Sunday 12 April 2020

सामुहिक अग्निहोत्रनंतर प्रदुषकांचे प्रमाण कमी

अक्कलकोट येथील विश्व फाऊंडेशनच्या पुढाकाराने जळगाव येथे दि. १५ मार्चला सामुहिक अग्निहोत्रचा विधी ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला होता. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी अग्निहोत्रचे पारंपरिक आणि विज्ञान विषयक महत्त्व स्पष्ट करताना अग्निहोत्रनंतर हवेतील प्रदुषकांचे प्रमाण कमी होते असा दावा केला होता. या संदर्भात पूर्वी केलेल्या काही प्रयोगांच्या व्हिडिओ क्लिपही माध्यमातून प्रसारित झालेल्या होत्या. त्याप्रमाणे जळगाव येथेही शास्त्रशुद्ध तपासणी करता यावी म्हणून अग्निहोत्र स्थळी मापन यंत्रे लावून अग्निहोत्र पूर्व आणि त्यानंतर हवेतील प्रदुषकांचे मापन केले गेले. मुंबईतील एनव्हायरो केअर लॅब प्रायव्हेट लिमीटेडच्या तज्ञांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हवेच्या गुणवत्तेचे मापन केले. त्यानंतर हवेतील प्रदुषकांची टक्केवारी कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. विश्व फाऊंडेशन भारतासह जगभरात अग्निहोत्रच्या प्रसाराचे काम करीत असते. आतापर्यंत जवळपास ४५ देशांमध्ये अग्निहोत्रच्या उपयुक्ततेविषयी विविध प्रयोग झालेले आहेत. जळगाव मधील प्रयोगामुळे आणखी विश्वासार्ह आकडेवारी हाती आली आहे.

झांबरे विद्यालय मैदानावर अग्निहोत्र स्थळी लावलेले यंत्र
सध्या जगभरात कोरोना व्हायरस (कोवीड १९) साथरोगासह मृत्युंचे थैमान घालत आहे. अशा स्थितीत अग्निहोत्रनंतर हवेतील प्रदुषके कमी होतात हा निष्कर्ष दिलासा देणारा आहे. कोरोनाच्या विषाणुंचा संसर्ग हा काही प्रमाणात हवेतून होतो. घरगुती वातावरणात असा कोणताही संसर्ग टाळायचा असेल तर अग्निहोत्र हा उत्तम पर्याय असल्याचे म्हणता येईल, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. जळगाव येथील प्रयोगाविषयी संपूर्ण माहिती आयोजकांकडे सध्या उपलब्ध झाली आहे. त्यात कोणत्या प्रकारची यंत्रे वापरली, प्रदुषकांचे प्रमाण कसे कमी झाले वगैरे सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. या विषयावर तज्ञ मंडळी साधकबाधक चर्चा करु शकतात.

हवेत प्राणवायू ऑक्सीजन (O2) आणि नायट्रोजन (NO2) हे सजिवांच्या श्वासोच्छवासासाठी व शरीरासाठी उपयुक्त घटक असतात. या सोबत हवेत काही अती सुक्ष्म कणही असतात. ज्या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर पेक्षा कमी असतो त्याला पीएम (पार्टीकल्स मॉलेक्युल) म्हणतात. हे कण किती सुक्ष्म असतात हे जाणून घेण्यासाठी केसाचे उदाहरण घ्यावे लागते. केसाचा व्यास १०० मायक्रोमीटर गृहीत धरला तर त्यावर पीएम २.५ चे ४० अती सुक्ष्म कण सामावू शकतात. तसेच पीएम १० चे सुद्धा आहे. ज्या सुक्ष्म कणांचा आकार १० मायक्रोमीटर पेक्षा जास्त वा कमी आहे त्यांना पीएम १० म्हणतात. यात धुलीकण वा धुरातील कार्बन कण असतात. आपण श्वासोच्छवास करतो तेव्हा हे अती सुक्ष्म कण फुफ्फुसात जाऊन तेथे रोगांचा संसर्ग निर्माण करतात. शिवाय डोळे व गळ्यातही संसर्गाचा धोका असतो. हवेत या शिवाय इतर ६ प्रदुषके असतात. त्याच्या प्रमाणावरुन हवेची गुणवत्ता (AQI म्हणजे एयर क्वालिटी इंडेक्स) ठरवला जातो.

Envirotech RDS
हवेतील घटकांचे मापन कसे होते ? हे सुद्धा समजून घेऊ. १ मीटर चौरस आकारातील हवेत अती सुक्ष्म कण किती मायक्रोग्रॅम आहेत यावर हवेची शुद्धता मापन केली जाते. या मापनासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध व संवेदनशील यंत्रांची आवश्यकता असते. १ मीटर चौरस आकारात कमीत कमी किती प्रमाणात अती सुक्ष्म घटक हवेत याचे मानक निश्चित केले आहेत. त्याच्याशी तुलना करुन हवेतील प्रदुषणाची आकडेवारी दिली जाते. हवेतील इतर ६ प्रदुषके कोणती असतात ? याची माहिती घ्यावी लागेल. हवेत सल्फर डायोक्साईड, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हैड्रोजन फ्लोराइड, ओझोन आणि हायड्रोकार्बन असतात. त्याचेही कमीत कमी प्रमाण निश्चित केलेले असते. एक घन चौरस मीटरमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण २१ टक्के आणि कार्बनचे प्रमाण ०.०३ टक्के हवे. यात कमी-जास्त व्हायला लागले की हवा प्रदुषित मानली जाते.

जळगाव येथे झालेल्या सामुहिक अग्निहोत्रानंतर हवेतील सर्वच प्रदुषकांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. त्याची शास्त्रशुद्ध भाषेतील चौकट सोबत दिलेली आहे. या प्रयोगाचे शास्त्रशुद्ध दाखले विश्व फाउंडेशनकडे उपलब्ध आहेत.

अग्निहोत्र स्थळी विधी पूर्वी आणि नंतर आढळलेली एअर क्वालिटी
जळगाव येथे सामुहिक अग्निहोत्र होण्यापूर्वी नेहमी प्रमाणे अग्निहोत्रच्या उपयुक्ततेविषयी आक्षेप नोंदविण्याचा प्रकार झालेला होता. खरे तर अग्निहोत्रचा कोणताही धार्मिक दावा आयोजकांनी केलेला नव्हता. अग्निहोत्र हा विधी कोणाही करु शकतो. पहाटे सूर्योदय होत असताना आणि सायंकाळी सूर्यास्त होत असताना दोन साध्या मंत्रांचा उच्चार करीत अग्निहोत्र प्रज्वलीत करायचा असतो. त्यात गाईच्या शेणाची गोवरी, गाईचे तूप, शुद्ध कापूर याचा उपयोग केला जातो. अग्निहोत्रनंतर निर्माण होणाऱ्या धुरातून हवेतील प्रदुषकांचे प्रमाण कमी होते. त्याचाच शास्त्रशुद्ध अनुभव जळगाव येथे घेता आला. त्यासंदर्भातील आकडेवारी सोबतच्या चौकटीत दिलेली आहे. शिवाय, कोणालाही जर याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ती श्री. अमर चौधरी यांच्याकडे उपलब्ध आहे.


No comments:

Post a Comment