Monday 3 September 2018

कौटुंबिक ऐक्याचे समर्पक उदाहरण ...

जैन उद्योग समुहातील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड या कंपनीचे सह - व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित भवरलाल जैन यांच्यावर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया रविवार, दि. २६ ऑगष्ट रोजी मुंबईत ब्रीचकेन्डी हॉस्पिटलमध्ये डॉ. भट्टाचार्य यांनी यशस्वीपणे पार पाडली. मुंबईचे ख्यातनाम कार्डिओलॉजीस्ट आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंचे जवळचे मित्र पद्मश्री डॉ. मुन्सी व जळगाव येथील डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर श्री. अजीत जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या ते आयसीयूमधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट झाले आहेत. श्रध्देय भवरलालजी व श्रध्देय कांताबाई जैन यांच्या पश्चात जैन कुटुंबाने अशा कसोटीच्या प्रसंगी दाखवलेल्या कौटुंबिक ऐक्य व एकत्रिकरणाचे एक अनोखे उदाहरण सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. श्री. अजीत यांच्यावरील शस्त्रक्रियेसंदर्भातील अधिकृत घोषणा करताना जैन कुटुंबाने आवर्जून 'भवरलाल व कांताबाई जैन यांचे कुटुंबिय' असा उल्लेख केला आहे. कौटुंबिक व आरोग्यविषयक सौख्य लाभाचे किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचे ऐक्य व एकत्रिकरण कसे आवश्यक असते, ती सुध्दा एक सकारात्मक शक्ती असते हेच यातून अधोरेखीत झाले आहे.

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व कांताबाई जैन यांनी आपल्या सहजिवनात उद्योग समुहाचा विस्तार करताना कौटुंबिक प्रपंचालाही स्नेहाच्या धाग्यांनी कौशल्याने गुंफून टाकले. दोघांच्या संस्कारांचे धागे इतके घट्ट होते की, सख्खे आणि चुलते या नात्यांच्या मर्यादा अस्पष्ट होत जैन कुटुंबातील घटक अर्धशतकावर गेले. कांताबाईंना अवेळी आणि अचानक उद्भवलेला आजार, त्याच्या उपचारासाठी सतत आयसीयूत करावी लागणारी धावपळ यामुळे जैन कुटुंबिय सतत त्यांच्या जवळपास असे. हॉस्पिटलमध्ये धावपळ करावी लागू नये म्हणून ज्येष्ठपूत्र श्री. अशोक जैन यांनी शहरातील राहत्याघरी जैन हाऊस येथे भरवलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २४ तासांत सर्व सुविधांनीयुक्त आयसीयू रुम तयार केली होती.

भवरलालजींना हृदयाशी संबधित चार मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. दोन बायपास,  एकवेळा एन्जोप्लास्टी व एकवेळा डीफेबूलेटरसह पेस मेकर बसविण्याशी संबंधित या शस्त्रक्रिया होत्या. दुसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान हृदय पुन्हा सुरु करण्यासाठी चौथ्या शॉक ट्रीटमेंटपर्यंत जावे लागले होते, याचा तपशील 'ती आणि मी' पुस्तकात आहे. भवललालजींवरील सर्वच शस्त्रक्रियांच्या काळात जैन कुटुंबिय व जवळचा मित्र परिवार सोबत असे. हा गोतावळा सोबत असल्याने भवरलालजी आजारातून लवकर सावरत असत. स्वतःच्या हृदयरोगाविषयी भवरलालजींचा एवढा अभ्यास झाला होता की, एखाद्या एमडी डॉक्टरलाही काही बारकावे ते सहज सांगू शकत असत. मात्र, अखेरच्या टप्प्यात भवरलालजींना हृदयरोग परास्त करु शकला नाही तर त्यांच्या शरीरात इतर बैक्टेरियांनी प्रवेश केला आणि त्यातून उद्भवलेल्या आजारात त्यांचे निधन झाले. जैन कुटुंबासाठी मोठ्याभाऊंचे असे जाणे धक्कादायक होते.

