Wednesday, 25 July 2018

नाथाभाऊ, आम्ही तुम्हाला विसरतोय ...

आ. नाथाभाऊ नमस्कार
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचाराचे तीन दिवस उरले आहेत. प्रचाराची तुमची घणाघाती भाषणे आणि कार्यकर्त्यांविषयी असलेल्या जिव्हाळ्याची उणिव करुन देत ही निवडणूक संपते आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी तुम्ही अगोदर पासून लावून धरली. इतर नेते मंडळी शिवसेनेशी युती करण्याच्या तयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. युती होणार असा निर्णय जाहीर करीत चर्चेचा फोटोही काढून आणला. या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही दिसले नाहीत. तुम्हाला तेथे बोलावले जाणे शक्यच नव्हते. भाजप - शिवसेना युती करणार असे सांगत तो फोटो सुध्दा माध्यमांमध्ये प्रसिध्द झाला. मात्र, अवघ्या ४ दिवसांनी युती होणार नाही असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

नाथाभाऊ, या सर्व घडामोडी पाहत असताना पक्षाच्या पातळीवर तुम्हाला मात्र 'खड्यासारखे' बाजुला सारले गेले. ना युती विषयी विचारणा झाली ना स्वबळावर लढताना तुमचा सल्ला घेतला गेला. गेल्या अडीच वर्षांत तुम्हाला भाजपने पक्षांतर्गत वाळीत टाकले असल्याचे पदोपदी अनुभवास येत आहे. मनपाच्या निवडणुकीतही तुम्हाला बाजुला सारल्याचे पाहून मनोमनी दुःख झाले. पहिल्यांदा खेद झाला की, लेवा पाटील समाजात जर का जन्म घेतला असता तर समाजाची कानउघाडणी केली असती. आता समाजाच्या बाहेरचा म्हणून लिहायला मर्यादा आहेत.

कष्टकरी, मेहनती व प्रामाणिक या गुणांनी संपन्न असा लेवा पाटीदार समाज जळगाव जिल्ह्यात आहे. स्व. वाय. एस. महाजन, स्व. वाय. एम. बोरोले, स्व. मधुकरराव चौधरी, स्व. जे. टी. महाजन, वाय. जी. महाजन अशा दिग्गज नेत्यांच्या नंतर लेवा पाटील समाजाचे आजचे धडाडीचे नेते तुम्ही आहात. लेवा समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी तुम्ही वारंवार प्रयत्न केले. फेब्रुवारी २०१८ मध्ये लेवा समाज भोरपंचायतच्या माध्यमातून पाडळसे येथे तुमच्या पुढाकारात समाजाचे भव्य दिव्य अधिवेशन झाले. सर्व समाज घटकांना तुम्ही एकत्र आणले. अधिवेशनाच्या व्यासपिठावर राजकीय कोंडीची खंत व्यक्त करीत पक्षातील व जिल्ह्यातील काही छुपे लोक तुमची बदनामी करीत असल्याची भावना व्यक्त केली. अधिवेशनात व्यासपिठावर ज्यांना तुम्ही जागा दिली त्यातीलच काही मंडळी तुमचे नाव समाजातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मात्र सत्य आहे.

पाडळसेच्या अधिवेशनात तुम्ही उमविला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा ठराव केला. त्यानंतर विधी मंडळातही मागणी लावून धरली. अखेर सरकारने उमविचा नामविस्ताराचा निर्णय घेतला. यासाठी तुम्ही किती वेळा पाठपुरावा केला आहे, हे माहिती आहे. पण नामविस्ताराचे श्रेय घ्यायला अनेकजण उभे राहिले.

भाऊ, तुमच्यावर किती बेछूट आरोप झाले. कथित पीएचे लाच प्रकरण, दाऊदला कॉल प्रकरण, नेटशेडसाठी कृषी अनुदान, भोसरी भूखंड प्रकरण, जामनेर जवळचे भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा केल्याच्या तक्रारी अशी इतर प्रकरणे. तुमच्या सारख्या नेत्यावर आरोपासाठी महिलांना पुढे केले गेले. या बदनामीमागे एक मंत्री असल्याचा उल्लेख तुम्ही नेहमी करीत असतात. अर्थात, यामागील संदर्भ हा कुण्या इनामदार आडनावाच्या महिलेने केलेल्या वक्तव्यांचा आहे. तुम्ही त्या मंत्र्याचे नाव कधी घेतले नाही पण जनतेला 'बातों बातों में' तुमचा इशारा समजतो. लेवा पाटील समाजाचा नसलो तरी तुमची राजकीय कोंडी करीत लेवा पाटील नेतृत्वाला दुर्लक्षाने बाजुला सारले जात असल्याचे सहज लक्षात येते. तुम्हीच मोठ्या केलेल्या मंडळींनीच तुमची अप्रतिष्ठा केल्याचे दिसते.

