Monday, 28 May 2018

राझी चित्रपटाच्या निमित्ताने ...

१९७१ मधील युद्धाचा रंजक, रोमांचक आणि उत्कंठा वाढविणारा इतिहास
पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझी
मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला आणि नौदलातील वरिष्ठ निवृत्त अधिकारी लेफनन्ट कमांडर हरिन्दर सिक्का यांच्या कॉलिंग सेहमतया पुस्तकावर आधारित आणि अभिनेत्री आलिया भट हिची मध्यवर्ती भूमिका असलेला "राझी" (मराठीत अर्थ एखादे काम करण्यासाठी राजी होणे)  चित्रपट बघितला. बघितला हा शब्द गुळमुळीत वाटतो. चित्रपट अनुभवला असेच म्हणायला हवे. 

Saturday, 19 May 2018

स्फटिकासम मित्र हा !

जळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ तथा माझे मित्र सुशील अत्रे यांचा आज वाढदिवस. त्यांचे अभीष्टचिंतन करीत असताना त्यांच्याशी असलेली माझी मैत्री उलगडून दाखविणाऱ्या माझ्या भावना मी त्यांचे तिसरे पुस्तक ‘देवळे राऊळे’ यात व्यक्त केल्या आहेत. समाजातील काही मान्यवरांशी आपली मैत्री असावी असे आपणास वाटत असते. सुशीलभाऊ माझ्यासाठी अशा मान्यवरात अव्वल आहेत.

Tuesday, 15 May 2018

गब्बर के ताप से कौन बचा सकता है ?

जळगाव महानगर पालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील सुमारे २,३०० दुकानदार व त्यांच्यावर अवलंबून असलेली ६/७ हजार कुटुंबे आज व्यापार, व्यवसायाच्या अस्थैर्यामुळे चिंतीत आहेत. शांत आणि संपन्न बाजारपेठ ही सुखी व समाधानी समाज जीवनाचा अविभाज्य अंग असते. व्यापार, व्यवसायात अस्वस्थता असेल तर समाजमनाचा एक कप्पा अंतर्गत धुसमुसत असतो. हा अनुभव सध्या जळगावातील 'ते' २,३०० दुकानदार घेत आहेत. व्यापारी संकुलातील गाळ्यांचे जवळपास ५ वर्षांचे थकलेले भाडे आणि थकलेले इतर कर याचे ओझे डोक्यावर असलेल्या दुकानदारांना आपले काय होणार ? या चिंतेने ग्रासले आहे. कोणत्याही दुकानदाराचा गाळे भोगवटादार म्हाणून हक्क हिरावला जाऊ नये व त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही बहुतांश जळगावकरांची इच्छा आहे.

Sunday, 13 May 2018

नाथाभाऊ, नकाच होऊ मंत्री !

स्वकीयांनी उपेक्षा केलेल्या दोन 'हेवीवेट' नेत्यांबाबत योगायोगाच्या गोष्टी अलिकडे घडल्या आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरुन कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना जवळपास अडीच वर्षानंतर जामीन मिळाला. भुजबळ मूळ खटल्यातून निर्दोष सुटलेले नाहीत. भुजबळ जामीनावर बाहेर आलेत यावर ज्येष्ठनेते शरद पवार यांची सूचक प्रतिक्रिया आहे. पवार म्हणाले, 'भुजबळ बाहेर आल्याचा आनंद आहे पण जेव्हा मूळ खटल्यातून ते निर्दोष बाहेर येतील तेव्हा मला हर्षवायू होईल.' पवार यांचे हे सूचक वाक्य खटला अजून निकाली निघाला नाही याची जाणीव करुन देतो. 'ईडी' च्या चौकशी फेऱ्यात अडकल्यानंतर पक्षश्रेष्ठी व स्वकीयांनी भुजबळांची फारशी पाठराखण केल्याचे दिसलेले नाही.