Thursday, 12 February 2015

शहर सुंदर करणारी माणसं...


रिवर्तन हे नाव घेवून नाट्य क्षेत्रात काम करणारे आमचे मित्र व नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते शंभूअण्णा पाटील यांच्याशी एकदा जळगाव सुंदर आहे का? याविषयांवर वादपूर्ण चर्चा रंगली. जळगाव मनपा आणि त्यातील नाकर्त्या पुढाऱ्यांवर माझा प्रचंड राग असल्यामुळे भौतिक सुविधांच्या तक्रारी करीत जळगाव सुंदर नाहीच, असे मी आग्रहाने मांडत होतो. त्यावर शंभूअण्णा म्हणाले, बौद्धीक संपदा, निःस्वार्थी जनसेवा आणि चांगल्या प्रवृत्तीची माणसं लक्षात घेवून मी आपले जळगाव सुंदर असल्याचे म्हणत आहे. जळगावची माणसं इतरांच्यापेक्षा निश्चित सुंदर आहेत. अर्थात, हा युक्तीवाद मान्य करण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. 

शोध मी कोण?चा


गेले काही दिवस माझा वैचारिक गोंधळ उडाला आहे. मी कोण? या प्रश्नाचे उत्तर मला वेगवेळ्या मानसिकतेतून मिळत आहे. मला पडलेला प्रश्न हा माझ्या राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व याच्याशी संबंधित आहे. मी हिंदुस्थानी आहे, की मी भारतीय आहे, की मी इंडियन आहे, यापैकी जी ओळख मी माझी मानतो, त्यानुसार माझी विचारधारा बदलते. बहुधा याच मनःस्थितीत इतरही अनेकजण असावेत. ही ओळख एकदा प्रत्येकाने निश्चित केलीच पाहिजे...

गिरीशभाऊ भगीरथ व्हाच !


राज्याच्या जलसंपदा मंत्रालयाची सूत्रे जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्याकडे आहेत. जळगाव जिल्ह्यातील नेत्याला तिसऱ्यांदा या मंत्रालयाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. प्रकल्पांची पूर्तता आणि सिंचन लाभक्षेत्र बाबतीत संपूर्ण खान्देशच उपेक्षित आहे. अनेक लघु-मध्यम, मोठ्या पाटबंधारे व धरण प्रकल्पांचा हजारो कोटींचा अनुशेष शिल्लक असताना नव्या योजनांचा प्रारंभ करण्याची आज वेळ नाही. रखडलेले-प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गिरीशभाऊ पुरेसा निधी आणू शकले तरी त्यांचे नाव खान्देशच्या इतिहासात भगीरथमंत्री म्हणून लिहीले जाईल...

फेरयुती झाली; फेरजुळणीचे काय ?


भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येवून फेरयुती जमवून आणली. राज्याच्या सत्तेत आता दोन्ही पक्षांची हिस्सेदारी निश्चित झाली आहे. राज्यस्तरावर बड्या नेत्यांचे मनोमिलन झाले, पण जिल्हा आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या मनभेदाचा सांधा जुळणार कसा? हा प्रश्न आहे. फेरयुतीनंतर जळगाव जिल्ह्यातही कार्यकर्त्यांच्या फेरजुळणीचा नवा अध्याय लिहीण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागतील. तरच जिल्ह्यासाठी सत्तेचा निश्चित लाभ दोन्ही पक्षांना मिळू शकतो... 

जळगाव सुंदर होवू शकते


मृत्यू पश्चात आयुष्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा श्रद्धाळूंना नरक म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. पण, नरक असतो यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना नरकयातना म्हणजे काय? हे अनुभवायचे असेल तर त्यांनी जळगावमध्ये निवास करावा. नरकाची चित्रमय कल्पना ओमशांती परिवाराच्या प्रचार पुस्तकांतून दिली आहे. त्या पुस्तकातील चित्रे आणि जळगावकर सध्या ज्या वातावरणात निवास करीत आहेत ती स्थिती, यात फारसा फरक नाही. असे असले, तरी एक जळगावकर म्हणून मला वाटते की, हो जळगाव महानगर आजही सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या माणसांचे गाव होवू शकते. ते कसे आणि त्यासाठी पर्याय काय असू शकतात? हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच...

नाथाभाऊ : द वॉल


भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान म्हणून नेतृत्व गांगुलीकडे असो की धोनीकडे, बेसावध प्रसंगी ढेपाळणाऱ्या फलंदाजीला सावरणारा विश्वासू फलंदाज म्हणून नेहमी राहूल द्रविडकडे पाहिले जायचे. द्रविड खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहायचा. राजकारणाच्या निसरड्या पटावरही पाय रोवून उभा राहणारा नेता असावा लागतो. राज्यातील भारतीय जनता पक्षात असा एकमेव नेता सध्या आहे, तो म्हणजे एकनाथराव खडसे. खान्देशचे नाथाभाऊ. भाजप नेतृत्वातील नव्या सरकारसाठी नाथाभाऊ म्हणजे द वॉल. संरक्षण देणारी भिंत...

विसर्जन रस्ता दुरूस्तीसाठी जैन उद्योग समुहाचा पुढाकार


नपाचे बँक खाते सील झालेले. कोणताही ठेकेदार उधारीत काम करायला तयार नाही. पालकमंत्र्यांनीही निधी द्यायला असमर्थता व्यक्त केलेली. अशा अडचणीत गणेश विसर्जन मार्गाची तातडीने दुरूस्ती कशी करावी? हा प्रश्न मनपा प्रशासनासमोर होता. अखेर मदतीला उभा राहीला जैन उद्योग समुह. समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून विसर्जन मिरवणूक मार्ग दुरूस्तीच्या सूचना दिल्या आणि काम मार्गी लागले...

स्थितःप्रज्ञ नाथाभाऊंची आव्हानांवर मात !


राजकारण, समाजकारण आणि कौटुंबिक व्यासपीठावर गेल्या पाव शतकात ना. एकनाथराव खडसे यांची अनेक रुपे पाहता आणि अनुभवता आली. पत्रकार म्हणून त्यांच्या काही राजकिय निर्णयांचे समर्थन केले. अपवादात्मक स्थितीत खंडन  करणारे लिखाणही केले. तटस्थपणे लिहीताना निर्णय टोकाचे वाटले मात्र, त्यांच्याशी चर्चा करून लिहीताना निर्णयांशी सहमती झाली. नाथाभाऊंच्या स्वभावाचा हा महत्त्वाचा पैलू आहे. त्यांनी एखाद्याविषयावर बाजू मांडली की, आव्हानात्मक वाटणारी स्थितीही त्यांच्या ताब्यात येते. ही सिद्धी त्यांना वैचारिक आणि आध्यात्मिक बैठकीच्या नैतिक अधिष्ठानातून प्राप्त झाली आहे. म्हणूनच नाथाभाऊ स्थितःप्रज्ञ माणसाप्रमाणे साऱ्या आव्हानांना सामोरे जातात नव्हे तर त्यावर यशस्वीपणे मातही करतात.

बदलाचा उंबरठा ओलांडताना...


खान्देशच्या मातीत रुजलेले दैनिक ‘जळगाव तरुण भारत’ आज 18 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 19 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. प्रखर हिंदूत्ववादी आणि उज्ज्वल राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार अंगिकारून नागपूर येथे वृत्तपत्राचा चेहरा लाभलेल्या ‘तरुण भारत’च्या मूळ स्थापनेपासूनच्या वाटचालीचा इतिहास 88 वर्षांचा आहे. स्थापनेपासूनच्या कालावधीचा विचार केला तर ‘जळगाव तरुण भारत’च्या प्रवासाला दीर्घ काळाची वाटचाल असे म्हणणे योग्य होणार नाही. परंतू, ‘जळगाव तरुण भारत’ अनेक स्थित्यंतराच्या काळातही आपले अस्तित्व आणि ओळख कायम ठेवू शकला, ही या द्विदशकाच्या प्रवासातील निश्चित समाधानाची बाब आहे. 

जळगावकरांना पुराचा इशारा


ळगाव शहर व परिसरात दि. 8 आणि 9 सप्टेंबर दरम्यान सुमारे 36 तास झालेल्या जोरदार पावसामुळे उपनगरांमधून वाहणाऱ्या नाल्यांना नैसर्गिक उतार व प्रवाहाच्या दिशेने पूर आले. या पुरामुळे नाल्यांच्या काठावरील आणि लगतची पाच हजारावर कुटुंबे पूर्णतः किंवा काही प्रमाणात उध्वस्त झाली. निसर्ग आणि पर्यावरणाशी मनमानी खेळ करणाऱ्या सरकारी व खासगी प्रवृत्तींना या पुराने इशारा दिला. तो का, कसा, कुठे आणि कधीपर्यंत? हे प्रत्येक जळगावकराने समजून घेणे आवश्यक आहे...