Friday, 13 July 2018

त्या १७ जणांना उमेदवारी नाकारणारे कोण ?

इतर पक्षातून आयात झालेल्या मंडळींमुळे भाजप सध्या हाऊसफुल्ल आहे. भाजप - शिवसेना युतीची हाळी देत सुरु झालेली निवडणूक आता स्वबळाच्या हातघाईवर आली आहे. युतीतील ३०/३५ जागांवरुन भाजपने थेट ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. जागा वाढल्यामुळे निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक, माजी पदाधिकारी आदींना  उमेदवारी मिळायची अपेक्षा होती. पण उमेदवार निश्चित करणाऱ्या नेत्यांनी ठरवून काहींची उमेदवारी कापली. यात सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांसह २ विद्यमान नगरसेवक, ४ मंडल अध्यक्ष, महिला आघाडी महानगर अध्यक्ष, ४ माजी पदाधिकारी यांची उमेदवारी नाकारली गेली.


जळगाव मनपा निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजपच्या युतीला हिरवा कंदिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. जलसंपदामंत्री ना. गिरीषभाऊ महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी युतीसाठी अनुकूलता दाखविली होती. आमदार सुरेश भोळे आणि ना. महाजन यांच्या शेजारील वर्तुळातील काही जणांना युती नको होती.  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनाही युती नको होती. त्यांनी पक्षश्रेष्ठींना एसएमएस पाठवून भाजपने स्वबळावर जळगाव मनपा लढवावी असे सूचविले होते. त्यांचा हा एसएमएस युतीत खोडा घालणारा ठरला.

अखेर युतीचा संदेश देणारा फोटो हा देखावा ठरला. ना. महाजन यांनीही युती होणार नाही अशी भूमिका घेतली. युती होणार आणि युती होणार नाही अशी वक्तव्ये नेत्यांनी किती दिवसात फिरवली याचा मतदान करताना विचार करायला हवा. युती केल्याचा फोटो जाहिरपणे शेअर करतात आणि नंतर युती होणार नाही, असेही जाहिरपणे सांगतात. अशा नेत्यांनी जाहिरपणे दिलेल्या इतर आश्वासनांवर विश्वास ठेवायचा कसा ? अशा नेत्यांना जळगावचा विकास करायची खरेच इच्छा आहे ?

एकीकडे युती नाकारली गेल्याने भाजप पदाधिकारी व निष्ठावंतांना आपणास उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. अर्थात, भाजपच्या अनेकांचा हिरमोड झाला. कारण चहुबाजूने इच्छुकांची आयात झाल्याने भाजपचे वसंतस्मृती कार्यालय तुडूंब भरले. पूर्वी जे पदाधिकारी या कार्यालयात निष्ठावंत म्हणून येत, तेच आता आत घुसायला अनोळखी ठरले आहेत.

इतरांसाठी पायघड्या टाकत असताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक व आजी - माजी पदाधिकाऱ्यांना उमेदवारीपासून ठरवून डावलले गेले. हा प्रकार पाहून श्री. खडसेही बोलले, 'निष्ठावंतांना डावलले जाते आहे.' मात्र त्यांच्या या वक्तव्याकडे उमेदवारी देणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. श्री. खडसे स्वतः मुक्ताईनगर नगर पंचायत निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांनी जळगाव मनपा निवडणुकीकडे लक्ष दिले नाही. असेही म्हणता येईल की, त्यांना लांब ठेवले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री. खडसे यांच्याशी संबंधित १७ जणांची उमेदवारी भाजपच्या निवड समितीने नाकारली आहे. यात विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे (रास्वसं स्वयंसेवक), सौ. जयश्री नितीन पाटील, शिवदास साळुंखे (माजी नगरसेवक), जयश्री उमेश पाटील (बोरसे) (महानगर महिला आघाडी), जितेंद्र चव्हाण (उपाध्यक्ष, युवा मोर्चा), राजेंद्र मराठे (रास्वसं घराणे), भगवान सोनवणे, किशोर वाघ व चंदन महाजन (निष्ठावंत), राहुल पाटील, राहुल रमेश वाघ, प्रदीप रोटे, सुशील हासवानी (चौघे मंडळ अध्यक्ष), प्रविण संतोष पाटील (मंडल सरचिटणीस), रिंकू चौधरी, चेतन रमेश शर्मा, प्रविण कुळकर्णी (माजी पदाधिकारी) यांचा समावेश आहे.

पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करताना नगरसेवक होण्याची संधी काही जणांना मिळत होती. मात्र आयात उमेदवारांमुळे निष्ठावंत बाजूला टाकले गेले. आता पाच वर्षे कुठेही उमेदवारीची संधी नाही. केवळ नाथाभाऊंचे समर्थक म्हणून आपल्याला बाजुला सारले हा अपमानाचा सल अनेकांना बोचतोय. आपल्या परिसरात आयारामचा प्रचार कसा करावा ? हा प्रश्न अनेकांना आहे. एक गोष्ट नक्की, भाजपत अंतर्गत धुम्मस खूप आहे. आयात उमेदवारांपेक्षा प्रभागातील योग्य उमेदवाराला पाठबळ देण्याची चर्चा अनेक जण करताना दिसतात. भाजपच्या उमेदवारांसाठी असा अंतर्गत सूरुंग त्रासाचा ठरणार हे नक्की !

शिवाजीनगर भागातील महिला आघाडी उपाध्यक्ष सना जहाँगिर खान यांचीही उमेदवारी कापली असे वरील लेख वाचून संबंधितांनी कळविले आहे.

14 comments:

 1. Jayashri patil is best nagarsevika
  Yana umedvari milayala havi hoti

  ReplyDelete
 2. प्रवीण कुलकर्णी या निष्ठावंत ला उमेदवारी नाकारणं योग्य नाही

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. महापालिका म्हटली कि आयडिया कंपनीची जाहिरात "उल्लु बनाविंग" त्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधीहि आघाडिवर असल्याचे वास्तव आहे. या सर्वांना धडा शिकवण्यासाठी सर तुमचा हा लेख जनमानसाला बळ देईल.

  ReplyDelete
 5. महापालिका म्हटली कि आयडिया कंपनीची जाहिरात "उल्लु बनाविंग" त्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधीहि आघाडिवर असल्याचे वास्तव आहे. या सर्वांना धडा शिकवण्यासाठी सर तुमचा हा लेख जनमानसाला बळ देईल.

  ReplyDelete
 6. आपका लेख पढ़कर अच्छा लगा कोई तो है जो इनको आईना बता रहा है

  ReplyDelete
 7. अभ्यासपूर्ण लेख

  ReplyDelete
 8. Jyani bjp La varti aanle tyana ��

  ReplyDelete