मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभ निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि.30) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मंत्रिमंडळातील सर्वाधिक अनुभवी, अभ्यासू, प्रभावी नेते तथा महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आयोजित केलेला उद्याचा कार्यक्रम आहे. केवळ जळगाव जिल्हा नव्हे तर धुळे, नंदुरबारसह संपूर्ण खान्देशचे एकहाती नेतृत्व खडसे करतात. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात खानदेशच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ‘तरूण भारत‘च्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.
Monday, 9 February 2015
खान्देश विकासाकरीता हवे विशेष पॅकेज
मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभ निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि.30) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मंत्रिमंडळातील सर्वाधिक अनुभवी, अभ्यासू, प्रभावी नेते तथा महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आयोजित केलेला उद्याचा कार्यक्रम आहे. केवळ जळगाव जिल्हा नव्हे तर धुळे, नंदुरबारसह संपूर्ण खान्देशचे एकहाती नेतृत्व खडसे करतात. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात खानदेशच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ‘तरूण भारत‘च्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.
दशावतारी साहेब
महाराष्ट्रासह देशातील सत्तेच्या
सारीपाटावर साहेब या नावाला वेगवेगळे वलय आहे. साहेब शब्दाला जाणताराजा हाही पर्याय
आहे. राजकारणाचा उंबरठा नव्याने ओलांडणारा कोणताही नवखा किंवा उमदा गडी साहेबांचे नाव
घेताना दोन्ही हाताने कानांच्या पाळ्या पकडतो, जीभ सुद्धा चावतो. यातून व्यक्तिमत्वाविषयी
असलेल्या आदराची आणि उत्तुंगपणाची जाणीव व्हावी. साहेबांचे गुगली, घुमजाव, यू टर्न
आणि वक्तव्याचा विपर्यास याच गुणवैशिष्टांची संकलीत माहितीतून ओळख करुन घेण्याचा हा
प्रयत्न आहे.
देव आणि देवत्वाचा शोध
शिर्डीच्या साईबाबांना देवाचा
दर्जा देणे किंवा त्यांचे देवत्व नाकारून मंदिरातील त्यांच्या मूर्ती काढून टाकण्याचा
खळबळजनक आदेश कर्वदा (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या हिंदू साधू- संतांच्या
धर्मसंसदेतून देण्यात आला आहे. साईबाबांचे महत्त्व किंवा देवत्वही सांगायचे नाही आणि
धर्मसंसदेच्या आदेशालाही विरोध करायचा मुद्दा नाही. विचार मांडायचा आहे तो, केवळ देव
मानणाऱ्या श्रद्धेचा आणि देवत्वाचे अस्तित्व अनुभवणाऱ्या प्रचितीचा. दगड, प्रतिमा किंवा
कोणत्याही प्रतिकात देव शोधण्यापेक्षा माणसांमधील देवत्वाचा शोध आपण कधी घेणार? आणि
त्याला कोणाची संमती अथवा मंजुरी घ्यावी लागणार? हे दोनच प्रश्न सर्वसामान्य माणूस
अथवा भाविकांसाठी महत्वाचे आहेत. आम्ही सांगू तो देव किंवा आम्ही पेटंट घेवून ठरवला
तोच देवाचा चेहरा ही वृत्ती- प्रवृत्ती श्रद्धेचा प्रवास अंधश्रद्धेकडे नेणारी आहे.
ती सर्वार्थाने समाजासाठी घातक आहे.
संपत्तीच्या वाटणीत लेकी, सुना उपऱ्याच !
सूनचे सासरच्या संपत्तीत आणि लेकीचे माहेरच्या मालमत्तेत असलेले अधिकार हिरावणारा एक आणि अधिकार देणारा दुसरा असे दोन निकाल विविध उच्च न्यायालयाच्या खंडपिठांनी दिले आहेत. या निकालांनी संपत्तीच्या वाटणीत आजही लेकी माहेरी तर सुना सासरी उपऱ्याच असल्याचे अधोरेखित केले आहे. न्यायालयाचे निकाल हे विशिष्ट खटले आणि न्यायपिठासमोर मांडली गेलेली परिस्थिती यावर दिले जातात. त्यामुळे अपवादात्मक स्थितीत दिलेले निकाल हे आगळे वेगळे असले तरी त्या निकालांमधील साम्यस्थळे शोधून खालच्या न्यायालयात न्याय मागितला जातो किंवा दिला जातो. महिलांच्या संपत्तीवरील हक्काबाबती न्यायालयीन प्रकरणे ही अशाच परस्पर विरोधी निवाड्यांमधील साम्यस्थळांच्या घोळात वेळकाढू ठरत आहेत. माहिलांचा संपत्तीवरील अधिकार हा जोपर्यंत पुरूषांची मानसिकता अंतःकरणापासून स्वीकारत नाही तोपर्यंत कोणताही कायदा महिलांना त्यांची कुटुंबात आणि समाजात पत, प्रतिष्ठा आणि सन्मान बहाल करू शकत नाही.
