ब्राह्मण समाजातील पोट जातींमधील कर्मकांडाच्या वादावर आधारलेल्या दशक्रिया या चित्रपटाला ब्राह्मण समाजाकडून विरोधाचे वातावरण आहे. विषय ब्राह्मणांशी संबंधित असल्यामुळे इतर मंडळींनी दशक्रिया चित्रपट प्रदर्शनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत ब्राह्मण द्वेषाचे बी पेरणारी विचारधारा विस्तारते आहे. ज्यांचे राजकारण जात व समाजावर आधारलेले आहे अशी राजकीय मंडळी सतत अस्वस्थ आहे. समाज आधारित पक्षीय राजकारण आणि संघटीत झुंडशाही निर्धारित राजकारण असे दोन्ही कार्ड वापरुन सुध्दा गावपातळी पासून तर मंत्रालयापर्यंतची सत्ता मिळू शकत नाही अशा आगतिकतेतून ब्राह्मणांच्या द्वेषाच्या अनेक जागा शोधल्या जात आहेत. याच द्वेषाची किनार दशक्रिया चित्रपट सादर व्हावा या भूमिके मागे असावी ?
ब्राह्मण समाज पूर्वापार कर्मकांड हेच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन मानत आला असा एक "अप समज" इतरांचा आहे. काळाचा प्रवाह झपाट्याने वाहत असताना ब्राह्मण समाज शिक्षणाची वाट धरुन विविध क्षेत्रात बाबुगिरी करु लागला. हे क्षेत्र खासगी ते सरकारी असे विस्तारलेले आहे. जात, समाजाच्या मतांवर सत्तेच्या खूर्ची मिळवण्यात मश्गुल असलेल्यांना शिक्षण घेवून प्रशासनात मक्तेदारी निर्माण करता येते हे लक्षात आलेले नाही. शिक्षणाची क्रिया बुद्ध्यांकशी संबंधित आहे. तेथे बहुजन असण्याला महत्त्व नाही. राजकारणाच्या क्रियांना आजही आरक्षणात गुंतवायचे कामच केले जात आहे.
विषय आहे दशक्रिया चित्रपटाचा. दशक्रिया म्हणजे मानवाच्या मृत्यूनंतर केले जाणारे कर्मकांड. अशा प्रकारे कर्मकांड करावे की नाही हा ऐच्छिक विषय आहे. त्याची सक्ती असलेले एखादे गाव महाराष्ट्रात आहे का ? उत्तर नाहीच असणार. प्रत्येक समाजात जाती व पोट जाती आहेच. त्यानुसार तशा पोटजाती ब्राह्मणात ही आहेत. देव - देवळांशी करायचे कर्मकांड आणि मर्तिकाचे व नंतरचे कर्मकांड करण्याची विभागणी या पोट जातींमध्ये आहे. कर्मकांड करणे म्हणजे पौराहित्य करणे. पूजापाठ करणे. पण बदलत्या काळात या पौराहित्याचा अधिकार आता महिलांपासून तर इतर समाज घटकांनाही प्राप्त झाला आहे. वैदिक विधी सर्वांना शिकता येतील असे वर्ग सुरु झाले आहेत. पंढरपुरात महिला व इतर समाजाचे पुरोहित नेमले गेले आहेत. शनिशिंगणापुरात बहुजन समाजाचेच पुरोहित आहेत. बदलत्या काळात पौराहित्याचा हा अधिकार ब्राह्मणांसाठी आरक्षित म्हणून ठेवा या मागणीसाठी कुठे मोर्चा निघाला आहे का ? या प्रश्नाचे उत्तर नाहीच येणार.
मुळात ब्राह्मण समाजातील युवा पिढी सुध्दा या कर्मकांडाच्या पिढीजात कार्यात उतरायला तयार नाही. त्यातही मर्तिकाचे कार्य तर कोणीही स्विकारायला तयार नाही. आज जी मंडळी यात गुंतली आहे, त्यांचेच काही वारस अनिच्छेने या कार्यात आहेत. ब्राह्मणांच्या कर्मकांड व दक्षिणेचा मुद्दा ठळकपणे प्रसिध्द देव - देवळांच्या परिसरात जाणवतो. तेथील मूठभर ब्राह्मण हे टीकेचा विषय ठरतात. त्याच वेळी मंदिराबाहेर फूल, प्रसादापासून इतर व्यवसाय करणाऱ्यांच्या मनमानीवर कोणीही बोलत नाही. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील अर्थ व्यवस्था सुध्दा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे का ? या प्रश्नाचे उत्तर सुध्दा नकारार्थीच असेल.