जळगाव शहरातील दोन निवडणुका तुमच्या नेतृत्वात जिंकल्याचे संदर्भ माहिती आहेत. सन २००१ मध्ये भाजपचा लोकनियुक्त नगराध्यक्ष तुमच्या नेतृत्वात निवडून आला होता. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जळगावमधून भाजपचा आमदार निवडून आणायला तुम्ही रणनिती आखली होती. नाथाभाऊ, तुम्ही ज्यांना निवडून आणतात ती मंडळी नंतर तुमच्यावर उलटते हे लक्षात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष तुमच्यावर उलटले होते. आताही ज्यांच्या आमदारकीसाठी प्रतिष्ठापणाला लावली ती मंडळी तळ्यात मळ्यात करीत असतात. तुम्ही ज्यांना संघटनेत पदे दिली ते सुध्दा अलिकडे उलटले आहेत. अशी मंडळी तुमची होत नाही तर ती लेवा पाटील समाजाची कशी होईल ?

नाथाभाऊ, तुम्ही लेवा पाटील समाजाचा आभिमान आहात. तुमची कोंडी करणाऱ्या मंडळींना आज भाजपत चांगले दिवस आहेत. राजकारणातून तुमचे नाव खोडून टाकायला लेवा पाटील समाजातील काही तथाकथित पुढारी मदत करीत आहेत. मनपाच्या निवडणुकीत 'जर तुम्हाला वगळून यश मिळते आहे हे सिध्द झाले तर भविष्यात लेवा पाटील समाजाला भाजप खिजगणतीत गृहीत धरणार' ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 'काही तथाकथित मंडळींच्या पाठिमागे समाज उभा राहतो', 'आता नाथाभाऊची गरज काय?' असे प्रश्न भविष्यात उर्मटपणे विचारले जातील. अत्यंत प्रतिकूल काळात तुम्ही पक्षाच्या वाढीसाठी वणवण भटकलात. आज त्याच पक्षाने तुम्हाला वणवणछ फिरायची वेळ आणली आहे. लेवा पाटील समाजासाठी हिच धोक्याची घंटा आहे.

जळगाव मनपा निवडणुकीत भाजपला मतदान करताना लेवा पाटील समाजाचे प्रत्येक मत हे नाथाभाऊ विरोधात, नाथाभाऊच्या पक्षांतर्गत अवमानाचे समर्थन करणारे, नाथाभाऊंचा राजकीय प्रभाव संपला हे सिध्द करणारे, नाथाभाऊला वगळून सुध्दा लेवा पाटील समाज भाजपसोबत आहे असे दाखवून देणारे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नाथाभाऊंना आयुष्याच्या उंबरठ्यावर बदनाम करुन सत्ताबाह्य करणाऱ्यांचे हात बळकट करण्याच्या बाजुने कौल देणारे असेल. असे झाले तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार देताना भाऊ तुमच्या शब्दाला किंमत असणार नाही. तुमचेच  नव्हे तर लेवा पाटील समाजाचे हे नुकसान असेल.

गुरुवारी जळगावात भाजपचा मेळावा होता. प्रदेशाध्यक्ष दानवे आले नाहीत. तुम्ही व इतर मंत्री उपस्थित राहणार होते. मात्र तुम्हाला भाषण करायची संधी नको म्हणून मेळावाच रद्द केला गेला. भाऊ, तुम्ही भाजपच्या निष्ठावंत उमेदवारांना आशीर्वाद दिले आहेत. तुम्ही असेही म्हणालात, 'चांगले काम करणारे व चांगले चारित्र्य असलेल्यांना मतदारांनी निवडावे.' तुमचा एवढाच संदेश 'समझदार को इशारा काफी है'

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतन करताना आणि मनपा निवडणुकीत मतदान करताना लेवा पाटील समाजाने एक प्रश्न नेहमी स्वतःला विचारावा, मी नाथाभाऊंचे नुकसान करतोय का ? नाथाभाऊंच्या विरोधकांना बळकट करतो आहे का ? जसे पक्षाने तुम्हाला दूर सारले तसे समाजाने कमळाच्या चिन्हाला या निवडणुकीत दूर सारायला हवे.

