जळगाव महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासोबत अनौपचारिक गप्पा करण्याची संधी मिळाली. डांगे यांनी पदभार स्वीकारुन साधारणपणे पाच महिने झाले आहेत. मनपाची आर्थिक दुखणी आणि जळगावकरांच्या प्राथमिक सुविधांसंदर्भातील समस्या याची बऱ्यापैकी माहिती त्यांना झालेली आहे. मनपात सत्ताबदल होवून भारतीय जनता पक्षाच्या बहुमतातील पदाधिकारी सुध्दा कार्यरत झाले आहे. मोदी ते फडणवीस, फडणवीस ते गिरीश महाजन आणि महाजन ते महापौर सौ. सिमा व आमदार सुरेश भोळे अशी सत्तेची सूत्रेही निश्चित झालेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस उद्या (दि.८) जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
Saturday, 6 October 2018
Wednesday, 3 October 2018
नाना पाटेकरवर आमचा विश्वास आहे !
गेल्या काही दिवसांत दूरचित्रवाहिन्या आणि इंग्रजी, हिंदी अॉनलाईन तथा छापिल माध्यमातून दक्षिणेतील कधी काळी अभिनेत्री असलेली व सध्या अनिवासी भारतीय तनुश्री दत्ता हिने चित्रपट अभिनेता नाना पाटेकरवर गैरवर्तनाचा आरोप लावून नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य व चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही संशयाच्या पिंजऱ्या उभे केले आहे.
Tuesday, 18 September 2018
बच्चा लोग ... ताली बजाव !
सन १९९२/९३ मधील जळगाव शहरातील राजकीय इतिहास डोळ्यांसमोर येतो. नगरपालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीची बहुमताची सत्ता तेव्हा होती. स्व. बबन बाहेती, स्व. नरेंद्र पाटील, छबीलदास खडके, उल्हास साबळे असे दोन चार जण विरोधक म्हणून असायचे. पालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी असली की सत्ताधारी गटाची पार्टी मिटींग सुरेशदादांच्या निवासस्थानी व्हायची. सभेत अजेंड्यावरील विषय कसे मंजूर करायचे याचा फार्स तेथे निश्चित व्हायचा. प्रत्यक्ष सभेत एका कोपऱ्यात गफार मलिक, दुसऱ्या कोपऱ्यात बंडू तथा पांडुरंग काळे तिसऱ्या कोपऱ्यात शिवचरण ढंढोरे व चौथ्या कोपऱ्यात करीम सालार बसायचे.
Sunday, 16 September 2018
वसाहतीची जीवनशैली बदलणारा प्रकल्प ...
जळगावमधील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक असलेले श्रीराम व श्रीकांत बंधू सध्या चर्चेत आहेत. मनपाच्या निवडणुकीत पडद्यामागून व्यूहरचना करीत 'भेद आणि दाम' चा योग्य व्यक्तिंवर पुरेशा प्रमाणात वापर करीत भारतीय जनता पक्षाला 'न भुतो न भविष्यती' असे यश मिळवून देण्यात दोघांचा मोठा वाटा आहे. उमेदवार ठरविताना भाजपला ५० अधिक अशा ५२ जागा मिळतील असा दावा केला जात होता. मात्र, भाजपला किमान ५७ जागा मिळतील असे श्रीकांत सांगत होते. घडलेही तसेच. त्यामुळे भाजपच्या बेरजेच्या राजकारणापासून तर यशस्वी बिल्डर व्यवसायातील अनेक प्रकल्पात अग्रेसर असलेल्या खटोड बंधुंचे हात 'जेथे लागतील तेथे सोने होईल'अशी जादू करणारे असून ते तुपातही आहेत.
Monday, 3 September 2018
कौटुंबिक ऐक्याचे समर्पक उदाहरण ...
जैन उद्योग समुहातील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड या कंपनीचे सह - व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित भवरलाल जैन यांच्यावर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया रविवार, दि. २६ ऑगष्ट रोजी मुंबईत ब्रीचकेन्डी हॉस्पिटलमध्ये डॉ. भट्टाचार्य यांनी यशस्वीपणे पार पाडली. मुंबईचे ख्यातनाम कार्डिओलॉजीस्ट आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंचे जवळचे मित्र पद्मश्री डॉ. मुन्सी व जळगाव येथील डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर श्री. अजीत जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या ते आयसीयूमधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट झाले आहेत. श्रध्देय भवरलालजी व श्रध्देय कांताबाई जैन यांच्या पश्चात जैन कुटुंबाने अशा कसोटीच्या प्रसंगी दाखवलेल्या कौटुंबिक ऐक्य व एकत्रिकरणाचे एक अनोखे उदाहरण सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. श्री. अजीत यांच्यावरील शस्त्रक्रियेसंदर्भातील अधिकृत घोषणा करताना जैन कुटुंबाने आवर्जून 'भवरलाल व कांताबाई जैन यांचे कुटुंबिय' असा उल्लेख केला आहे. कौटुंबिक व आरोग्यविषयक सौख्य लाभाचे किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचे ऐक्य व एकत्रिकरण कसे आवश्यक असते, ती सुध्दा एक सकारात्मक शक्ती असते हेच यातून अधोरेखीत झाले आहे.
Sunday, 2 September 2018
नाथाभाऊंना माध्यमांचा चकवाच !
