Monday, 30 July 2018

प्रचाराला रिवाईंड करु या !

जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला. निवडणूक रिंगणात असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांचा एकही स्टार प्रचारक शहरात आला नाही. हे या निवडणूक प्रचाराचे पहिले वैशिष्ट्य. प्रचारात स्थानिक नेत्यांनी गल्लीबोळात फिरुन पक्षाच्या उमेदवारांना वियजी करा असे आवाहन केले. यात भाजपतर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन, रमेश जैन, नितीन लढ्ढा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. राधेशाम चौधरी यांनी सहभाग दिला. रिपब्लिकन पक्षाचे अनिल अडकमोल व राजु मोरे हे शिवसेनेसोबत आहेत. स्थानिक नेत्यांनी प्रचारासाठी घेतलेली मेहनत हे प्रचाराचे दुसरे वैशिष्ट्य ठरले.

Sunday, 29 July 2018

नाथाभाऊंच्या बनावट अॉडिओ क्लिपचे गौडबंगाल...

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला आजचा (दि. ३०) एकच दिवस शिल्लक आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सोशल मीडियात अजब फंडा  वापरण्यात आला आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजाची नक्कल करून, ‘भाजपला मतदान करा’ असे आवाहन करणारी बनावट ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या बनावट क्लिपविषयी माहिती मिळाल्याने स्वत: नाथाभाऊ व्यथित झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून या गंभीर प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. नाथाभाऊंच्या नावाने भाजपला मतदान हवे, पण नाथाभाऊ भाजपत नको, असा कुटील डाव सध्या खेळला जात असल्याचे यातून उघड झाले आहे. म्हणून अशी क्लिप कोणी तयार केली असावी यामागील गौडबंगाल वाढले आहे.

Saturday, 28 July 2018

नाथाभाऊंनी केली अशीही पोलखोल !



जळगाव मनपा निवडणूक प्रचाराचे अखेरचे दोन दिवस आहेत. प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांनी फारशी गाजलेली नाही. भाजपकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा होणार आहे. शिवसेनेकडून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्या सभा सुरु होत आहेत. इतरांच्या सभा फारशा लक्षात येणाऱ्या नाहीत.

Wednesday, 25 July 2018

नाथाभाऊ, आम्ही तुम्हाला विसरतोय ...

आ. नाथाभाऊ नमस्कार
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचाराचे तीन दिवस उरले आहेत. प्रचाराची तुमची घणाघाती भाषणे आणि कार्यकर्त्यांविषयी असलेल्या जिव्हाळ्याची उणिव करुन देत ही निवडणूक संपते आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी तुम्ही अगोदर पासून लावून धरली. इतर नेते मंडळी शिवसेनेशी युती करण्याच्या तयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. युती होणार असा निर्णय जाहीर करीत चर्चेचा फोटोही काढून आणला. या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही दिसले नाहीत. तुम्हाला तेथे बोलावले जाणे शक्यच नव्हते. भाजप - शिवसेना युती करणार असे सांगत तो फोटो सुध्दा माध्यमांमध्ये प्रसिध्द झाला. मात्र, अवघ्या ४ दिवसांनी युती होणार नाही असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

Tuesday, 24 July 2018

जळगाव होईल का मराठा आंदोलनाचे कुरुक्षेत्र ?

जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाने राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंढरपूर येथे आषाढीच्या शासकिय महापुजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचे काय ? असा प्रश्न विचारुन महापूजेसाठी मज्जाव केला गेला. अखेर फडणवीस यांनी पंढरपुरात येण्याचे टाळले. पण तसा निर्णय का घेतला हे माध्यमांना सांगत असताना मराठा आंदोलनाच्या कथित कृत्यांची वाच्यता फडणवीस यांनी केली. या वक्तव्यांनी मराठे भडकणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असताना मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी कायगाव टोका (जि. औरंगाबाद) येथे काकासाहेब शिंदे या २८ वर्षाच्या मुलाने पुलावरुन गोदावरीत उडी मारुन देहाचे जलार्पण केले. आता त्याचे पडसाद म्हणून महाराष्ट्र बंदचे लोण उसळले आहे.

Sunday, 22 July 2018

शिवरायांचा गनिमीकावा काय शिकवतो ... ?

