पुनीत शर्मा यांची नवी कादंबरी
कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे केलेल्या खुनाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेत जम्मू-काश्मिरमधील समाज जिवनाचे काळेकुट्ट प्रतिबिंब उमटले आहे. मुस्लिम-हिंदू समाजातील वर्चस्वाचा वाद, दुसऱ्या समाजाला घाबरवण्यासाठी केलेला गुन्हेगारी कट, गुन्हेगारांना पोलिसांची मदत आणि गुन्हेगारांना संरक्षणासाठी निर्माण केलेले जनमत असे ठळक विषय कठुआ घटनेत समोर येतात. याच पार्श्वभूमीवर जळगावचे लेखक पुनीत शर्मा यांनी 'हाफ विडो' ही काश्मिरात घडणाऱ्या काल्पनिक कथाबिजावर आधारलेली कादंबरी मला वेगळी वाटते. अर्थात, कठुआ प्रकरण घडण्यापूर्वी ही कादंबरी मी वाचली आहे. पुनीत शर्मा यांची ही दुसरी साहित्यकृती. यापूर्वी त्यांचे 'एनिमी ईन मी' हे स्वयंशोधाचे समुपदेशनात्मक पुस्तक बाजारात आले आहे.
पुनीत शर्मा यांच्या कादंबरीचे कथाबीज काश्मिर भेटीतील भटकंती, निरीक्षण आणि वास्तव यावर आधारित आहे. भारतीय सैन्यस्थळासमोर पतीच्या शोधासाठी एक महिला बसलेली असते आणि तिच्या हातात 'हाफ विडो' हा फलक असतो. हा फलक कशासाठी ? या प्रश्नामागील वास्तव जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कादंबरीचा प्रवास सुरु होतो.
या ठिकाणी काश्मिरातील शेकडो महिलांचे आयुष्य 'हाफ विडो' या चार शद्बांच्या स्थितीत सामावले आहे, हे अगोदर समजून घ्यावे. सैन्यदलाने संशयावरुन ताब्यात घेतलेला पती जोपर्यंत मृत झाल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पत्नी ही 'हाफ विडो' या स्थितीत असते. शोधाचा अनिश्चित कालावधी आणि मानसिक त्रास ती सहन करते. ती स्वतःला विधवाही म्हणू शकत नाही आणि दुसरे लग्न सुध्दा करु शकत नाही. कादंबरीची गुंफण याच समस्येवर आहे.
'हाफ विडो' ही कहाणी आहे सर्वसाधारण स्थितीतील पत्नी बेनजीर आणि पती आफराज यांची. बेनजीरला नजर अधू होण्याचा आजार आहे. आफराज हा नावाडी आहे. समोर आहे त्या परिस्थितीवर मात करीत दोघेही जगत आहेत. या दरम्यान काश्मिरातील रोजच्या जगण्याचे व ताण तणावाचे प्रसंग आहेत. दहशतवाद्यांचा वावर आहे. सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांची हजेरी आहे. वेळी अवेळी होणारी संचारबंदी आहे. कादंबरीत धोक्याचे वळण येते ते दहशतवादी फरहाद मलिकच्या प्रवेशाने. हा मलिक आफराजला थोडे जास्त पैसे देऊन दर्गात स्फोटके ठेवण्यासाठी वापरायचा प्रयत्न करतो. त्याच्या या हेतू व कृत्यापासून अनभिज्ञ असलेला आफराज सैन्यदलाच्या तावडीत संशयित म्हणून सापडतो. सैन्यदलातील अधिकारी सिद्धांत, वीरप्रताप व बलदेव ही पात्रेही येतात. सैन्यदलाने आफराजला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा ठावठिकाणा बेनजीरला लागत नाही. पतीच्या शोधासाठी तिची भटकंती सुरु होते. याचे प्रत्ययकारी वर्णन पुनीत शर्मा यांनी केले आहे. परिस्थितीमुळे दहशतवाद्यांच्या मोहात फसलेल्या आफराजचे काय होणार व बेनजीरचा शोध कधी संपणार ? या प्रश्नाच्या उत्तरात कादंबरी पुढे सरकत जाते. शेवट हा रंजक आहे. 'सर्जिकल स्ट्राईक' या कारवाईचा प्रसंग खुबीने वापरला आहे. कादंबरीतील अनपेक्षित वळण या ठिकाणी आहे.
