जळगाव शहरातून प्रचंड वाहतूक असलेल्या नरभक्षक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचा विस्तार व त्यालगत समांतर रस्ते (सर्व्हिस रोड) तयार करण्याच्या कामांचा डीपीआर (सोपा शब्द आराखडा) मंजूर करुन कामाची निविदा मंजूर केल्याची प्रत हाती मिळावी म्हणून सध्या जनभावनांच्या असंतोषाचे प्रतिक म्हणून साखळी उपोषण आंदोलन सुरु आहे. सर्व पक्षातील स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या अराजकिय "जळगाव समांतर रस्ते कृती समिती" च्या नेतृत्वात सुमारे १०० विविध संस्था, संघटना, मंडळे व राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने १०० दिवस उपोषणाचा निर्धार करण्यात आला आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस असून एक दिवसाच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी इतर संघटनांचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. रोज हजारो नागरिक सह्या करुन या आंदोलनाच्या माध्यमातून जनरेट्याचा दबाव निर्माण करीत आहेत.
Saturday, 17 November 2018
Saturday, 6 October 2018
जळगाव शहर निश्चितपणे कात टाकेल !
जळगाव महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासोबत अनौपचारिक गप्पा करण्याची संधी मिळाली. डांगे यांनी पदभार स्वीकारुन साधारणपणे पाच महिने झाले आहेत. मनपाची आर्थिक दुखणी आणि जळगावकरांच्या प्राथमिक सुविधांसंदर्भातील समस्या याची बऱ्यापैकी माहिती त्यांना झालेली आहे. मनपात सत्ताबदल होवून भारतीय जनता पक्षाच्या बहुमतातील पदाधिकारी सुध्दा कार्यरत झाले आहे. मोदी ते फडणवीस, फडणवीस ते गिरीश महाजन आणि महाजन ते महापौर सौ. सिमा व आमदार सुरेश भोळे अशी सत्तेची सूत्रेही निश्चित झालेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस उद्या (दि.८) जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
Wednesday, 3 October 2018
नाना पाटेकरवर आमचा विश्वास आहे !
गेल्या काही दिवसांत दूरचित्रवाहिन्या आणि इंग्रजी, हिंदी अॉनलाईन तथा छापिल माध्यमातून दक्षिणेतील कधी काळी अभिनेत्री असलेली व सध्या अनिवासी भारतीय तनुश्री दत्ता हिने चित्रपट अभिनेता नाना पाटेकरवर गैरवर्तनाचा आरोप लावून नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य व चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही संशयाच्या पिंजऱ्या उभे केले आहे.
Tuesday, 18 September 2018
बच्चा लोग ... ताली बजाव !
सन १९९२/९३ मधील जळगाव शहरातील राजकीय इतिहास डोळ्यांसमोर येतो. नगरपालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीची बहुमताची सत्ता तेव्हा होती. स्व. बबन बाहेती, स्व. नरेंद्र पाटील, छबीलदास खडके, उल्हास साबळे असे दोन चार जण विरोधक म्हणून असायचे. पालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी असली की सत्ताधारी गटाची पार्टी मिटींग सुरेशदादांच्या निवासस्थानी व्हायची. सभेत अजेंड्यावरील विषय कसे मंजूर करायचे याचा फार्स तेथे निश्चित व्हायचा. प्रत्यक्ष सभेत एका कोपऱ्यात गफार मलिक, दुसऱ्या कोपऱ्यात बंडू तथा पांडुरंग काळे तिसऱ्या कोपऱ्यात शिवचरण ढंढोरे व चौथ्या कोपऱ्यात करीम सालार बसायचे.
Sunday, 16 September 2018
वसाहतीची जीवनशैली बदलणारा प्रकल्प ...
जळगावमधील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक असलेले श्रीराम व श्रीकांत बंधू सध्या चर्चेत आहेत. मनपाच्या निवडणुकीत पडद्यामागून व्यूहरचना करीत 'भेद आणि दाम' चा योग्य व्यक्तिंवर पुरेशा प्रमाणात वापर करीत भारतीय जनता पक्षाला 'न भुतो न भविष्यती' असे यश मिळवून देण्यात दोघांचा मोठा वाटा आहे. उमेदवार ठरविताना भाजपला ५० अधिक अशा ५२ जागा मिळतील असा दावा केला जात होता. मात्र, भाजपला किमान ५७ जागा मिळतील असे श्रीकांत सांगत होते. घडलेही तसेच. त्यामुळे भाजपच्या बेरजेच्या राजकारणापासून तर यशस्वी बिल्डर व्यवसायातील अनेक प्रकल्पात अग्रेसर असलेल्या खटोड बंधुंचे हात 'जेथे लागतील तेथे सोने होईल'अशी जादू करणारे असून ते तुपातही आहेत.
Monday, 3 September 2018
कौटुंबिक ऐक्याचे समर्पक उदाहरण ...
जैन उद्योग समुहातील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड या कंपनीचे सह - व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित भवरलाल जैन यांच्यावर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया रविवार, दि. २६ ऑगष्ट रोजी मुंबईत ब्रीचकेन्डी हॉस्पिटलमध्ये डॉ. भट्टाचार्य यांनी यशस्वीपणे पार पाडली. मुंबईचे ख्यातनाम कार्डिओलॉजीस्ट आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंचे जवळचे मित्र पद्मश्री डॉ. मुन्सी व जळगाव येथील डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर श्री. अजीत जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या ते आयसीयूमधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट झाले आहेत. श्रध्देय भवरलालजी व श्रध्देय कांताबाई जैन यांच्या पश्चात जैन कुटुंबाने अशा कसोटीच्या प्रसंगी दाखवलेल्या कौटुंबिक ऐक्य व एकत्रिकरणाचे एक अनोखे उदाहरण सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. श्री. अजीत यांच्यावरील शस्त्रक्रियेसंदर्भातील अधिकृत घोषणा करताना जैन कुटुंबाने आवर्जून 'भवरलाल व कांताबाई जैन यांचे कुटुंबिय' असा उल्लेख केला आहे. कौटुंबिक व आरोग्यविषयक सौख्य लाभाचे किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचे ऐक्य व एकत्रिकरण कसे आवश्यक असते, ती सुध्दा एक सकारात्मक शक्ती असते हेच यातून अधोरेखीत झाले आहे.