नाथाभाऊ आपणास उद्देशून लिहिलेले हे पत्र आता थांबवतो.

धन्यवाद.

आपला,
लेवापाटील नसलेला हितचिंतक

22 comments:

 1. Bhau yana ata apli kimat kaludya..... ani tyanchi jaga pn dakhaun dya

  ReplyDelete
 2. भाऊ आहेत तो पर्यत जळगावात पक्ष आहे बस....

  ReplyDelete
 3. मा.श्री. दिलीपजी, आपण आज लिहलेले जळगाव शहराच्या दृष्टीने योग्य आहेच. पण त्याच बरोबर आदरणीय भाउंनी अवघ्या २-४ दिवसापूर्वीच मुक्ताईनगर नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली ही बाब आपल्याला विसरता येणार नाही. आदरणीय भाऊंच्या मागे आजही मुक्ताईनगर परिसरातील सर्व समाजाचे लोक प्रेमाने उभे आहेत ही चित्र खूपच दिलासादायक आणि सोबत प्रेरणादायक सुध्दा आहेच. राहिला भाऊंना जळगाव मध्ये शह देण्याचा प्रयत्न तर प्रत्येक गोष्टीच्या अंताला एक योग्य वेळ असतेच मागील २ ३ वर्षापासून चे शुक्लकाष्ट संपण्याकरीता आमच्या सारखे काही लेवा बांधव श्री गणपती पाण्यात ठेवून बसलो आहोतच आता सोबत आपल्या सारख्या हितचिंतकांची भर पडत आहे अशी कायम भर पडत राहो.. आणि भाऊंना खूपच पाठबळ आणि दीर्घायुरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...आपला नितीन कोल्हे.

  ReplyDelete
 4. Dilip ji Aapan jo lekh lihala ahes tyat purna pane satyach ahes but sir kahi vishari lok yani kiti swapna bagale tari tyancha bapane jari purn janam jari ghetala tari tyancha aaba aaji kadan ny honar....Shevati ekch sangal... Jay Namo Nath🙏🙏👍👍✌✌💯💯

  ReplyDelete
 5. माननिय, मी नाथाभाऊंचा समर्थकच आहे , परंतु साहेब मंत्री असतांना मी तीन -चार वेळा मंत्रालय व बंगल्यावर गेलो माझे सरकार दरबारी अडलेले एक काम पुर्ण होऊ शकले नाही याच मला फार दुःख झालं की एक लेवा पाटील मंत्री असून एका लेवा समाजाच्या माणसाच भलं करु शकले नाही. Sorry काही चुकल असेल तर माफ करा आदरणिय खडसे साहेब

  ReplyDelete
  Replies
  1. तुमचं काम हे वैयक्तिक होतं की सामाजिक

   Delete
 6. Sir mala tumcha lekh khup aawadal and mi kattar nathabhau samarthak ahe Nathabhauni fakt aadesh dyayla hava ki bjp la matcdeu naka ki bagha Jalgaon vatunch kai Purn jilhaytun bjp yenar nahi. Kahu chukich boalao aslo yr sorry

  ReplyDelete
 7. मि जगदीश,
  तिवारी साहेब माझा तुम्हाला मनापासून नमस्कार ज्या लोकाना नाथाभाऊ नि निवडून आनुन सत्तेच्या प्रवाहात अनले ते भाउंना झाले नाही
  है तुम्ही सर्व लेवा पाटिल च्या निदर्शनात आनुन दिले अशि आशा वाटते की आतातरी संमाज नाथाभाऊ च्या मागे ठाम पने उभे राहतील
  धन्यवाद

  ReplyDelete
 8. Bhau leva Patil kahihi jaga honar nahi
  Sarvat matlabi aani aalshi jat aahe hi
  Kiran Bhangale

  ReplyDelete
 9. फक्त नाथाभाऊ

  ReplyDelete
 10. Bhau...tumhi Rajinama dila mhanun 15 te 16 janana Lal Diva milala pn aaj tech tumchyavr uthle ahet... Mg ka Bhau... Bhau ajun evdhi matdaranchi takat aani jantecha viswas ahe tumchyajavl... Dakhun deu Ya samajkantkana... Asle lok janm denar Aai Vadilana pn Tumhi Kon He vichart astil Vatt

  ReplyDelete
 11. If we don't vote to BJP then other oppsion ?