जळगाव मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला आठवडा संपला असून प्रचार दुसऱ्या आठवड्यात पोहचला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ आणि काँग्रेसने १७ उमेदवार दिले आहेत. जळगाव शहरात निवासी असलेल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपापल्या घरातून प्रभागात उमेदवार द्यावेत, असे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार सांगून गेले होते. पण, काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमात व्यासपिठावर गर्दी करणाऱ्या नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून दिसत नाहीत. खासदारकी व आमदारकीचे संभावित उमेदवार असणाऱ्या नेत्यांच्या निवासी भागातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही.

Saturday, 21 July 2018

मुस्लिम मतदारांचा कौल सुरेशदादांकडे ?

जळगाव महानगर पालिका निवडणूक प्रचाराची रंगत वाढते आहे. राज्यात सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करताना मराठा आणि ब्राह्मण समाजाला डावलल्याचे दिसते आहे. जळगाव शहरातील किमान सहा प्रभागात विजयाचे निर्णय फिरवू शकणाऱ्या मुस्लिम बहुल प्रभागात कौल कोणाच्या बाजुने जाईल ही उत्सुकता आहे. मुस्लिम समाज हा स्थानिक व प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास दर्शवतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे.

Thursday, 19 July 2018

गल्लीच्या निवडणुकीत मोदी, फडणविस यांची आश्वासने !

जळगाव महानगर पालिकेची निवडणूक रंगात आली आहे. केंद्र व राज्यात सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला मनपात सत्ता हवी आहे. येन केन प्रकारे सत्ता मिळवायला आश्वासने दिली जात आहेत. ही आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे छायाचित्र असलेल्या जाहिरातीतून दिली जात आहे. निवडणूक जळगाव मनपाच्या ७५ प्रभागांची व गल्लीबोळातील आहेत.

Wednesday, 18 July 2018

ब्रह्मवृंदही निवडणुकीतून बाद !

जळगाव मनपाच्या निवडणुकीतून मराठा समाज कसा बाजुला ढकलला केला याचे सविस्तर विवेचन कालच्या ब्लॉगमध्ये केले. याविषयी अनेकांनी मोबाइलवर संपर्क करुन समाजाच्या पुढाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घातल्याचा उल्लेख केला. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक या संस्थेत दोन गटांचे टोकाचे मतभेद सुरु झाले आणि मराठा नेत्यांचे खच्चीकरण झाले, असेही एका मित्राने लक्षात आणून दिले. संघटन नेत्यांच्या हेव्या दाव्यात विभागले आणि सत्तेतील सामाजिक मक्तेदारी संपुष्टात येत गेली, याचेच हे उदाहरण.

Tuesday, 17 July 2018

मराठा वर्चस्व संपवणारी निवडणूक

जळगाव महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांनी अगदी सोयीने आणि ठरवून आपापल्या उमेदवारांची निवड केली आहे. उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पक्षात स्वागतासाठी पायघड्या घातल्या गेल्या. यात मराठा म्हणून कोणीही दिसले नाही. मतदारांची गठ्ठा संख्या लक्षात घेऊन प्रभागातील उमेदवारांची निवड झाली आहे. पैनल प्रमुखांच्या भोवतीचे चेहरे नीटपणे बघितले की, प्रभागातील चौघा उमेदवारांच्या जात व समाज निहाय मतांच्या समिकरणाची माहिती होते. या समिकरणाचे अंतिम उत्तर काय असेल ? हे पडताळून पाहिले की, लक्षात येते या निवडणुकीतून मराठा समाजाच्या नेतृत्वाचा चेहरा हरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व  वगळले तर इतर पक्षांमध्ये मराठा नेतृत्व म्हणून चेहराच नाही. जळगाव शहरात मराठा मतदारांची संख्या जवळपास ७० हजार आहे. मराठा क्रांति मोर्चाला याच शहरात लाखावर गर्दी झाली होती.

Sunday, 15 July 2018

सारेच उडीदामाजी काळे गोरे ... !

२५ कोटींच्या कामांसाठी एकत्र आलेले प्रशासन व पुढारी
जळगाव महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या ५/६ दिवसात लेखन करताना 'आयाराम गयाराम' या विषयावर कठोरपणे लिहिले. भाजपतील निष्ठावंतांना उमेदवारी पासून कसे लांब ठेवले गेले हे ही लिहिले. जळगाव शहराशी संबंधित विकास योजनांकडे आजी - माजी मंत्री यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील नगर विकास विभागाने कसे दुर्लक्ष केले याचाही उहापोह केला. याचा दुसरा अर्थ असा नाही की, मनपात सत्तेत असलेल्या खान्देश विकास आघाडीचा कारभार हा 'अॉल इज वेल' होता.