Sunday, 2 September 2018
नाथाभाऊंना माध्यमांचा चकवाच !
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस. त्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षात खडसेंची राजकीय कोंडी करण्यात आली आहे. फारसा आगापिछा नसलेल्या कथित आरोपांच्या भोवऱ्यात खडसे पक्षांतर्गत एकाकी पडले आहेत. अशा स्थितीत आगतिक झालेल्या खडसे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या संदर्भात केलेले वक्तव्य आठवले. खडसेंनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, 'सत्य माहित झाल्यानंतर माध्यमांनी मला न्याय मिळवून द्यायला हवा !' अर्थात, खडसेंवर झालेल्या अनेक आरोपांपैकी एकही आरोप न्यायालयाच्या कक्षात साधार पुराव्यांसह साबीत झालेला नाही. या सोबत दुसरी बाजू अशीही आहे की, खडसेंवरील सर्वच आरोप निराधार असल्याची क्लिनचीट भाजप नेतृत्वातील सरकारने दिलेली नाही. म्हणून खडसेंची सत्तास्थानावरील वापसी होण्याची तुर्तास शक्यता नाही. याची जाणिव खडसे यांनाही असून काही दिवसांपूर्वी ते स्वतःच म्हणाले आहेत, 'मला मंत्रीपद मिळण्याची 'ती योग्य वेळ' परत कधी येणार नाही.'
Saturday, 18 August 2018
समाजसेवकांना फसवणारे निवडणुकीचे मापदंड
जळगाव महानगर पालिकेत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्य सुरु होईल. शहर विकास आघाडी, खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे नगर पालिका व महानगर पालिकेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या नेते व त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेच्या रुपात सत्ता हाती कायम ठेवण्याचा प्रयत्न जळगावकर मतदारांनी नाकारला. जुन्यांची सत्ता नकोच असा निश्चिय केलेल्या जळगावकरांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला २/३ पेक्षा जास्त बहुमत दिले आहे. भाजपच्या या विजयाचे विश्लेषण विविध माध्यमातून करण्यात आले आहे.
Wednesday, 15 August 2018
नशिबाची वाजलेली घंटा ...
डीसीएम गाडीचा ड्रायव्हर ते अशोक लेलैण्डचा डिलर ...
मैत्रिचा गोतावळ्याच बंध कोणात कसा गुंतवून टाकेल सांगता येत नाही. अशाच एका बंधाने आज जखडून टाकले. जुने मित्र ॲड. जमिल देशपांडे यांची 'अपर्णा ॲटोमोटीव्ह' च्या उद्घाटन समारंभात भेट झाली. मला कार्यक्रमासाठी उपस्थितीचा आग्रह सौ. अपर्णा भट - कासार या आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रिणीकडून होता. श्री. किरण कासार यांनीही आवर्जून या असे व्यक्तिशः म्हटले होते. बहुधा जमिलभाई सुध्दा अशाच आग्रहातून आले असावेत ? असा अंदाज होता.
मैत्रिचा गोतावळ्याच बंध कोणात कसा गुंतवून टाकेल सांगता येत नाही. अशाच एका बंधाने आज जखडून टाकले. जुने मित्र ॲड. जमिल देशपांडे यांची 'अपर्णा ॲटोमोटीव्ह' च्या उद्घाटन समारंभात भेट झाली. मला कार्यक्रमासाठी उपस्थितीचा आग्रह सौ. अपर्णा भट - कासार या आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रिणीकडून होता. श्री. किरण कासार यांनीही आवर्जून या असे व्यक्तिशः म्हटले होते. बहुधा जमिलभाई सुध्दा अशाच आग्रहातून आले असावेत ? असा अंदाज होता.
Monday, 30 July 2018
प्रचाराला रिवाईंड करु या !
जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला. निवडणूक रिंगणात असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांचा एकही स्टार प्रचारक शहरात आला नाही. हे या निवडणूक प्रचाराचे पहिले वैशिष्ट्य. प्रचारात स्थानिक नेत्यांनी गल्लीबोळात फिरुन पक्षाच्या उमेदवारांना वियजी करा असे आवाहन केले. यात भाजपतर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन, रमेश जैन, नितीन लढ्ढा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. राधेशाम चौधरी यांनी सहभाग दिला. रिपब्लिकन पक्षाचे अनिल अडकमोल व राजु मोरे हे शिवसेनेसोबत आहेत. स्थानिक नेत्यांनी प्रचारासाठी घेतलेली मेहनत हे प्रचाराचे दुसरे वैशिष्ट्य ठरले.
Sunday, 29 July 2018
नाथाभाऊंच्या बनावट अॉडिओ क्लिपचे गौडबंगाल...
