महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या आघाडी राज्य सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारधारांचे कारभारी आहेत. या कारभाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र व स्वराज्य उभारणीच्या कार्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आघाडी राज्य सरकार टीकविण्याची सर्वाधिक जबाबदारी निभावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवचरित्राची नव्याने संपूर्ण मांडणी करायची आहे. राज्य सरकारमध्ये आपसूक दुय्यम भूमिकेत असलेल्या शिवसेनेला शिवचरित्रातील जुन्या-नव्या संदर्भात फारसा रस नाही. त्यांचा दृष्टिकोन पक्षाच्या विचारधारेशी संबंधित हिंदू, हिंदवी स्वराज्य या शब्दांचा गरजेनुसार खेळ करण्यात आहे. सरकारी दिनांक की तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी ? याविषयी शिवसेना आजही निर्णय घेऊ शकलेली नाही. शिवसेना कार्यकर्त्यांना आता दोन वेळा शिवजयंती साजरी करावी लागते. मुख्यमंत्री आपले असल्यामुळे सरकारी दिनांकला आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तिथीला. राज्य सरकारमधील काँग्रेसला शिवचरित्रात पूर्वीपासून सर्व धर्म समभाव दिसतो. यवनांच्या पाच शाहींना आव्हान देत शिवाजी महाराजांनी विस्तारलेले स्वराज्य हे कोणत्याही धर्माचे नव्हते, हा विचारही इतिहासाचे नवे अभ्यासक नवा सिद्धांत म्हणून मांडतात. अशा प्रकारे परस्पर टोकांचे विचार असणाऱ्या तीन पक्षांचे कारभारी जनतेसमोर उठता-बसता शिवचरित्रातील सोयीची उदाहरणे मांडत असतात.
Tuesday, 23 February 2021
Thursday, 18 February 2021
छत्रपती शिवाजी महाराज मथुरेत कुठे मुक्कामी होते ?
गेल्या ४०० वर्षांच्या
काळखंडात सर्वाधिक लोकप्रिय चरित्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राहिले
आहे. शेकडो अभ्यासक व तज्ञ मंडळींच्या लेखनातून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे
विविध पैलू समोर आले आहेत आणि येत आहेत. उपलब्ध बखरी,
कागदपत्रे, आज्ञापत्रे यातील आशय
वाचून शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचे विश्लेषण तर्काधारे केले जाते. या अगोदर केलेला
तर्क वा मांडणी चुकीची होती असा दावा करीत नवा तर्क मांडला
जातो. याच कारणामुळे संपूर्ण जगभरातील अभ्यासकांना भूरळ घालणारे व्यक्तिमत्त्व शिवाजी
महाराज यांचे आहे.
Monday, 8 February 2021
हिंदू समाज खरच सडला आहे का ...?
![]() |
फोटो १ भीमबेटका गुहाचित्रे |
Subscribe to:
Posts (Atom)