Saturday, 14 July 2018

मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षाने जळगावच्या योजना बासनात !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकास योजनांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्यामुळे आज मनपा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपची पाटी कोरीच्या कोरी आहे. एकीकडे फडणवीस यांनी स्वतः दिलेले २५ कोटी रुपये भाजपमधील स्थानिक नेत्यांमधील वादविवादाने खर्च झाले नाहीत. दुसरीकडे फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या अमृत पाणी योजना व अमृत भुयारी गटार योजनांबाबत सचिवस्तरावर आडमुठी भूमिका घेतली गेली. या दोन्ही योजनांमध्ये मंत्रालयात खुट्या मारणाऱ्या सचिवांना कधीही फडणवीससह ना. गिरीषभाऊ महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा धाक वाटला नाही. फडणवीस यांनी असाच दुर्लक्ष केलेला मुद्दा आहे, मनपा मालकीच्या २२०० गाळे भाडे कराराचा. गेले २ वर्ष हा विषय घेऊन स्थानिक आमदार व व्यापारी फडणवीस यांचे समोर गेले. मात्र तेथून आश्वासनाशिवाय कृतीचा काहीही दिलासा मिळाला नाही.

Friday, 13 July 2018

त्या १७ जणांना उमेदवारी नाकारणारे कोण ?

इतर पक्षातून आयात झालेल्या मंडळींमुळे भाजप सध्या हाऊसफुल्ल आहे. भाजप - शिवसेना युतीची हाळी देत सुरु झालेली निवडणूक आता स्वबळाच्या हातघाईवर आली आहे. युतीतील ३०/३५ जागांवरुन भाजपने थेट ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. जागा वाढल्यामुळे निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक, माजी पदाधिकारी आदींना  उमेदवारी मिळायची अपेक्षा होती. पण उमेदवार निश्चित करणाऱ्या नेत्यांनी ठरवून काहींची उमेदवारी कापली. यात सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांसह २ विद्यमान नगरसेवक, ४ मंडल अध्यक्ष, महिला आघाडी महानगर अध्यक्ष, ४ माजी पदाधिकारी यांची उमेदवारी नाकारली गेली.

Thursday, 12 July 2018

संघ संस्काराचे उमेदवार किती ?

निष्ठावानों के हाथ चने
घुसपैठी खाएँ अंगूर ...
बागवान को फेका बाहर
मौजा कर रहे लंगूर ...
हाफ से पुरी चठ्ठी ढके है
वो अधनंगा तन बदन ...
संस्कारों की करे ऐसीतैसी
मजे लुटे वो मस्त मदन ...

Wednesday, 11 July 2018

दलबदलुंना दारातून परत पाठवा !

जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा पोळा शेवटी फुटला. पोळा हा शब्द येथे उदाहरण म्हणून आहे, तुलनात्मक नाही याचे अगोदर स्पष्टीकरण देतो. बैल आणि माणसांची तर मुळीच तुलना होऊ शकत नाही. मनपा निवडणुकीत जे घडले व घडते आहे ते पाहून बैल पोळ्याची आठवण झाली. पोळ्याच्या दिवशी बैलांविषयी दोनच गोष्टी मालक किंवा गडीच्या हातून घडतात. पहिली म्हणजे, पळवून किंवा मिरवणुकीने ओळखी पाळखीच्या दारी बैलाला नेले जाते. तेथे पूजा करुन पुरणपोळी खाऊ घालतात. 'इच्छा असो वा नसो' बिच्चारा बैल पोळी खात असतो. दुसरी घडणारी गोष्ट म्हणजे, एखाद्या चौकात ग्रामदैवताच्या मंदिराजवळ १०१,२०१ रुपये बक्षीसाचे नारळ दोराला बांधलेले असते. बैलाच्या मागून धावत येणारे मालक वा गडी उडी मारुन ते नारळ तोडतात. जो बैल मालक किंवा गडी नारळ तोडतो, तो बक्षीसाचा मानकरी ठरतो.