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला आजचा (दि. ३०) एकच दिवस शिल्लक आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सोशल मीडियात अजब फंडा वापरण्यात आला आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजाची नक्कल करून, ‘भाजपला मतदान करा’ असे आवाहन करणारी बनावट ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या बनावट क्लिपविषयी माहिती मिळाल्याने स्वत: नाथाभाऊ व्यथित झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून या गंभीर प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. नाथाभाऊंच्या नावाने भाजपला मतदान हवे, पण नाथाभाऊ भाजपत नको, असा कुटील डाव सध्या खेळला जात असल्याचे यातून उघड झाले आहे. म्हणून अशी क्लिप कोणी तयार केली असावी यामागील गौडबंगाल वाढले आहे.
Saturday, 28 July 2018
नाथाभाऊंनी केली अशीही पोलखोल !
जळगाव मनपा निवडणूक प्रचाराचे अखेरचे दोन दिवस आहेत. प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांनी फारशी गाजलेली नाही. भाजपकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा होणार आहे. शिवसेनेकडून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्या सभा सुरु होत आहेत. इतरांच्या सभा फारशा लक्षात येणाऱ्या नाहीत.
Wednesday, 25 July 2018
नाथाभाऊ, आम्ही तुम्हाला विसरतोय ...
आ. नाथाभाऊ नमस्कार
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचाराचे तीन दिवस उरले आहेत. प्रचाराची तुमची घणाघाती भाषणे आणि कार्यकर्त्यांविषयी असलेल्या जिव्हाळ्याची उणिव करुन देत ही निवडणूक संपते आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी तुम्ही अगोदर पासून लावून धरली. इतर नेते मंडळी शिवसेनेशी युती करण्याच्या तयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. युती होणार असा निर्णय जाहीर करीत चर्चेचा फोटोही काढून आणला. या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही दिसले नाहीत. तुम्हाला तेथे बोलावले जाणे शक्यच नव्हते. भाजप - शिवसेना युती करणार असे सांगत तो फोटो सुध्दा माध्यमांमध्ये प्रसिध्द झाला. मात्र, अवघ्या ४ दिवसांनी युती होणार नाही असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचाराचे तीन दिवस उरले आहेत. प्रचाराची तुमची घणाघाती भाषणे आणि कार्यकर्त्यांविषयी असलेल्या जिव्हाळ्याची उणिव करुन देत ही निवडणूक संपते आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी तुम्ही अगोदर पासून लावून धरली. इतर नेते मंडळी शिवसेनेशी युती करण्याच्या तयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. युती होणार असा निर्णय जाहीर करीत चर्चेचा फोटोही काढून आणला. या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही दिसले नाहीत. तुम्हाला तेथे बोलावले जाणे शक्यच नव्हते. भाजप - शिवसेना युती करणार असे सांगत तो फोटो सुध्दा माध्यमांमध्ये प्रसिध्द झाला. मात्र, अवघ्या ४ दिवसांनी युती होणार नाही असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
Tuesday, 24 July 2018
जळगाव होईल का मराठा आंदोलनाचे कुरुक्षेत्र ?
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाने राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंढरपूर येथे आषाढीच्या शासकिय महापुजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचे काय ? असा प्रश्न विचारुन महापूजेसाठी मज्जाव केला गेला. अखेर फडणवीस यांनी पंढरपुरात येण्याचे टाळले. पण तसा निर्णय का घेतला हे माध्यमांना सांगत असताना मराठा आंदोलनाच्या कथित कृत्यांची वाच्यता फडणवीस यांनी केली. या वक्तव्यांनी मराठे भडकणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असताना मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी कायगाव टोका (जि. औरंगाबाद) येथे काकासाहेब शिंदे या २८ वर्षाच्या मुलाने पुलावरुन गोदावरीत उडी मारुन देहाचे जलार्पण केले. आता त्याचे पडसाद म्हणून महाराष्ट्र बंदचे लोण उसळले आहे.
Sunday, 22 July 2018
शिवरायांचा गनिमीकावा काय शिकवतो ... ?
जळगाव मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला आठवडा संपला असून प्रचार दुसऱ्या आठवड्यात पोहचला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ आणि काँग्रेसने १७ उमेदवार दिले आहेत. जळगाव शहरात निवासी असलेल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपापल्या घरातून प्रभागात उमेदवार द्यावेत, असे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार सांगून गेले होते. पण, काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमात व्यासपिठावर गर्दी करणाऱ्या नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून दिसत नाहीत. खासदारकी व आमदारकीचे संभावित उमेदवार असणाऱ्या नेत्यांच्या निवासी भागातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही.
Saturday, 21 July 2018
मुस्लिम मतदारांचा कौल सुरेशदादांकडे ?
जळगाव महानगर पालिका निवडणूक प्रचाराची रंगत वाढते आहे. राज्यात सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करताना मराठा आणि ब्राह्मण समाजाला डावलल्याचे दिसते आहे. जळगाव शहरातील किमान सहा प्रभागात विजयाचे निर्णय फिरवू शकणाऱ्या मुस्लिम बहुल प्रभागात कौल कोणाच्या बाजुने जाईल ही उत्सुकता आहे. मुस्लिम समाज हा स्थानिक व प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास दर्शवतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
Thursday, 19 July 2018
गल्लीच्या निवडणुकीत मोदी, फडणविस यांची आश्वासने !
जळगाव महानगर पालिकेची निवडणूक रंगात आली आहे. केंद्र व राज्यात सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला मनपात सत्ता हवी आहे. येन केन प्रकारे सत्ता मिळवायला आश्वासने दिली जात आहेत. ही आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे छायाचित्र असलेल्या जाहिरातीतून दिली जात आहे. निवडणूक जळगाव मनपाच्या ७५ प्रभागांची व गल्लीबोळातील आहेत.
Wednesday, 18 July 2018
ब्रह्मवृंदही निवडणुकीतून बाद !
