विशाल खान्देशचे पॉवरफूल्ल नेते व सध्या भाजपतील सर्वाधिक अन्यायग्रस्त नाथाभाऊ खडसे यांचा "विजय असो" असे मनापासून म्हणावेसे वाटते आहे. सत्तेत असले आणि सत्तेत नसले तरी नाथाभाऊंचे मुंबई मंत्रालय ते दिल्ली मंत्रालयात जबरदस्त वजन आहे. अशा लोकनेत्याची "जय हो" म्हणताना कारणही तसेच भव्य आणि दिव्य गवसले आहे. जळगाव शहरालगत महामार्ग विस्तारिकरणासाठी मिळालेला १०० कोटी रुपयांचा निधी ना. नितीन गडकरींनी परत घेण्याची किमया केवळ आणि केवळ नाथाभाऊंच्या वजनामुळे साध्य करुन दाखवली आहे. ज्या पालकमंत्र्यांनी, ज्या जलसंपदामंत्र्यांनी व ज्या खासदार, आमदाराने पत्रकार परिषदांमध्ये "डिंग्या हाणत" म्हटले होते की, महामार्ग विस्तारासाठी १०० कोटी रुपये आम्ही आणले, त्यांच्या नाकांवर टीच्चून नाथाभाऊंनी हा निधी परत घ्यायला लावला आहे. नाथाभाऊंच्या जवळपास अर्ध शतकी राजकारणातील ही "सर्वांत मोठी अचिव्हमेंट" म्हणावी लागेल. इतर नेते विकास निधी मी आणला असे डंका वाजवून सांगतात. पण नाथाभाऊंची इतिहासात नोंद झाली ती, होय मी परत नेला हे सांगताना.
नाथाभाऊंनी जळगाव मनपातील सत्ताधारी, त्यांच्या सोबतचे संधीसाधू आणि समांतर रस्ते कृती समितीच्या मूठभर नतद्रष्ट लोकांना धडा शिकवला आहे. सत्तेत असेल तर नाथाभाऊ हजारो कोटीच्या घोषणा ना. गडकरींना करायला लावतात आणि सत्तेत नसेल तरी नाथाभाऊ शेकडो रुपयांचा निधी परत न्यायला भाग पाडतात, हे नाथाभाऊंनी दाखवून दिले.
नाथाभाऊ सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सुरुवातीचे दीड वर्ष ११/१२ खात्यांचे मंत्री होते. शिवसेनेच्या अर्धवट टेकूवर असलेले सरकार चालविण्याची जबाबदारी फडणवीस पेक्षा त्यांचीच अधिक आहे, असे नाथाभाऊंना वाटत असे. अखेर फडणवीसांनी हाच गडी गाळून मी माझे सरकार चालतो असे दिल्लीतील जोडगोळीला जावून कानात सांगितले आणि नाथाभाऊंना मंत्रीपद सोडून अन्यायग्रस्त व्हावे लागले. "ना रहे गा बांस ना बजेगी बांसुरी" अशी अवस्था करुन टाकली.
नाथाभाऊ दीडच वर्ष मंत्री होते. तेवढ्या काळात नाथाभाऊ केवळ घोषणाच करु शकले. कोणता निधी आणून काम तर काही करु शकले नाही. कारण फडणवीसांनी तशी संधीच दिली नाही. त्यानंतर दोन वर्षे झाली. नाथाभाऊ एका बाजुला अन्याय ... अन्याय अशी जपमाळ ओढत आहेत आणि दुसरीकडे निष्ठूर सरकार नाथाभाऊने घोषणा केलेले विषय गुंडाळत आहे. कशी शोकांतिका आहे बघा, नाथाभाऊंचा जिल्ह्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट ठरावा असा विकासाचा विषय नव्हताच. मुक्ताईनगरच्या खासगी साखर कारखान्याचे गाळप हंगामाला मुख्यमंत्र्यांना आणण्याशिवाय नाथाभाऊ काहीही करु शकलेले नाही. जळगावात ना. गडकरींनी महामार्गांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. त्यावर अपवाद वगळता फारकाही झालेले नाही. आता तर फडणवीस सरकार एवढे अघोरी झाले आहे की, नाथाभाऊच्या मतदार संघात आरोग्य सेवेत पुरेसे डॉक्टरच देत नाही. अशावेळी नाथाभाऊ सारख्या पॉवरफूल्ल नेत्याने कलेक्टर अॉफिससमोर उपोषण नाही करायचे नाही तर काय, दगडमारो आंदोलन करायचे ? की तरुणपणी कधी तरी केलेले कपडे काढून आंदोलन आता या वयात करायचे ? कपाशीच्या भावासाठी कधीकाळी आंदोलन करणारा नेता आज मंत्री असताना शेतात कपाशीच लावत नाही ही वस्तुस्थिती आहे.
जिल्हा आणि त्याचे प्रश्न गेले खड्ड्यात. नाथाभाऊच्या मतदार संघात आरोग्य सेवेत डॉक्टर मिळत नाही म्हणजे किती किती हा अन्याय आहे. दुसरीकडे चॉकलेट स्वभावाचे मंत्री गावोगावी आरोग्य शिबिरांची सर्कस भरवून मतदारांना रोगमुक्त करत आहेत आणि नाथाभाऊंच्या मतदार संघात डॉक्टर नाहीत ? यालाच म्हणतात पुन्हा पुन्हा अन्याय.
