Monday, 27 April 2015

'मधुकर’चा कलाटणी देणारा कौल

फैजपूर (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल कारखान्यातील सत्ताधारी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वातील ‘शेतकरी’ पॅनेलला धक्का देणारा ठरला. जावळे यांच्यासह त्यांचे सर्व २१ शिलेदार पराभूत झाले. लेवापाटीदार बहूल मतदारांनी ‘भुईसपाट’ या शब्दाचा प्रत्यय आणून देत दिलेला हा कौल सहकार क्षेत्राला निश्चितपणे कलाटणी देणारा आहे. ‘मधुकर’मध्ये आता दुसर्‍या पिढीतील नेत्यांच्या नेतृत्वात ‘लोकमान्य’ पॅनेलची सत्ता आली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून नेतृत्व करणारे स्व. मधुकरराव चौधरी यांचे चिरंजिव शिरीष चौधरी, कारखान्याचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले स्व. जे. टी. महाजन यांचे चिरंजीव शरद महाजन, माजी उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी यांचे चिरंजीव अतुल चौधरी यांच्यासह रमेश विठ्ठल चौधरी, अरुण पाटील आदींकडे कारखान्याचे नेतृत्व आले आहे. कारखान्याची आर्थिकस्थिती ‘डबघाईच्या मार्गावर’ अशीच आहे. ४० कोटींचा तोटा, पाच कोटींची कामगारांची देणी, ऊसाचे घटलेले क्षेत्र आणि ऊस तोडणीचे बिघडलेले वेळापत्रक अशा अनंत अडचणी नव्या संचालकांच्या समोर आहेत. मात्र, प्रामाणिक प्रयत्न केले तर हा कारखाना पुन्हा उर्जितावस्थेत येवू शकतो. तसे घडले तर ‘मधुकर’चा पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरू शकेल...

Saturday, 25 April 2015

वृत्तलेखन कार्यशाळेला लाभले "चार चाँद"

हम निकले साथमें और कारवाँ बनता-बढता गया
दिलीप तिवारी
 ळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि जळगाव तरुण भारततर्फे दि.२३/ २४/ २५ एप्रिल २०१५ अशी ३ दिवस पत्रकार, लेखक, जाहिरातदार आदींसाठी मोफत कार्यशाळा झाली. यात मुख्य मार्गदर्शक म्हणून तरुण भारतचे मुख्य संपादक दिलीप तिवारी यांनी भाषा, शुध्द लेखन, वृत्तलेखन व पद्धती आणि लेखन कार्याशी संबंधित साधने यावर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी ४५, दुसऱ्या दिवशी ३९ आणि समारोपाच्या दिवशी ४६ जणांनी सहभाग घेतला.

‘पेपर रद्दी’च्या बदल्यात ‘नव्या वह्या’

आनंद पब्लिकेशन्सचा उपक्रम ः देशभरात युवकांची साखळी जोडणार



र्यावरण रक्षण आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशातून जळगावच्या आनंद पब्लिकेशन्सच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘रद्दी द्या’ नव्या कोर्‍या ‘नेचर फ्रेंडली वह्या घ्या’, हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या हा उपक्रम पुण्यात सुरू असून तेथे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही माहिती आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांनी दिली.

Sunday, 19 April 2015

पालकांशी समन्वयासाठी ‘अॅप’

नंदुरबारचे किशोरभाई वाणी यांचा प्रयत्न ः नंदुरबारच्या ‘केआरपीएस’चा उपक्रम

 

 शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगती, गुणवत्ता आणि वर्तणुकीची माहिती पालकांना देण्यासाठी ‘ऍण्ड्राईड ऍप’ चा वापर करण्याची अभिनव संकल्पना नंदुरबारच्या कन्हय्यालाल रावजी पब्लिक स्कूलने (केआरपीएस) अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. बदलत्या काळानुसार नव्या तंत्राचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना संभाव्य स्पर्धेत कसे उतरवता येईल, याचाच ध्यास घेतलेले नंदुरबारचे उद्योगपती तथा सर्वांत मोठे आडत व्यापारी किशोरभाई वाणी यांच्या नेतृत्वात ही शाळा वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग राबवित आहे.