जळगाव मनपाच्या निवडणुकीतून मराठा समाज कसा बाजुला ढकलला केला याचे सविस्तर विवेचन कालच्या ब्लॉगमध्ये केले. याविषयी अनेकांनी मोबाइलवर संपर्क करुन समाजाच्या पुढाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घातल्याचा उल्लेख केला. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक या संस्थेत दोन गटांचे टोकाचे मतभेद सुरु झाले आणि मराठा नेत्यांचे खच्चीकरण झाले, असेही एका मित्राने लक्षात आणून दिले. संघटन नेत्यांच्या हेव्या दाव्यात विभागले आणि सत्तेतील सामाजिक मक्तेदारी संपुष्टात येत गेली, याचेच हे उदाहरण.
Tuesday, 17 July 2018
मराठा वर्चस्व संपवणारी निवडणूक
जळगाव महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांनी अगदी सोयीने आणि ठरवून आपापल्या उमेदवारांची निवड केली आहे. उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पक्षात स्वागतासाठी पायघड्या घातल्या गेल्या. यात मराठा म्हणून कोणीही दिसले नाही. मतदारांची गठ्ठा संख्या लक्षात घेऊन प्रभागातील उमेदवारांची निवड झाली आहे. पैनल प्रमुखांच्या भोवतीचे चेहरे नीटपणे बघितले की, प्रभागातील चौघा उमेदवारांच्या जात व समाज निहाय मतांच्या समिकरणाची माहिती होते. या समिकरणाचे अंतिम उत्तर काय असेल ? हे पडताळून पाहिले की, लक्षात येते या निवडणुकीतून मराठा समाजाच्या नेतृत्वाचा चेहरा हरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व वगळले तर इतर पक्षांमध्ये मराठा नेतृत्व म्हणून चेहराच नाही. जळगाव शहरात मराठा मतदारांची संख्या जवळपास ७० हजार आहे. मराठा क्रांति मोर्चाला याच शहरात लाखावर गर्दी झाली होती.
Sunday, 15 July 2018
सारेच उडीदामाजी काळे गोरे ... !
![]() |
२५ कोटींच्या कामांसाठी एकत्र आलेले प्रशासन व पुढारी |
Saturday, 14 July 2018
मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षाने जळगावच्या योजना बासनात !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकास योजनांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्यामुळे आज मनपा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपची पाटी कोरीच्या कोरी आहे. एकीकडे फडणवीस यांनी स्वतः दिलेले २५ कोटी रुपये भाजपमधील स्थानिक नेत्यांमधील वादविवादाने खर्च झाले नाहीत. दुसरीकडे फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या अमृत पाणी योजना व अमृत भुयारी गटार योजनांबाबत सचिवस्तरावर आडमुठी भूमिका घेतली गेली. या दोन्ही योजनांमध्ये मंत्रालयात खुट्या मारणाऱ्या सचिवांना कधीही फडणवीससह ना. गिरीषभाऊ महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा धाक वाटला नाही. फडणवीस यांनी असाच दुर्लक्ष केलेला मुद्दा आहे, मनपा मालकीच्या २२०० गाळे भाडे कराराचा. गेले २ वर्ष हा विषय घेऊन स्थानिक आमदार व व्यापारी फडणवीस यांचे समोर गेले. मात्र तेथून आश्वासनाशिवाय कृतीचा काहीही दिलासा मिळाला नाही.
Friday, 13 July 2018
त्या १७ जणांना उमेदवारी नाकारणारे कोण ?
इतर पक्षातून आयात झालेल्या मंडळींमुळे भाजप सध्या हाऊसफुल्ल आहे. भाजप - शिवसेना युतीची हाळी देत सुरु झालेली निवडणूक आता स्वबळाच्या हातघाईवर आली आहे. युतीतील ३०/३५ जागांवरुन भाजपने थेट ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. जागा वाढल्यामुळे निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक, माजी पदाधिकारी आदींना उमेदवारी मिळायची अपेक्षा होती. पण उमेदवार निश्चित करणाऱ्या नेत्यांनी ठरवून काहींची उमेदवारी कापली. यात सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांसह २ विद्यमान नगरसेवक, ४ मंडल अध्यक्ष, महिला आघाडी महानगर अध्यक्ष, ४ माजी पदाधिकारी यांची उमेदवारी नाकारली गेली.
Thursday, 12 July 2018
Wednesday, 11 July 2018
दलबदलुंना दारातून परत पाठवा !
जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा पोळा शेवटी फुटला. पोळा हा शब्द येथे उदाहरण म्हणून आहे, तुलनात्मक नाही याचे अगोदर स्पष्टीकरण देतो. बैल आणि माणसांची तर मुळीच तुलना होऊ शकत नाही. मनपा निवडणुकीत जे घडले व घडते आहे ते पाहून बैल पोळ्याची आठवण झाली. पोळ्याच्या दिवशी बैलांविषयी दोनच गोष्टी मालक किंवा गडीच्या हातून घडतात. पहिली म्हणजे, पळवून किंवा मिरवणुकीने ओळखी पाळखीच्या दारी बैलाला नेले जाते. तेथे पूजा करुन पुरणपोळी खाऊ घालतात. 'इच्छा असो वा नसो' बिच्चारा बैल पोळी खात असतो. दुसरी घडणारी गोष्ट म्हणजे, एखाद्या चौकात ग्रामदैवताच्या मंदिराजवळ १०१,२०१ रुपये बक्षीसाचे नारळ दोराला बांधलेले असते. बैलाच्या मागून धावत येणारे मालक वा गडी उडी मारुन ते नारळ तोडतात. जो बैल मालक किंवा गडी नारळ तोडतो, तो बक्षीसाचा मानकरी ठरतो.
