जळगाव महानगर पालिकेत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्य सुरु होईल. शहर विकास आघाडी, खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे नगर पालिका व महानगर पालिकेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या नेते व त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेच्या रुपात सत्ता हाती कायम ठेवण्याचा प्रयत्न जळगावकर मतदारांनी नाकारला. जुन्यांची सत्ता नकोच असा निश्चिय केलेल्या जळगावकरांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला २/३ पेक्षा जास्त बहुमत दिले आहे. भाजपच्या या विजयाचे विश्लेषण विविध माध्यमातून करण्यात आले आहे.

