Friday 24 January 2020
‘शिल्पकवडा मूर्तीकार’ किशोर सोनवणे
Thursday 16 January 2020
वंशावळीचा वाद - गागाभट्ट ते संजय राऊत!
महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत घाणेरड्या पातळीवर नेण्याचे पातक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरूषांच्या प्रतिमांची तुलना आणि विडंबन सोबत जात, समाज अशा विषयांवर उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहेत. संपूर्ण भारतभूमीचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इतर नेत्यांशी तुलना करण्याच्या अपराधात छत्रपतींच्या सातार गादीच्या वंशाकडे पुरावे मागण्याचा प्रमाद संजय राऊत या पत्रकाराकडून घडला आहे. अर्थात, राऊत विरोधात अश्लाघ्य भाषेतील टीका टीपणी समाज माध्यमात सुरु झाली आहे. हा प्रसंग लक्षात घेता इतिहासातील दुसऱ्या प्रसंगाची प्रकर्षाने आठवण होते. तो प्रसंग म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांच्या कुळाला शुद्र ठरवून मंगल विधी करण्यास ब्रह्मवृंदाने नकार दिला होता. तेव्हा खुद्द महाराजांनाही आपल्या क्षत्रिय कुळाची वंशावळ शोधावी लागली होती.
Saturday 4 January 2020
जळगाव मनपात कोण आहेत हे निर्लज्ज ?
जळगाव महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कारभारी आमदार मामा आणि महापौर मामी आहेत. यांचे नेते माजी पालकमंत्री गिरीशभू आहेत. बाकी उरलेले भाजपचे नगरसेवक म्हणजे किस गली मे खसखस आहेत. जमेल तेथे शहराचे वाट्टोळे करणे आणि सरकारी निधीतून पैसा खाणे असा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. पैसा खाण्यात संघ परिवाराशी संबंधित चेहरे आणि त्यांचे नातेवाईकही आघाडीवर आहेत.
Thursday 2 January 2020
बस्स झाले लवंगी फटाके ...
नाथाभाऊ यांना पत्रकार मित्राने लिहिलेले खुले पत्र
आ. नाथाभाऊ गेल्या दोन दिवसात तुम्ही केलेल्या आरोपाच्या बातम्या सोशल
मीडियातून वेगात व्हायरल झाल्या. तुम्ही म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश
महाजन या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तुमची उमेदवारी कापली. गेल्या ३
वर्षांत हा विषय वारंवार चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या बातमीला नाथाभाऊंचा
गौप्यस्फोट किंवा नाथाभाऊंचा बाॅम्बगोळा असा शब्दही आता वापरला जात
नाही. तुम्ही केलेल्या आरोपाचे गांभीर्य नंतर तुमच्याच कृतीने संपवून टाकले.
भाजपच्या एका बैठकीत तुम्ही आणि गिरीश महाजन एकत्र आले. या बैठकीत तुम्ही दोघे जवळ
बसले. शिवाय, हास्य विनोदात एकमेकांच्या टाळ्याही घेतल्या. तुमच्या या कृतीला
माध्यमांनी लगेच मनोमिलन म्हणून टाकले. नाथाभाऊ तुम्ही असे करुन काय मिळवित आहात ? आता तुमचे बोलणे हे गौप्यस्फोट किंवा बाॅम्बगोळेही राहिले नाहीत. ते
फुसके लवंगी फटाके ठरताहेत. वाटू दे तुम्हाला व तुमच्या काही समर्थकांना वाईट, पण
जे खरे ते लिहायला हवे.
Subscribe to:
Posts (Atom)