे ठरेल. दुसरी म्हणजे, मनपाने जळगावकरांच्या माहितीसाठी करार जाहीर करा ! - भाग १०३ प्रभागांसाठी मागविलेल्या निविदा (प्रभाग २ साठी ३, प्रभाग ३ साठी २, प्रभाग ४ साठी ३) अद्याप खुल्या केलेल्या नाहीत. किंवा ती प्रक्रिया रद्द केलेली नाही. तिसरे म्हणजे बांधकामासाठी मजूर पुरवठा करण्याच्या ठरावानुसार ४०० मजूर घेऊन तूर्त शहरात सफाई व स्वच्छता केली जात आहे. असे हे तीन विषयांचे त्रांगडे आहे.
Saturday, 4 April 2020
गोळा करणे व वाटपासाठी भाजपत गट-तट - भाग ९
स्वच्छ शहर अभियान योजनेची घोषणा केंद्र सरकारडून झाली तेव्हा महापौरपदावरुन नितीन लढ्ढा पायउतार होत होते. जळगाव मनपाने योजनेसाठी आराखडा तयार करणे सुरु केले तेव्हा महापौर होते ललित कोल्हे. यापूर्वी एक राजकीय उप कथानक घडले होते. खान्देश विकास आघाडीसोबत सख्य करुन स्वीकृत नगरसेवक असलेल्या कैलास सोनवणे यांचा (ना) राजीनामा रमेश जैन यांनी घेतला होता. कोल्हे यांचा कार्यकाळ संपत असताना मनपा निवडणुकीची धामधूम सुरु झाली. या काळात घडलेल्या घडामोडींनी जळगाव शहर भाजपत गटा-तटाची बिजे रोवली.
Friday, 3 April 2020
'वॉटरग्रेस'साठी कशी आणि का झाली घाई ? - भाग ८
जळगाव शहरातील सफाईचा ठेका 'वॉटरग्रेस'ला मिळवून देण्यासाठी माजी महापौर व इतर नगरसेवक यांच्या शिफारशी होत्या. सर्वांत कमी दर वॉटरग्रेसचा आल्यामुळे त्यालाच ठेका जाणार हे सुद्धा निश्चित झाले. त्यामुळे वॉटरग्रेस सोबत करार करण्याची घाई सुरु झाली. वॉटरग्रेसविरोधात इतर ठिकाणी असलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. फाईल पूर्ण करण्याचे काम ५ लाख रुपयात दिले गेले असे भाजपचे नगरसेवक सांगतात.
Thursday, 2 April 2020
निविदा ५ आणि शिफारशी अनेक !- भाग ७
स्वच्छ शहर अभियानांतर्गत संपूर्ण जळगाव शहरातील सफाई व स्वच्छतेचा एकमुस्त ठेका देण्याची निविदा मराठीत तयार झाली. नंतर ती अॉनलाईन प्रसिध्द झाली. ५ वर्षांत सुमारे ७५ कोटी रुपये खर्च होणार हे निश्चित होते. हा लोण्याचा गोळा पदरात पडावा म्हणून ५ कंपन्यांच्या निविदा आल्या. याचवेळी मनपातील काही पदाधिकाऱ्यांनी विशिष्ट कंपनीसाठी शिफारशी करणे सुरु केले. कोण होते ते ? आणि काय होता त्यांचा हेतू ? हे सुद्धा समजून घ्यायला हवे.
Subscribe to:
Posts (Atom)