  ReplyDelete
 12. वास्तविकता मांडणारा तंत्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण लेख

  ReplyDelete
 13. मा.तिवारींनी योग्य व्यथा मांडली आहे.मां नाथाभाऊंना लेवा समाज्याची म्हणावी तशी साथ लाभली नाही.महाराष्ट्रात बीजीपीची सत्ता आणण्यामध्ये नाथाभाऊंचेफार मोठे योगदान आहे ही गोष्ट विरोधकही नाकारत नाही.परंतु ह्याच सरकारने भाऊंना खड्यासारखे बाजूला सारले.कुणाचे वैयक्तिक काम झाले नसेल त्याला काही कारणे असू शकतील.तेवढ्या कारणाने त्यांचे महत्व कमी समजूनका भाऊंच्या पडत्या काळात समाजाने साथ द्यायलाच हवी

  ReplyDelete
  Replies
  1. ॥सैराट ॥
   लालसा पदाशी ।
   जलन उदाशी ॥
   शत्रु तो आपशी ।
   पीछा करी ॥2॥
   एक होती तो प्यारी ।
   निभाते लेते थे यारी ।
   तीनो मरती थी पूरी ।
   इच्छा धारी ॥2॥
   अनुभव की शिदोरी
   श्रद्धा और सबुरी
   सत्ता की नही लाचारी
   नाथ तो विचारी॥3॥
   -----गणाप्पा -----
   गणेश पाटील पत्रकार
   7741820171
   8999117215
   Delete
  2. ॥सैराट ॥
   लालसा पदाशी ।
   जलन उदाशी ॥
   शत्रु तो आपशी ।
   पीछा करी ॥2॥
   एक होती तो प्यारी ।
   निभाते लेते थे यारी ।
   तीनो मरती थी पूरी ।
   इच्छा धारी ॥2॥
   अनुभव की शिदोरी
   श्रद्धा और सबुरी
   सत्ता की नही लाचारी
   नाथ तो विचारी॥3॥
   -----गणाप्पा -----
   गणेश पाटील पत्रकार
   7741820171
   8999117215
   Delete
 14. ॥सैराट ॥
  लालसा पदाशी ।
  जलन उदाशी ॥
  शत्रु तो आपशी ।
  पीछा करी ॥2॥
  एक होती तो प्यारी ।
  निभाते लेते थे यारी ।
  तीनो मरती थी पूरी ।
  इच्छा धारी ॥2॥
  अनुभव की शिदोरी
  श्रद्धा और सबुरी
  सत्ता की नही लाचारी
  नाथ तो विचारी॥3॥
  -----गणाप्पा -----
  गणेश पाटील पत्रकार
  7741820171
  8999117215  ॥सैराट ॥
  लालसा पदाशी ।
  जलन उदाशी ॥
  शत्रु तो आपशी ।
  पीछा करी ॥2॥
  एक होती तो प्यारी ।
  निभाते लेते थे यारी ।
  तीनो मरती थी पूरी ।
  इच्छा धारी ॥2॥
  अनुभव की शिदोरी
  श्रद्धा और सबुरी
  सत्ता की नही लाचारी
  नाथ तो विचारी॥3॥
  -----गणाप्पा -----
  गणेश पाटील पत्रकार
  7741820171
  8999117215

  ReplyDelete
 15. सर, नाथाभाऊंच्या मतदार संघात लेवा पाटीदारांची संख्या खूपच कमी, तरी पण ते 30 वर्षांपासून नुवडून येत आहे, याचाच अर्थ ते येथे काम करताय म्हणूनाच ना, नाथाभाऊ हे एक सर्व समावेशक नेतृत्व आहे म्हणूनच ना, नाथाभाऊनी कित्येकांना मोठे केलेले आम्ही पाहिले आहे आणि तेही त्यांचा समाज कोणता हे न विचारता हेच सत्य आहे, म्हूणून साहजिकच समाजाची नाराजी असू शकते

  ReplyDelete