जळगाव मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला आठवडा संपला असून प्रचार दुसऱ्या आठवड्यात पोहचला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ आणि काँग्रेसने १७ उमेदवार दिले आहेत. जळगाव शहरात निवासी असलेल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपापल्या घरातून प्रभागात उमेदवार द्यावेत, असे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार सांगून गेले होते. पण, काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमात व्यासपिठावर गर्दी करणाऱ्या नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून दिसत नाहीत. खासदारकी व आमदारकीचे संभावित उमेदवार असणाऱ्या नेत्यांच्या निवासी भागातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिडात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी हवा भरली आहे. देवकर हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून आमदारकीची तयारी करीत आहेत. त्यामुळे ते जळगाव शहरातील प्रस्थापित विरोधक आणि जुन्या मित्रांशी फारसा वाईटपणा घेण्याच्या स्थितीत नाहीत. याचे कारण जळगाव ग्रामीण मतदार संघात त्यांना अशा जुन्या मित्रांची मदत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर प्रमुखच शिवसेनावासी झाल्याने देवकरांवर नेतृत्वाची धुरा आली आहे.
एकीकडे भाजप शत प्रतिशत जागा जिंकायचा दावा करीत आहे. दुसरीकडे शिवसेना महापौर आमचाच होणार असे म्हणत आहे. म्हणजेच या दोन्ही पक्षांना सत्ता मिळवायची उमेद आहे. पण ४२ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हाजी गफार मलिक म्हणाले, 'आम्ही किंग मेकर असू.' देवकर म्हणाले, 'महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल.' मलिक व देवकर यांच्या वक्तव्यांचा थेट अर्थ असा की, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळणार नाही. महापौरही होणार नाही. म्हणजेच २/३ नगरसेवक निवडून आलेच तर ते महापौर निवडणुकीत भाजप किंवा शिवसेनेसोबत तळ्यात - मळ्यात करतील.
जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची स्थिती बिकट आहे. अनेक बुजूर्ग मंडळी जळगावात निवासी आहेत. पण त्यांना जनाधार नाही. पक्षाचे नेते असलेल्या पवार कुटुंबियांपैकी कोणी जळगावात आले तर त्यांच्या भोवती मुंगळ्यागत अनेक गोळा होतात. पण निवडणुकीच्या मैदानात विरोधकांशी चार हात करण्याची स्थिती कोणाचीही नाही. सहकार क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः काढता पाय घेतला आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता, जळगाव महानगर पालिका निवडणुकीत भाजपला विरोध असलेल्या मतदारांनी शहाणपणाचा विचार करीत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला मतदान करण्याचा विचार सोडून द्यायला हवा. याचे पहिले कारण, आमचा महापौर होत नाही, हे मलिक व देवकर स्वतःच म्हणत आहेत. दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, जर भाजपलाच धडा शिकवायचा असेल तर त्यांच्या जास्तीत जास्त उमेदवारांचा पराभव हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजप समोरील पर्यायी व प्रबळ पक्षाच्या उमेदवारांना मत देण्यात शहाणपण आहे.
भाजप सोबत सत्तेत राहून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा एकमेव पक्ष शिवसेना आहे. भाजपच्या सत्ताप्राप्तीचा मग्रुर होणारा अहंकार जर मोडायचा असेल तर जळगाव शहरातील भाजप विरोधी मतदारांनी प्रबळ विरोधकाला मत देण्याचा पर्याय स्वीकारायला हवा. शेवटी शत्रूच्या प्रबळ शत्रूला पाठबळ देणेच शहाणपणाचे असते.
शिवरायांच्या युध्द नीतीतील गनिमीकावा सुध्दा असाच आहे. कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. शिवरायांकडे तेव्हा आरमार नव्हते. ते शिवरायांनी तयार केले. जेव्हा औरंगजेब दिल्लीत व्यस्त होता आणि आदिलशहा मरण पावला होता तेव्हा शिवरायांनी कोकण मोहिम फत्ते केली. ही मोहिम फत्ते करताना पोर्तुगिजांच्या आरमाराशी तह केला. हेच ते पोर्तुगिज होते ज्यांनी शिवरायांना आरमार तयार करायला मदत केली नव्हती. अशीच रणनीती जळगाव महानगर पालिका निवडणुकीत भाजप विरोधकांनी स्वीकारायला हवी.

No comments:
Post a Comment