Wednesday, 20 December 2017

गुजरात के चुनावी तोलकाटे पर महाराष्ट्र !

गुजरात विधानसभा चुनाव के नतिजे सामने आए है ।गुजरात पर २२ साल से सत्ता बनाये भाजपा को गुजरात के मतदाताओंने फिरसे ५ साल सत्ता चलाने का विकल्प चुना है । गुजरात के जीत के साथ देश के उपरी हिस्सेवाले हिमाचल प्रदेश की विधानसभा भाजपाने काँग्रेस के हाथों छीन ली है । गुजरात में भाजपाके अल्प संख्यात्मक विजय की चर्चा कई मुद्दे लेकर जैसे गर्मा रही है वैसे दुसरी ओर हिमाचल प्रदेश में काँग्रेस के पराजय की बात पर सभी राजकीय विश्लेषक मौन धारण कर बैठे है ।

Monday, 18 December 2017

दक्षिण गुजरात जिंकणारा सेनापती ...

दक्षिण गुजरातमध्ये भाजपच्या २४ जागा जिंकून आणणारी
कामगिरी करणारे प्रभारी डॉ. राजेंद्र फडके (मध्यभागी)
यांचा सत्कार करताना मित्र मंडळी
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. सन २०१२ मध्ये निवडणूक झालेल्या व आताच्या मावळत्या विधानसभेत एकूण १८२ पैकी ११५ जागा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात होत्या. आज निकाल लागताना एकूण १८२ पैकी जवळपास ९९ जागा जिंकून भाजपने सत्ता आपल्याच हाती राखण्यात यश मिळविले आहे. साध्या बहुमतासाठी ९२ जागा जिंकणे आवश्यक होते. भाजपने त्यापेक्षा ७ जागा जिंकल्या आहेत. (यात अंतिम निकालात एखाद-दोन जागांचा फरक शक्य आहे) गुजरात राज्यात भाजपचा हा सलग सहावा विजय आहे. गेली २२ वर्षे तेथे भाजप सत्तास्थानी आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणारे राहुल गांधी, पटेल आरक्षणाचा मुद्दा मांडणारा हार्दिक, ओबीसींचा नेता अल्पेश ठाकोर व दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी गुजरातचे मूळ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना प्रचारात घाम फोडला होता. गुजरातमध्ये परिवर्तन घडेल अशी हवा निर्माण केली होती. काही अंशी या चौघांच्या युतीने भाजपची जवळपास १६ जागंवर पिछेहाट केली पण सत्तापरिवर्तन करण्याचे यश त्यांना मिळाले नाही. मागील निवडणूक निकालाशी तुलना केल्यास भाजपने यावेळी सत्ता कायम राखली असली तरी जवळपास १६ जागा कमी गमावल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या जागा मागील निकालाच्या तुलनेत १८ ने वाढल्या आहे. युद्धात आणि प्रेमात विजय हा विजय असतो, या न्यायाने गुजरातची निवडणूक ही पुन्हा मोदी-शहा-भाजप या त्रिकुटाने जिंकली आहे.

Saturday, 16 December 2017

संयमाचा महामेरु प्रदीपभाऊ !!

जळगाव शहरात सन १९९१ ते १९९४ दरम्यान पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. तो काळ जळगाव शहरात प्रचंड घडामोडींचा होता. जळगाव शहर आणि सहकार क्षेत्रावर पकड होती सुरेशदादा जैन आणि त्यांच्या समर्थकांची. राज्यातले तत्कालिन सरकार होते शरद पवार यांचे. थेट पवार यांच्याशीच सुरेशदादांचा पंगा होता. त्यामुळे या सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री अरुण गुजराथी आणि सुरेशदादांचे संबंध ताणलेले होते. तत्कालीन विधानसभाध्यक्ष असलेले स्व. मधुकरराव चौधरी यांच्याशी सुरेशदादांचे कधीच जमले नाही. सुरेशदादा स्वतःच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना हंगामासाठी कर्जाची गरज असल्याने अध्यक्ष मंडळीही सुरेशदादांच्या दरबारात असत. जिल्हा दूध संघही त्यांच्याच ताब्यात होता. नाही म्हणायला पवार समर्थक असलेले ईश्वरलाल जैन विरोधात होते.

Thursday, 7 December 2017

लिमजीचे आनंददायी स्मरण ...

जैन उद्योग समुहाचा कर्मचारी लिमजी जलगाववाला हा सच्चा पर्यावरणवादी कार्यकर्ता होता. त्याच्या स्मृती ताज्या होण्याचे कारण म्हणजे, लिमजी जलगाववालाच्या नावाने जैन उद्योग समुहाने पुरस्कृत केलेल्या पर्यावरण क्षेत्रातील विविध कार्यासाठीच्या पुरस्कारांचे व सन्मानचे वितरण जळगाव येथे दि. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाले. लिमजीच्या निधनानंतर झालेल्या सभेत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी अशा प्रकारचे पुरस्कार देण्याची इच्छा बोलून दाखविली होती. त्यानुसार वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात लिमजीच्या नावाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. हाच प्रसंग लिमजीच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि आनंददायी होता. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर श्री. अशोक जैन यांनी असेही घोषित केले की, लिमजीच्या नावाचे पुरस्कार भविष्यातही सुरु राहतील आणि त्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील निवड करावयाच्या व्यक्ती, समुह याचा दर्जाही उंचावत नेला जाईल.