जळगाव शहराचे बारावे महापौर आणि मनसेच्या १२ नगरसेवकांचे नेते ललितभाऊ कोल्हे यांचा आज वाढदिवस. जवळच्या आणि जिवाभावाच्या काही मित्रांचे त्यांच्या वाढदिवसाला मनःपूर्वक अभीष्टचिंतन करताना त्यांच्या विषयी चांगल्या गोष्टी लिहण्याचा वसा अनेक वर्षांपासून मी जपला आहे. वृत्तपत्राच्या व्यापातून बाजुला झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. ओळखीचे रुपातंर परिचयात झाले. परिचयातून मैत्री वृद्धींगत झाली. काही मोजक्या लोकांशी विवाद होवूनही गाढ मैत्री झाली. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून हक्काच्या वाचकांपर्यंत पोहचताना मित्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरांना माहित नसलेले पैलू उलगडण्याची संधी साधत आलो आहे. याच परंपरेत आज ललित कोल्हे यांच्या विषयी ठरवून लिहित आहे. विवादातून झालेल्या या मैत्रिची प्रवास लक्षवेधी आहे.
Sunday, 21 January 2018
Wednesday, 10 January 2018
समांतर रस्ते जनआंदोलनाचा आदर्श व अन्वयार्थ ...
जळगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व समांतर रस्ते विकास संदर्भात समांतर रस्ते कृती समितीने केलेल्या महामार्ग रोकोला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी महामार्ग रुंदीकरण व समांतर रस्ते विकासाबाबत आंदोलनकर्त्या नागरिकांसमोर कालबध्द कामांची घोषणा केली. एवढेच नव्हे तर काम पूर्ण करण्याची लेखी हमी जळगावमधील तटस्थ व मान्यवर नागरिकांना दिली. हे चेहरे राजकीय नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून समांतर रस्ते कृती समिती निग्रहाने बाजुला झाली आणि नागरिकांतर्फे तटस्थ निरीक्षकांनी लेखी हमीपत्र स्वीकारले, या मागील संकल्पना हिच तर खरी जनआंदोलनाची आहे.Thursday, 4 January 2018
शालेय शिक्षणातला अनोखा प्रयोग - एड्युफेअर २०१८
आंतराष्ट्रीयस्तरावरील शालेय शिक्षणाचे उच्च मानांकन पूर्ण करीत हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंटरनॅन्शल स्कूलची निर्मिती करणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत तथा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन तथा मोठेभाऊ यांनी अत्यंत दूरदृष्टीने सामान्य समाज घटकातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलची सुध्दा निर्मिती केली. मोठेभाऊंनी लावलेली शालेय शिक्षणाची ही दोन रोपे आता वृक्षागत बहरत आहेत. दोन्ही शाळांमधील अध्यापन आणि अध्ययनाची संकल्पना ही हसत खेळत शिक्षण आणि खेळता खेळता शिक्षण अशी आहे. शिक्षकांच्या सोबतच विद्यार्थीही नाविन्यपूर्ण अध्यापन साहित्याचा शोध घेवून शिक्षण प्रक्रियेला सहज, सोपी, सुलभ व आनंदायी करीत आहे.
Wednesday, 20 December 2017
गुजरात के चुनावी तोलकाटे पर महाराष्ट्र !
गुजरात विधानसभा चुनाव के नतिजे सामने आए है ।गुजरात पर २२ साल से सत्ता बनाये भाजपा को गुजरात के मतदाताओंने फिरसे ५ साल सत्ता चलाने का विकल्प चुना है । गुजरात के जीत के साथ देश के उपरी हिस्सेवाले हिमाचल प्रदेश की विधानसभा भाजपाने काँग्रेस के हाथों छीन ली है । गुजरात में भाजपाके अल्प संख्यात्मक विजय की चर्चा कई मुद्दे लेकर जैसे गर्मा रही है वैसे दुसरी ओर हिमाचल प्रदेश में काँग्रेस के पराजय की बात पर सभी राजकीय विश्लेषक मौन धारण कर बैठे है ।
Monday, 18 December 2017
दक्षिण गुजरात जिंकणारा सेनापती ...
![]() |
| दक्षिण गुजरातमध्ये भाजपच्या २४ जागा जिंकून आणणारी कामगिरी करणारे प्रभारी डॉ. राजेंद्र फडके (मध्यभागी) यांचा सत्कार करताना मित्र मंडळी |
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष
लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. सन २०१२ मध्ये निवडणूक
झालेल्या व आताच्या मावळत्या विधानसभेत एकूण १८२ पैकी ११५ जागा भारतीय जनता पक्षाच्या
पारड्यात होत्या. आज निकाल लागताना एकूण १८२ पैकी जवळपास ९९ जागा जिंकून भाजपने
सत्ता आपल्याच हाती राखण्यात यश मिळविले आहे. साध्या बहुमतासाठी ९२ जागा जिंकणे
आवश्यक होते. भाजपने त्यापेक्षा ७ जागा जिंकल्या आहेत. (यात अंतिम निकालात
एखाद-दोन जागांचा फरक शक्य आहे) गुजरात राज्यात भाजपचा हा सलग सहावा विजय आहे. गेली
२२ वर्षे तेथे भाजप सत्तास्थानी आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे
अध्यक्षपद स्वीकारणारे राहुल गांधी, पटेल आरक्षणाचा मुद्दा मांडणारा हार्दिक, ओबीसींचा
नेता अल्पेश ठाकोर व दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी गुजरातचे मूळ असलेल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना प्रचारात घाम
फोडला होता. गुजरातमध्ये परिवर्तन घडेल अशी हवा निर्माण केली होती. काही अंशी या
चौघांच्या युतीने भाजपची जवळपास १६ जागंवर पिछेहाट केली पण सत्तापरिवर्तन करण्याचे
यश त्यांना मिळाले नाही. मागील निवडणूक निकालाशी तुलना केल्यास भाजपने यावेळी
सत्ता कायम राखली असली तरी जवळपास १६ जागा कमी गमावल्या आहेत. दुसरीकडे
काँग्रेसच्या जागा मागील निकालाच्या तुलनेत १८ ने वाढल्या आहे. युद्धात आणि प्रेमात
विजय हा विजय असतो, या न्यायाने गुजरातची निवडणूक ही पुन्हा मोदी-शहा-भाजप या
त्रिकुटाने जिंकली आहे.