गारपिटचे संकट अटळच !

हाराष्ट्रासोबत इतरही राज्यांमध्ये बारमाही होणार्‍या गारपिटचे नवे संकट शेतकर्‍यांसमोर दोन-तीन वर्षांपासून उभे ठाकले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीच्या तीनही हंगामातील पिकांना बसत असून शेतकर्‍यांसोबत केंद्र व राज्य सरकारही या संकटावर कशी उपाय योजना करावी? याच विचाराने हवालदिल आहे. गारपिट रोखण्याचे कोणतेही यंत्र-तंत्र-विज्ञान सध्यातरी जगात कुठेही उपलब्ध नाही. मात्र, अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने हवामान बदलाचा अंदाज घेवून बेमोसमी पाऊस, गारपिट किंवा वादळ-वारे याचा काही तास अगोदर विश्‍वासपूर्ण अंदाज देवू शकेल असे तंत्र जगभरात विकसित झाले आहे. हे यंत्र-तंत्र सरकारी खर्चाने किंवा शेतकर्‍यांनी सामूहिक सहकार्यातून शेतशिवारापर्यंत आणण्याचा विचार करायला हवा. तसे झाले तरच भविष्यात गारपिटच्या संकटातून शेती उत्पादनांचा बचाव करणे शक्य होणार आहे...

Wednesday, 15 April 2015

माझे चौथे आयुष्य...( अर्थात इंटरनेटवरचे सातबारा)

 भारतीय जीवनशैलीत माणसाचे आयुष्य तीन प्रमुख स्थितीत असल्याचे मानले जाते. ढोबळ मानाने विचार केला तर तो जगतो ते आणि जे इतरांना दिसते ते असे भौतिक अथवा ऐहिक हे पहिले आयुष्य. यात आपण इतरांसाठी कोण आहोत ? हे ठरवूनच माणसाची वागणूक सुरू असते. दुसरे आयुष्य म्हणजे माणसाचे अंतर्गत अथवा स्वतःशी असलेले वर्तन. आपण कोण आहोत ? हे पूर्णतः जाणून माणूस स्वतःशी वर्तन करीत असतो. तिसरे आयुष्य म्हणजे माणसाच्या मन, वृत्ती, प्रवृत्ती, स्वार्थ, लालसा, अपेक्षा, ईच्छा, लोभ, मोह, मद, मत्सर, क्रोध, ताप-संताप, आनंद, सुख, समाधान यावर नियंत्रण करण्यासाठी असलेली शरिरांतर्गत रसायन प्रणाली. एका आर्थाने हे माणसाचे सुक्ष्म आयुष्य. या आयुष्याला संयम, दृढता, निश्चय याचे बंधन घालण्यासाठी पर्यायी जीवनशैली असते ती यौगिक आयुष्य, अध्यात्मवादी आयुष्य किंवा माणसाची व्यक्तीगत छंदाची दुनिया. माणूस आतापर्यंत हे तीन आयुष्य जगत होता. आता माणसाचे चौथे आयुष्य सुरू झाले आहे.

Monday, 13 April 2015

‘जिल्हा बँकमां काय भेटस रे भौ?’

ळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी १८ जागांसाठी सुमारे २६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. जवळपास १०० वर उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यातील काही संभाव्य उमेदवार सहकार विभाग किंवा न्यायालयाकडे जावून अर्ज वैध ठरवावेत म्हणून प्रयत्न करण्याची शक्यता आहे. प्रसंगी निवडणूक प्रक्रिया पुढेही ढकलली जाईल असे दिसते (तशी शक्यता नाहीच). ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्व पक्षीय नेेते गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उडालेली झुंबड पाहाता सर्व सामान्य माणूस पुढार्‍यांना प्रश्‍न विचारतोय की, ‘जिल्हा बँकमां काय भेटसरे भौ?’

