 |
किशोर राजे निंबाळकर |
लेखाचे शिर्षक वाचून अनेकांना वाटेल, हे काय खूळ आहे. प्रत्येकाला कलेक्टर किशोर राजे निंबाळकर
कसे होता येईल ? कलेक्टर होणे एवढे सोपे आहे का ? हे
दोन्ही प्रश्न रास्त आहे. पण, स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होवून अमर्याद अधिकार
असलेला कलेक्टर होणे फारसे अवघड नसले तरी अधिकारांचे उच्च पदस्थ
बुजगावणे व्हायचे की अधिकारांचा समाजासाठी वापर करीत माणूस व्हायचे याचा निर्णय
प्रत्येकाला घेता येणे शक्य आहे. लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी म्हणून प्रचंड अधिकार प्राप्त असले तरी सामान्य माणसासाठी लोकसेवकाच्या मानसिकतेतून माणूस होणे फारच
थोड्यांना साधते. तसे ते जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना साधले
आहे. “माणूस असलेला अधिकारी” अशी ओळख राजे निंबाळकर यांनी निर्माण केली आहे.
 |
मंगल विवाहात वधूपिता |
एरंडोल तालुक्यातील राजेश पाटील हे आयएएस होवून कलेक्टर झालेले असेच एक माणूस
अधिकारी. खडतर आयुष्यावर मात करीत राजेश पाटील कलेक्टर झाले. त्यांनी या प्रवासाविषयी “ताई मी कलेक्टर व्हयनू ...” हे पुस्तकही लिहले आहे. राजेश पाटील यांचे आत्मकथन हे अधिकारापर्यंत
पोहचण्याचा प्रवास आहे. मात्र, मिळालेले अधिकार हे माणूस होवून माणसांपर्यंत
पोहचविण्याची आँखोदेखी म्हणजे, राजे निंबाळकरांचा आदर्श आहे.
 |
लोकशाहीदिनी तक्रारदाराजवळ जावून तक्रार ऐकणे |
पत्रकार म्हणून काम करताना २५/२६ वर्षांत किमान १०/१२ कलेक्टर पाहिले. त्यातील
३/४ नावे स्मरणात आहेत. उमेशचंद्र सरंगी (नाशिक), विद्याधर कानडे, अजयभुषण पांडे आणि विजय सिंघल हे तिघेही जळगावला होते. इतरांचा फारसा संपर्क नव्हता. या अधिकाऱ्यांची सामान्य लोकांसाठी कार्य
करण्याची शैली लक्षात राहिली. उमेशचंद्र सरंगी प्रशासनावर पकड ठेवून होते. विद्याधर कानडे राजकीय संतुलन राखून कामे करीत. अजयभुषण पांडे कर्तव्य कठोर होते. विजय सिंघल यांनी
नदीजोड कार्यक्रमाला चालना दिली.
 |
वॉर्डात जावून घाणीची पाहणी |
जळगाव जिल्ह्यास भास्कर पाटील हेही कलेक्टर म्हणून लाभले होते. त्यांचे नावही लोकाभिमुख
अधिकारी म्हणून घेतले जाते. त्यांच्याच नावाने जळगाव शहरात भास्कर मार्केट तयार
झाले. असे भाग्य लाभलेले ते बहुधा ते एकमेव अधिकारी असावेत.
वरील सर्वांच्या नावानंतर आणि बराच प्रशासकीय काळ उलटल्यानंतर जळगाव जिल्ह्यात
किशोर राजे निंबाळकर यांच्या कार्याचा बोलबाला आहे. अधिकारी म्हणून राजे निंबाळकर
यांची ओळख आहेच पण अधिकार हे सामान्य लोकांसाठी राबवायचे असतात याचा कृतिशील परिचय
राजे निंबाळकर यांनी घडवून दिला आहे. वरील इतर
अधिकाऱ्यांची नावे घेतलेली असली तरी त्यांचे कार्य हे कलेक्टरच्या कॅबिनमध्ये बसून
झालेले आहे. राजे निंबाळकर यांना ओळख मिळाली ती “रस्त्यावरचे कलेक्टर” म्हणून. वॉर्डांची पाहणी करणारे, मार्केंटमध्ये जावून कचरा उचलायला लावणारे व
अतिक्रमण हटवताना स्वतःच अनधिकृत मंदिर पाडणारे अधिकारी म्हणून राजे निंबाळकर
यांना जळगाव ओळखते.