दशक्रिया चित्रपटात ब्राह्मणांच्या पोट जातीतील भांडण आहे. या भांडणाच्या संवाद फेकीतून अंधश्रेध्देवर प्रहार आहेत. विशिष्ट विधीसाठीच्या अडवणुकीवर टीका आहे. या चित्रपटाला विवेकी आणि बुध्दीवादी ब्राह्मणांनी विरोध करायचे कारण नाही. उलटपक्षी अशा चित्रपटांमुळे ब्राह्मणांची भावी पिढी सजग होते. कालबाह्य होणाऱ्या विधी परंपरापासून सुटका करुन घेण्याचा निश्चय अशा विषयांमधून करता येतो. पौराहित्य सोडून इतर क्षेत्रात बुध्दीच्या बळावर संधी निर्माण करण्यामागे भावी पिढीने लागायला हवे. यापूर्वी घाणेरड्या राजकारणावर आधारलेले अनेक चित्रपट आले. त्यातील नेते मंडळींचे चित्रण सुध्दा सांकेतिक होते किंवा असते. असे वारंवार पाहूनही संबंधित प्रवृत्ती सुधारते का ? सावरते का ? शिक्षणसम्राट म्हणून मिरवणाऱ्या अनेक राजकारणी मंडळींच्या शाळा - महाविद्यालयात डोनेशन देवून कोण शिक्षण घेते ? तेथील मास्तर, प्राध्यापकात प्रशासक कोण असतात ? याचाही विचार दशक्रिया समर्थक आणि विरोधकांनी करावा. माध्यमांच्या क्षेत्रात प्रारंभीचा संघर्ष करुन किती जण वरिष्ठ पदापर्यंत पोहचतात याचा ही कधीतरी विचार करायला हवा. असे जवळपास सर्वच क्षेत्रातील चित्र आहे. माध्यमांमध्ये कोणतेही पद आरक्षणाच्या टक्केवारीत कोणीही मिळवू शकत नाही.
ब्राह्मणांमधील देव पुजावाले आणि मर्तिकाची पूजा विधीवाले यांच्यातील संघर्षाचा विषय सन १९८१ मध्ये प्रेमानंद गज्वी यांच्या किरवंत या नाटकात मांडला होता. मृताच्या नावे पिंडाला दर्भाचा कावळा करून आत्म्यास मुक्ती मिळवून देणारे म्हणजे किरवंत. हे नाटक डॉ. श्रीराम लागू आणि सुहाज जोशी यांनी प्रत्ययकारी पध्दतीने सादर केले. या नाटकाला विरोध झाला नाही किंवा समर्थन झाले नाही. याच विषयाचा धागा पकडून सन १९९५ मध्ये बाबा भांड यांनी "दशक्रिया" ही कादंबरी लिहीली. त्या कादंबरीवर आधारलेला दशक्रिया हा चित्रपट आहे. आपापसातील वैमनस्यातून दशक्रिया विधी करायला नकार देणारा किरवंत आणि इतरांमधील नाट्यमय संघर्ष चित्रपटात आहे.
खरे तर सर्व प्रकारच्या कर्मकांडावर आपल्या संत, समाज सुधारकांनी यापूर्वी कडवे प्रहार केले आहेत. यात कबीर, नामदेव, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फूले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश आहेच. कालप्रवाहातील अशा टीका - टीपणी स्वीकारुन ब्राह्मणांचे कर्मकांड सुरुच आहे. अंधश्रध्दा निर्मूलन कायदा झाला. शिक्षांची तरतुद आहे. तरी सुध्दा देव - देवळातील गर्दी कमी होत नाही. मंदिरे उभारणे सुरुच असते आणि नित्य पूजापाठला ब्राह्मण भेटत नाही. हे सर्व वास्तव आहे.
अशा सामाजिक वातावरणात दशक्रिया या चित्रपटाला ब्राह्मणांनी विरोध करुच नये हे माझे व्यक्तिगत मत आहे. सैराट चित्रपटात मुलगी अमक्या समाजाची दाखविली म्हणून विरोध करणाऱ्यांची मानसिकता ब्राह्मणांनी दाखवूच नये. दशक्रिया सारखे चित्रपट भावी पिढीला जरुर दाखवा. त्यातून परिवर्तनाचे बी मुलांच्या मनांत रुजले तरी फायदा ब्राह्मणांचाच आहे. हेच वास्तव आपण स्वीकारु या !!!

No comments:
Post a Comment