लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार नसलेल्या सेनेचे सर्वेसर्वा मा. राजसाहेब ठाकरे यांनी जाहीरसभांमध्ये डिजीटल स्क्रीनचा वापर करीत प्रचाराचा नवा ट्रेंड आणला आहे. नेत्यांच्या वक्तव्याचे जुने व्हीडीओ आणि अलिकडे भूमिका बदललेल्या वक्तव्यांचे नवे व्हीडीओ एकचवेळी पाठोपाठ दाखवून संबंधितांची लबाडी उघडी पाडण्याची ही साधी सोपी व भरपूर करमणूक करणारी पद्धत आहे. या पद्धतीने यूट्यूबवरील प्रेक्षक वाढला आहे.
अर्थात, सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकपूर्व प्रचारात संभाव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयी राजसाहेब काय बोलले होते आणि आता पंतप्रधान मोदीविषयी भ्रम निरास झाल्याने राजसाहेब कशी टीका करीत आहेत ? याचेही परस्पर विसंवाद स्पष्ट करणारे व्हीडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. यावर राजसाहेब म्हणतात, आता माझी भूमिका बदलली आहे. भूमिका बदलायचा फक्त राजसाहेबांनाच अधिकार नाही. तो सर्वांना आहे.
मोदी-शहा माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत असे राजसाहेब जाहीरसभांमध्ये बोलतात. पण एखाद्याच्या समोर तेच ते प्रश्न विचारले गेले की नेता उद्विग्न होतो याचा अनुभव स्वतः राजसाहेब घेत आहेत. अलिकडे टीव्ही 9 ची निखिला व BBC मराठीचे आशीष दीक्षित यांनी राजसाहेबांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीत निखिला व आशीष यांनी घुमवून फिरवून तेच ते प्रश्न राजसाहेबांना विचारले. त्यावर राजसाहेब उद्वेगाने म्हणताना दिसतात, तुमच्याकडे दुसरे प्रश्न नाहीत का ? आशीषला तर राजसाहेब थेट म्हणतात, सुपारी घेऊन प्रश्न विचारत आहात का ? याच प्रश्नाची गंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजसाहेब यांना उद्देशून केली आहे. राजसाहेब जाहीरसभांमध्ये जे प्रश्न विचारत आहेत ते सुपारी घेऊन विचारले जात आहेत का ? असे फडणवीस विचारतात.
असो. आपला मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय मोठे साहेब यांच्या वक्तव्यांविषयी आहे. मोदी-शहा यांच्याविषयी राजसाहेब यांची भूमिका सन २०१४ नंतर २०१९ मध्ये बदलली. म्हणजे तब्बल ५ वर्षांनी बदलली. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेब हे गांधी परिवाराविषयी सतत भूमिका बदलत आले आहेत. सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा साहेबांनी चर्चेला घेतला. त्यानंतर त्यांचे काँग्रेसमधून निष्कासन झाले. याच साहेबांनी नंतर काँग्रेस आघाडीत १० वर्षे मंत्रीपद सांभाळले. साहेबांच्या भूमिका बदलाचा हा यू टर्न गाजलेला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसतर्फे राहुल गांधी देशभर प्रचार करीत आहेत. तेच पंतप्रधान होतील अशी अपेक्षा सर्व सामान्य मतदारात आहे. सोनिया, राहुल यांची प्रसंशा साहेबांनी निवडणुकीपूर्वी केली आहे. गांधी घराण्याचा त्याग साहेबांनी सांगितला आहे. हे सांगताना सोनियांचे विदेशीपण साहेब विसरले आहेत. राहुल गांधी यांच्या नावाभोवती सक्षम विरोधी नेता असे वलय निर्माण होत असताना साहेबांनी संभाव्य पंतप्रधान म्हणून ममता, मायावती व चंद्राबाबू यांचे नाव घेतले आहे. साहेबांनी राहुलचे नाव टाळत, राहुल स्वतः पंतप्रधानपदाला इच्छूक नाही अशी पुष्टीही जोडली आहे.
राजसाहेबांनी पाच वर्षांत भूमिका बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेब मात्र दरमहा, दरआठवडा भूमिका बदलतात. अशावेळी राजसाहेबांचा 'लाव रे तो व्हीडीओ' हा फार्म्युला वापरायचे ठरले तर साहेबांच्या बदललेल्या भूमिकांवर तीन तासांचा चित्रपट होईल. पण आपण केवळ 'ए दाखवरे त्या बातम्या' एवढेच म्हणून जानेवारी २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान साहेबांनी सोनिया व राहुल यांच्याविषयी केलेली वक्तव्ये आणि ती छापील माध्यमात कशी प्रसिध्द झाली एवढेच पाहू ... (भूमिका बदलून अभिव्यक्त होण्याचा प्रत्येकाला राज्य घटनेने दिलेला अधिकार मान्य करुन.)
...तर २०१९मध्ये पंतप्रधान होईल: राहुल गांधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 08 May 2018, 03:28 PM
बेंगळुरू - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास २०१९ मध्ये मी पंतप्रधान होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. २०१९ मध्ये भाजपची सत्ता येणार नाही. तसंच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असं भाकितही त्यांनी व्यक्त केलं.
२०१९ची निवडणूक मोदी X राहुल होणार नाही: पवार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Oct 2018, 01:59 PM
मुंबई - '२०१९ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल होणार आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेत राहणार नाहीत. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेतून पायउतार होईल, पण कुणालाही बहुमत मिळणार नसल्याने त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल,' असं भाकित करतानाच लोकसभा निवडणुकीत भाजप नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तसं होणार नाही, असंही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
'राहुल गांधी हेच २०१९ मध्ये पंतप्रधान'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Dec 2018, 10:05 PM
वृत्तसंस्था, कोची - 'राहुल गांधी हेच २०१९ मध्ये पंतप्रधानपदी असतील,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधीपंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेत उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
सोनिया, राहुल गांधीच देशाचे नेतृत्व करण्यास योग्य : शरद पवार (Video)
Pudhari News - Published On: Dec 25 2018 10:59PM | Last Updated: Dec 25 2018 11:02PM
सातारा : प्रतिनिधी - देशाचे नेतृत्व करण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधी यांचेच नेतृत्व योग्य आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केले. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्यावरून १९९९ मध्ये पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. परंतु आज त्यांनी सोनिया आणि राहुल यांचे नेते म्हणून कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तर यांपैकी एक होईल पंतप्रधान, शरद पवारांचे महत्त्वपूर्ण विधान
दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 28, 2019, 12:42 PM IST
मुंबई - एनडीएला बहुमत मिळाले नाही तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार असू शकतात'' असे शरद पवार म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. राहुल गांधी व्यतिरीक्त वेगळ्या तीन नेत्यांची नावे त्यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वरील आशय वाचून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक अद्वातद्वा प्रतिक्रिया देऊ शकतात. तसे करताना एकच गोष्ट लक्षात घ्या ... 'राजसाहेब भूमिका बदलू शकतात' ... 'साहेब नेहमीच भूमिका बदलतात' ... साहेबांचे प्रसिध्द वाक्य आहे ... 'भाकरी फिरवावी लागते' ... हे विचारांनाही लागू आहे.

No comments:
Post a Comment