Saturday, 16 June 2018

राहुल गांधींना समज आहे ?

काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अपरिपक्व हरकती किंवा संवादाचे अनेक किस्से चर्चेत आहेत. यु ट्यूबवर राहुल यांच्याशी संबंधित अशा विषयावरील अनेक व्हीडीओ क्लिप पाहता येतात. तरीही एक युवा नेता म्हणून राहुल यांच्याकडे मी पाहतो.


वाकडी (ता. जामनेर, जि. जळगाव, महाराष्ट्र) येथे दि. १० जून २०१८ ला सकाळी १० वाजता तीन अल्पवयिन मुलांना (कायद्याच्या भाषेत १८ वर्षांपेक्षा वय कमी असलेल्या) भटक्या विमुक्त जमातीतील दोन जणांनी नग्नावस्थेत मारहाण केली. या घटनेचा व्हीडीओ मारहाण करणाऱ्यांनी व्हायरल केला आहे. तोच व्हीडीओ त्या घटनेचा पुरावा म्हणून संपूर्ण भारतात फिरतो आहे.

वाकडी येथील या दुर्दैवी घटनेतील ही तीनही मुले कायद्याच्या अल्पवयिन या व्याख्येत बसतात. त्यामुळे आरोपींच्या विरोधात पहुर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पॉस्को ॲक्ट (The Protection of Children from Sexual Offences Act (POCSO Act) 2012) आणि आयटी ॲक्ट (The Information Technology Act, 2000, Also known as ITA-2000 , or the IT Act ) ची कलमे लावली आहेत.

पॉस्को ॲक्टमध्ये अल्पवयिन मुलांचा लैंगिक अथवा अश्लिल पध्दतीने छळ करण्यासाठी शिक्षेची तरतुद आहे. तर आयटी ॲक्टमध्ये अल्पवयिन मुलांची नग्न छायाचित्रे अथवा व्हीडीओ त्यांची परवानगी न घेता इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर माध्यमात प्रसिध्द करायला बंदी आहे. याविषयी कलम ६६ इ आहे.

(66E Publishing private images of others If a person captures, transmits or publishes images of a person's private parts without his/her consent or knowledge. Imprisonment up to three years, or/and with fine up to ₹ 200,000)

या शिवाय अशा प्रकारची माहिती फॉर्वर्ड करायला प्रतिबंध घालणारे कलम ६७ आहे.

(67 Publishing information which is obscene in electronic form. If a person publishes or transmits or causes to be published in the electronic form, any material which is lascivious or appeals to the prurient interest or if its effect is such as to tend to deprave and corrupt persons who are likely, having regard to all relevant circumstances, to read, see or hear the matter contained or embodied in it. Imprisonment up to five years, or/and with fine up to ₹ 1,000,000)

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाकडी प्रकरणातील अल्पवयिन ३ पीडितांपैकी  १ अनुसूचित जमातीचा आणि २ अनुसूचित जातीचे आहेत. त्यांना मारहाण करणारे प्रल्हाद लोहार व इश्वर चांदणे हे दोघे भटक्या विमुक्त जमातीचे आहेत. ही बाब जळगाव पोलिसांनी स्वतःच प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.

वाकडी प्रकरणाचा टीकात्मक प्रसिध्दीचा लाभ सर्व प्रथम काँग्रेसने उचलला. अगदी राहुल गांधीपासून व्हाया अशोक चव्हाण अशा नेत्यांनी आदेश देवून वाकडीत काँग्रेसी मंडळी पोहचली. आता काँग्रेस पीडितांना संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा टीकात्मक मसाला जळगावातील काँग्रेसींनी अखिल भारतीय अध्यक्ष राहुल गांधींना पोहचवला आहे. सोशल मीडियात ट्विटरचा वेगवान वापर करणाऱ्या राहुल यांनी वाकडी विषयी आपल्या अधिकृत अकाऊंटवर ट्विट केले आहे.

राहुल गांधी १० ओळींच्या ट्विटमध्ये पहिला शोध लावतात, महाराष्ट्र के इन दलित बच्चो का अपराध इतना था कि ये एक "सवर्ण" कुएं में नहा रहे थे l

 https://twitter.com/RahulGandhi/status/1007519009158332416?s=19

आता गंमत ही आहे की विहिर ही कधी पासून वर्णवादी झाली ? सवर्ण विहिर व मागासवर्ण विहिर असा कुठे प्रकार आहे का ? राहुल यांच्या याच "समज" चा प्रश्न पडतो.  बहुधा राहुल यांना म्हणायचे आहे, विहिर सवर्णाची आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की विहिर तर भटक्या विमुक्त जमातीच्या शेतमालकाची आहे.

राहुल यांना किती समज आहे ? हा प्रश्न अजुन दुसऱ्यांदा पडतो. कारण राहुल यांनी ट्विटरवर पीडितांचा तो व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओचा वापर त्यांनी आरएसएस, बीजेपी व मनुवाद यासाठी केला आहे. वाकडी घटनेतील पीडित मुलांचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांच्या नग्नावस्थेतील व्हीडीओ  मुलांच्या परवानगी विना शेअर करणे, पुढे पाठवणे हा सुध्दा अपराध आहे. राहुल यांनी केलेले खोटारडे ट्विट व शेअर केलेला व्हीडीओ यातून त्यांची समज किती हा प्रश्न कायम राहतो.

पोलिसांनी गुन्ह्याची प्रेसनोट देताना पीडित वआरोपींची जात का प्रसिध्द केली याचे उत्तर राहुल यांचे ट्विट व काँग्रेसने मुद्दा उचलायची केलेली घाई यातून दिसते.

5 comments:

 1. rahul gandhi shared that VDO....
  kya rahul pe PASCO under case register hona chahiye?

  ReplyDelete
 2. सर आपले लिखाण नेहमी वास्तवा ला धरून सत्य असते नाहीतर खमंग लोकप्रियते साठी काही पत्रकार व मीडिया वास्तुस्थिला सोडून काहीतरी मालमसाला लावून खळबळ माजवणे तसाच प्रकार वाकडीचा झाला मी आपले लेख नेहमी वाचतो व फॉरवर्ड पण करतो सलाम आपल्या लेखणीला व आपल्याला

  ReplyDelete
 3. सर आपले लिखाण नेहमी वास्तवा ला धरून सत्य असते नाहीतर खमंग लोकप्रियते साठी काही पत्रकार व मीडिया वास्तुस्थिला सोडून काहीतरी मालमसाला लावून खळबळ माजवणे तसाच प्रकार वाकडीचा झाला मी आपले लेख नेहमी वाचतो व फॉरवर्ड पण करतो सलाम आपल्या लेखणीला व आपल्याला

  ReplyDelete
 4. राहुल नेमका कोणत्या शाळेत शिकला ? त्याचे शिक्षक व मित्र ? याचा शोध घ्यायला हवा.

  ReplyDelete