राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मालमत्तेविषयी चौकशी करण्याची जनहित
याचिका (क्र. ३/१७) मुंबईच्या उच्च न्यायालयात अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी
दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात न झालेल्या चर्चेची चुकीची
माहिती देणाऱ्या बातम्या संबंधित न्यायाधिशांच्या नावाने राज्यभरातील तमाम आघाडीच्या
माध्यमे व दैनिकांमध्ये दि. १५ जुलै २०१७ ला ठळकपणे प्रसिद्ध झाल्या आहेत.
प्रसिद्ध बातम्यांमधील तपशील पूर्णतः काल्पनिक आणि दिशाभूल करणारा आहे. या
संदर्भात खडसे यांच्यावतिने याचिकेच्या संदर्भातील कागदपत्रे व्हायरल करण्यात आली
आहेत. याचिकेच्या आतापर्यंत झालेल्या सात दिवसांच्या सुनावणीत अवघ्या एकेका ओळीत
कामकाज नोंदले गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही दि. १५ जुलै २०१७ च्या
बातम्यांमध्ये तपशील असा लिहला आहे जणू काही प्रत्यक्षदर्शीने न्यायालयात उपस्थित
राहून आणि सारे कामकाज पाहून, ऐकून बातमी लिहीली आहे. वाचकांचा असा समज होवू शकतो.
Sunday, 16 July 2017
Wednesday, 12 July 2017
शिवसेनेतील डबल बडवे !
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे आज (दि. १२ जुलै) खान्देशच्या
दौऱ्यावर आहेत. त्यांना काही गोष्टी कळाव्यात म्हणून हा विशेष ब्लॉग लिहीला आहे. साधारणतः
महिनाभरापूर्वी धुळ्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणुकीत खान्देशातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होतील. अर्थात, राऊत
यांचे असे अनेक राजकिय अंदाज चुकतात. राऊत बोलघेवडे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते स्वतः कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवून विजयी
झालेले नाहीत. नियुक्तीच्या मार्गाने राज्यसभेत पोहचणाऱ्या व्यक्तीला निवडणूक
जिंकायला काय करावे लागते हे कसे समजणार ? असो, मात्र उद्धव ठाकरे यांचा हा दौरा मुख्यमंत्री होण्यासाठीची पाया भरणी
असेल तर आज त्यांनी शिवसेनेतील डबल बडवे (दोन्ही बाजुने बडवणारे या अर्थाने) ही
टीका समजून घ्यावी.
Sunday, 2 July 2017
आपण पत्रकार का व्हावे ?
प्रिंट, रेडीओ, टीव्ही आणि वेब अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्त माध्यमांसाठीचा बातमी स्वरुपातील आशय हा शब्द, ध्वनी, चित्र आणि चलचित्र स्वरुपात असतो. या आशयाची निर्मिती करणारा घटक हा पत्रकार असतो. पत्रकारासोबत आशय संकलन, संपादन आणि सादरीकरण करणारी यंत्रणा असते. ही यंत्रणा यंत्र, तंत्र आणि विज्ञानाचा वापर करीत वाचक, श्रोता व प्रेक्षकाला समजेल अशा स्वरुपात आशय निर्मिती करते. लोकांना म्हणजेच जनतेला समजेल असा आशय निर्माण करुन तो सादर करणे यालाच जनसंवाद म्हणतात. उत्तम प्रकारे जनसंवाद करुन सर्वोत्तम प्रकारचा कृतिशील जनप्रतिसाद मिळवायचा असेल तर सर्व प्रकारची कौशल्ये आत्मसात असलेला आणि त्याचा वापर करु शकणारा पत्रकार हवा.
Friday, 23 June 2017
येसूबाई - प्रत्येक महिलेने वाचावी अशी चरित्रात्मक कादंबरी ... !
छत्रपती शिवाजी
महाराजांच्या चरित्रातील अनेक घटनांचे संदर्भ नव्याने लिहीण्याचे प्रयत्न होत आहेत.
जुने, नवे ऐतिहासिक दस्तावेज आणि त्यांच्या सत्यतेबाबतची खात्री करुन काही
विषयांची नव्याने मांडणी करण्यात येत आहे. पूर्वी लिहीलेल्या शिवचरित्रावर भाट,
शाहिर, कवी आणि लेखकांच्या जाती, धर्माचा शिक्का मारुन एकांगीपणे व विशिष्ट हेतूने
त्यांनी लेखन केल्याचा दावा केला जात आहे. शिवचरित्राचे पुनर्लेखन करण्याच्या
निमित्ताने इतिहास संशोधकांचे नवे चेहरे समोर येत आहेत.
