Saturday, 18 August 2018

समाजसेवकांना फसवणारे निवडणुकीचे मापदंड

जळगाव महानगर पालिकेत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्य सुरु होईल. शहर विकास आघाडी, खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे नगर पालिका व महानगर पालिकेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या नेते व त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेच्या रुपात सत्ता हाती कायम ठेवण्याचा प्रयत्न जळगावकर मतदारांनी नाकारला. जुन्यांची सत्ता नकोच असा निश्चिय केलेल्या जळगावकरांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला २/३  पेक्षा जास्त बहुमत दिले आहे. भाजपच्या या विजयाचे विश्लेषण विविध माध्यमातून करण्यात आले आहे.

Wednesday, 15 August 2018

नशिबाची वाजलेली घंटा ...

डीसीएम गाडीचा ड्रायव्हर ते अशोक लेलैण्डचा डिलर ...

मैत्रिचा गोतावळ्याच बंध कोणात कसा गुंतवून टाकेल सांगता येत नाही. अशाच एका बंधाने आज जखडून टाकले. जुने मित्र ॲड. जमिल देशपांडे यांची 'अपर्णा ॲटोमोटीव्ह' च्या उद्घाटन समारंभात भेट झाली. मला कार्यक्रमासाठी उपस्थितीचा आग्रह सौ. अपर्णा भट - कासार या आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रिणीकडून होता. श्री. किरण कासार यांनीही आवर्जून या असे व्यक्तिशः म्हटले होते. बहुधा जमिलभाई सुध्दा अशाच आग्रहातून आले असावेत ? असा अंदाज होता.