दोन वर्षांपूर्वी ना. गडकरी रस्ते कामांच्या भूमिपूजनासाठी जळगावात आले होते. व्यासपिठावर एका बाजूला खासदार सुनबाई, एका बाजूला जिल्हा बँक अध्यक्षा कन्या आणि एका हाताला जिल्हा दूध संघ अध्यक्षा काकू असा जमघट होता. ना. गडकरींनी जळगावशी संबधित व इतर रस्त्यांचे काम करायला १८ हजार कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी १८ रुपये हाती काही आले नाहीत. नाथाभाऊंनी विशेष बाब म्हणून १०० कोटी रुपये ओढून आणले होते. मात्र समांतर रस्ते कृती समिती आणि पुढारपण करणाऱ्या कलेक्टरने तो निधी परत न्यायला भाग पाडले. जळगाव शहरातील काही फडतूस व रिकाम्या लोकांनी समांतर रस्ते कृती समिती बनवून आंदोलन केले. ही समिती दलाल आणि बिनडोक लोकांची होती, असे नाथाभाऊंसह त्यांच्या दोन-तीन २४ तास समर्थकांना वाटते. याच कृती समितीच्या आंदोलनात जावून कलेक्टरने चमकोगिरी करुन घेतली. या अशा स्वार्थी लोकांच्या समितीत मी स्वतः एक (लेखक) आहे हे सखेद मान्य करतो. कारण एकट्या नाथाभाऊंना जी एकच गोष्ट माहित होती ती म्हणजे, जळगाव शहरातील समांतर रस्ते आम्ही करु असे प्रतिज्ञापत्र मनपाने पूर्वी न्यायालयात दिले आहे. ते इतर कोण्याही मूर्खाला माहित नव्हते. यात अर्थात केंद्रीय मंत्री ही आहेतच. अशा वेळी सरकारचे १०० कोटी मनपाच्या समांतर रस्तेवर खर्च झाले असते तर सरकारच्या अॉडीटमध्ये शक निर्माण झाला असता. त्यामुळे जे नाथाभाऊंना समजत होते तेच आता ना. गडकरींना समजले आणि त्यांनी जळगावसाठी दिलेले १०० कोटी परत घेतले. एक गंमत काय आहे माहिती आहे का ? ज्या १०० कोटीचे आदेश ना. गडकरींनी दिले आहेत त्याच आदेशात १२०० कोटी नागपूरसाठी मंजूर झाले आहेत. तेथे नाथाभाऊंच्या सारखी कोणाची हिंमत आहे का, रक्कम परतीची ? म्हणून नाथाभाऊंचे मनापासून अभिनंदन !! भाऊ तुम्ही विकास प्रकल्पासाठी भले निधी आणला नसेल पण निधी परत करण्याची धमक फक्त तुमच्यातच आहे ... हिप हिप हुर्ये !
नाथाभाऊंचा अनुभव आणि स्मरणशक्तीला द्यावी तेवढी दाद कमी आहे. नाथाभाऊ जसे समांतर रस्ते प्रकरणी मनपाने केलेले प्रतिज्ञापत्र विसरत नाही तसेच फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा ही महसूल विभागाची आहे हे ही शोधायला विसरत नाही. आता सुध्दा या दोन्ही मार्केटमधील थकीत भाडे वसुली सुरु आहे. खरे तर हा सर्व पैसा महसूल विभागाच्या तिजोरीत जायला हवा. नाथाभाऊंची पॉवर अजुन येथे काम करताना दिसत नाही.आताच्या महसूल मंत्र्यांना तेवढी समजही नाही, असे म्हणता येईल.
जळगाव शहरासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी २५ कोटी रुपये दिले आहेत. ते खर्च न करु देणारे भाजपचे आमदार व नगरसेवक हुशार आहेत. त्यांचे एकमुखी नेते नाथाभाऊ यांनी सुध्दा १०० कोटी रुपये डंका वाजवून परत करुन दाखविले आहेत. अशावेळी जळगावकर मूर्ख असल्याचे सिध्द होते. अस्वच्छ शहरात राहायची, खड्ड्यांच्या रस्त्यात चाला-फिरायची आणि हायवेवर रोज माणसे मरायची सवय व सराव झालेला असताना महामार्ग विकासाचे स्वप्न जळगावकर कसे पाहू शकतात ? जळगावचे मतदार नालायक आहेत. खासदार भाजपचा दिला, आमदार भाजपचा दिला पण जळगाव मनपा भाजपच्या ताब्यात नाही. तेथे आजही खान्देश विकास आघाडी वेटोळे मारुन बसली आहे. याच आघाडीच्या नेत्याने आणि यातील काही नगरसेवकांनी मुलाला विधान परिषद निवडणुकीत पराभूत केले आहे, हे नाथाभाऊंनी का विसरावे ? नाथाभाऊ काहीही विसरत नाही आणि विरोधात काम करणाऱ्याला सोडत नाही.
नाथाभाऊंनी जळगाव मनपाला आणि पर्यायाने ५ लाख नागरिकांना हा जो धडा शिकवला तो लक्षात घेवून आज मनापासून म्हणायची इच्छा आहे, "नाथाभाऊ की जय हो !"

भाऊंनी मंजूर करून आणलेला निधी होता, काही निधी लागणारे आणि श्रेय लाटणारे आयत्या बिळावर बसल्यावर काय होणार..आणि जिल्हाधिकाऱयाच काय सांगतात ह्या आंदोलनात निवेदन घेणायस चौफुलीवर येतात, आणि आदिवासी बांधवांना रात्रभर तिष्ठत ठेवतात ह्या कार्यशैली विषयी पण लिहा लेख जमल्यास...
ReplyDelete