यावर्षीचा पावसाळा जळगावकरांसाठी मनःस्ताप घेऊन आला आहे. अमृत योजनेच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचा ऊत-मात झालेला आहे. घंटागाड्या जमेल तेवढा कचरा गोळा करीत असल्या तरी लोकांनी कॉलनींच्या मोकळ्या जागेत वा कचरा कुंड्यांजवळ टाकलेला कचरा उचलला जात नाही आहे. अशा स्थितीत जळगाव हे कचरा, घाण, माश्या, डास व मच्छरांचे गलिच्छ शहर झाले आहे. अर्थात, याचा दोष नेहमी प्रमाणे महानगरपालिकेवर फोडला जात असून अमृत योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांचे १२ वाजले असा ढोबळ दोष लावला जातोय. सोशल मीडियातून टीका टीपण्या करताना राजकीय पुढाऱ्यांना टीकेचे धनी केले जात आहे.
खरे तर अमृत योजनेच्या कामाची निविदा नगरसेवक आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी धड वाचलेली नाही. अमृतसाठी दीड फूट रुंदीची चारी सर्वत्र खोदली हे खरे आहे. पण रस्ता कमीत कमी १० फुटापेक्षा जास्त रुंदीचा आहे. मग उरलेल्या साडेआठ फुटावर खड्डे कोणामुळे पडले ? शिवाय जोपर्यंत नव्या जलवाहिनीवर घरनिहाय नळ जोडणी दिली जात नाही तोवर रस्ते दुरुस्ती होणार कशी ? याचे उत्तर भाऊ, मामा, मामी कोण देणार ?
जळगावकरांची अवस्था अरण्यरुदन करणाऱ्या श्वापदासारखी आहे. एखाद्या निबीड अरण्यात एकटा हिंस्त्र प्राणी रस्ता चुकला की तो फिरुन फारून एकाच जागी येतो. असे १०/१२ वेळा घडले की तो प्राणी आवाज काढून रडतो. त्याच्या त्या रडण्याला म्हणतात अरण्यरुदन. जळगावकर नागरी सुविधांबाबत सध्या असेच रडगाणे गात आहेत. निगरगट्ट झालेले पुढारी व निष्क्रिय प्रशासन झाडांगत ठोकळे बनून उभे आहेत. अशावेळी नागरिक म्हणून आपण खरोखर जळगावकर आहोत का ? हा मला प्रश्न पडतो. खरेच जळगाव शहराविषयी आपल्याला किती प्रेम आहे ? हे एकदा मानसिक परिपक्वतेच्या कसोटीवर तपासायला हवे.
आज जळगावकरांचे चित्र काय आहे ? हे सुध्दा मागील काही घटनांवरुन तपासायला हवे. माझे एक मित्र मला नेहमी म्हणतात, जळगाव हे चांगल्या माणसांचे शहर आहे. भले येथील पुढारी नालायक असतील. मला मात्र जळगाव चांगल्या नव्हे तर लाचारांचे शहर वाटते. हे वाचून भांबाळून जाण्याची गरज नाही आणि माझ्यावर व्यक्तिगत टीकेची गरज नाही. कारण लाचार जळगावकरांचे चित्र यापूर्वीच माध्यमांमधून शब्दबद्ध झालेले आहेच.
९/१० महिन्यांपूर्वी जळगाव महानगर पालिकेची निवडणूक एकतर्फी झाली. एकूण ७५ पैकी ५७ जागा भाजप जिंकली. यातील भाजपच्या २ विजयी उमेदवारांच्या घरासमोर तिसऱ्या दिवशी मतदारांनी पैशांसाठी रांग लावली होती. मतदान होऊन निकालानंतर विजयी उमेदवाराच्या घरासमोर उरलेली रक्कम घ्यायला १०००/१२०० जळगावकर जमले होते. ही बातमी तर वाचली असेलच ना ? हा जळगावकर असा मतविक्या आहे ?
महामार्गावर पाळधीनजिक मद्य नेणारा ट्रक आणि मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकलवरील दाम्पत्य ठार झाले होते. अपघातानंतर ट्रक पलटी झाला होता. तेव्हा जळगावकर मंडळी मृत दाम्पत्याकडे दूर्लक्ष करुन ट्रकमधून दारुच्या बाटल्या काढत होते. ही बातमी वाचली असेलच ना ? हा जळगावकर असा लुटारु व्यसनी आहे ?
महामार्गावर दादावाडी परीसरात कांदा नेणाऱ्या ट्रैक्टरची ट्रॉली पलटी झाली. तेव्हा अवघ्या २ तासांत लोकांनी अर्धा ट्रॉली कांदा पळवला होता. ही बातमी वाचली असेलच ना ? हा जळगावकर असा फुकट्या चोर आहे ?
प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी सागरपार्क मैदानावर विश्व विक्रमी भरीत तयार केले होते. हे भरीत फुकट न्या असे आवाहन करण्यात आले होते. अवघ्या २ तासात सुमारे ८०० किलो भरीत जळगावकर डबे भरभरून घेऊन गेले होते. वाटपाच्या रांगेत पती, पत्नी व मुले उभी होती. ही बातमी वाचली असेलच ना ? हा जळगावकर असा फुकट खाऊ आहे ?
जळगाव शहरात फिरायला उद्याने नाही असे आपण म्हणायचो. दोन वर्षांपूर्वी भाऊंचे उद्यान झाले. तेथे फुकटात प्रवेश आहे म्हणून रोज शेकडो नागरिकांची गर्दी असते. हे चित्र तर रोजच दिसते ना ? जळगावकर असा दुसऱ्यांच्या भरवशावर टाईमपास करणारा नागरिक आहे ?
महामार्गलगत समांतर रस्ते तयार करावेत या मागणीसाठी १५/२० जणांची कृती समिती १२ दिवस साखळी उपोषाणाला बसली होती. तेथे नागरिकांच्या सह्यांचे रजिस्टर होते. सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान रोज हजारो नागरिक उषोणकर्त्यांच्या समोरुन जात असत. पण रजिस्टरवर सही करायला १५०/२०० जण यायचे. १२ दिवसात १० हजार सह्याही संकलित झाल्या नाही. या बातम्याही वाचल्या असतील ना ? जळगावकर हे असे बेफिकीर आणि स्वमग्न अवस्थेतील नागरिक आहेत ?
वरील परिस्थिती आणि जळगांवकरांचे वागणे मला सतत अस्वस्थ करीत असते. जळगावकरांच्या गर्दीत मी कुठे असतो ? हा प्रश्न प्रत्येकानेच स्वतःला विचारायला हवा. तरच प्जळगावकर म्हणून घ्यायची आमची पात्रता आहे ? या प्रश्नाचे सुस्पष्ट आणि वास्तवदर्शी उत्तर मिळेल.

No comments:
Post a Comment