Saturday 24 February 2018

"गोतावळा" निर्मितीची प्रेरणा !

श्रद्धेय मोठेभाऊ तथा पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या द्वितीय श्रद्धावंदनदिनी आज (दि. २५ फेब्रुवारी) माणसांचे रंग टीपणाऱ्या माझ्या तिसऱ्या पुस्तक "गोतावळा" चे  प्रकाशन होते आहे. माझ्यासाठी हा दुग्धशर्करा योग आहे. तो कसा, हे सुद्धा सांगायला हवे. "गोतावळा" पुस्तकात समाविष्ट ५२ व्यक्तिमत्त्वांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची साखर पेरणी पानोपानी आहे. अशा शर्करायुक्त पुस्तकाचे प्रकाशन समाजाप्रति नेहमी दातृत्वाची साय देणाऱ्या मोठेभाऊंच्या श्रध्दावंदनदिनाला व्हावे हाच तर दुग्ध शर्करा योग आहे.

Sunday 18 February 2018

छत्रपती शिवरायांचे सोशल इंजिनियरींग ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रित्राचा अभ्यास देशी आणि विदेशी अभ्यासकांनी वेगवेगळ्या विषयांवर सखोलपणे केला आहे. शिवरायांच्या शौर्यगाथेचे जेव्हा वाचन केले जाते तेव्हा त्यातील नाविन्यपूर्ण विषय नेहमी समोर येत असतो. शिवचरित्र हे एकमेव असे चरित्र आहे की, ज्यात अनेक विद्याशाखांच्या मूलभूत सिद्धांतांची कृतिशीलता सिद्ध होते. कोणत्याही क्षेत्रात यश अथवा निर्धारित उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सोशल इंजिनिअरींग करणे आवश्यक ठरते.

Saturday 10 February 2018

सोनेबाजाराचे एनसायक्लोपीडिया

जळगाव शहरातील पत्रकारितेत मला २२-२३ वर्षे झाली आहेत. या प्रवासात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्री झाली. कधी बातम्यांच्या विषयानिमित्त तर कधी जाहिरात अथवा इव्हेंट आयोजनाच्या निमित्त. अशा मान्यवरांमध्ये सर्वांत बुजूर्ग मार्गदर्शक जर कोणी असेल तर ते आहेत, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संस्थापक तथा विस्तार करणारे स्वतः श्री. रतनलालजी बाफना तथा भाईसाहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचे अभीष्टचिंतन करताना त्यांच्या प्रवासातील काही प्रसंग इतरांना सांगायला हवेत.

Friday 9 February 2018

सावलीचा होतोय वटवृक्ष !

संपूर्ण जगभरात पीव्हीसी पाईप आणि ठिबक सिंचन संच निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आणि ठरवून जळगावातच मुख्यालय ठेवणाऱ्या जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा आज वाढदिवस. अशोकभाऊंचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन करताना त्यांच्या दिनचर्येचा मागोवा घेण्याची इच्छा होते.

नाथाभाऊ की जय हो !

विशाल खान्देशचे पॉवरफूल्ल नेते व सध्या भाजपतील सर्वाधिक अन्यायग्रस्त नाथाभाऊ खडसे यांचा "विजय असो" असे मनापासून म्हणावेसे वाटते आहे. सत्तेत असले आणि सत्तेत नसले तरी नाथाभाऊंचे मुंबई मंत्रालय ते दिल्ली मंत्रालयात जबरदस्त वजन आहे. अशा लोकनेत्याची "जय हो" म्हणताना कारणही तसेच भव्य आणि दिव्य गवसले आहे. जळगाव शहरालगत महामार्ग विस्तारिकरणासाठी मिळालेला १०० कोटी रुपयांचा निधी ना. नितीन गडकरींनी परत घेण्याची किमया केवळ आणि केवळ नाथाभाऊंच्या वजनामुळे साध्य करुन दाखवली आहे. ज्या पालकमंत्र्यांनी, ज्या जलसंपदामंत्र्यांनी व ज्या खासदार, आमदाराने पत्रकार परिषदांमध्ये "डिंग्या हाणत" म्हटले होते की, महामार्ग विस्तारासाठी १०० कोटी रुपये आम्ही आणले, त्यांच्या नाकांवर टीच्चून नाथाभाऊंनी हा निधी परत घ्यायला लावला आहे. नाथाभाऊंच्या जवळपास अर्ध शतकी राजकारणातील ही "सर्वांत मोठी अचिव्हमेंट" म्हणावी लागेल. इतर नेते विकास निधी मी आणला असे डंका वाजवून सांगतात. पण नाथाभाऊंची इतिहासात नोंद झाली ती, होय मी परत नेला हे सांगताना.

Sunday 4 February 2018

सुमार दर्जाचा तद्दन मसालापट ... पद्मावत !

संजय लिला भन्साळी यांचा विवादीत चित्रपट पद्मावत पाहिला. तब्बल तीन तास केवळ तीन पात्रांभोवती फिरणारा चित्रपट रतन सिंह आणि पद्मावतीचे प्रेमगुंजन आणि अल्लाउद्दीन खिलजीची पद्मावतीप्रती लालसा हे दोनच मनोरंजनाचे रस प्रेक्षकांना देतो. बाकी चित्रपटाचा मसाला हा  राजवाड्याचे भव्यदिव्य सेट आणि चकाचक कपडे, दागिने याचाच आहे. चितौडगडची तटबंदी उध्वस्त करायला अल्लाउद्दीन खिलजीने आणलेले अग्नीगोळ्यांचे लाकडी रथ हे बाहुबली चित्रपटातील दगडी गोळ्यांची आठवण करुन देतात. संजय लिला भन्साळीचा सिनेमा असाही पात्रांमधील भावभावनांचे रस कधीच दाखवत नाही. मोठमोठ्या सेटवर दागिन्यांचे वा कपड्यांचे ओझे वाहणारी पात्रे भांबावलेली व बावरलेलीच दिसतात. अशी कचकड्याची पात्रे अभिनयाच्या नावाने केवळ संवाद फेकतात. चित्रपट डोळ्यांना भावतो, पण हृदयात शिरत नाही आणि मेंदूला पटत नाही.