Monday, 18 June 2018
जळगाव भाजपतील यादवी ... !
भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा शाखेत उभी फूट पडली आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडलेले मात्र मंत्रीपदाची तीव्र इच्छा आजही बाळगून असलेले एकनाथराव खडसे यांचा एक गट आहे. त्यांच्या सोबत खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे हे दोघेच दिसून येतात. दुसरा गट विद्यमान जल संपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचा आहे. त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जळगाव महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे (कधी इकडे कधी तिकडे) यांच्यासह खासदार ए. टी. पाटील, आमदार उन्मेष पाटील, हरिभाऊ जावळे, सौ. स्मिता वाघ, चंदुभाई पटेल यांचे गूळपीठ दिसते.
Saturday, 16 June 2018
वाकडी येथील दुसरी बाजू ...

Monday, 4 June 2018
असे जिंकले १९७१ चे युद्ध
![]() |
पाकिस्तानी सैन्यदलाची शरणागती |
सन १९४७ मध्ये भारताचे विभाजन होऊन दि. १४ ऑगस्ट १९४७ ला पूर्व
पाकिस्तान (आताचा बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) हे अस्तित्वात
आले. भौगोलिकदृष्ट्या दोन ठिकाणी विभाजीत अशा संयुक्त देशाचे अस्तित्व तेव्हाही
अडचणीचे होते. पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी व पठाणी राजकिय नेत्यांचे पूर्व
पाकिस्तानवर वर्चस्व होते. त्यांची भाषा उर्दू होती. पूर्व व पश्चिम पाकिस्तानची
सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक संस्कृती भिन्नच होती. पूर्व पाकिस्तान नैसर्गिक
स्त्रोतांनी संपन्न होता. तेथे बंगाली नेते राजकिय वर्चस्व ठेवून होते. त्यांची
भाषा बंगाली होती. राजकारणासह सरकारी नोकऱ्यांत पश्चिमी पाकिस्तानी मंडळींचे
वर्चस्व होते. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तान विषयी प्रारंभापासून
नाराजी होती.
Friday, 1 June 2018
ना. गिरीषभाऊंचा अटकेपार झेंडा !
पालघर मतदार संघात भाजप उमेदवार राजेंद्र गावीत यांना विजयी करुन जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्ह्याबाहेरील दुसऱ्या निवडणुकीत नेतृत्वाचा "अटकेपार झेंडा" लावला आहे. नाशिक महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावून ना. महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द खरा करुन दाखविला होता. पालघरचा विजय हा त्यापुढील मोहिम असून आणि बदलत्या वातावरणात शिवसेनेच्या नाकावर टीच्चून जागा कायम राखण्याचे राजकीय कौशल्य ना. महाजन यांनी दाखविले आहे.
Monday, 28 May 2018
राझी चित्रपटाच्या निमित्ताने ...
१९७१ मधील युद्धाचा रंजक, रोमांचक आणि उत्कंठा वाढविणारा इतिहास
![]() |
पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझी |
मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला आणि नौदलातील वरिष्ठ निवृत्त
अधिकारी लेफनन्ट कमांडर हरिन्दर सिक्का यांच्या “कॉलिंग सेहमत” या पुस्तकावर आधारित आणि
अभिनेत्री आलिया भट हिची मध्यवर्ती भूमिका असलेला "राझी" (मराठीत अर्थ
एखादे काम करण्यासाठी राजी होणे) चित्रपट बघितला. बघितला हा शब्द गुळमुळीत
वाटतो. चित्रपट अनुभवला असेच म्हणायला हवे.
Saturday, 19 May 2018
स्फटिकासम मित्र हा !
Tuesday, 15 May 2018
गब्बर के ताप से कौन बचा सकता है ?
जळगाव महानगर पालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील सुमारे २,३०० दुकानदार व त्यांच्यावर अवलंबून असलेली ६/७ हजार कुटुंबे आज व्यापार, व्यवसायाच्या अस्थैर्यामुळे चिंतीत आहेत. शांत आणि संपन्न बाजारपेठ ही सुखी व समाधानी समाज जीवनाचा अविभाज्य अंग असते. व्यापार, व्यवसायात अस्वस्थता असेल तर समाजमनाचा एक कप्पा अंतर्गत धुसमुसत असतो. हा अनुभव सध्या जळगावातील 'ते' २,३०० दुकानदार घेत आहेत. व्यापारी संकुलातील गाळ्यांचे जवळपास ५ वर्षांचे थकलेले भाडे आणि थकलेले इतर कर याचे ओझे डोक्यावर असलेल्या दुकानदारांना आपले काय होणार ? या चिंतेने ग्रासले आहे. कोणत्याही दुकानदाराचा गाळे भोगवटादार म्हाणून हक्क हिरावला जाऊ नये व त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही बहुतांश जळगावकरांची इच्छा आहे.
Sunday, 13 May 2018
नाथाभाऊ, नकाच होऊ मंत्री !
स्वकीयांनी उपेक्षा केलेल्या दोन 'हेवीवेट' नेत्यांबाबत योगायोगाच्या गोष्टी अलिकडे घडल्या आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरुन कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना जवळपास अडीच वर्षानंतर जामीन मिळाला. भुजबळ मूळ खटल्यातून निर्दोष सुटलेले नाहीत. भुजबळ जामीनावर बाहेर आलेत यावर ज्येष्ठनेते शरद पवार यांची सूचक प्रतिक्रिया आहे. पवार म्हणाले, 'भुजबळ बाहेर आल्याचा आनंद आहे पण जेव्हा मूळ खटल्यातून ते निर्दोष बाहेर येतील तेव्हा मला हर्षवायू होईल.' पवार यांचे हे सूचक वाक्य खटला अजून निकाली निघाला नाही याची जाणीव करुन देतो. 'ईडी' च्या चौकशी फेऱ्यात अडकल्यानंतर पक्षश्रेष्ठी व स्वकीयांनी भुजबळांची फारशी पाठराखण केल्याचे दिसलेले नाही.
