जळगावमधील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक असलेले श्रीराम व श्रीकांत बंधू सध्या चर्चेत आहेत. मनपाच्या निवडणुकीत पडद्यामागून व्यूहरचना करीत 'भेद आणि दाम' चा योग्य व्यक्तिंवर पुरेशा प्रमाणात वापर करीत भारतीय जनता पक्षाला 'न भुतो न भविष्यती' असे यश मिळवून देण्यात दोघांचा मोठा वाटा आहे. उमेदवार ठरविताना भाजपला ५० अधिक अशा ५२ जागा मिळतील असा दावा केला जात होता. मात्र, भाजपला किमान ५७ जागा मिळतील असे श्रीकांत सांगत होते. घडलेही तसेच. त्यामुळे भाजपच्या बेरजेच्या राजकारणापासून तर यशस्वी बिल्डर व्यवसायातील अनेक प्रकल्पात अग्रेसर असलेल्या खटोड बंधुंचे हात 'जेथे लागतील तेथे सोने होईल'अशी जादू करणारे असून ते तुपातही आहेत.
गणेशोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी मेहरुण तलाव परिसरात शिरसोली रस्त्यावरील सुमारे सव्वादोन एकर जागेत १५० फ्लैटच्या 'श्री श्री लेक प्राईड' या प्रकल्पाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. या बहुउद्देशीय गृहप्रकल्पातील मंदिरात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याचे निमित्त साधून प्रकल्पस्थळी निमंत्रितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अर्थात, यानिमित्ताने जळगावकरांनी प्रकल्पस्थळी येऊन तेथील नव्या वसाहतीची जीवनशैली पाहावी हा या मागील हेतू होता.
जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असून त्याचा चारही दिशेला मनपा हद्द म्हणून ६५ चौरस किलोमीटर विस्तार कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात जळगाव शहराची हद्द आता ८० चौरस किलोमीटरच्या आसपास आहे. याचाच अर्थ शहरालगत नागरी वसाहतींची संख्या झपाट्याने वाढते आहे. बांधकाम वापरासाठी उपयोगात येणाऱ्या भूखंडाच्या क्षेत्रात रस्ते, गटारी व पथदिवे या सोयी देण्याची जबाबदारी विकसकाची आहे. परंतु अशा व्यवसायातील पारंपरिक विकसक हे भूखंड किंवा रो हाऊस, फ्लैट घेणाऱ्यांना खरोखर काय सुविधा देतात ? हा प्रश्न आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सामावलेल्या वसाहतींमध्ये आजही प्राथमिक सुविधांची वानवा आहे. गेल्या काही वर्षांत जळगाव हे खड्डेयुक्त रस्ते, सफाई न होणारे शहर म्हणून कुलौकिक मिळवून आहे. जळगाव शहरात निवास करण्यापेक्षा नाशिक, पुणे आणि औरंगाबादला स्थलांतरित होणाऱ्यांची अनेक उदाहरणे समोर आहेत. अशा या वातावरणात वसाहतींची जीवनशैली बदलणारा सध्याचा सर्वोत्तम गृह प्रकल्प म्हणून 'श्री श्री लेक प्राईड' चा उल्लेख करता येईल.
खटोड बंधू गेल्या ३०/३५ वर्षांपासून जमीन, भूखंड, बांधकाम व्यवसायात आहेत. बहुतांश कायदेशीर अडचणींवर मात करीत ते आपले अनेक गृह प्रकल्प पूर्ण करु शकले आहेत. मात्र महानगरांमधील टाऊनशीप सारखा पहिला प्रकल्प जळगावात पूर्ण करण्याचा माईल स्टोन 'श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर' ने रोवला आहे. अर्थात, या प्रकल्पाच्या परिपूर्णतेचे श्रेय हे खटोड यांच्या तिसऱ्या पिढीतील ॲड. समर्थ श्रीकांत खटोड यांना जाते. जमीन, भूखंड आणि बांधकाम व्यवसायात जास्तीत जास्त जबाबदारी विविध कायद्यांची असते. कागदोपत्रांची अनेक भेंडोळी व प्रमाणपत्रे पूर्ण केली की तांत्रिक आराखड्याने बांधकामे पूर्ण होतात. हाच अडथळा नेहमीचा दूर व्हावा या हेतूने समर्थने विधी शाखेची पदवी घेतली. त्याने अभियांत्रीकी किंवा गृह आरेखन शाखेचे शिक्षण घेतले नाही. या मागील कारण असे की, अशा कामाचा ३०/३५ वर्षांचा अनुभव मोठे काका श्रीराम आणि वडील श्रीकांत यांना आहे. त्यांच्या अनुभवाच्या कार्यशाळेत बिल्डर कामाचे बाळ कडू त्याला सहज मिळाले. म्हणून त्याने शिक्षण विधी शाखेचे घेतले.
