डीसीएम गाडीचा ड्रायव्हर ते अशोक लेलैण्डचा डिलर ...
मैत्रिचा गोतावळ्याच बंध कोणात कसा गुंतवून टाकेल सांगता येत नाही. अशाच एका बंधाने आज जखडून टाकले. जुने मित्र ॲड. जमिल देशपांडे यांची 'अपर्णा ॲटोमोटीव्ह' च्या उद्घाटन समारंभात भेट झाली. मला कार्यक्रमासाठी उपस्थितीचा आग्रह सौ. अपर्णा भट - कासार या आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रिणीकडून होता. श्री. किरण कासार यांनीही आवर्जून या असे व्यक्तिशः म्हटले होते. बहुधा जमिलभाई सुध्दा अशाच आग्रहातून आले असावेत ? असा अंदाज होता.
एजन्सी व सर्व्हिस सेंटरची पाहणी करुन कार्यक्रमस्थळी गेलो. तेथे सहज जमिलभाईंना विचारले, 'किती वेळ थांबणार ?' जमिलभाईंनी दिलेल्या उत्तरानंतर मी मैत्रिच्या नव्या बंधात जखडला गेलो. जमिलभाई म्हणाले, 'मी कार्यक्रमात प्रास्ताविक करणार आहे. किरण आणि मी ड्रायव्हर असल्यापासूनचे मित्र आहोत. मी त्याच्या विषयी बोलणार आहे' या माहितीमुळे उत्सुकता वाढली. जमिलभाई ड्रायव्हर होते हे मला माहित आहे. जळगाव येथे 'सकाळ'चा मी सहयोगी संपादक असताना जमिलभाई बातमीदारही होते. पण श्री. किरण कासार यांची कहाणी उत्कंठा वाढवणारी होती. जमिलभाईंशी केलेल्या गप्पांमध्ये मैत्रिचा धागा जखडायला लागला.
मिलींद कासार व जमिलभाई हे दोघे मित्र. जळगावपासून जवळच्या पाळधीत राहणारे जमिलभाई आयशर गाडी चालवायचे. मिलींद यांच्याकडे डीसीएम गाडी होती. त्यांच्यासोबत लहान बंधु किरण कधीकधी गाडीवर येत. त्यांच्याशीही जमिल भाईंची मैत्री जमली. मिलींद यांचे गाडी हाकण्याचे कौशल्य उत्तम होते. किरण शिकलेले सवरलेले असल्याने मिलींद यांनी त्यांना गाडी चालवू नको तर आयशरचे स्पेअरपार्ट विक्री कर असे सांगितले. त्याप्रमाणे कालिंकामाता मंदिराजवळ स्पेअरपार्ट विक्री व सोबत दोन तीन मेकैनिक ठेवून छोटे गैरेज सुरु झाले. पण दैवाला काही वेगळे करायचे असावे.
एका अपघातात मिलींद यांचा मृत्यू झाला. मग काही काळ भावाची डीसीएम चालविण्याची जबाबदारीही किरणवर आली. सोबत आयशरचे गैरेज सुरु होते. तेव्हा आयशरचे सर्व्हिस सेंटर नाशिक व औरंगाबादला होते. ते लांब असल्याने जळगावचे गाडीमालक किरण यांच्याच गैरेजमध्ये काम करुन घेत. याची माहिती कंपनीला मिळाली. धुळ्यातील वितरकाच्या माध्यमातून किरण यांना आयशरचे सर्व्हिस सेंटर मिळाले.
किरण यांनी आयशर सर्व्हिस सेंटर एखाद्या कुटुंबाप्रमाणे सांभाळले आहे. स्वतः ड्रायव्हरचा अनुभव घेतल्याने तेथे ड्रायव्हर मंडळींसाठी आराम कक्ष आहे. तेथे टीव्ही सुध्दा आहे. आयशरच्या सर्व्हिस सेंटरमध्ये एक घंटा लावली आहे. आपल्या गाडीच्या दुरुस्तीचे काम समाधानकारक झाले असेल तर गाडी मालकाने ती वाजवून आपला आनंद व्यक्त करायचा. असे म्हणतात, ग्राहक हा देव असतो. मंदिरात देवाचे लक्ष वेधायला भाविक घंटा वाजवतो. आयशरच्या या सर्व्हिस सेंटरमध्ये सेवेवर खूश झालेल्या ग्राहक देवालाच घंटा वाजवायची संधी मिळाली आहे.
किरण कासार यांच्या या प्रवासात सौ. अपर्णा भट कासार यांची साथ सांगत आहे. त्या स्वतः ज्येष्ठ व सुप्रसिध्द नृत्यांगना आहेत. अर्थात, दोघांच्या विवाहाविषयक बंधाची माहिती जमिलभाईंनी दिली नाही. ती सुध्दा रंजक असेल. सहा महिन्यांपूर्वी अशोक लेलैण्ड कंपनीने जळगावात लाईट व्हेईकल वाहनांसाठी स्वतंत्र डीलरशीप देण्यासाठी जाहिरात दिली. तेथे किरण कासार यांनी हात घातला. आयशर सर्व्हिस सेंटरच्या अनुभवातून त्यांना ही संधी मिळणार हे निश्चित होते. अखेर झाले सुध्दा तसेच. अशोक लेलैण्डने किरण कासार यांना डिलर म्हणून नेमले. ड्रायव्हरचा डिलर झाला. जमिलभाईंच्या भाषेत 'डी टू डी'. किरण कासारांनी पत्नीवरील प्रेम आता जाहिरपणे पुन्हा व्यक्त केले आहे. 'अपर्णा ॲटोमोटीव्ह' नाव देवून. डिलरशीप सुरु होण्याच्या अगोदरच किरण कासार यांनी २० गाड्या विक्री केल्या आहेत. कासार कुटुंबियांचा यशाचा प्रवास पुढेही असाच शिखर गाठणारा असावा.
टीप - कासार यांच्या कार्यक्रमात नंदुरबारचे डॉ. दीपक अंधारे भेटले. 'सकाळ'चा प्रतिनिधी म्हणून मी नंदुरबारला सुध्दा होतो. तेथे मला युरिन इन्फेक्शनचा भयंकर त्रास झाला होता. डॉ. अंधारे यांनी सलाईनद्वारे युरिन फोर्सचा वापर करुन इन्फेक्शन कमी करणे किंवा बारीक मुतखडा असेल तर काढून टाकणे हा उपचार केला होता. त्यानंतर आजपर्यंत तसा त्रास पुन्हा झालेला नाही. डॉ. अंधारे यांची भेट आनंददायी ठरली.

inspiring story,nicely narrated sir.
ReplyDeleteExcellent story.. I was there that day when Koran lost his brother
ReplyDelete