Wednesday 31 January 2018

खुद हो जाऊंगा बदनाम

अभी सूरज नहीं डूबा जरा सी शाम होने दो ……
मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम तो होने दो ……
मुझे बदनाम करने का बहाना ढूंढ़ता है जमाना ……
मैं खुद हो जाऊंगा बदनाम पहले मेरा नाम तो होने दो ……

इंटरनेटवर सर्च करीत असताना कुठल्याश्या शायरचा वरील शेर वाचनात आला. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतल्यानंतर डोळ्यांसमोर एकनाथराव खडसे यांचा चेहरा आला. "मुझे बदनाम करने का बहाना ढुंढता है जमाना ……" दोन अडीच वर्षांत आरोपांचे किती पाणी वाहून गेले ? दाऊदला कॉल, ३० कोटींची कथित लाच, शेतात नेटशेडचे लाखोंचे अनुदान, भोसरी भूखंड प्रकरण, जावयाची लिमोझीन कार, महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये. असे एक ना अनेक विषय. छुप्या शत्रूंनी आणि स्वकियातील हितशत्रूंनी शोधलेले अनेक बहाणे.

बदनामीचे अडथळे अनंत आहेत. ४० वर्षे ज्या पक्षाची निष्ठेने धुरा सांभाळली तेथेच न्याय मिळण्याची शक्यता नाही. जीव वाचवायच्या अपेक्षेने नारायणरावाने ज्या राघोबादादाकडे धावावे तेथेच आनंदीबाईचे गारदी बसलेले. ज्या देवेंद्र फडणविसांना राजकारणात पुढे चाल दिली, त्यानेच सारे काही गुंडाळावे आणि ज्या नरेंद्र मोदी, अमित शहाकडे मदतीसाठी जावे त्यांनीच "नरो वा कुंज रोवा" म्हणावे, "अभी सूरज नहीं डूबा जरा सी शाम होने दो ……"

नाथाभाऊंवर अनेक आरोप केले गेले. त्यातील एकही कागदोपत्री सिध्द नाही. तर्काच्या आधारावर सर्वच खरे वाटणारे. अखेर नाथाभाऊ स्वतःच वारंवार म्हणाहेत, "होवू दे आरोप सिध्द. मी स्वतःच राजकारणातून बाजूला होतो." पण विरोधकांना आरोप सिध्द करायचेच नाहीत. फक्त आरोपांचा संभ्रम निर्माण करायचा आहे. "मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम तो होने दो ……"

नाथाभाऊंविषयी खेद आणि खंत निर्माण करणारी अवस्था आहे आता. "मैं खुद हो जाऊंगा बदनाम ……" आपल्याच लोकांच्या त्रासापायी आता रोजच त्रागा आहे. निराशेतून जे बोलेल त्यातून रोज नवा श्लेष. कधी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोब्याचा संशय. तर कधी काँग्रेसशी साटेलोटेची चर्चा. शिवसेनेकडून डागण्या सुरुच. खरे तर हे नाथाभाऊंनी स्वतःच स्वतःवर ओढवून घेतले आहे. एवढ्या वाईट पध्दतीने की, सामना दैनिकाच्या संपादकाने नाथाभाऊंना पदर ढळलेल्या महिलेचे उदाहरण देवून तुलनाच केली. आरोपाचा एक दगड कोण भिरकावतो याचीच प्रतिक्षा इतरांना असते. एकाने मारल्यावर मग हलके फुलके लोकही खडे फेकून घेतात. नाथाभाऊ राष्ट्रवादीच्या वाटेवर हा संशय व्यक्त झाला. आज नाथाभाऊ काँग्रेसच्या उंबरठ्यावर ही बातमीही पोहचली. त्यानंतर नाथाभाऊंनी मान्य केले की, "हो मी भेटलो. पण, माझे दुसरे काम होते" ...... हे म्हणजे, अमीर खानने राणी मुखर्जीला गुलाम चित्रपटात मवाल्यागत विचारलेल्या गाण्यासारखे आहे, "आती क्या खंडाला ……" नाथाभाऊंनी स्वतःच निर्माण केलेला स्वतः भोवती संशय.

नाथाभाऊंचे हे आगतिक होणे अस्वस्थ करणारे आहे. सत्तेच्या सारीपाटात सोंगाट्या फेकू द्या अशी आर्जव  आशाळभूतपणे वारंवार करणे जसे केविलवाणे वाटते तसेच तर नाथाभाऊंचे रुदन सुरु आहे. अशा या वातावरणात मोदी-शहा-फडणवीस यांनी मंत्रीपद दिले तरी त्यामागे आता प्रतिष्ठेचे वलय असणार आहे ? मागील मान-सन्मान, रुतबा-रुबाब, जलसा-जलवा असणार आहे ? उधारीवर मिळालेला सत्तेचा शेंदूर कोणावरील निष्ठांच्या भांगेत भरणार ? …… "पहले मेरा नाम तो होने दो ……" ४० वर्षांच्या निष्ठेनंतरही कोण नाथाभाऊ ? म्हणत पक्षात ओळख हवी असेल तर …… "खुद हो जाऊंगा बदनाम ……" म्हणण्या शिवाय काय पर्याय आहे ???

नाथाभाऊंनी स्वतःच ओढवून घेतलेली ही अवस्था अखेर दुसरा शायर चपखल शब्दांत मांडतो ……

"शोहरत" तो बदनामी से ही मिलती है साहेब,सुना है
लोग बदनामी के किस्से कान लगाकर सुनते हैं …... !

बातम्यांचे संदर्भ -

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय.
Sachin Salve | Updated On: Dec 27, 2017 09:18 PM IST
http://lokmat.news18.com/maharastra/bjp-leader-eknath-khadse-join-ncp-say-nawab-malik-278214.html

खडसे फार काळ भाजपात राहणार नाहीत!
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे कोणत्या पक्षात जातील ते सांगता येणार नाही. मात्र, ते भाजपात फार काळ राहणार नाहीत, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज जळगावात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
https://m.maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/eknath-khadse-will-leave-bjp-soon-says-shivsena-leader-sanjay-raut/articleshow/62461750.cms
महाराष्ट्र टाइम्स | Updated Jan 11, 2018, 08:08 PM IST

भाजपवर वैतागलेले एकनाथ खडसे काॅंग्रेसच्या वाटेवर?
सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 जानेवारी 2018
से हे काॅंग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. काॅंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी खडसे यांनी काल औरंगाबाद येथे चर्चा केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
http://www.sarkarnama.in/will-eknath-khadase-join-cingress-20269

ककाँग्रेस नेत्यांना भेटलो; पण त्या पक्षात जाणार नाही : खडसे
सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 जानेवारी 2018
पुणे ः माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचा खुलासा केला आहे. काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी माझी भेट झाली असली तरी ती खासगी स्वरूपाची भेट होती.
http://www.sarkarnama.in/i-will-not-join-congress-khadase-20270

शिवसेनेच्या वाटेला जाणारे इतिहासजमा झाले; सेनेचा खडसेंना टोला
मुंबई | Updated: June 6, 2016 8:29 AM
शिवसेनेच्या वाट्याला जाणारे कशाप्रकारे इतिहासजमा झाले, असे सांगत ‘सामना’च्या अग्रलेखातून खडसेंच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्याचे काम सेनेने केले आहे.
https://www.loksatta.com/mumbai-news/battle-between-shivsena-and-eknath-khadse-1247202/

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete