![]() |
दक्षिण गुजरातमध्ये भाजपच्या २४ जागा जिंकून आणणारी कामगिरी करणारे प्रभारी डॉ. राजेंद्र फडके (मध्यभागी) यांचा सत्कार करताना मित्र मंडळी |
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष
लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. सन २०१२ मध्ये निवडणूक
झालेल्या व आताच्या मावळत्या विधानसभेत एकूण १८२ पैकी ११५ जागा भारतीय जनता पक्षाच्या
पारड्यात होत्या. आज निकाल लागताना एकूण १८२ पैकी जवळपास ९९ जागा जिंकून भाजपने
सत्ता आपल्याच हाती राखण्यात यश मिळविले आहे. साध्या बहुमतासाठी ९२ जागा जिंकणे
आवश्यक होते. भाजपने त्यापेक्षा ७ जागा जिंकल्या आहेत. (यात अंतिम निकालात
एखाद-दोन जागांचा फरक शक्य आहे) गुजरात राज्यात भाजपचा हा सलग सहावा विजय आहे. गेली
२२ वर्षे तेथे भाजप सत्तास्थानी आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे
अध्यक्षपद स्वीकारणारे राहुल गांधी, पटेल आरक्षणाचा मुद्दा मांडणारा हार्दिक, ओबीसींचा
नेता अल्पेश ठाकोर व दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी गुजरातचे मूळ असलेल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना प्रचारात घाम
फोडला होता. गुजरातमध्ये परिवर्तन घडेल अशी हवा निर्माण केली होती. काही अंशी या
चौघांच्या युतीने भाजपची जवळपास १६ जागंवर पिछेहाट केली पण सत्तापरिवर्तन करण्याचे
यश त्यांना मिळाले नाही. मागील निवडणूक निकालाशी तुलना केल्यास भाजपने यावेळी
सत्ता कायम राखली असली तरी जवळपास १६ जागा कमी गमावल्या आहेत. दुसरीकडे
काँग्रेसच्या जागा मागील निकालाच्या तुलनेत १८ ने वाढल्या आहे. युद्धात आणि प्रेमात
विजय हा विजय असतो, या न्यायाने गुजरातची निवडणूक ही पुन्हा मोदी-शहा-भाजप या
त्रिकुटाने जिंकली आहे.
![]() |
पंतप्रधान मोदींसोबत डॉ. फडके |
गुजरातच्या निवडणुकीत
काँग्रेस सोबत इतर युवा नेत्यांनी भाजप विरोधाच्या प्रताराची हवा भरली होती.
काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या सोबतच्या नेत्यांना
भाजपमुक्त भारतचे स्वप्न पडायला लागले होते. ज्या गुजरात विकास मॉडेलचा वापर करुन
मोदी पंतप्रधान झाले त्याच गुजरात मॉडेलचा खेटेपणा दाखवून गुजरात जिंकू असा भ्रम
काँग्रेससह इतर विरोधकांनी निर्माण केला होता.
मात्र, गुजराची निवडणूक
भाजपने कशा पद्धतीने जिंकली याची माहिती डॉ. फडके यांच्या केलेल्या नियोजनबद्ध
प्रचारातून दिसते. गेले ३ महिने डॉ. फडके हे दक्षिण गुजरातेत ठाण मांडून होते.
पक्षाने ग्रामीण भागात शक्तीकेंद्र आणि शहरी भागात वॉर्डनिहाय बूथची रचना केली
होती. मतदानाच्या प्रत्येक बूथवर मतदार यादी डोळ्यांसमोर ठेवून एका पानावरील किमान
४८ मतदारांची जबाबदारी ५ जणांकडे सोपविली होती. त्यामुळे मतदारापर्यंत पोहचणे व
त्यांना पक्षासाठी पूरक करुन मतदानासाठी आणणे हे काम शेवटपर्यंत पार पाडले गेले.
याचा परिणाम असा झाली की, दक्षिण गुजरामध्ये भाजप किमान २४ जागा राखू शकला.
भाजप निवडणूक पूर्व तयारी
करताना मोबाइलवर क्रियाशील सदस्य नोंदणीस प्राधान्य देत असतो. याकडे इतर विरोधी पक्ष
उपरोधिकपणे पाहतात. पण या माहितीचा वापर करुन भाजप बूथनिहाय व आता पेजनिहाय
जबाबदारी वाटप करीत आहे. त्यातून मिळणारे यश लागोपाठ महाराष्ट्र, उत्तरप्रदेश,
मध्यप्रदेश, राजस्थान व आता गुजरात या मोठ्या राज्यांमध्ये दिसले आहे.
![]() |
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोबत डॉ. फडके |
दक्षिण गुजरातमधील या
निकालात डॉ. राजेंद्र फडके यांचे पेजनिहाय नियोजन उपयुक्त ठरले. गेल्या १५-१६
वर्षांत भाजपच्या संघटनात्मक आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यात डॉ. फडके यांनी
अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मुक्ताईनगर मतदार संघात मंडल निरीक्षक म्हणून
काम सुरू केलेल्या डॉ. फडके यांनी मंडल सरचिटणीस, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष, भाजप
प्रदेश सदस्य, जिल्हा संघटक, विभाग सह संघटक, प्रदेश सहमंत्री आणि अलिकडे विधानसभा
निवडणुकीत ठराविक प्रांतासाठी प्रभारी म्हणून काम केले आहे. डॉ. फडके यांना
गुजरातच्या ४, मध्य प्रदेशच्या ५, गोवाच्या ४, कर्नाटकच्या १ निवडणुकांचा अनुभव
आहे. या शिवाय त्यांनी आसाम, उत्तर प्रदेश, उत्तरांचल व हिमाचल प्रदेशातही
निवडणुकीचे काम केले आहे. गोवानंतर उत्तरप्रदेश व आता गुजरात अशा तीन
निवडणुकांमधील यशाची हॅट्रीक्ट डॉ. फडके यांन
संघटनात्मक प्रमुख म्हणून अनुभवली आहे. मोदी व शहा यांच्या निवडणूक
व्यवस्थापनाचे अनेक पैलू डॉ. फडके बारकाव्याने सांगतात. गुजरात निवडणुकीत दक्षिण
गुजरात सर करणारा हा सेनापती जळगाव शहरात व जिव्ह्यात भाजपच्या कामगिरीविषयी
चक्कार शब्द बोलत नाही. जळगावचा विषय काढला की, ते म्हणतात, मी उजव्या कानाने
बहिरा आहे.
जय गूरूदेव...
ReplyDelete