Sunday, 29 April 2018
काश्मिरमधील विवाहितांची दुसरी बाजू - हाफ विडो
पुनीत शर्मा यांची नवी कादंबरी
कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे केलेल्या खुनाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेत जम्मू-काश्मिरमधील समाज जिवनाचे काळेकुट्ट प्रतिबिंब उमटले आहे. मुस्लिम-हिंदू समाजातील वर्चस्वाचा वाद, दुसऱ्या समाजाला घाबरवण्यासाठी केलेला गुन्हेगारी कट, गुन्हेगारांना पोलिसांची मदत आणि गुन्हेगारांना संरक्षणासाठी निर्माण केलेले जनमत असे ठळक विषय कठुआ घटनेत समोर येतात. याच पार्श्वभूमीवर जळगावचे लेखक पुनीत शर्मा यांनी 'हाफ विडो' ही काश्मिरात घडणाऱ्या काल्पनिक कथाबिजावर आधारलेली कादंबरी मला वेगळी वाटते. अर्थात, कठुआ प्रकरण घडण्यापूर्वी ही कादंबरी मी वाचली आहे. पुनीत शर्मा यांची ही दुसरी साहित्यकृती. यापूर्वी त्यांचे 'एनिमी ईन मी' हे स्वयंशोधाचे समुपदेशनात्मक पुस्तक बाजारात आले आहे.
कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे केलेल्या खुनाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेत जम्मू-काश्मिरमधील समाज जिवनाचे काळेकुट्ट प्रतिबिंब उमटले आहे. मुस्लिम-हिंदू समाजातील वर्चस्वाचा वाद, दुसऱ्या समाजाला घाबरवण्यासाठी केलेला गुन्हेगारी कट, गुन्हेगारांना पोलिसांची मदत आणि गुन्हेगारांना संरक्षणासाठी निर्माण केलेले जनमत असे ठळक विषय कठुआ घटनेत समोर येतात. याच पार्श्वभूमीवर जळगावचे लेखक पुनीत शर्मा यांनी 'हाफ विडो' ही काश्मिरात घडणाऱ्या काल्पनिक कथाबिजावर आधारलेली कादंबरी मला वेगळी वाटते. अर्थात, कठुआ प्रकरण घडण्यापूर्वी ही कादंबरी मी वाचली आहे. पुनीत शर्मा यांची ही दुसरी साहित्यकृती. यापूर्वी त्यांचे 'एनिमी ईन मी' हे स्वयंशोधाचे समुपदेशनात्मक पुस्तक बाजारात आले आहे.
Thursday, 26 April 2018
पांडुरंग भेट व्हाया गांधी ...
![]() |
किशोर राजे निंबाळकर पांडुरंगाची मूर्ती भेट देताना. |
Wednesday, 25 April 2018
शेतकऱ्यांची पिढी घडविताना ...
Tuesday, 24 April 2018
रस्त्यावर थुंकणारे विषारी नाग, कोळीचे वारस !
आपण रस्त्याने चालत असलो किंवा दुचाकी वाहनावर असलो, की आपल्या पुढच्या दुचाकीवरील किंवा चार चाकीतील एखादा माणूस पचकन रस्त्यावर थुंकतो. वाऱ्याच्या वेगासोबत थुंकीचे थेंब आपल्या शरीर व कपड्यांवर उडतात. हा अनुभव भयंकर असतो. बहुतांशवेळा थुंकणाऱ्याला त्याने असा काही अपराध केला याची लाजलज्जा नसते. एखाद दुसरा दुचाकीस्वार वाहन वेगाने दामटून थुंकणाऱ्याला समजही देतो. पण रस्त्यावर थुंकण्याची ही सवय संबंधितांना एखाद्या आजारागत शरीरात भिनलेली असते. शिव्या खाऊनही तो काही सुधारत नाही. मला असे अनुभव नेहमी येतात.
Friday, 20 April 2018
असिफा, आम्ही सारेच दोषी !
जम्मुतील कठुआ जिल्ह्यातील रायसना गावातील बंजारा बकरवाल समाजाच्या पशूपालक कुटुंबातील अवघ्या आठ वर्षांच्या असिफा बानो या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या केल्याच्या घटनेने संवेदनाशील असलेल्या प्रत्येक माणसाचे हृदय हेलावले आहे. तब्बल तीन- साडेतीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेविषयी चर्चा करताना अनेक विषयांवर समाज विभाजीत होताना दिसतो आहे. पीडित असिफा ही मुस्लिम समाजाची तर संशयित क्रूर आरोपी हे हिंदू समाजाचे आहेत. विभाजीत एक गट असा धर्माशी संबधित आहे. कट्टर हिंदुत्त्ववादी मंडळी असिफा बानोशी घडलेल्या अत्याचाराचा दोष जम्मुतील सध्याच्या परिस्थितीला देतात. घुसखोरी व दहशतवादी कारवायांना समर्थन देणाऱ्या स्थानिक लोकांच्या कृत्याचे भोग असिफाच्या नशिबी असल्याचा दावा हिंदुत्व संघटन करते. दुसरीकडे पुरोगामी, समाजवादी मंडळी असिफावरील अत्याचाराचा दोष कट्टर पंथियांना लावते. तिसरी अजून एक विभागणी आहे. ती म्हणजे, जम्मू- काश्मीरमधील मुस्लिम हा स्वतःला भारतीय समजतो का ? या प्रश्नाच्या उत्तरात आहे. असिफा बानोवरील अत्याचारासाठी देशभरातील जनता अश्रू गाळते आहे. मोर्चा, निषेध व मेणबत्ती मार्च निघतोय. पण देशात इतरत्र होणाऱ्या अशा अत्याचाराच्या घटनांसाठी जम्मू- काश्मीरातील नागरिक भारतीयांसाठी अश्रू गाळतात का ? याचे सुध्दा उत्तर अपेक्षित आहे. अजून एक विभाजित गट हा मानवतावादी दृष्टीकोनाचा आहे. अत्याचार पीडित मुलगी कोणत्याही समाजाची व प्रांताची असो, तिच्यावर झालेले अत्याचार हे अमानविय असून त्याचा निषेध झालाच पाहिजे. या शिवाय, संशयित आरोपींवरील आरोप लवकर सिध्द करुन त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळायला हवी, असे या गटाला वाटते. आता राहिला शेवटचा एक गट. तो म्हणजे, सध्या देशात काहीही झाले तरी त्याचा दोष केंद्रातील सरकार व पंतप्रधानांचा असल्याचे ठासून सांगणारा गट.
