Monday, 27 November 2017

ना. गिरीषभाऊ ! टू राईट अॉर नॉट राईट ?

संपूर्ण राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प करुन वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन आणि त्यांची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या संकल्पनेचे मूळ जनक ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने व विक्रमी शल्यचिकित्सक डॉ. रागिनी पारेख हे दोघेही दिवसाला २०० वर रुग्णांचे मोतीबिंदू काढत आहेत. ज्येष्ठ व सर्वांत बुजूर्ग समाजसेवक अण्णा हजारे यांनी ना. महाजन यांच्या आरोग्य महाशिबिर आयोजनाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

Wednesday, 22 November 2017

"दशक्रिया" ला विरोध कशासाठी ?

ब्राह्मण समाजातील पोट जातींमधील कर्मकांडाच्या वादावर आधारलेल्या दशक्रिया या चित्रपटाला ब्राह्मण समाजाकडून विरोधाचे वातावरण आहे. विषय ब्राह्मणांशी संबंधित असल्यामुळे इतर मंडळींनी दशक्रिया चित्रपट प्रदर्शनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत ब्राह्मण द्वेषाचे बी पेरणारी विचारधारा विस्तारते आहे. ज्यांचे राजकारण जात व समाजावर आधारलेले आहे अशी राजकीय मंडळी सतत अस्वस्थ आहे. समाज आधारित पक्षीय राजकारण आणि संघटीत झुंडशाही निर्धारित राजकारण असे दोन्ही कार्ड वापरुन सुध्दा गावपातळी पासून तर मंत्रालयापर्यंतची सत्ता मिळू शकत नाही अशा आगतिकतेतून ब्राह्मणांच्या द्वेषाच्या अनेक जागा शोधल्या जात आहेत. याच द्वेषाची किनार दशक्रिया चित्रपट सादर व्हावा या भूमिके मागे असावी ?

Thursday, 9 November 2017

मैत्रिच्या मण्यांमधील धागा ...

अनिल जोशी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे अभीष्टचिंतन करताना मैत्रीतील दोन- चार गोष्टी लिहायची मनस्वी इच्छा आहे. सन १९९२ पासून अनिल आणि मी घट्ट मित्र आहोत. बहुतांश गोष्टी आम्ही एकमेकांकडे शेअर करतो. तरीही अरे - तुरेचे नाते काही आमच्यात निर्माण झाले नाही. याचे कारण म्हणजे, अनिल यांनी  व्यक्तिशः माझा आदर करणे कधीही सोडले नाही. नोकरीत शिकाऊ असल्यापासून आम्ही सहकारी होतो. वयाने मी मोठा असल्याने अनिल यांना दरडावण्याचा अधिकार मी खूप वेळा वापरला मात्र, अनिल यांनी प्रत्युत्तर न देता नेहमी आदरच केला. नंतर मान सन्मानाच्या पदावरही दोघांनी सोबत काम केले. अनेकवेळा अनिल आणि माझ्यात विवादाचे विषय आले. मी वेळप्रसंगी टोकाचा वागलो. पण अनिल यांनी संभाव्य वाद नेहमी जेवणाच्या टेबलावर मिटवला.

Friday, 3 November 2017

खिचडीची सुध्दा अफवा शिजली !

केंद्र सरकारचा अन्न व प्रक्रिया उद्योग खिचडीला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करणार अशी अफवा सोशल मीडियात मागील आठवड्यात शिजली. सोशल मीडियात चाललेला खिचडीचा हा दिशाभूल करणारा ट्रेण्ड केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या ट्विटरवरील खुलाशामुळे अफवा असल्याचे सिध्द झाला. बादल यांनी स्पष्ट केले की, येत्या ४ नोव्हेंबर रोजी खाद्यदिन साजरा होत आहे. त्या अनुषंगाने मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्याचा दर्जा दिला जाणार असे माध्यमांमधील प्रसारित वृत्त निखालस खोटे आहे. खिचडीला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी वर्ल्ड फूड इंडिया (WorldFoodIndia) या महोत्सवात सुप्रसिध्द शेफ मंडळी खिचडीचा स्वाद या महोत्सवात सादर करणार आहेत. एक प्रकारे हा महोत्सव म्हणजे खिचडी महोत्सव आहे.