जैन कुटुंबिय आरोग्याच्या बाबतीत सतत दक्ष आहेत. दैनंदिन खानपानवर निश्चित बंधने आहेत. रोजच्या आहारात काय असावे याची काळजी घेतली जाते. अशोक, अनिल, अजित आणि अतुल अशा चारही भावांसह कुटुंब, मित्रपरिवार आणि कंपनीतील सहकाऱ्यांसाठी खास निसर्गोपचार केंद्र जैन हिल्स येथे तयार केले आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदशर्नाप्रमाणे उपचार करण्यात येतात. पुढील युवा पिढीला सुध्दा काही गोष्टींसाठी आता पासूनच बाध्य केले जाते.

जैन उद्योग समुहाचे नेतृत्व चारही भावंडाकडे असताना त्यांच्यातील स्नेहबंध हा कमालीचा घट्ट आहे. प्रत्येकाची कार्यशैली भिन्न असली तरी त्यात भवरलालजींच्या गुणांचा संचय आहे. श्री. अजित यांच्या कार्यशैलीत खानपानावर वैयक्तिक नियंत्रण आहे पण त्यांच्या जेवणाच्या वेळा उशिराच्या आहेत. संस्थेतील सर्वांत शिस्तबध्द, आटोपशीर, स्वतःला कामात गुंतवून घेणारे आणि कठोर परिश्रम करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. कुशल प्रशासकाचा नेटकेपणा व कार्य कठोरता त्यांच्या ठायी आहे. अशाही जीवनशैलीतून उद्भवलेला हृदयाचा आजार त्यांच्यासह इतर सर्व कुटुंबाला अस्वस्थ करणारा आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे हा त्रास हेरिडीटीमुळे झाला. म्हणूनच अख्खे जैन कुटूंब या काळात एकत्र असून पूर्वजांची पुण्याई मोठ्यांचे आशिर्वाद, वैद्यकीय कौशल्य, मित्र परिवाराच्या सद्भावना, समुहातील सहकाऱ्यांच्या व इतरांच्या सदीच्छा या बळावरच श्री. अजित आजारावर मात करु शकले आहेत. कुटुंबाच्या ऐक्याचे आणि एकत्रिकरणाचे हे एकमेवाद्वितीय उदाहरण असावे.

रिश्तों को मजबूत बनाने के लिए।
एक छोटा सा उसूल बनाया है।।
रोज कुछ अच्छा याद रखते है।
और बुरा हमेशा भूल जाते है।।

12 comments:

  1. सुंदर,समर्पक परिचय.मोठे भाऊ आणि अशोकजी यांच्याव्यतिरिक्त इतरांचा परिचय सामान्य नागरिकांना नव्हता,तो आज झाला,छान वाटले,खरंच आदर्श कुटुंब!
    और सबसे पसंद आया तो आपका उसुल, हम भी कोशिश करेंगे उसे अपनानेकी!💐💐

    ReplyDelete
  2. हम सब एक है 👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम ����
    छोट्याशा लेख मध्ये परीवारिक समन्वय आणि संपूर्ण कुटूंबाचा परीचय झाला !

    ReplyDelete
  4. हा परिवार प. पु मोठ्या भाउच्या तालिमेत तयार झाला आहे त्यामुळे भविष्यात सुध्दा असा परिवारिक समन्न्वय असेल

    ReplyDelete
  5. हा परिवार प. पु मोठ्या भाउच्या तालिमेत तयार झाला आहे त्यामुळे भविष्यात सुध्दा असा परिवारिक समन्न्वय् राहील याची मला हमी आहे !

    ReplyDelete
  6. अप्रतिम शब्दांकन... आदरणीय तिवारी साहेबांना माझा नमस्कार

    ReplyDelete
  7. Family unity leads to suscess

    ReplyDelete
  8. Family unity leads to suscess

    ReplyDelete