स्वयंभू नाथ !
दगडाच्या देवाचा चेहरा कारागिराला हवा तसा असतो. एखाद्या पाषाणाने मूर्ता निर्मितीसाठी स्वतःवर पैलू पाडले तर तो स्वनिर्मितीचा चमत्कार होईल. कठोर मेहनत आणि सततच्या परिश्रमातून एखाद्या माणसाने स्वतःला घडविले तर तो ठरतो...स्वयंभू! ती व्यक्ती अगदी जवळची, असेल तर त्यांना म्हणावे लागेल एकनाथराव खडसे... स्वयंभू नाथ. नाथांचा हा अनेकांना माहित नसलेला प्रवास.
जिल्ह्याच्या राजकारणात व्यक्तिविरोधाचा व्हायरस
विधानसभा निवडणुकीसाठी युती
किंवा आघाडी झाली वा नाही झाली तरी जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील रणधुमाळीत सर्वच
पक्षांत असलेला व्यक्तिविरोधाचा व्हायरस हा प्रत्येक उमेदवारासाठी डोकेदुखीचा ठरणार
आहे. मनोमिलनाची तात्पुरती मलमपट्टी करुन हा व्हायरस किल करता येत नाही आणि त्याच्याकडे
दुर्लक्षही करता येत नाही, अशी साऱ्यांचीच अवस्था आहे.
सार्वत्रिक असंतोषाची कृतीदर्शके: आंदोलन, चळवळ, संघटन, अभियान, सेवा
अधिक-जादा-जास्तीचे मिळविण्याचा
हक्क किंवा अधिकार हा प्रत्येक वर्ग, गट किंवा घटकातील समाजाला हवा आहे. या अधिकारासाठी
किंवा मागणीसाठी सामाजिक असंतोष अथवा अस्वस्थता दर्शविणारे विविध मार्ग समाजात अवलंबिले
जातात. त्याचे स्वरुप हे आंदोलन, चळवळ, अभियान, संघटन अथवा सेवा यांच्या माध्यमातून
असते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गणपती पाण्यात
महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. निवडणुकीच्या संभाव्य निकालाचा कल काय असू
शकतो? याची पहिली चाचणी एबीपी माझा चॅनेल आणि नील्सन या संस्थानी संयुक्तपणे केलेल्या
सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचा अर्थ या सर्वेक्षणातून
निघतो. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या 11 पैकी किमान 10 मतदार संघात भाजपसह युतीला अनुकूल
वातावरण राहील असे दिसते. याच वातावरणात सत्ताधारी आघाडीतील प्रमुख राजकिय पक्ष म्हणून
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्ह्यातील अस्तित्व धो्नयात येण्याची श्नयता आहे. सध्या
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5 आमदार व 1 सहयोगी आमदार असून आगामी निवडणुकीत ही संख्या
1 किंवा 2 वर येण्याची श्नयता आहे. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गणपती पाण्यात दिसतो.
कॉंग्रेसची अवस्था नेहमीप्रमाणे उत्सवापूर्वीच गणेशाचे विसर्जन अशी आहे.
Thursday, 5 February 2015
व्हिडीओ- उंदिरखेडा येथील नागेश्वर मंदिर
पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथे पेशवेकालीन नागेश्वर मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते.
Wednesday, 4 February 2015
रेसचा घोडा आणि कार्पोरेटचा अधिकारी...
माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील आघाडीच्या एका दैनिकातील नोकरीचा राजीनामा दिला. मित्र आणि त्या दैनिकाचे समिकरण असे घट्ट होते की मित्राचा दिनप्रारंभ "शुभसकाळ" म्हणून व्हायचा. योगायोग असा की, मी सुध्दा याच दैनिकात होतो आणि मलाही बाहेर पडण्यासाठी ६ वर्षांपूर्वी असेच वातावरण निर्माण केले गेले होते. मित्र कोणत्या मानसिकतेत असेल याची कल्पना होती म्हणून मी दोन-तीन दिवस त्याला फोन करणे टाळले.
Subscribe to:
Posts (Atom)