Sunday, 18 June 2017
मनिष भंगाळेच्या कुभांडची ७८८ पाने
![]() |
| पोलीस कोठडीत मनिष भंगाळे |
Saturday, 10 June 2017
फडणवीस पुन्हा नापासच !
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणी वरुन महाराष्ट्रात धुम्मस सुरु आहे. दि. १ जून २०१७ पासून आठवडाभर शेतकरी संपाचे वातावरण आहे. आज या संपाचा फारसा परिणाम दिसत नाही. काही प्रमाणात दूध पुरवठा विस्कळीत झाला. भाज्यांच्या किमती कडाडल्या. दोन कारणांमुळे. पहिले म्हणजे लिलाव ठप्प झाले. दुसरे म्हणजे पावसाला सुरुवात झाली. जवळपास सर्व भाज्या ३० ते ४० रुपये किलोपर्यंत पोहचल्या.
Sunday, 4 June 2017
शेतकरी संघटना भाजपच्याच गळी !
शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा करुन संपात फूट पाडल्याचा आरोप करुन जयाजी सूर्यवंशीची संपूर्ण जातकुळी काढली जात आहे. गणोजी शिर्के किंवा सूर्याजी पिसाळ संबोधून त्याचा रावसाहेब दानवे केला जातोय. साला शब्द उच्चारुन दानवे अडचणीत आल्यानंतर त्यांच्यासाठी जी भाषा वापरली गेली तीच आता जयाजीसाठी आहे. दानवेंचीही जातकुळी काढली गेली होती. मराठा मूकमोर्चा संदर्भात संभ्रम निर्माण करणारी एक जाहिरात पुण्यातून प्रसारित झाली होती. हे सर्व संदर्भ पुन्हा ताजे झाले.
Thursday, 25 May 2017
संगीत संशेवकल्लोळला हवा रसिकाश्रय !
खान्देशी मातीतील नाट्य कलावंतांना सोबत घेवून
व्यावसायिक रंगभूमिवर भरारी घेण्याचा अलिकडचा दुसरा प्रयत्न “संगीत संशेवकल्लोळ” या नाटकाने होतो आहे. मुंबई
येथील श्री महाल्क्ष्मी प्रॉडक्शन निर्मित हे दोन अंकी फुल्ल टू धमाल नाटक जळगाव
येथील स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे उद्या, शनिवार, दि. २७ मेस सायंकाळी
७.३० वाजता भय्यासाहेब गंधे सभागृहात सादर होत आहे. हा नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग
आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य आहे.Wednesday, 17 May 2017
वैचारिक दहशतवाद
सत्ता, संपत्ती, अधिकार आणि शोषण अशा चार प्रमुख गोष्टींच्या हव्यासापोटी दहशतवाद किंवा नक्षलवाद बळावतो. या चारही गोष्टी ज्यांना हव्यात ते समुह करुन एकत्र येतात. हे एकत्र येणे प्रथमतः धर्माच्या नावावर असते. त्यानंतर पंथ, वर्ण, समाज, जात, लिंग आणि कार्य अथवा विचारांच्या सामायिकतेतून लोकांना एकत्र आणले जाते. ज्या चार गोष्टींची मागणी करायची त्यासाठी अगोदर लक्षवेधी आक्रोश केला जातो. आक्रोशातून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आंदोलन उभे राहते. आंदोलनाचे मूलतः दोनच प्रकार असतात. पहिला अहिंसक व दुसरा हिंसक.
दहशतवादाला मूक विरोध ...
परदेशातून आणि देशांतर्गत
अशा दोन्ही प्रकारच्या दहशतवादी व घातपाती कारवायांचा सामना करणाऱ्या भारतात
दरवर्षी दि. २१ मेस दहशतवाद विरोधीदिन साजरा केला जातो. श्रीलंकन दहशतवादी संघटना
लिट्टेने आत्मघाती बॉम्बचा वापर करून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची
श्रीपेरंबुदूर (तामिळनाडू) येथे दि. २१ मे १९९१ ला हत्या घडवून आणली होती.
त्यांच्या स्मृतिनिमित्त काँग्रेस आघाडी सरकारने देशभरात दहशतवाद विरोधीदिन दि. २१
मेस साजरा करणे सुरू केले. अर्थात, यामागे भारतात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या
माध्यमातून होणाऱ्या घातपाती कारवायांचा इतिहास व ताजा वर्तमानही आहे.
Subscribe to:
Posts (Atom)