'श्री श्री लेक प्राईड' चे काम अवघ्या तीन वर्षांत झाले आहे. मे २०१४ मध्ये काम सुरु झाले आणि जून २०१७ मध्ये काम पूर्ण झाले. आज काही कुटुंबांना फ्लैट ताब्यात घेऊन निवासाला वर्ष पूर्ण झाले आहे. या तीन वर्षांत नोटबंदी आली. बांधकाम क्षेत्रातला क्लिष्ट कायदा 'रेरा' आला. अनेक सेवा, व्यवसायात जीएसटी आला. या फेऱ्यात मोठ्या शहरातील बिल्डर व्यवसायात मंदी आली. अजूनही बहुतांश व्यावसायिक सावरलेले नाहीत. पण खटोडांच्या युवापिढीने आपल्या प्रकल्पाला अडचणींवर मात करीत पूर्ण केले. या प्रकल्पात २/३/४ बीएचके प्रकारातील फ्लैट आहेत. त्याची संख्या १५० आहे. यापैकी १२५ फ्लैटची विक्री झालेली आहे. ४० कुटुंबे नव्या फ्लैटमध्ये स्थिरावली आहेत. उरलेल्या २५ फ्लैटसाठी ग्राहकांच्या चौकशी झालेल्या आहेत.
श्री श्री लेक प्राईड' हा प्रकल्प वसाहतींची जीवनशैली बदलणरा का आहे ? याचे उत्तर तेथे भेट देऊन पाहणी केल्यावर लक्षात येते. घरामध्ये पुरेसा प्रकाश असावा व हवा खेळती राहवी ही माफक अपेक्षा ग्राहकाची असते. ही बाब लक्षात घेऊन कमीत कमी वीजेचा वापर आणि नैसर्गिक हवेचा आनंद या दोन्ही गोष्टीचा लाभ देणारे फ्लैटचे आरेखन आहे. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, बांधकामातील हर एक साहित्य गुणवत्तापूर्ण व नव्या जमान्याच्या शैलीचे आहे. केवळ फ्लैटमधीलच जीवनशैली आरामदायी न करता फ्लैटच्या बाहेरही सामुहिक जीवनशैली परस्पर सामंजस्य, एकोपा व आरोग्यदायी करण्यासाठी कॉमन हॉल, जीम, छोटे मैदान, ट्रैक, उद्यान, ॲम्पिथीएटर अशा लाजबाब सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुविधा महिला, वयोवृधूद, मुले यांच्यासह कर्त्या माणसांनाही आनंद व समाधान देणाऱ्या आहेत. संपूर्ण वसाहतीत मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. सुरक्षेवर नजर ठेवायला सीसीटीव्ही आहेत. संपूर्ण वसाहत वॉल कंम्पाऊंडने बंदीस्त आहे. रस्ते, गटारी व पथदिवे याचा विषयच नाही. संपूर्ण वसाहतीत काँक्रिटीकरण असून बंदीस्त गटार व्यवस्था आहे. दिव्याची सर्वत्र व्यवस्था आहे. जळगावकरांना स्वप्नवत वाटणारी आरामदायी व विलासी जीवनशैली येथे निश्चितपणे साकारली आहे. याबद्दल ॲड. समर्थसह खटोड बंधू तथा कुटुंबियांचे अभिनंदन करायला हवे.
खटोड बंधुंचा निवास महाबळ परिसरात आहे. दोघा बंधुंचे बंगले आहेत. दोन बंगल्यांच्या मध्ये एक दुसरा बंगला आहे. खटोड बंधु एकत्र बसतात आणि व्यवसायही एकत्र करतात. तरीही बंगले बांधताना सलग व जवळ जवळ न बांधता मध्येच दुसरा बंगला कसा आला ? असे मी एकदा श्रीकांत यांना विचारले होते. ते म्हणाले, 'कौटुंबिक प्रेम, जिव्हाळा आणि स्नेह कायम टीकावा असे वाटत असेल तर विशिष्ट एका मर्यादेनंतर त्यात अंतर हवे. तरच कौटुंबिक स्वास्थ टीकून राहते. म्हणूनच आम्ही आमचे बंगले बांधताना ठरवून मध्ये एक प्लॉट सोडला. परंतु त्यामुळे आमचे दोघांचेच नाही तर नव्या पिढीचेही स्नेहबंध अधिक घट्ट जुळलेले आहे.' श्रीकांत यांचे हे कुटूंबशास्त्र अलिकडच्या विभक्त होणाऱ्या कुटुंबियांनी समजावून घेणे आवश्यक आहे. अर्थात, श्रीकांत खटोड आणि माझी मैत्री ही १४/१५ वर्षापूर्वी एका वादातून जोडली गेली. आज श्रीकांत यांचे सोबत श्रीरामही तेवढेच घट्ट मित्र आहेत.
गणेशोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी मेहरुण तलाव परिसरात शिरसोली रस्त्यावरील सुमारे सव्वादोन एकर जागेत १५० फ्लैटच्या 'श्री श्री लेक प्राईड' या प्रकल्पाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. या बहुउद्देशीय गृहप्रकल्पातील मंदिरात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याचे निमित्त साधून प्रकल्पस्थळी निमंत्रितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अर्थात, यानिमित्ताने जळगावकरांनी प्रकल्पस्थळी येऊन तेथील नव्या वसाहतीची जीवनशैली पाहावी हा या मागील हेतू होता.
जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असून त्याचा चारही दिशेला मनपा हद्द म्हणून ६५ चौरस किलोमीटर विस्तार कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात जळगाव शहराची हद्द आता ८० चौरस किलोमीटरच्या आसपास आहे. याचाच अर्थ शहरालगत नागरी वसाहतींची संख्या झपाट्याने वाढते आहे. बांधकाम वापरासाठी उपयोगात येणाऱ्या भूखंडाच्या क्षेत्रात रस्ते, गटारी व पथदिवे या सोयी देण्याची जबाबदारी विकसकाची आहे. परंतु अशा व्यवसायातील पारंपरिक विकसक हे भूखंड किंवा रो हाऊस, फ्लैट घेणाऱ्यांना खरोखर काय सुविधा देतात ? हा प्रश्न आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सामावलेल्या वसाहतींमध्ये आजही प्राथमिक सुविधांची वानवा आहे. गेल्या काही वर्षांत जळगाव हे खड्डेयुक्त रस्ते, सफाई न होणारे शहर म्हणून कुलौकिक मिळवून आहे. जळगाव शहरात निवास करण्यापेक्षा नाशिक, पुणे आणि औरंगाबादला स्थलांतरित होणाऱ्यांची अनेक उदाहरणे समोर आहेत. अशा या वातावरणात वसाहतींची जीवनशैली बदलणारा सध्याचा सर्वोत्तम गृह प्रकल्प म्हणून 'श्री श्री लेक प्राईड' चा उल्लेख करता येईल.
'श्री श्री लेक प्राईड' चे काम अवघ्या तीन वर्षांत झाले आहे. मे २०१४ मध्ये काम सुरु झाले आणि जून २०१७ मध्ये काम पूर्ण झाले. आज काही कुटुंबांना फ्लैट ताब्यात घेऊन निवासाला वर्ष पूर्ण झाले आहे. या तीन वर्षांत नोटबंदी आली. बांधकाम क्षेत्रातला क्लिष्ट कायदा 'रेरा' आला. अनेक सेवा, व्यवसायात जीएसटी आला. या फेऱ्यात मोठ्या शहरातील बिल्डर व्यवसायात मंदी आली. अजूनही बहुतांश व्यावसायिक सावरलेले नाहीत. पण खटोडांच्या युवापिढीने आपल्या प्रकल्पाला अडचणींवर मात करीत पूर्ण केले. या प्रकल्पात २/३/४ बीएचके प्रकारातील फ्लैट आहेत. त्याची संख्या १५० आहे. यापैकी १२५ फ्लैटची विक्री झालेली आहे. ४० कुटुंबे नव्या फ्लैटमध्ये स्थिरावली आहेत. उरलेल्या २५ फ्लैटसाठी ग्राहकांच्या चौकशी झालेल्या आहेत.
खटोड बंधुंचा निवास महाबळ परिसरात आहे. दोघा बंधुंचे बंगले आहेत. दोन बंगल्यांच्या मध्ये एक दुसरा बंगला आहे. खटोड बंधु एकत्र बसतात आणि व्यवसायही एकत्र करतात. तरीही बंगले बांधताना सलग व जवळ जवळ न बांधता मध्येच दुसरा बंगला कसा आला ? असे मी एकदा श्रीकांत यांना विचारले होते. ते म्हणाले, 'कौटुंबिक प्रेम, जिव्हाळा आणि स्नेह कायम टीकावा असे वाटत असेल तर विशिष्ट एका मर्यादेनंतर त्यात अंतर हवे. तरच कौटुंबिक स्वास्थ टीकून राहते. म्हणूनच आम्ही आमचे बंगले बांधताना ठरवून मध्ये एक प्लॉट सोडला. परंतु त्यामुळे आमचे दोघांचेच नाही तर नव्या पिढीचेही स्नेहबंध अधिक घट्ट जुळलेले आहे.' श्रीकांत यांचे हे कुटूंबशास्त्र अलिकडच्या विभक्त होणाऱ्या कुटुंबियांनी समजावून घेणे आवश्यक आहे. अर्थात, श्रीकांत खटोड आणि माझी मैत्री ही १४/१५ वर्षापूर्वी एका वादातून जोडली गेली. आज श्रीकांत यांचे सोबत श्रीरामही तेवढेच घट्ट मित्र आहेत.
No comments:
Post a Comment