Saturday, 16 December 2017
संयमाचा महामेरु प्रदीपभाऊ !!
Thursday, 7 December 2017
लिमजीचे आनंददायी स्मरण ...
जैन उद्योग समुहाचा कर्मचारी लिमजी जलगाववाला हा सच्चा पर्यावरणवादी कार्यकर्ता होता. त्याच्या स्मृती ताज्या होण्याचे कारण म्हणजे, लिमजी जलगाववालाच्या नावाने जैन उद्योग समुहाने पुरस्कृत केलेल्या पर्यावरण क्षेत्रातील विविध कार्यासाठीच्या पुरस्कारांचे व सन्मानचे वितरण जळगाव येथे दि. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाले. लिमजीच्या निधनानंतर झालेल्या सभेत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी अशा प्रकारचे पुरस्कार देण्याची इच्छा बोलून दाखविली होती. त्यानुसार वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात लिमजीच्या नावाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. हाच प्रसंग लिमजीच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि आनंददायी होता. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर श्री. अशोक जैन यांनी असेही घोषित केले की, लिमजीच्या नावाचे पुरस्कार भविष्यातही सुरु राहतील आणि त्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील निवड करावयाच्या व्यक्ती, समुह याचा दर्जाही उंचावत नेला जाईल.
Monday, 27 November 2017
ना. गिरीषभाऊ ! टू राईट अॉर नॉट राईट ?
संपूर्ण राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प करुन वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन आणि त्यांची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या संकल्पनेचे मूळ जनक ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने व विक्रमी शल्यचिकित्सक डॉ. रागिनी पारेख हे दोघेही दिवसाला २०० वर रुग्णांचे मोतीबिंदू काढत आहेत. ज्येष्ठ व सर्वांत बुजूर्ग समाजसेवक अण्णा हजारे यांनी ना. महाजन यांच्या आरोग्य महाशिबिर आयोजनाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.Wednesday, 22 November 2017
"दशक्रिया" ला विरोध कशासाठी ?
ब्राह्मण समाजातील पोट जातींमधील कर्मकांडाच्या वादावर आधारलेल्या दशक्रिया या चित्रपटाला ब्राह्मण समाजाकडून विरोधाचे वातावरण आहे. विषय ब्राह्मणांशी संबंधित असल्यामुळे इतर मंडळींनी दशक्रिया चित्रपट प्रदर्शनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत ब्राह्मण द्वेषाचे बी पेरणारी विचारधारा विस्तारते आहे. ज्यांचे राजकारण जात व समाजावर आधारलेले आहे अशी राजकीय मंडळी सतत अस्वस्थ आहे. समाज आधारित पक्षीय राजकारण आणि संघटीत झुंडशाही निर्धारित राजकारण असे दोन्ही कार्ड वापरुन सुध्दा गावपातळी पासून तर मंत्रालयापर्यंतची सत्ता मिळू शकत नाही अशा आगतिकतेतून ब्राह्मणांच्या द्वेषाच्या अनेक जागा शोधल्या जात आहेत. याच द्वेषाची किनार दशक्रिया चित्रपट सादर व्हावा या भूमिके मागे असावी ?
Thursday, 9 November 2017
मैत्रिच्या मण्यांमधील धागा ...
अनिल जोशी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे अभीष्टचिंतन करताना मैत्रीतील दोन- चार गोष्टी लिहायची मनस्वी इच्छा आहे. सन १९९२ पासून अनिल आणि मी घट्ट मित्र आहोत. बहुतांश गोष्टी आम्ही एकमेकांकडे शेअर करतो. तरीही अरे - तुरेचे नाते काही आमच्यात निर्माण झाले नाही. याचे कारण म्हणजे, अनिल यांनी व्यक्तिशः माझा आदर करणे कधीही सोडले नाही. नोकरीत शिकाऊ असल्यापासून आम्ही सहकारी होतो. वयाने मी मोठा असल्याने अनिल यांना दरडावण्याचा अधिकार मी खूप वेळा वापरला मात्र, अनिल यांनी प्रत्युत्तर न देता नेहमी आदरच केला. नंतर मान सन्मानाच्या पदावरही दोघांनी सोबत काम केले. अनेकवेळा अनिल आणि माझ्यात विवादाचे विषय आले. मी वेळप्रसंगी टोकाचा वागलो. पण अनिल यांनी संभाव्य वाद नेहमी जेवणाच्या टेबलावर मिटवला.
Subscribe to:
Posts (Atom)






