Saturday, 31 October 2020
या गांडुगिरीचे करायचे काय ?
लेखाचे
शिर्षक उद्धटपणाचे आणि असभ्य आहे. ते ठरवून दिले असून भारतातील
उदारमतवादी, पुरोगामी, समाजवादी आणि समानतावादी ढोल बडविणाऱ्यांना उद्देशून
आहे. ही मंडळी भारत सरकार, पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि
सैन्यदले यांच्याविषयी गैरसमज पसरवणारी 'गांडुगिरी' अधुनमधून करतात. अलिकडे
तसा एक भयंकर प्रकार सिद्ध झाला आहे. पुलवामा येथे भारतीय सैन्यदलाच्या
तुकडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर काही राजकीय पक्षांचे नेते,
माध्यमातील बोलभांड प्रवक्ते, एकतर्फी अभ्यासक, ढोंगाळलेले समाजसेवी आणि
सुपारीबाज पत्रकार यांनी तोंडसुख घेणाऱ्या भरपूर प्रतिक्रिया दिल्या
होत्या. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घडवून आणला अशी शंका
घेत सर्वसामान्यांचा बुद्धीभ्रम होण्यापर्यंतची सूचक विधाने या मंडळींनी
केली होती. मात्र, या सर्वांच्या कानफटात सणकन आवाज करणारे विधान
पकिस्तानातून आले आहे. पाकिस्तानच्या संसदेत विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री
फवाद चौधरी याने पुलवामात भारतीय सैन्यदलावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन
करीत ते यश म्हणजे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा
केला आहे.
Friday, 23 October 2020
कुंडल्या, व्हाया व्हिडिओ कैसेट ते सीडी
जळगाव जिल्ह्यातील राजकारणातला सन १९९२/९४ चा काळ आठवला. सहकार क्षेत्रातील लढाईत सुरेशदादा विरुद्ध स्व. प्रल्हादराव पाटील गटांमध्ये घामासान लढाई सुरू होती. दादा आणि भाऊ हे दोघे तेव्हा महानेता शरद पवार यांचे समर्थक होते. तरी सुद्धा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत होते. असे म्हटले जाते की, त्या निवडणुकीत मतदारांची जी कमाई झाली तशी नंतर कधीच झाली नाही. मतदारांनी सुद्धा २२ पैकी दोन्ही गटाला ११/११ असा कौल दिला होता.
Subscribe to:
Posts (Atom)