Saturday 31 October 2020

या गांडुगिरीचे करायचे काय ?

लेखाचे शिर्षक उद्धटपणाचे
आणि असभ्य आहे. ते ठरवून दिले असून भारतातील उदारमतवादी, पुरोगामी, समाजवादी आणि समानतावादी ढोल बडविणाऱ्यांना उद्देशून आहे. ही मंडळी भारत सरकार, पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सैन्यदले यांच्याविषयी गैरसमज पसरवणारी 'गांडुगिरी' अधुनमधून करतात. अलिकडे तसा एक भयंकर प्रकार सिद्ध झाला आहे. पुलवामा येथे भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर काही राजकीय पक्षांचे नेते, माध्यमातील बोलभांड प्रवक्ते, एकतर्फी अभ्यासक, ढोंगाळलेले समाजसेवी आणि सुपारीबाज पत्रकार यांनी तोंडसुख घेणाऱ्या भरपूर प्रतिक्रिया दिल्या होत्या. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घडवून आणला अशी शंका घेत सर्वसामान्यांचा बुद्धीभ्रम होण्यापर्यंतची सूचक विधाने  या मंडळींनी केली होती. मात्र, या सर्वांच्या कानफटात सणकन आवाज करणारे विधान पकिस्तानातून आले आहे. पाकिस्तानच्या संसदेत विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी याने पुलवामात भारतीय सैन्यदलावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करीत ते यश म्हणजे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा केला आहे.

अर्थात, चौधरीच्या या वक्तव्याच्या नंतर गांडू मंडळींनी कोणताही खुलासा केलेला नाही. याच मंडळीतील पत्रकार राजदीप सरदेसाई याने त्याच्या 'इंडिया टुडे' चॅनेलवर आणि 'एनडीटीव्ही' चॅनेलने फवाद चौधरी यांची खुलासा करणारी मुलाखत दाखवली आहे. ती दाखवणे भाग होते कारण पुलवामा मोदींनी घडलविले असे राजदीप व त्याची तळी उचलणारे म्हणत होते. पण पाकिस्तानचा मंत्री संसदेत म्हणतो की आम्ही पुलवामा घडविले यावर राजदीपसारखा गांडू चवताळणे भागच होते. ती फवादची मुलाखत कमी राजदीपचा वैताग जास्त होती. 

तरी सुद्धा फवाद याने भारतातील चैनलचा वापर भारत विरोधी प्रचारासाठी केला. म्हणून राजदीप व त्याच्या विचाराच्या इतरांना 'गांडू' म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटवर एअर स्ट्राईक केला. त्या पश्चात पाकिस्तान वायुदलाने भारतात घुसायचा प्रयत्न केला त्या एअर अक्शनची भलावण करण्यासाठी संसदेत मी ते वक्तव्य केल्याचा दावा चौधरी याने केला आहे. पुलवामा हल्ला प्रकरणामागील फुशारकी मारणाऱ्या चौधरीच्या मुखातून अनावधानाने सत्य बाहेर पडले आहे. त्याच्या बचावासाठी माध्यमाचा वापर करण्याच्या प्रवृत्तीला गांडुगिरी संबोधून शिर्षक दिले आहे. या ठिकाणी गांडू हा शब्द शिवी म्हणून नाही. गांडू म्हणजे ना धड स्त्री, ना पुरुष. म्हणजेच मधला तृतियपंथी. पश्चात्य भाषेत 'गे' पंथिय. जी मंडळी पुलवामावर भारताच्या बाजूने धड बोलू शकत नाहीत आणि पाकिस्तानच्या बाजूने तर मुळीच बोलू शकत नाहीत. 

हा विषय विस्ताराने समजून घ्यावा लागेल. पुलवामा येथील सैन्यदलावर झालेला आत्मघाती दहशतवाद्याचा हल्ला, त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे असलेल्या दहशतवादी तळावर केलेला एअरस्ट्राईक, त्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत केलेली एअर ॲक्शन, विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानात अटक आणि नंतर सुटका या चार घटनांची एकापाठोपाठ एक जंत्री पाहावी लागेल. या घटनांच्या काळात पंतप्रधान मोदी यांची भूमिका, भारतीय वायुदल आणि सैन्यदलाच्या कामगिरीवर शंका घेणारी वक्तव्ये उदारमतवादी, पुरोगामी, समाजवादी आणि समानतावादी मंडळींनी केलेली आहेत. ती सर्व मंडळी फवाद याच्या वक्तव्यामुळे ढुंगणावर आपटली आहेत.

भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलिस फोर्सचा तळ आहे. तेथून जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर दि. १४ फेब्रुवारी २०१९ ला दुपारी सुमारे ३.१५ वाजता आत्मघाती दहशतवाद्याने आरडीएक्स भरलेल्या वाहनासकट हल्ला केला होता. तेथे झालेल्या स्फोटात सुमारे ४० जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या ताफ्यात ७८ वाहने व सुमारे २५०० पेक्षा जास्त जवान होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित इस्लामिक गट जैश-ए-महंमदने स्वीकारली होती. या दुर्दैवी घटनेनंतर विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारवर तोंडसुख घेतले होते. पुलवामा घटनेच्याबदल्यात पाकिस्तानला वेळीच धडा शिकवू असे भारत सरकारने म्हटले होते. पण सरकार काय करणार ? याचा अंदाज तेव्हा नव्हता.
 

पण भारत सरकार काय करु शकते याचा धक्का देणारा अनुभव अवघ्या १५ दिवसांनी आला. भारतीय वायुदलाने दि. २६ फेब्रुवारी २०१९ ला पाकिस्तान व्याप्त काश्मीरातील बालाकोट, चकोठी आणि मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीरची राजधानी) येथील दहशतवादी प्रशिक्षण व निवारा तळांवर हवाई हल्ला केला. वायुसेनेच्या १२ मिराज २००० जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन ही कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-महंमद या दहशतवादी गटाच्या तळांवरील जवळपास ३५० प्रशिक्षणार्थींना ठार झाले असा दावा करण्यात आला होता. या हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमाने कोणत्याही अडथळ्याशिवाय भारताच्या भूमीवर परत आली होती. याला म्हटले गेले 'बालाकोट एअर स्ट्राईक'. या हल्ल्यानंतर बावचळून गेलेल्या पाकिस्तानी वायुदलाच्या २० विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसायचा प्रयत्न केला. पण सजग भारतीय वायुदलाने तो हाणून पाडला. याला म्हणतात 'पाकिस्तानची एअर एक्शन'. या कारवाईत भारतीय वायुदलाचे ‘मिग-२१ बायसन’ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे जमिनीवर सुखरुप उतरले पण त्यांना पाकिस्तानी सैन्यदलाने ताब्यात घेतले. नंतर अभिनंदन यांना भारताकडे वापसीचा वेगळाच अध्याय लिहिला गेला. अभिनंदन यांच्या वापसीसाठी भारतीय वायुदलाने पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी केली होती. या घडामोडीवर अमेरिकेचे लक्ष होते. भारताची कठोर भूमिका लक्षात घेऊन अमेरिकेने पाकिस्तान सरकारवर दबाव आणून अभिनंदनच्या परतीचा अध्याय घडवून आणला. अवघ्या ४८ तासात अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द करण्यात आले.

या सर्व घडामोडीत भारतीय सरकार, वायु व सैन्यदले व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केलेली कठोर, चपळ आणि योग्य कार्यवाही वाखाणण्याजोगी होती. याचे श्रेय तेव्हाच्या केंद्रातील मोदी सरकारला होते. पण लोकसभा निवडणुकांचा माहौल पाहून गांडु मंडळींनी त्या यशाला गोलबोट लावणे सुरु केले. सर्व प्रथम एअर स्ट्राईक कसा झाला ? याचे पुरावे मागणे सुरु झाले. नंतर ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या आकडेवारीवरून वायुदलाच्या क्षमतेवर शंका घेतली गेली. त्याच्याही पुढे जावून पुलवामातील हल्ला मोदींनीच घडवला इथपर्यंत लोणकढी थाप ठोकली गेली. विंग कमांडर अभिनंदनच्या परतीसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या मुत्सद्देगिरीचे कौतुक न करता पाकिस्तानातील इम्रान खान सरकारला धन्यवाद देणाऱ्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. हा सर्व प्रकार म्हणजे भारताच्या विजयाला हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रकार होता.

