Thursday, 12 July 2018

संघ संस्काराचे उमेदवार किती ?

निष्ठावानों के हाथ चने
घुसपैठी खाएँ अंगूर ...
बागवान को फेका बाहर
मौजा कर रहे लंगूर ...
हाफ से पुरी चठ्ठी ढके है
वो अधनंगा तन बदन ...
संस्कारों की करे ऐसीतैसी
मजे लुटे वो मस्त मदन ...

अखेर पार्टी वुईथ डिफरन्स भाजपने १९ प्रभागातील ७५ उमेदवारांची यादी जाहीर केली. ही यादी सोशल मीडियात आली तेव्हा इंदूरहून ट्रैव्हल्सने परतीच्या प्रवासात होतो. उमेदवारांची यादी किमान १० वेळा वाचली. जळगाव शहरातील गल्लीबोळात संघ परिवाराचे अनेक स्वयंसेवक मित्र आहेत. त्यापैकी कोणी यादीत दिसतोय का ? याचा शोध घेत होतो. हा शोध घेता घेता १० तासांचा प्रवास संपला.

आज सकाळी पुन्हा यादी समोर घेऊन संघ परिवारातील जुने कोणी आहे का ? हे शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा धक्का बसला. संघाचा गणवेश घालणारा व अभ्यास करुन सभागृहात बोलणारा स्वयंसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचेही नाव यादीत नव्हते. गेले काही दिवस उमेदवारीसाठी उड्या मारणाऱ्या अजून एका मित्राचे नाव नव्हते. भाजपला ७५ उमेदवार मिळतात आणि त्यात संघ परिवारातील २/४ जण सुध्दा नाहीत याचा धक्का बसला. संघ परिवारात तरुण मंडळी घडविली जात नसावी का ? असा बाळबोध प्रश्नही पडला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रशिक्षणार्थीही नसावेत ? याचेही आश्चर्य वाटले.

नंतर मात्र लक्षात आले की, 'हरेक माल एकाना' करीत करीत भाजपत जे जे घुसले त्यांनी पक्षाची जत्रा करुन टाकली. जत्रेच्या या गर्दीत 'कवायतवाल्या एखाद दुसऱ्या स्वयंसेवकाला' जागा नसते, हे मला उशिरा उमगले. मी काही संघी मित्रांशी बोललो. तेव्हा ते म्हणाले, 'परिवाराचे पदाधिकारी अशा निवडीतून दूर असतात. पण दोघा तिघांना उमेदवारी हवी होती.' भाजपचे काही निष्ठावंत आणि संघ परिवारातील २/४ इच्छूक नाराज आहे. उघडपणे बैठक होणार नाही. पण पृथ्वीराज सोनवणेच्या प्रचारात संघाचे काही स्वयंसेवक उतरतील, हा माझा दावा आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी तसे केले नाही तर चड्डी पूर्ण करुनही सोनवणेंचे पाय खुलेच राहिले असे इतर बोलतील. संघ स्वयंसेवकाला डावलण्याचे कार्य आमदार तथा महानगर प्रमुखाचे आहे. या मागील कारण असे की, संघ संस्कार असलेल्या सोनवणे यांनी दारु दुकानांच्या ठरावाला विरोध दर्शवला होता.

भाजपत आता स्थिरस्थावर झाली आहे. बहुधा योगायोगाने भाजपला बहुमत मिळेल सुध्दा. पण रात्रीतून भरती केलेले हे पदाधिकारी सोयीने संघाचा टीळा कपाळी लावण्याची चलाखी करणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण अशा घुसखोरांना कधी विचारले की, संघाची प्रार्थना काय आहे ? तर ते 'वंदे मातरम्' म्हणतात. तेव्हा गांधीही खुद्कन हसत असतील. नाही तरी भाजपतील स्थिती सध्या वर उल्लेखलेल्या कवितेनुसार आहे ...

बागवान को ढकेले बाहर
मौजा कर रहे लंगूर ...

1 comment:

  1. कॉंग्रेसने मात्र धनबल,बाहूबल,जातिबल नाकारून फाटक्या पण निष्ठावंंतांंना प्रतिकुल परिस्तिथीतही उमेदवारी दिलीय.
    सत्तेत आल्यावर तत्वे,नैतिकता सर्वच बासनात गुंडालतात याची प्रचिती भाजपाने दिलीय.

    ReplyDelete