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस. त्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षात खडसेंची राजकीय कोंडी करण्यात आली आहे. फारसा आगापिछा नसलेल्या कथित आरोपांच्या भोवऱ्यात खडसे पक्षांतर्गत एकाकी पडले आहेत. अशा स्थितीत आगतिक झालेल्या खडसे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या संदर्भात केलेले वक्तव्य आठवले. खडसेंनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, 'सत्य माहित झाल्यानंतर माध्यमांनी मला न्याय मिळवून द्यायला हवा !' अर्थात, खडसेंवर झालेल्या अनेक आरोपांपैकी एकही आरोप न्यायालयाच्या कक्षात साधार पुराव्यांसह साबीत झालेला नाही. या सोबत दुसरी बाजू अशीही आहे की, खडसेंवरील सर्वच आरोप निराधार असल्याची क्लिनचीट भाजप नेतृत्वातील सरकारने दिलेली नाही. म्हणून खडसेंची सत्तास्थानावरील वापसी होण्याची तुर्तास शक्यता नाही. याची जाणिव खडसे यांनाही असून काही दिवसांपूर्वी ते स्वतःच म्हणाले आहेत, 'मला मंत्रीपद मिळण्याची 'ती योग्य वेळ' परत कधी येणार नाही.'
Saturday, 18 August 2018
समाजसेवकांना फसवणारे निवडणुकीचे मापदंड
जळगाव महानगर पालिकेत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्य सुरु होईल. शहर विकास आघाडी, खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे नगर पालिका व महानगर पालिकेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या नेते व त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेच्या रुपात सत्ता हाती कायम ठेवण्याचा प्रयत्न जळगावकर मतदारांनी नाकारला. जुन्यांची सत्ता नकोच असा निश्चिय केलेल्या जळगावकरांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला २/३ पेक्षा जास्त बहुमत दिले आहे. भाजपच्या या विजयाचे विश्लेषण विविध माध्यमातून करण्यात आले आहे.
Wednesday, 15 August 2018
नशिबाची वाजलेली घंटा ...
डीसीएम गाडीचा ड्रायव्हर ते अशोक लेलैण्डचा डिलर ...
मैत्रिचा गोतावळ्याच बंध कोणात कसा गुंतवून टाकेल सांगता येत नाही. अशाच एका बंधाने आज जखडून टाकले. जुने मित्र ॲड. जमिल देशपांडे यांची 'अपर्णा ॲटोमोटीव्ह' च्या उद्घाटन समारंभात भेट झाली. मला कार्यक्रमासाठी उपस्थितीचा आग्रह सौ. अपर्णा भट - कासार या आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रिणीकडून होता. श्री. किरण कासार यांनीही आवर्जून या असे व्यक्तिशः म्हटले होते. बहुधा जमिलभाई सुध्दा अशाच आग्रहातून आले असावेत ? असा अंदाज होता.
मैत्रिचा गोतावळ्याच बंध कोणात कसा गुंतवून टाकेल सांगता येत नाही. अशाच एका बंधाने आज जखडून टाकले. जुने मित्र ॲड. जमिल देशपांडे यांची 'अपर्णा ॲटोमोटीव्ह' च्या उद्घाटन समारंभात भेट झाली. मला कार्यक्रमासाठी उपस्थितीचा आग्रह सौ. अपर्णा भट - कासार या आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रिणीकडून होता. श्री. किरण कासार यांनीही आवर्जून या असे व्यक्तिशः म्हटले होते. बहुधा जमिलभाई सुध्दा अशाच आग्रहातून आले असावेत ? असा अंदाज होता.
Monday, 30 July 2018
प्रचाराला रिवाईंड करु या !
जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला. निवडणूक रिंगणात असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांचा एकही स्टार प्रचारक शहरात आला नाही. हे या निवडणूक प्रचाराचे पहिले वैशिष्ट्य. प्रचारात स्थानिक नेत्यांनी गल्लीबोळात फिरुन पक्षाच्या उमेदवारांना वियजी करा असे आवाहन केले. यात भाजपतर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन, रमेश जैन, नितीन लढ्ढा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. राधेशाम चौधरी यांनी सहभाग दिला. रिपब्लिकन पक्षाचे अनिल अडकमोल व राजु मोरे हे शिवसेनेसोबत आहेत. स्थानिक नेत्यांनी प्रचारासाठी घेतलेली मेहनत हे प्रचाराचे दुसरे वैशिष्ट्य ठरले.
Sunday, 29 July 2018
नाथाभाऊंच्या बनावट अॉडिओ क्लिपचे गौडबंगाल...
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला आजचा (दि. ३०) एकच दिवस शिल्लक आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सोशल मीडियात अजब फंडा वापरण्यात आला आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजाची नक्कल करून, ‘भाजपला मतदान करा’ असे आवाहन करणारी बनावट ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या बनावट क्लिपविषयी माहिती मिळाल्याने स्वत: नाथाभाऊ व्यथित झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून या गंभीर प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. नाथाभाऊंच्या नावाने भाजपला मतदान हवे, पण नाथाभाऊ भाजपत नको, असा कुटील डाव सध्या खेळला जात असल्याचे यातून उघड झाले आहे. म्हणून अशी क्लिप कोणी तयार केली असावी यामागील गौडबंगाल वाढले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)