 |
सातबाराचे चावडीवाचन |
राजे निंबाळकर कर्तव्य कठोर किंवा तत्पर अधिकारी आहेतच. पण, मला त्यांचे
अधिकारी असूनही माणुसकी निभावणारे वर्तन अधिक भावते. गेल्या तीन-चार महिन्यांतील अनेक कार्यक्रमांतून राजे
निंबाळकरांचे अधिकारांच्या कवचातील माणुसपण अधोरेखित झाले आहे. रोटरीतर्फे आयोजित मंगल विवाह, शहरातील व्यापारी गाळ्यांची स्वच्छता, लोकशाहीदिनी
वयोवृध्दांपर्यंत जाणे, स्वच्छता अभियान दरम्यान कलेक्टर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केळी देणे, रेल्वेची कंपाऊंड वॉल पाडणे असे अनेक विषय आहेत. एड्सग्रस्त मुलांना जेवण देणे आणि सिनेमा दाखविणे हे विषय प्रलंबित आहेत. राजे निंबाळकरांनी पूर्वीही अधिकारी म्हणून इतरत्र कार्य
केले आहे. तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
 |
गोलाणीतील घाणीची पाहणी |
राजे निंबाळकर घराण्याला फलटणचा वारसा आहे. तेथील
सरदरांचे घराणे इतिहासात प्रसिद्ध. किशोर राजे निंबाळकर शिरूर (जि. पुणे) येथील. त्यांचे शिक्षण बी. एस्सी. ऍग्री आहे. १९८७ मध्ये स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होवून ते सरकारी
सेवेत आले. अक्कलकोट येथे
तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. नंतर सोलापूरला दोन वर्षे प्रांताधिकारी, त्यानंतर पंढरपूरला प्रांताधिकारी होते. पुढे पिंपरी चिंचवड (जि. पुणे) मनपात जकात अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
 |
रेल्वेची कंपाऊंड वॉल पाडली |
त्यानंतर माजी मंत्री तथा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे खासगी सचिव व उपसचिव होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांचेही सचिव होते. राज्य सीमा दलाचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम त्यांनी केले. ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अल्पावधीत काम केले. वरील सर्व पदांवर असताना राजे निंबाळकर यांनी प्रशासकिय कामांचा आदर्श
निर्माण केला. यातला बराच भाग यापूर्वी प्रसिद्ध झाला आहे. पण, राजे निंबाळकर
यांच्यातील माणूस असलेला अधिकारी अस्तित्वात ठेवण्याचे कार्य त्यांच्या अध्यात्मिक
व वैचारिक संतुलनाने केले आहे.
 |
नाट्यगृहाची दर सोमवारी पाहणी |
अक्क्लकोट, पंढरपूर येथे काम करताना राजे निंबाळकर यांनी तेथील देवस्थानांसाठी
विविध योजना राबविल्या. दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी ते जातात.
त्यांचे वडीलही वारकरी आहेत. निंबाळकर घराणे वतनदार किंवा जहागिरदार असले तरी
विठ्ठलाचे वारकरी आहेत. राजे निंबाळकरांचे वडील आजही मुलास रोज रात्री फोन करुन
विचारतात, “जेवलास का, घऱी आलास
का ?” आणि रात्री १० पर्यंत कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेले राजे निंबाळकर वडीलांना
म्हणतात, “हो जेवलो आहे, आता घरी आहे.”
 |
शेतकऱ्यांशी जमिनीवर बसून चर्चा |
राजे निंबाळकरांनी मंत्रालयस्तरावर विविध प्रकारची कामे केलेली असल्यामुळे
तेथील अनेक विभागातील अधिकारी मंडळी त्यांचे थेट मित्र आहेत. याच मैत्रिचा उपयोग
विविध प्रकारच्या कामांना गती देण्यासाठी होतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, जळगाव
येथील बंदीस्त नाट्यगृहाच्या रेंगाळलेल्या कामाला राजे निंबाळकर यांनी दिलेली गती.
या नाट्यगृहातील वीजेच्या जोडणीचे काम जोखमीचे आहे. या कामाचा ठेका घेणारा ठेकेदार
नखरे करीत होता. राजे निंबाळकरांनी त्याला काम सुरू करायला “हाग्या” दम भरला. एवढेच नव्हेतर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास थेट संपर्क करुन या
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची सूचना करुन टाकली. जेव्हा हे सारे त्या
ठेकेदाराला कळले तेव्हा कुठे कामाने गती घेतली. आताही दर सोमवारी सायंकाळी राजे निंबाळकर तेथील
कामाचा आढावा भेट देवून घेतात.