पुनीत शर्मा यांचा कादंबरी लेखनाचा हा पहिला प्रयत्न आहे. शर्मा हे स्वतः हिंदी भाषिक असल्याने ओघवत्या व लाघवी शब्दांत लेखन झाले आहे. काश्मिरात स्वातः केलेली भटकंती, तेथील स्थानिकांशी संवाद आणि वाचनातून मिळालेले संदर्भ याचा वास्तवदर्शी उल्लेख लेखनात आहे. हेच कादंबरीचे बलस्थान आहे. त्यामुळे पुनीत शर्मा यांच्या या खऱ्या अर्थाने पहिल्या साहित्यिक अपत्याचे मनःपूर्वक स्वागत करायला हवे.
या कादंबरी लेखनामागे पुनीत शर्मा यांचा स्वतःचाही दृष्टीकोन आहे. त्यांच्या लेखनातून हा दृष्टीकोन डोकावतो आणि काही प्रश्नही निर्माण करतो. काश्मिरात सैन्यदलाची कारवाई विशेष सशस्त्र कायद्या (AFSPA) नुसार होते. हा कायदा सैन्यदलास विशेष अधिकार देतो. त्यामुळे १०० संशयितांसह एखाद दुसरा निर्दोष नागरिकही त्यात भरडला जातो. काश्मिरचे भारतात सामिल होणे आणि तेथील आजचे प्रश्न या विषय इतर भारतीय फारसे जाणून घेत नाही. काश्मिरी जनतेची आज स्वातंत्र्य (आझादी) हवे अशी मागणी आहे. त्यांना स्वातंत्र्य कशाचे हवे ? या प्रश्नाचा मागोवा सरकार वा माध्यमे घेत नाहीत, हे सूचवत अशाही स्थितीत तेथे भारतीय सैन्य अनेक अडचणींचा सामना करीत पाय रोवून उभे आहेत, हे शर्मा यांच्या लेखनातून जाणवते.
कादंबरी ओघवती असली तरी गती घेत नाही. बहुतेक प्रसंगात ती थबकते. बेनजीरच्या आजाराविषयी व नातेवाईकांचे प्रसंग रेंगाळलेले वाटतात. काही वेळा भारतीय सैन्यदलाचे काश्मिरातील वर्तन अन्यायाचे वाटायला लागते. अर्थात, कादंबरीचा शेवट करताना त्यात नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न उत्तम झाला आहे. बेनजीर ही काश्मिरातील बहुतेक 'हाफ विडो' चे प्रतिनिधीत्त्व करते. संशयावरुन पतीला सैन्यदलाने ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या जिवंत असण्याची नेमकी माहिती नाही, म्हणून अशा महिला 'हाफ विडो' ठरतात असा नवा विषय पुनीत शर्मा यांच्या कादंबरीतून वाचकांना अनुभवायला मिळतो.
कादंबरी ... हाफ विडो
प्रकाशन ... प्रशांत पब्लिकेशन, जळगाव
पाने ...२१६
(टीप - 'हाफ विडो' नावाचा एक चित्रपट सुध्दा मागील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यात अनिवासी भारतीय दाम्पत्याला काश्मिरात संशयावरुन झालेला त्रास दाखवला आहे. पतीच्या शोधाची ती कहाणी आहे. शिर्षक आणि कथाबीज योगायोगाने सारखे आहे)

No comments:
Post a Comment