तेव्हा मोदींना लक्ष करीत स्वतःच्या ढुंगणावरून अगरबत्त्या ओवाळून समाधान मानून घेणारे आता पाकिस्तान संसदेतील चर्चेमुळे गांडीवर आपटले आहेत. कारण भारतीय वायुदलाने बालाकोट एअर स्ट्राईक केल्यानंतर आणि विंग कमांडर अभिनंद पाकिस्तानच्या ताब्यात असताना तेथे काय घडले याचा तपशील सुद्धा पाकिस्तान संसदेत सांगितला गेला आहे. तेथील संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक याने संसदेतील चर्चेत थेट म्हटले आहे की, 'मला आठवते एक बैठक बोलावली होती. पण पंतप्रधान इम्रान खान बैठकीस आले नाहीत. परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते. या बैठकीला लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आले. तेव्हा त्यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. कुरेशी म्हणाले की, 'अभिनंदनला सोडावे लागेल नाहीतर भारत रात्री ९ ला हल्ला करेल. नंतर गुडघ्यावर बसून अभिनंदनला परत पाठवले गेले.' पाकिस्तानच्या संसदेतील ही चर्चा भारताचा तेव्हाचा दबाव दर्शविण्यास पुरेशी आहे. सादिक याच्या वक्तव्यानंतर भारतातील गांडुगिरी करणारे ठार बहिरे झाले आहेत. मोदी नावाचीही दहशत पाकिस्तानच्या संसदेत असल्याचे यावरुन तरी सिद्ध होते.

सादिक याने केलेल्या कथनाला पूरक माहिती माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी दिली आहे. बालाकोट एअर स्ट्राईक झाला त्यावेळी धनोआ हवाई दलाचे प्रमुख होते. सादिकच्या वक्तव्यानंतर ते म्हणाले, 'अभिनंदनला माघारी आणू असा शब्द त्याच्या वडिलांना मी दिला होता. आम्हाला १९९९ ची घटना माहीत होती. त्यावेळी पाकिस्तानने शेवटच्या क्षणी आमचा विश्वासघात केला होता. त्यामुळेच आम्ही सतर्क होतो.' भारतीय हवाई दलाची विमाने नेमकी कुठे तैनात आहेत, ती कुठून कुठपर्यंत उड्डाणे करू शकतात आणि किती आक्रमकपणे हल्ले करू शकतात, याची कल्पना पाकिस्तानला होती, म्हणूनच तेव्हा पाकिस्तानची सेना गलितगात्र झाली होती. भारतीय हवाई दलाच्या पोझिशन्स अतिशय आक्रमक होत्या. आम्ही पाकिस्तानच्या फॉरवर्ड पोस्ट सहज उद्ध्वस्त करू शकत होतो. याशिवाय बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानवर मोठा दबाव होता. आपण मर्यादा ओलांडली, तर परिणामांचा सामना करावा लागेल, याची कल्पना त्यांना होती, त्यामुळे अभिनंदनाला परत पाठविण्याचा शहाणपणा त्यांनी स्वीकारला,' असे धनोआ म्हणाले. सादिक यांचा दावा, धनोआ यांचे वक्तव्य यामुळे अभिनंदनच्या वापसीचे श्रेय पाकिस्तानला देणाऱ्यांची थोबाडे फुटली आहेत.
 
सादिक याने पाकिस्तान सरकारचे वाभाडे संसदेत काढल्यानंतर मंत्री फवाद चौधरी याने फुशारकी मारण्यासाठी थेट पुलवामा हल्ल्याचे समर्थन करीत तो इम्रान खान सरकारने घडवून आणला असे वक्तव्य करुन टाकले. पाकिस्तानी हवाई दलाने भारतात घुसून भारतीय जवानांना मारल्याचा दावाही त्याने केला. विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर चौधरी म्हणाला, ‘आम्ही भारताला त्यांच्या हद्दीत घुसून मारले आहे आणि पुलवामात जे यश मिळाले ते इम्रान खान सरकारचेच मोठे यश आहे.’ नंतर मात्र चौधरी पलटला. चौधरीने आता कितीही सारवासारव केली तर एक सत्य समोर आले, ते म्हणजे पुलवामा हल्ला घडविण्यामागे इम्रान खानचे सरकार होते. सत्य समोर आल्यामुळे पुलवामा हल्ला मोदींनी घडविला असे म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या गांडीवर फटके मारून घ्यायला हवेत.