Sunday, 5 April 2015

पीकेचा पडद्यामागील पंचनामा!

Amir in Makkah
मीर-हिराणी-चोप्रा यांचा बहुवादग्रस्त पीके चित्रपट आला आणि महिनाभरात ८०० कोटींपेक्षा जास्त धंदा करून गेला. गतवर्षाच्या एकाही चित्रपट पुरस्कारात पीकेची फारशी दखल घेतली गेली नाही. थिएटरमध्ये गर्दी करणारा हा चित्रपट पुरस्कारांच्या गर्दीत ‘सपशेल मागे’ राहीला. यामागील कारणांचा शोध घेताना लक्षात आले की, अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता यांच्या संदेशवहन आणि प्रत्यक्ष वर्तनात असलेल्या तफावतीमुळे पीकेतील आशय पुरस्कार देणार्‍या ज्युरींना बेवकूफ बनवू शकला नाही. तद्दन गल्लाभरू याच हेतूने पीके तयार केला गेला, हेच वास्तव पडद्यामागील काही नोंदीतूनही दिसून येते. देवादिके-अल्लाह-गॉड यांच्या अवडंबर आणि बाजारूपणावर प्रहार करण्याचा आव आणणार्‍यांचे पाय सुद्धा मातीचेच असल्याचे आढळून आले आहे. ‘पीकेचा पद्यावरील पंचनामा’ यापूर्वी केलाच आहे. आता ‘पीकेच्या पडद्यामागील काही गोष्टींचाही पंचनामा’...

विकास नियोजनातील वास्तव

शासनाच्या निधीतून विकासाच्या मोठ्या योजना राबविण्याचे दिवस संपले आहेत. कर स्वरुपातून होणारी महसुली जमा आणि नागरीकांच्या किमान गरजा कार्यक्रमावरील खर्चाचा ताळमेळ घालू न शकणारी शासन व्यवस्था नागरी सुविधा आणि सेवांशी सबंधित विकास कामे खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याला प्राधान्य देत आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेतून उभारल्या जाणार्‍या प्रत्येक विकाससेवेसाठी नागरीकांना यूज ऍण्ड पे पद्धतीने खर्च करावा लागत आहे. विकासाचे हे मॉडेल अडचणीचे आणि असंख्य तक्रारींचे ठरत आहे. विकास नियोजनातील हेच वास्तव लक्षात घेवून पुन्हा एकदा लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून विकासाचे नवे सामाजिक मॉडेल निर्माण करावे लागणार आहे.

निसटामार्गाचे सेवेकरी

राजपटावर सत्तेच्या जवळ जाण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी दोन प्रकारच्या मार्गांचा अवलंब केला जातो. पहिला म्हणजे, एकाच विचारधारेशी कायम प्रामाणिक राहून सत्ता प्राप्तीची प्रतीक्षा करणे. हा मार्ग खूप वेळ घेणाराही असू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे, सत्तेत असलेल्या कोणत्याही विचारधारेशी तडजोड करणे. शक्य होईल तेव्हा आपली विचारधारा बदलणे. हा मार्ग संधीनुसार बदलता येतो. वरील दोन्ही क्रियांसाठी दोन चांगले पर्यायी शब्द समोर आहेत. पहिल्या विचारधारेसोबत कायम राहणार्‍यांना आपण ‘निष्ठामार्गावरुन’ जाणारे वारकरी म्हणू शकतो. मात्र, बदलत्या विचारधारेशी गरजेनुसार संधी साधणार्‍यांना आपण ‘निसटामार्गाचे सेवेकरी’ म्हणू शकतो. याचे कारण, ही मंडळी एकाजागेहून दुसर्‍या जागेसाठी कधीही निसटू शकतात. त्याचे उद्दिष्ट हे सेवा देण्याचे किंवा घेण्याचे असते, म्हणून ते सेवेकरी....