Tuesday, 18 September 2018

बच्चा लोग ... ताली बजाव !

सन १९९२/९३ मधील जळगाव शहरातील राजकीय इतिहास डोळ्यांसमोर येतो. नगरपालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीची बहुमताची सत्ता तेव्हा होती. स्व. बबन बाहेती, स्व. नरेंद्र पाटील, छबीलदास खडके, उल्हास साबळे असे दोन चार जण विरोधक म्हणून असायचे. पालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी असली की सत्ताधारी गटाची पार्टी मिटींग सुरेशदादांच्या निवासस्थानी व्हायची. सभेत अजेंड्यावरील विषय कसे मंजूर करायचे याचा फार्स तेथे निश्चित व्हायचा. प्रत्यक्ष सभेत एका कोपऱ्यात गफार मलिक, दुसऱ्या कोपऱ्यात बंडू तथा पांडुरंग काळे तिसऱ्या कोपऱ्यात शिवचरण ढंढोरे व चौथ्या कोपऱ्यात करीम सालार बसायचे.

Sunday, 16 September 2018

वसाहतीची जीवनशैली बदलणारा प्रकल्प ...

जळगावमधील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक असलेले श्रीराम व श्रीकांत बंधू सध्या चर्चेत आहेत. मनपाच्या निवडणुकीत पडद्यामागून व्यूहरचना करीत 'भेद आणि दाम' चा योग्य व्यक्तिंवर पुरेशा प्रमाणात वापर करीत भारतीय जनता पक्षाला 'न भुतो न भविष्यती' असे यश मिळवून देण्यात दोघांचा मोठा वाटा आहे. उमेदवार ठरविताना भाजपला ५० अधिक अशा ५२ जागा मिळतील असा दावा केला जात होता. मात्र, भाजपला किमान ५७ जागा मिळतील असे श्रीकांत सांगत होते. घडलेही तसेच. त्यामुळे भाजपच्या बेरजेच्या राजकारणापासून तर यशस्वी बिल्डर व्यवसायातील अनेक प्रकल्पात अग्रेसर असलेल्या खटोड बंधुंचे हात 'जेथे लागतील तेथे सोने होईल'अशी जादू करणारे असून ते तुपातही आहेत.

Monday, 3 September 2018

कौटुंबिक ऐक्याचे समर्पक उदाहरण ...

जैन उद्योग समुहातील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड या कंपनीचे सह - व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित भवरलाल जैन यांच्यावर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया रविवार, दि. २६ ऑगष्ट रोजी मुंबईत ब्रीचकेन्डी हॉस्पिटलमध्ये डॉ. भट्टाचार्य यांनी यशस्वीपणे पार पाडली. मुंबईचे ख्यातनाम कार्डिओलॉजीस्ट आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंचे जवळचे मित्र पद्मश्री डॉ. मुन्सी व जळगाव येथील डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर श्री. अजीत जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या ते आयसीयूमधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट झाले आहेत. श्रध्देय भवरलालजी व श्रध्देय कांताबाई जैन यांच्या पश्चात जैन कुटुंबाने अशा कसोटीच्या प्रसंगी दाखवलेल्या कौटुंबिक ऐक्य व एकत्रिकरणाचे एक अनोखे उदाहरण सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. श्री. अजीत यांच्यावरील शस्त्रक्रियेसंदर्भातील अधिकृत घोषणा करताना जैन कुटुंबाने आवर्जून 'भवरलाल व कांताबाई जैन यांचे कुटुंबिय' असा उल्लेख केला आहे. कौटुंबिक व आरोग्यविषयक सौख्य लाभाचे किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचे ऐक्य व एकत्रिकरण कसे आवश्यक असते, ती सुध्दा एक सकारात्मक शक्ती असते हेच यातून अधोरेखीत झाले आहे.

Sunday, 2 September 2018

नाथाभाऊंना माध्यमांचा चकवाच !

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस. त्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षात खडसेंची राजकीय कोंडी करण्यात आली आहे. फारसा आगापिछा नसलेल्या कथित आरोपांच्या भोवऱ्यात खडसे पक्षांतर्गत एकाकी पडले आहेत. अशा स्थितीत आगतिक झालेल्या खडसे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या संदर्भात केलेले वक्तव्य आठवले. खडसेंनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, 'सत्य माहित झाल्यानंतर माध्यमांनी मला न्याय मिळवून द्यायला हवा !' अर्थात, खडसेंवर झालेल्या अनेक आरोपांपैकी एकही आरोप न्यायालयाच्या कक्षात साधार पुराव्यांसह साबीत झालेला नाही. या सोबत दुसरी बाजू अशीही आहे की, खडसेंवरील सर्वच आरोप निराधार असल्याची क्लिनचीट भाजप नेतृत्वातील सरकारने दिलेली नाही. म्हणून खडसेंची सत्तास्थानावरील वापसी होण्याची तुर्तास शक्यता नाही. याची जाणिव खडसे यांनाही असून काही दिवसांपूर्वी ते स्वतःच म्हणाले आहेत, 'मला मंत्रीपद मिळण्याची 'ती योग्य वेळ' परत कधी येणार नाही.'