वरील सर्व वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर मोदींवर संशय घेणारे कोण होते याचाही विचार करायला हवा. यात जास्त गोची काँग्रेसचीच आहे. बालाकोटमधील एअर स्ट्राईकचे पुरावे द्या अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिग्विजय सिंह, कपिल सिब्बल यांनी केली होती. काँग्रेस आघाडीने १० वर्षांच्या कार्यकाळात १२ एअर स्ट्राईक केले मात्र, आम्ही त्याचे कधीही राजकारण केले नाही, असा अफलातून दावा काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला होता. पुलवामातील दहशतवादी हल्ला हा नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यातील मॅचफिक्सिंग असल्याचे वादग्रस्त विधान काँग्रेसचे राज्यसभा खासदार बी. के. हरिप्रसाद यांनी केले होते. पुलवामा हल्ला मोदी व इम्रान खानमधील समजौता आहे, असे अरविंद केजरीवाल व फारूक अब्दुल्ला म्हणाले होते. भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे नेते आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी मांडले होते.  पुलवामातील हल्ला हा कट असून, मतांसाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी म्हटले होते. महाराष्ट्र विधासभेच्या निवडणूक प्रचारात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पुलवामा हल्ल्यावर मत मांडले होते. ‘पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रमध्ये बदल नक्की घडेल, असा दावा पवार यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषेदत केला होता. लोकसभा निवडणुकी आधीही मोदी सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आणि परिस्थिती बदलली. पुलावामा हल्ल्याबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनाच शंका होती. हा हल्ला नेमका घडला का घडवला. मात्र, हा देशाचा विषय आहे. म्हणून त्यावर बोलू नका, असे मी सांगितले.’ असा दावाही पवार यांनी केला होता.

एअर स्ट्राईकचे पुरावे द्या, फोटोग्राफ रिलीज करा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.  बालाकोट हवाई स्ट्राईकवर मनसेचे नेते राज ठाकरे यांनीही संशय घेतला होता. हवाई हल्ल्यात १० माणसेही पाकिस्तानात मारली गेली असती तर अभिनंदन यांना पाकिस्तानने परत केलेच नसते, असे ठाकरे म्हणाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेत हे वक्तव्य त्यांनी केले होते. एअर स्ट्राईकमध्ये ३०० दहशतवादी ठार झाले. तुम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करायचा होता ? की झाडे उन्मळून टाकायची होती ? असा सवाल काँग्रेसचे नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला होता. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, ३०० ते ३५० दहशतवादी ठार झाल्याचे कोणी सांगितले ? असे ट्विट पी. चिदंबरम यांनी केले होते. २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले याचा पुरावा काय ? असा सवाल ममता बॅनर्जींनी केला होता.

विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने वाघा बॅर्डरवर आणून भारताच्या हवाली केले तेव्हा भारतातील पत्रकार, समाजसेवी, पुरोगामी, समानतवादी मंडळींनी पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव करुन त्यांच्या शांतीविषयक प्रवृत्तीचे कौतुक केले होते. कारण त्यांना मोदी सरकार किंवा भारतीय वायुदल, सैन्यदलाच्या दबावामुळे ते घडले असे श्रेय द्यायचे नव्हते. पाकिस्तानचे अभिनदंन करण्यात सर्वांत पुढे पत्रकार राजदीप सरदेसाई (फवाद याची खुलासा मुलाखत दाखवणारा), सुप्रीम कोर्टातील वकील प्रशांत भुषण, पत्रकार बरखा दत्त, लेखिका शोभा डे, पत्रकार निखील वागळे आदी होते.

पुलवामा हल्ला प्रकरणातील बऱ्याच गोष्टी पाकिस्तानच्या संसदेतील चर्चेमुळे समोर आल्या आहेत. त्यात भारतीय सरकारचा दबाव, वायुदल आणि सैन्यदलाची तयारी सोबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इतर देशांच्या माध्यमातून केलेली मध्यस्थी याबाबी स्पष्ट होतात. अशावेळी भारतात गांडुगिरी करणाऱ्यांकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष करणे योग्य ठरते. अशा मंडळींचा हिशोब कुठे ना कुठे चुकता करण्याची संधी जनतेला मिळतच असते.

(वैधानिक इशारा - गांडुगिरी हा शब्द सरकारी धोरणाला धड विरोध नाही आणि धड समर्थन नाही या अर्थाने आहे. इतर काय अर्थ घेतात याच्याशी लेखकाचा काडीचाही संबंध नाही.)

1 comment:

  1. अगदी बरोबर आहे हे विश्लेषण!

    ReplyDelete