 |
आमदार, महापौरांच्या सहकार्याने मंदिराचे अतिक्रमण हटाव |
राजे निंबाळकर यांची शेती आहे. अत्याधुनिक शेती
तंत्राचा वापर त्यांनी केला आहे. गावाकडे गेल्यावर शेतात चक्कर टाकणे होतेच. शिरुर
गावात किशोर राजे निंबाळकर यांना मानणारा व काम करणाऱ्या लोकांचा समुह आहे. त्यामुळे
ती मंडळी ग्रामपंचायत, तालुका पंचायत समितीत काम करताना राजे निंबाळकरांचा सल्ला
घेतात. अर्थात, निंबाळकर घराणे जहागिरदार असल्यामुळे आजही तेथील काही विषयांवर
चर्चेसाठी राजे निंबाळकरांच्या निवासस्थानी परिसरातील लोक येतात. राजे
निंबाळकरांच्या अधिकारी असण्यातील माणुसकी याच गोष्टींमुळे टीकून आहे.
 |
गुजरालपंपचौक विस्तारासाठी पाहणी |
अध्यात्माच्या वैचारिक
बैठकीबरोबर माणसाने इतरांचे चांगले ऐकण्याची सवय करायला हवी. ती राजे निंबाळकर
यांना आहे. त्यांना गाणी ऐकण्यासोबत नाट्यसंगीत ऐकण्यात
रुची आहे. त्यांची अनेक मराठी गाणी तोंडपाठ आहे. ठेका कुठे धरायचा आणि कुठे
सोडायचा याचे भान राजे निंबाळकर यांना आहे. अशा प्रकारचा “
हेका”
व्यवहारातही धरणे आणि सोडणे अधिकारी वर्गाला वेळीच जमायला हवे.
 |
जिल्हा रुग्णालयात पाहणी |
राजे निंबाळकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देताना
त्यांच्यातील माणूस असलेला अधिकारी यावर लिहावे असे मला वाटले. नोकरी व्यवसायाच्या
उंबरठ्यावर असलेल्या युवकांनी कोणाकडून काय शिकावे ?
याचा नेहमी विचार करायला हवा. प्रशासकिय सेवांमध्ये जाण्याची इच्छा युवकांनी
जरुर बाळगावी. पण, सरकारी अधिकारी होण्याचा आदर्श कोणाचा घ्यावा असा जेव्हा प्रश्न
समोर असेल तर प्रत्येकाने म्हटले पाहिजे, “
मला राजे निंबाळकर व्हायचे आहे ...”
मेने आज तक सर्वाधिक तारीफ सुनी है ,तो वर्तमान जिलाधीश निंबालकर साहब की।प्रत्यक्ष संम्पर्क का काम भी 3 बार पडा।तुरंत निर्णय,विवाद सुनने के बजाय काम निपटाने पर जोर, स्वयम व्यक्तिगत रूप से ध्यान देकर काम करना, कडक अनुशासन कितने ही गुणो की झलक मिली।लेकिन यह केवल मेरा अनुभव ही नही था।अनेक लोग जो उनके समपर्क मे आए सभी ने अनेक तरह से उनकी कार्यशैली की तारीफ की।हम जलगाववाशी भाग्यशाली है कि हमे ऐसे जिलाधिकारियों मिले।भगवान उन्हें लंबी उम्र दे ,स्वस्थ्य रखे।
ReplyDeleteअंजनी कुमार मुंदड़ा जलगाव सचिव, लघु उद्योग भारती
मेने आज तक सर्वाधिक तारीफ सुनी है ,तो वर्तमान जिलाधीश निंबालकर साहब की।प्रत्यक्ष संम्पर्क का काम भी 3 बार पडा।तुरंत निर्णय,विवाद सुनने के बजाय काम निपटाने पर जोर, स्वयम व्यक्तिगत रूप से ध्यान देकर काम करना, कडक अनुशासन कितने ही गुणो की झलक मिली।लेकिन यह केवल मेरा अनुभव ही नही था।अनेक लोग जो उनके समपर्क मे आए सभी ने अनेक तरह से उनकी कार्यशैली की तारीफ की।हम जलगाववाशी भाग्यशाली है कि हमे ऐसे जिलाधिकारियों मिले।भगवान उन्हें लंबी उम्र दे ,स्वस्थ्य रखे।
ReplyDeleteअंजनी कुमार मुंदड़ा जलगाव सचिव, लघु उद्योग भारती
मेने आज तक सर्वाधिक तारीफ सुनी है ,तो वर्तमान जिलाधीश निंबालकर साहब की।प्रत्यक्ष संम्पर्क का काम भी 3 बार पडा।तुरंत निर्णय,विवाद सुनने के बजाय काम निपटाने पर जोर, स्वयम व्यक्तिगत रूप से ध्यान देकर काम करना, कडक अनुशासन कितने ही गुणो की झलक मिली।लेकिन यह केवल मेरा अनुभव ही नही था।अनेक लोग जो उनके समपर्क मे आए सभी ने अनेक तरह से उनकी कार्यशैली की तारीफ की।हम जलगाववाशी भाग्यशाली है कि हमे ऐसे जिलाधिकारियों मिले।भगवान उन्हें लंबी उम्र दे ,स्वस्थ्य रखे।
ReplyDeleteअंजनी कुमार मुंदड़ा जलगाव सचिव, लघु उद्योग भारती
खूप खूप अभिनंदन दिलीपजी... एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नेमक्या शब्दात गुणवर्णन केले आहे...आणि आदरणीय किशोर राजे आपल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा... आपल्या कार्यकर्तुत्वाची अनेकांना प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.... डॉ मुकुंद करंबेळकर आणि रंगगंध परिवार
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन सर ... एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नेमक्या शब्दात गुणवर्णन केले आहे...आणि आदरणीय किशोर राजे आपल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा... आपल्या कार्यकर्तुत्वाची अनेकांना प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.
