आपण रस्त्याने चालत असलो किंवा दुचाकी वाहनावर असलो, की आपल्या पुढच्या दुचाकीवरील किंवा चार चाकीतील एखादा माणूस पचकन रस्त्यावर थुंकतो. वाऱ्याच्या वेगासोबत थुंकीचे थेंब आपल्या शरीर व कपड्यांवर उडतात. हा अनुभव भयंकर असतो. बहुतांशवेळा थुंकणाऱ्याला त्याने असा काही अपराध केला याची लाजलज्जा नसते. एखाद दुसरा दुचाकीस्वार वाहन वेगाने दामटून थुंकणाऱ्याला समजही देतो. पण रस्त्यावर थुंकण्याची ही सवय संबंधितांना एखाद्या आजारागत शरीरात भिनलेली असते. शिव्या खाऊनही तो काही सुधारत नाही. मला असे अनुभव नेहमी येतात.
माणूस का थुंकत असावा ? असा प्रश्न मला नेहमी सतावतो. एखादा घास कडवट लागला, मुखातील घासात खडा लागला म्हणून थुंकणे हे नैसार्गिक मानले जाते. कधीकधी मुखात अतिरिक्त लाळ पाझरली म्हणून थुंकणेही समजू शकतो. पण तंबाखुचा किंवा गुटख्याचा तोबरा जिभेखाली अथवा गालात ठेवून तंबाखु-गुटखा रसाची घाणेरडी लाळ रस्त्यावर थुंकणे हे अनैसर्गिक आणि अनैतिकच ठरते. पान खाऊन थुंकणारे याच लायकीचे. काहीवेळा आजुबाजूला असलेली घाण, दुर्गंधी पाहून माणसाला थुंकायची इच्छा होते. एखादे दृश्य अथवा नावडता माणूस पाहून काही जण खुनशीपणे थुंकतात. अर्थात, असे करणे ही मानसिक विकृती असते. काही जणांना सर्दी आणि कफ याचा त्रास होऊन घशात खारट अथवा आंबट कफ पाझरतो. काही जण त्याचा आवंढा गिळून घेतात. पण काही जण अगदी जोरात खाकरुन थुंकतात. हा प्रकारही सभ्यतेचा नाही. क्षयरोगासारखा आजार आहे म्हणून रस्त्यावर थुंकणे हा पर्याय नाही. नावडत्या माणसाला पाहून अथवा त्याचे बोलणे ऐकून काही जण कडू घोट थुंकतात. हा सुध्दा एक मानसिक आजाराच. अपवादात्मक लोकांना थुंकण्याचे व्यसन जडलेले असते. थुंकले नाही तर ते बैचेन होतात. हा प्रकार म्हणजे मानसिक विकृतीच. अशा लोकांना दुसऱ्या व्यक्तिने थुंकण्यापासून प्रवृत्त केले तर ते वाद घालतात. काही वेळा हिंसक होतात.
थुंकणे हा प्रकार माणसातील विकृतीचाच आहे, हे सिध्द करणारी एक घटना संत एकनाथ यांच्या चरित्रात आहे. पैठण येथील रहिवासी संत एकनाथ रोज पहाटे नदीवर जाऊन स्नान करीत. ओला पंचा घालून देवादिकांचे दर्शन करीत. त्यांचा द्वेष करणाऱ्या एका विकृत माणसाने नाथांचा अवमान करायचा असे एके दिवशी ठरवले. नाथ स्नान करुन आले की तो विकृत नाथांच्या अंगावर थुंकायचा. नाथ त्याला एकही शद्ब विरोधात न बोलता नदीपात्राकडे जाऊन पुन्हा स्नान करुन येत. असे १०८ वेळा झाले. थुंकणाऱ्या विकृताचा घसा सुकला. थुंकीच येणे बंद झाले. अखेरीस तो नाथांच्या पायावर पडला आणि माफी मागू लागला. नाथ म्हणाले, 'तुझ्यामुळे मला आज १०८ वेळा स्नानाचे पावित्र्य अनुभवता आले.' आज रस्त्यांवर थुंकणारे बहुतेक 'त्या विकृताचे' वारस असावेत, असे मला वाटते.
माणूस हा अनुकरणप्रिय प्राणी आहे असे मी मानतो. माणूस हा सर्व प्रथम इतर माणसांच्या सवयी, कृतीचे अनुकरण करतो. त्यामुळे थुंकायच्या या सवयीचे अनुकरण एका विकृत माणसाकडून दुसऱ्या विकृताकडे स्थानांतरित होत असावे, असा माझ्या निरीक्षणात्मक संशोधनाचा निष्कृर्ष आहे. दुसरी एक शक्यता सुध्दा आहे. ती म्हणजे, कधी कधी माणूस हा पशू, पक्षी, प्राणी किंवा जनावरे यांच्याही सवयीचे सुध्दा अनुकरण करतो. हा तर्क तपासून पाहायचा असेल तर थुंकणारे प्राणी अथवा जनावरे कोणती ? याचा शोध घ्यावा लागतो. त्या अनुषंगाने मिळणारी माहिती धक्कादायक आहे.
थुंकणाऱ्या जनावरात कोब्रा जातीचा नाग आणि कोपऱ्यात जाळे तयार करणारा कोळी यांचा समावेश आहे. बहुधा अशा प्राण्याचे काही जीन्स घेऊन प्रत्येक थुंकणारा माणूस जन्माला येत असावा असा माझा अंदाज आहे.
थुंकणारा नाग (स्पिटिंग कोब्रा) हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम व चीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भाताची शेत शिवारे ही त्याची निवासस्थाने आहेत. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी (फॉस्फोलिपेसेस ए-२ हे रसायन) आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेऊन हा भक्ष्याची शिकार साधतो. विषारी चिवकांडी जवळपास एक मीटर जाऊ शकते.
नागाप्रमाणेच विष थूंकणारा दुसरा प्राणी हा कोळी आहे. प्राणीशास्त्रात कोळी हा किटक नाही तर प्राणीच आहे. त्याचे वर्गीकरण संधीपाद प्राणी गटात होते. थुंकणाऱ्या कोळीला त्यांना सहा डोळे व सहा पाय असतात. कोळ्यांच्या पुढच्या दोन नांग्या म्हणजे त्यांचे विषारी अवयव असतात. काही कोळी भक्षावर चिकट जाळे टाकून थुंकतात. त्यात भक्षा अडकून पडतो. कोळी त्या भक्षाचा रस शोषून घेतो.
थुंकणारे प्राणी आणि त्यांच्या विषयाचे हे प्रकार लक्षात घेतले तर सध्या पान, तांबाखू, गुटखा अथवा तत्सम पदार्थ खाऊन इतरांच्या कपड्यांवर व शरीरावर थुंकीचे फवारे उडवणारे हे कोब्रा नाग अथवा विषारी कोळी यांच्या जातीचे आहेत किंवा त्यांच्या मागील जन्माचे जीन्स आजही मानवी वंशात कायम असावेत असा वैज्ञानिक व तार्किक निष्कर्ष काढता येतो.

No comments:
Post a Comment