Sunday, 15 April 2018
जैन बंधू आणि पवारसाहेब!
जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या पश्चात जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचा अखिल भारतीय पातळीवरील कृषि क्षेत्रातील अग्रगण्य व अत्यंत प्रतिष्ठेचा 'पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान झाला. स्व. मोठेभाऊंच्या पश्चात पवार यांच्या उपस्थितीत झालेला हा पहिला कार्यक्रम. स्व. मोठेभाऊंच्या आठवणींनी पवार गहिवरले होते. अशोकभाऊ, अनिल, अजित व अतुल या जैन बंधुंनी स्व. मोठेभाऊंच्या पश्चातही त्यांच्या कार्याचा वसा अधिक उत्तमपणे जपल्याबद्दल पवार यांनी जाहिरपणे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली. पवार साधारणतः २५ मिनिटे बोलले. त्यात त्यांनी स्व. भवरलालजींशी असलेल्या मैत्रीतील अनेक हळवे प्रसंग सांगितले. त्याचवेळी नव्या पिढीने पवार - जैन कुटुंबाचा ऋणानुबंध कायम ठेवल्याचा उल्लेखही केला.
Saturday, 14 April 2018
'दमाने या' बाईंची दमनगिरी ...
कोणत्या नेतृत्वाचा उदय कोणत्या परिस्थितीतून होतो, यावर त्या नेत्याची सामाजिक प्रतिमा आणि नेतृत्व वाहून नेण्याचा काळही ठरतो. एखाद्या सनसनीखेज घटनेतून झपाट्याने पुढे आलेल्या नेत्या भोवती समर्थकांची थोडी बहुत गर्दी होते. ही गर्दी सामान्य माणसाचे लक्ष वेधून घेते पण सामान्य माणूस त्या गर्दीचा भाग होत नाही. नंतर काळाच्या प्रवाहात नेते मंडळी विचारांनी खुजे असल्याचे समाजाला जाणवू लागते. आपल्यापासून समाज लांब जातोय असे दिसू लागले की, खुज्या नेतृत्वाचे सामाजिक उपद्रव मूल्य सुरु होते. हे उपद्रव मूल्य दोन प्रकारात असते. पहिला प्रकार म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करायला लावणारे मुद्दे मांडून सद्भाव व ऐक्य नष्ट करणे. जसे, गुजरात व राजस्थानमध्ये सामाजिक आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन हिंसक आंदोलने केली गेली. उपद्रवाचा दुसरा प्रकार म्हणजे, व्यक्तिद्वेषाचे मुद्दे हाती घेऊन एखाद्या व्यक्तिला सतत अडचणीत आणणे. या प्रकारची उदाहरणे दिल्ली पासून गल्लीपर्यंत भरपूर आहेत.
Thursday, 12 April 2018
जामनेरची कुस्ती निकाली काढणारे गिरीषभू ...

Tuesday, 3 April 2018
कोणीही यावे टपली मारुनी जावे ...
जळगावचे बुजूर्ग नेते एकनाथराव खडसे सध्या दोन विषयांमुळे चर्चेत आहेत. एक तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर नमस्कारासाठी झुकल्यामुळे आणि दुसरा विषय २१ आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या खोट्या बातमीमुळे. या दोन्ही बातम्यांविषयी खडसेंनी खुलासे केले आहेत. किंबहुना त्यांनी ते वेळीच करणे आवश्यक होते. खडसेंची आजची अवस्था ही त्यांनी स्वतः ओढवून घेतलेली आहे. त्यांच्या काही उत्साही समर्थकांनी ही वेळ खडसेंवर आणली आहे.
Thursday, 1 March 2018
धूलिवंदन असे करा साजरे !
भारतीय सण उत्सव साजरे करताना मातृका (माती) पुजनाच्या काही परंपरा आजही कायम आहेत. शेतकरी पेरणीपूर्वी पूजा करतो. उद्योजक किंवा घर बांधकाम करणारी व्यक्ती काम सुरु करण्यापूर्वी मातीचे पुजन करतो. धूळवड किंवा धूलिवंदन याच परंपरेतील उत्सव आहे. होळी हा मूलतः जनसामान्यांचा उत्सव आहे. ती साजरी करण्यामागे पारंपरिक कथा आहेत. त्यासोबत साजरे होणारे धूलिवंदन म्हणजे जमिन-मातीला नमस्कार करण्याचा दिवस. त्या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावे असे संंकेत रूढ आहेत.