ReplyDeleteकिशोर राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
ReplyDeleteदिलीपजी श्री निंबाळकर साहेबांचा मोजक्या शब्दात परिचय करुन दिला आहे,विजय पवार,जिल्हा माहिती अधिकारी(निवृत्त) नासिक
Really he is a good person and making the decision on spot....
ReplyDeleteCollector sir we admire you
ReplyDeleteHappy Birthday 🎉 sir
Dilipji damdar article 👍
श्री किशोरराजे निंबाळकर साहेबयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !मंगल परदेशी जळगाव
ReplyDeleteश्री किशोरराजे निंबाळकर साहेबयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !मंगल परदेशी जळगाव
ReplyDeleteसच्चा अधिकारी, आदरणीय कलेक्टर साहेब किशोरराजे निंबाळकर!
ReplyDeleteआपण आपल्या कार्यातील कुशलतेतून करित असलेल्या जळगाव शहराच्या कायापालट कार्याला त्रिवार सलाम, आपले कार्य हे जळगावकर कायम स्मरणात ठेवतील, मला वाटते आपण शिक्षणासोबत खऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने करावयाच्या कृतीशील कार्याचे ज्ञान आत्मसात केलेले आहे, आणी त्यामुळेच आपल्यातील कर्तव्यपारायणता सामान्य जनमाणसांना भावते, तसे पाहीले तर प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांचा कर्तव्याची प्रामाणीक जाणीव मनात जागृत केल्यास कुणाही एकाच प्रामाणिक अधिकाऱ्यावर येणारा अतिरिक्त भार नक्कीच कमी होईल.
आपल्यातील कर्तव्यनिष्ठता आम्हा जळगावकरांना एक नवी दिशा व दृष्टीकोन देणारी ठरलेली आहे, माणसातील अधिकारी ऐवजी अधिकाऱ्यातील माणूस म्हणून तुम्ही आमचात सामील झालेले आहात, तुमचा कार्याला आमचा सलाम!!
तुम्हाला वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा !!!
मा. दिलीपजी आपण अत्यंत मोजक्या शब्दात मा. कलेक्टर साहेंबांचा आतापर्यंतचा जिवनप्रवासाची माहीती उपलब्ध करुन दिली तसेच त्यांचाबद्दलचे आमचा मनातील विचार प्रकट करण्यासाठी संधी उपलब्ध केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन व आभार! धन्यवाद.
(एक विनंती - जर सदरिल विचार मा. कलेक्टर सरांपर्यंत पोहचणार असतील तर त्यांनी कृपया एकदा रामेश्वर कॉलनी परिसरात भेट द्यावी, कदाचित त्यांचा पदस्पर्शाने या परिसराचा नक्कीच माणसांचा वस्तीसाठी लागणाऱ्या सुविधांची उपलब्धता होईल असा विश्वास आहे.)
संजय आर. जगताप, जळगाव
मो. 7020165491
कलेक्टर साहेब जेव्हा उद्योजकान सोबत पहिल्या मिटींगमध्ये आले व आलेल्या सर्व उद्योजकास सुरुवातीला सांगितले की आपल्याला जे चांगले काम सुरू करावयाचे आहे त्यावरच बोलुया. तेव्हाच साहेबानी आम्हाला जिकुन घेतले.साहेब फक्त सकारात्मक विचार करीत असतात.
ReplyDeleteआदरणीय श्री किशोरजी राजे निबाळकर आपणास ईश्वर निरोगी व दिर्घ आयुष्य प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
श्री विकास डिगबर महाले
महावीर शेगदाणा तेल
महाले इड.
डी 98
एम आय डी सी
जळगाव 425003
|| जीवेत शरद: शतम ||
ReplyDeleteश्री किशोरराजे निंबाळकर साहेबयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!💐🎂
ReplyDelete