Saturday, 24 February 2018
"गोतावळा" निर्मितीची प्रेरणा !
श्रद्धेय मोठेभाऊ तथा पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या द्वितीय श्रद्धावंदनदिनी आज (दि. २५ फेब्रुवारी) माणसांचे रंग टीपणाऱ्या माझ्या तिसऱ्या पुस्तक "गोतावळा" चे प्रकाशन होते आहे. माझ्यासाठी हा दुग्धशर्करा योग आहे. तो कसा, हे सुद्धा सांगायला हवे. "गोतावळा" पुस्तकात समाविष्ट ५२ व्यक्तिमत्त्वांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची साखर पेरणी पानोपानी आहे. अशा शर्करायुक्त पुस्तकाचे प्रकाशन समाजाप्रति नेहमी दातृत्वाची साय देणाऱ्या मोठेभाऊंच्या श्रध्दावंदनदिनाला व्हावे हाच तर दुग्ध शर्करा योग आहे.
Sunday, 18 February 2018
छत्रपती शिवरायांचे सोशल इंजिनियरींग ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास देशी आणि विदेशी अभ्यासकांनी वेगवेगळ्या विषयांवर सखोलपणे केला आहे. शिवरायांच्या शौर्यगाथेचे जेव्हा वाचन केले जाते तेव्हा त्यातील नाविन्यपूर्ण विषय नेहमी समोर येत असतो. शिवचरित्र हे एकमेव असे चरित्र आहे की, ज्यात अनेक विद्याशाखांच्या मूलभूत सिद्धांतांची कृतिशीलता सिद्ध होते. कोणत्याही क्षेत्रात यश अथवा निर्धारित उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सोशल इंजिनिअरींग करणे आवश्यक ठरते.
Saturday, 10 February 2018
सोनेबाजाराचे एनसायक्लोपीडिया
जळगाव शहरातील पत्रकारितेत मला २२-२३ वर्षे झाली आहेत. या प्रवासात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्री झाली. कधी बातम्यांच्या विषयानिमित्त तर कधी जाहिरात अथवा इव्हेंट आयोजनाच्या निमित्त. अशा मान्यवरांमध्ये सर्वांत बुजूर्ग मार्गदर्शक जर कोणी असेल तर ते आहेत, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संस्थापक तथा विस्तार करणारे स्वतः श्री. रतनलालजी बाफना तथा भाईसाहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचे अभीष्टचिंतन करताना त्यांच्या प्रवासातील काही प्रसंग इतरांना सांगायला हवेत.
Friday, 9 February 2018
नाथाभाऊ की जय हो !
विशाल खान्देशचे पॉवरफूल्ल नेते व सध्या भाजपतील सर्वाधिक अन्यायग्रस्त नाथाभाऊ खडसे यांचा "विजय असो" असे मनापासून म्हणावेसे वाटते आहे. सत्तेत असले आणि सत्तेत नसले तरी नाथाभाऊंचे मुंबई मंत्रालय ते दिल्ली मंत्रालयात जबरदस्त वजन आहे. अशा लोकनेत्याची "जय हो" म्हणताना कारणही तसेच भव्य आणि दिव्य गवसले आहे. जळगाव शहरालगत महामार्ग विस्तारिकरणासाठी मिळालेला १०० कोटी रुपयांचा निधी ना. नितीन गडकरींनी परत घेण्याची किमया केवळ आणि केवळ नाथाभाऊंच्या वजनामुळे साध्य करुन दाखवली आहे. ज्या पालकमंत्र्यांनी, ज्या जलसंपदामंत्र्यांनी व ज्या खासदार, आमदाराने पत्रकार परिषदांमध्ये "डिंग्या हाणत" म्हटले होते की, महामार्ग विस्तारासाठी १०० कोटी रुपये आम्ही आणले, त्यांच्या नाकांवर टीच्चून नाथाभाऊंनी हा निधी परत घ्यायला लावला आहे. नाथाभाऊंच्या जवळपास अर्ध शतकी राजकारणातील ही "सर्वांत मोठी अचिव्हमेंट" म्हणावी लागेल. इतर नेते विकास निधी मी आणला असे डंका वाजवून सांगतात. पण नाथाभाऊंची इतिहासात नोंद झाली ती, होय मी परत नेला हे सांगताना.
Sunday, 4 February 2018
सुमार दर्जाचा तद्दन मसालापट ... पद्मावत !

Wednesday, 31 January 2018
Monday, 29 January 2018
सौंदर्याची कार्यव्रती सौ. संगिता पाटील
मित्रांच्या गोतावळ्यातील जुन्या परिचित मैत्रिण तथा जळगाव शहरातील मोजक्या
सेलिब्रिटी वर्तुळातील सौ. संगिता प्रमोद पाटील यांचा आज वाढदिवस. जळगाव शहरातील
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांना सर्वजण आदराने संगितामैम म्हणतात. व्हीआयपी
मंडळींच्या व्हाट्सऍप गृपमध्ये मी त्यांना संगिताबाई म्हणत असे. अर्थात, त्यांनी
कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही. या मागील कारण होते की, मैम या शब्दात असलेला
औपचारिकपणा हा बाई शब्दांतून गळून पडतो. बाई हे मराठी संवादातही अधिकाराचेच पद
आहे. त्यामुळे सौ. संगिताबाईंनी कधीही माझ्या लेखनावर आक्षेप घेतला नाही. त्यांचे
पती व सहकार कायद्याचे विधीज्ञ प्रमोद पाटील यांच्याशीही माझा असाच मोकळाढाकळा
परिचय आहे.
Subscribe to:
Posts (Atom)